आता पार्टी मेकअप घरबसल्या करता येईल

* गृहशोभिका टीम

तुम्हाला हे माहित असेलच की मेकअप तुमची व्यक्तिमत्व वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. योग्य माहिती असल्यास पार्टी मेकअप घरबसल्या करता येईल. पार्टी मेकअप म्हणजे फक्त ब्युटी पार्लर असा नाही आणि जर तुमचे व्यक्तिमत्व फुलणार असेल, तर तुमचा आत्मविश्वासही वाढेल. त्यामुळे मेकअपकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही.

पार्टीसाठी तयार होत असताना प्रत्येक स्त्रीला वेगळं आणि सुंदर दिसायचं असतं. मेकअप हा त्याचा एक टप्पा आहे. तुमचे सौंदर्य वाढवण्यासोबतच ते तुमचा लुक अधिक आकर्षक बनवते.

योग्य प्रकारे केलेला मेक-अप तुमचा चेहरा चुंबकासारखा बनवतो की एकदा नजर गेली की तो आपली दृष्टी हिरावून घेऊ शकणार नाही.

पण, पार्टीत मेकअप कसा करायचा याबाबत अनेकदा पेच निर्माण होतो. आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगतो की अधिक मेकअप हा सौंदर्य प्राप्त करण्याचा मार्ग नाही. योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात केलेला मेकअप केवळ तुमचा लुक सुधारण्यास मदत करतो. जोपर्यंत घरी स्वतःचा मेकअप करण्याचा प्रश्न आहे, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य उत्पादने निवडणे. चांगली आणि योग्य उत्पादने आपल्याला इच्छित स्वरूप प्राप्त करण्यात मदत करतील.

चेहरा मेकअप

मेकअपच्या माध्यमातून तुमच्या चेहऱ्याची निखारता वाढवण्यासाठी सर्वप्रथम चेहऱ्याला क्लिंजिंगने पूर्णपणे स्वच्छ करा. नंतर टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करा. त्यानंतर कन्सीलर लावा. कन्सीलर चेहऱ्यावरील डाग लपवण्यास मदत करते. त्यानंतर फाउंडेशन लावा. लक्षात ठेवा की फाउंडेशन त्वचेच्या रंगाशी जुळले पाहिजे. चमकदार लुक देण्यासाठी क्रीम ब्लशर लावा. यानंतर फेस पावडर लावून नैसर्गिक बेस बनवा.

डोळा मेकअप

डोळ्यांवर गडद मेकअप रात्रीच्या पार्टीसाठी आकर्षक बनवतो. दिवसा लाईट शेड्स असलेल्या आयशॅडो वापरा. लावण्यापूर्वी, वरच्या झाकणांवर हलक्या ब्रशने आळीपाळीने फाउंडेशन आणि लूज पावडर लावा, तसेच डोळ्याच्या पेन्सिलने वरच्या झाकणांवर एक पातळ रेषा काढा आणि ब्रशने पसरवा, जेणेकरून पापणी मोठी दिसेल. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की थकलेल्या डोळ्यांवर जास्त किंवा गडद मेकअप करायला विसरू नका.

हेअरस्टाईल काहीतरी खास आहे

मेकअप व्यतिरिक्त, तुमची हेअरस्टाइलदेखील खूप महत्वाची आहे. हेअरस्टाइलमध्येही तुम्ही काहीतरी नवीन ट्राय करू शकता. लूज कर्ल्स आणि रोमँटिक अपडेट्ससह केसांना स्टायलिश लुक देण्याचा ट्रेंड असेल. यासोबतच कमी किंवा जास्त घट्ट पोनीटेल पुन्हा फॅशनमध्ये आहे.

ओठ मेकअप

ओठ पातळ दिसण्यासाठी, ओठांच्या आतील बाजूस म्हणजेच आतील बाजूस लिपस्टिकच्या शेडशी जुळणारे लिप लाइनर वापरा. गडद सावली अजिबात वापरू नका आणि लिपग्लॉसचा एकच कोट लावा. याउलट ओठ दाट दिसण्यासाठी ओठांच्या बाहेरील कडांना लिप लाइनर लावा. लिपस्टिकची कोणतीही समृद्ध शेड लावा आणि लिपग्लॉसच्या मदतीने वरच्या आणि खालच्या ओठांमधील क्षेत्र हायलाइट करा.

मग उशीर व्हायला काय हरकत आहे? तुम्ही पार्टीला जाण्यासाठी तयार आहात.

ट्रेंडी आय मेकअपने मास्कमध्येदेखील दिसा सर्वात वेगळे

*  मेकअप आर्टिस्ट शालिनीसोबत मनीषा जनमेजय यांच्याशी केलेल्या बातचीतवर आधारित

कोरोना व्हायरसच्या दरम्यान फेस मास्क एक आवश्यक बाब बनली आहे. आपण सर्वजण मास्कचा वापर करतो, परंतु याचा अर्थ असा नाही की स्त्रियांनी मेकअप करणं सोडून द्यावं. ज्या महिलांनी मास्कमुळे मेकअप करणं सोडलं आहे, त्यांनी आता नाराज होऊ नये. मास्कमुळे नक्कीच नाक आणि तोंड कव्हर होतं, परंतु आपले दोन प्रिय डोळे तर आहेत ना, जे कोणत्याही व्यक्तीच सौंदर्य व्यतीत करतं. तुम्ही तर ऐकलेच असेल की डोळेदेखील मनातील बोलतात. मग काय तुम्ही तुमच्या डोळयांचा मेकअप अशा प्रकारे करा की तुमच्या मनातील गोष्ट मुखाने न बोलता डोळे बोलतील. अशावेळी तुमच्या आय मेकअपवर लक्ष देऊन तुम्ही मास्कमध्येदेखील तुमचा लुक परफेक्ट बनवू शकता.

आयशॅडोसोबत अट्रॅक्टिव्ह लुक

आयशॅडोचा वापर करण्यापूर्वी आयलिडवर प्रायमरचा वापर करा. प्रायमर तुमच्या आयशॅडोला दीर्घकाळ टिकवून ठेवण्यात मदतनीस ठरेल. यानंतर कन्सीलरचा वापर करा. ड्रेसच्या कलरला मॅच करणारं आयशॅडो लावा. आयब्रशने व्यवस्थित पसरवा. तुमच्या पूर्ण आयलिडवर एक सिंगल कलर अॅप्लाय केल्यामुळे तुम्हाला क्लासिक लुक देतं. जर तुम्ही आयशॅडोवर मल्टिपल कलर्स वापरत असाल तर त्यांना एकत्रित ब्लँड करायला विसरू नका. आजच्या ट्रेंडमध्ये ग्लिटरी स्मोकी, डबलशेड आयशॅडो लुक अधिक ट्रेंडी आहे.

आयलॅशेज

जर तुम्हाला वाटतं की तुमच्या पापण्या अधिक दाट आहेत तर बाजारात उपलब्ध चांगल्या ब्रँडच्या आर्टिफिशील आयलॅशेज वापरू शकता. पापण्यांना व्यवस्थित स्टिक करा म्हणजे मेकअपनंतरदेखील त्या निघणार नाहीत.

आयलायनरचा करा वापर

आयलायनर सामान्य डोळयांनादेखील अट्रॅक्टिव्ह बनवतं. म्हणून जेव्हा आयलायनर लावायला सुरुवात कराल तेव्हा वर आयलॅश लाइनच्या मध्यावरून लायनर लावा. शक्य होईल तेवढं लायनर ब्रशला आपल्या आयलॅशेजच्या जवळ ठेवा. असं केल्यामुळे तुम्ही बाहेरच्या कोनापर्यंत सहजपणे लावू शकाल. तुम्ही वॉटरप्रुफ आयलायनर वापरू शकता.

पापण्यांना करा कर्ल

डोळयांना अधिक आकर्षक बनविण्यासाठी तुम्ही तुमच्या पापण्यांना कर्लदेखील करू शकता, कारण हे पापण्यांच्या सौंदर्यासाठी खूपच गरजेचे आहे. नेहमी मस्करा लावण्यापूर्वी पापण्यांना कोंब करा. यामुळे मस्करा व्यवस्थित लावला जाईल, त्याचबरोबर तुमच्या पापण्यादेखील दाट दिसतील.

आयब्रोजनादेखील द्या नवीन लुक

आयब्रोची रेषा व्यवस्थित दिसण्यासाठी बारीक आयब्रो पेन्सिलचा वापर करा. एक गोष्ट लक्षात ठेवा की आयब्रो पेन्सिलचा वापर हलक्या हाताने वरच्या दिशेने करा आणि कधीही मागे फिरवू नका.

स्मोकी आयमेकअप

स्मोकी आय मेकअपसाठी डोळयांवर अगोदर ब्लॅक काजळ आणि आयलायनर लावा. यानंतर ब्लॅक आणि ब्राऊन आयशॅडो एकत्रित मिसळून आयलिडवर लावा. कॉपर कलरने हायलाईटींग करा आणि वरच्या खालच्या पापण्यांवर मस्कारा लावा.

हे आयमेकअप टिप्स फॉलो करून तुम्ही मास्कमध्येदेखील आकर्षक दिसून याल. मग उशीर काय करता आजपासूनच या मेकअप टीप्सचा वापर करा.

Diwali Special: या दिवाळीत तुमच्या डोळ्यांना ही अनोखी भेट द्या

* गृहशोभिका टीम

या दिवाळीच्या सणाला तुमचे डोळेही सुंदर दिसावेत म्हणून तुम्ही तुमचे डोळे भेट देऊ इच्छिता? आम्ही तुम्हाला डोळ्यांच्या मेकअपसाठी काही खास टिप्स सांगणार आहोत.

प्रत्येक मुलीला डोळ्यांचा मेकअप करायला आवडतो. डोळ्यांचा मेकअप करूनच चेहऱ्यावर सौंदर्य आणता येते. या दिवाळीत, जेव्हा तुम्ही तयार असाल, आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या डोळ्यांचा मेकअप करा, तुमचा चेहरा नक्कीच सुंदर दिसेल.

अनेक लोक डोळ्यांचा मेकअप करणे आवश्यक मानत नाहीत किंवा ते चुकीच्या पद्धतीने मेकअप करतात. समजा त्यांचे डोळे खूप लहान आहेत आणि ते हलका मेकअपदेखील करतात, अशा परिस्थितीत, डोळे सुंदर दिसत नाहीत किंवा ते मोठ्या डोळ्यांवर भारी मेकअप करतात, ज्यामुळे ते लहान दिसू लागतात.

डोळ्यांचा मेकअप ही एक कला आहे जी शिकण्यासाठी ज्ञान आणि वेळ दोन्ही आवश्यक आहे. या दिवाळीत डोळे कसे सजवायचे ते जाणून घेऊया.

  1. तपकिरी आणि गुलाबी सावलीत डोळ्यांचा मेकअप करा. त्यामुळे डोळ्यात सहजता येईल आणि नाटकही दाखवले जाईल. तुम्हाला फक्त काळजी घ्यावी लागेल की तुम्ही ते जास्त करू नका.
  2. क्लासिक विंडेज आयलाइनर आणि न्यूट्रल आयशॅडोने डोळे सुंदर बनवता येतात. तुम्ही पापण्यांवर जाड लायनर लावा आणि मस्कराही लावा.
  3. जांभळा, चांदी आणि कांस्य या तीन शेड्स जेव्हा तुम्ही मेकअप टूल्स म्हणून वापरता तेव्हा ते एक उत्कृष्ट लुक देतात.
  4. सबस्टेल रोझ गोल्ड आयशॅडो डोळ्यांवर छान दिसते. यावेळी जर तुम्ही पूजेदरम्यान अनारकली सूट घालणार असाल तरच लावा. माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचे डोळे बोलतील.
  5. हा रोझ गोल्डपेक्षा थोडासा ठळक मेकअप असेल. त्याला हॅलो आयशॅडो असेही म्हणतात. आयशॅडोसाठी गडद गुलाबी शेड आणि डीप गोल्ड शेडचा वापर करता येईल.
  6. जर तुम्हाला मेकअपमध्ये थोडे धाडस आणि ट्विस्ट आवडणार असेल, तर तुम्ही चमकदार किरमिजी रंगाचा आयशॅडो लुक वापरून पाहू शकता. हा लुक देताना लिपस्टिकप्रमाणे लावा आणि नंतर त्याच रंगाची लिपस्टिक ओठांवर लावा.
  7. ही शॅम्पेन गुलाबी आयशॅडो डोळ्यांना फुलांचा लुक देते. जर तुम्ही पूजेदरम्यान या रंगाचा ड्रेस घालणार असाल तर हा मेकअप तुम्हाला खूप शोभेल.

टॉप ५ कलरफुल मस्कारा शेड्स

* पूनम पांडे

आयलाइनर आणि आयशॅडोच नव्हे, तर मार्केटमध्ये यलोपासून ब्लूपर्यंत आणि पिंकपासून ते ग्रीन शेड्सपर्यंत मस्काऱ्याच्या कलेक्शनमध्ये काही कमी नाहीए. अशा वेळी आपणही नेहमी ब्लॅक किंवा ट्रान्सपरन्ट शेड्सचा वापर करून कंटाळला असाल, तर एकदा कलरफुल मस्कारा जरूर ट्राय करा. मस्काऱ्याच्या कलरफुलल शेड्स डोळयांना मोठा आणि ब्राइट लुक देतात. ब्लॅक मस्काऱ्याच्या तुलनेत हे जास्त आकर्षकही दिसतात. अर्थात याची निवड करताना आपल्या त्वचेबरोबरच डोळयांचा रंग नीट लक्षात घ्या.

1 ब्लू मस्कारा

जर आपल्या डोळयांचा रंग ग्रे, ब्राउन किंवा लाइट ग्रीन असेल, तर आपण आपल्या वॅनिटी बॉक्समध्ये ब्लू शेड्सचा मस्कारा ठेवू शकता. मार्केटमध्ये ब्लूच्या अनेक शेड्चा मस्कारा उपलब्ध आहे. उदा. रॉयल ब्लू, नेव्ही ब्लू, सी ब्लू इ. ब्लूच्या या सर्व शेड्स फेअर कॉम्प्लॅक्शनच्या महिलांनाच नव्हे, तर डार्क आणि मीडीअम कॉम्प्लॅक्शन असलेल्या महिलांनाही सूट करतात. मात्र ब्लू शेड्चा मस्कारा नाइटऐवजी डे पार्टीतच जास्त खुलून दिसतो.

2 ग्रीन मस्कारा

डार्क ब्राउन शेड्सच्या डोळयांना ग्रीन शेड्सचा मस्कारा खूप छान दिसतो. स्किनटोनबाबत बोलायचे झाल्यास ब्लूप्रमाणेच ग्रीन कलरचा मस्काराही डार्क, फेअर, मीडीअम अशा सर्व स्किनटोनवर खुलून दिसतो. आपला ग्रीन मस्कारा अधिक खुलून दिसावा अशी आपली इच्छा असेल तर जेव्हाही ग्रीन कलरचा मस्कारा लावाल, तेव्हा त्यासोबत डार्क कलरचा आयशॅडो किंवा आयलाइनर लावायची चूक करू नका, अन्यथा डार्क शेड्पुढे आपला रंग फिका पडेल.

3 ब्राउन मस्कारा

ब्लॅक रंग वापरल्यानंतर लगेच कलरफुल मस्कारा वापरायला कचरत असाल, तर ब्राउन मस्काऱ्यापासून सुरुवात करा. हा ब्लॅक शेड्पेक्षा थोडा लाइट असतो. मात्र याचा इफेक्ट बराच नॅचरल दिसतो. मीडीअम आणि फेअर कॉम्प्लॅक्शन असलेल्या महिलांबरोबरच ब्राउन डोळयांच्या महिलांवरही ब्राउन शेड्चा मस्कारा खूप सुंदर दिसतो. हा पार्टी, फंक्शनसोबतच नेहमीही वापरता येईल. हा दिवसा किंवा रात्री दोन्ही वेळी छान दिसतो.

4 गोल्डन मस्कारा

जर तुम्हाला एखाद्या नाइट पार्टीचे आकर्षण बनायचे असेल, तर ग्रीन, ब्लू, पर्पल यासारख्या शेड्सचा मस्कारा सोडून गोल्डन शेड्च्या मस्काऱ्याची निवड करू शकता. हा सर्व प्रकारच्या शेड्च्या डोळयांवर खूप खुलून दिसतो. डार्कपासून ते मीडीअम आणि फेअर स्किनटोनच्या महिलांवरही गोल्डन शेड्चा मस्कारा छान दिसतो. म्हणजेच इतर शेड्स ठेवा अथवा नका ठेवू, पण पार्टीच्या आकर्षणाचे केंद्र बनायचे असेल, तर आपल्या वॅनिटी बॉक्समध्ये गोल्डन शेड् मस्काऱ्याला खास जागा जरूर द्या.

5 पर्पल मस्कारा

जर आपले डोळे छोटे आहेत आणि आपल्याला त्यांना मोठे दर्शवायची इच्छा असेल, तर डोळे बंद करून पर्पल शेड्चा मस्कारा आपल्या मेकअप बॉक्समध्ये जरूर ठेवा. हा ग्रीन, ब्राउन आणि ब्लू कलरच्या डोळ्यांवर जास्त सूट करतो. याच्या खास करून तीन शेड्चा जास्त वापर केला जातो. रॉयल पर्पल, प्लम आणि वायोलेट. जर आपला स्किनटोन डार्क असेल, तर पर्पल शेड्चा मस्कारा खरेदी करा. जर फेअर असाल, तर वायोलेट शेड आणि मीडीअम असेल, तर प्लम शेड् निवडू शकता. नाइटऐवजी पर्पल मस्कारा डे पार्टीमध्ये जास्त आकर्षक दिसतो.

आयलायनरच्या लेटेस्ट स्टाइल

– प्रतिनिधी

नवनवीन फॅशन करून पाहणं आवडत असेल तर रेग्यूलर आयलायनर स्टाइलला बायबाय म्हणून आयलायनरच्या लेटेस्ट स्टाइलला आपलेसे करा. हल्ली आयलायनरच्या कोणकोणत्या स्टाइल टे्न्डमध्ये आहेत हे जाणून घेऊ मेकअप आर्टिस्ट मनीष केरकरकडून :

फ्लोरल आयलायनर

डोळ्यांच्या मेकअपमध्ये सूपर कुल लुक देण्यासाठी फ्लोरल आयलायनर हा एक छान पर्याय आहे. आय मेकअपमध्ये बहुतांशी काळे किंवा ब्राऊन शेडचे आयलायनर अधिकीने वापरले जाते. पण फ्लोरल आयलायनर स्टाईलमध्ये पांढऱ्या रंगापासून पिवळा, गुलाबी, लाल, जांभळा असे बोल्ड शेड्स मोठ्या प्रमाणात वापरले जातात.

या रंगीबेरंगी आयलायनर्सनी पापण्यांवर वेगवेगळ्या फुलांची डिझाइन काढली जाते. म्हणून याला फ्लोरल आयलायनर स्टाइल म्हणतात. पूर्ण पापणीवर किंवा दोन्ही पापण्यांच्या सुरूवातीला किंवा टोकाच्या बाजूला फुलांची डिझाइन काढली जाते. आयलायनरची ही स्टाईल डे पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहे. फ्लोरल डिझाइनला योग्य आकार देण्यासाठी पेन आणि लिक्विड आयलायनरचा वापर करा.

क्रिस्टल आयलायनर

तुमच्या डिझायनर डे्सवर परफेक्ट मॅच होण्यासाठी क्रिस्टल आयलायनर हल्लीच फॅशनमध्ये आले आहे. यासाठी सर्वात आधी काळे, ब्राउन किंवा निळे असे घातलेल्या पेहरावाला मॅचिंग असणारे कोणत्याही एका शेडचे आयलायनर पापणीवर व खालीसुद्धा लावू घ्यावे.

हे व्यवस्थित वाळून सेट झाल्यानंतर आयलायनरच्या जवळ किंवा वर गोल्डन किंवा सिल्वर शेडच्या छोट्या छोट्या टिकल्या ओळीत चिकटवा. यामुळे तुमच्या आयलायनरला क्रिस्टल इफेक्ट मिळेल आणि लाइट पडताच तुमचा आयमेकअप चमकू लागेल. लग्नप्रसंगी किंवा नाईट पार्टी, काही विशेष सोहळ्यांसाठीही क्रिस्टल आयलायनर स्टाइल अतिशय बेस्ट आहे.

स्टिक ऑन आयलायनर

जर तुम्हालाही आयलायनरच्या वेगवेगळ्या शेड्स ट्राय करून पाहायच्या असतील, पण कुठल्याही प्रोफेशनलच्या मदतीशिवाय स्वत: वेगळ्या स्टाइलचा आयमेकअप करायची हिंमत होत नसेल किंवा आयलायनरला योग्य आकार देता येत नसेल तर समजून घ्या की स्टिक ऑन आयलायनर खास तुमच्याचसाठी आहे.

बाजारात उपलब्ध वेगवेगळ्या शेड्स आणि डिझाइनचे स्टिक ऑन आयलायनर लावून तुम्ही तुमच्या आय मेकअपला आकर्षक लुक देऊ शकता. यासाठी तुम्हाला फार काही करायची गरज नाही. फक्त आयलायनर स्टिकर पापण्यांवर योग्य जागी चिकटवायचे असते. स्टिक ऑन आयलायनर दिवसा असणाऱ्या कार्यक्रमांऐवजी रात्रीच्या कार्यक्रमात जास्त आकर्षक व उठून दिसते.

कॅन्डी केन आयलायनर

जर तुम्ही मजा मस्तीच्या किंवा सुट्टीच्या मूडमध्ये असाल व तुमच्या आय मेकअपला तुम्हाला वेगळा लुक द्यायचा असेल तर कॅन्डी केन आयलायनरद्वारे तुम्ही आय मेकअपला कॅन्डी केन लुक देवू शकता. या आयलायनर स्टाइलसाठी तुम्हाला फार काही करायचे नाही. फक्त व्हाईट आणि रेड शेड्च्या पेन्सिल, लिक्विड, पेन आयलायनर जे तुम्हाला आवडेल ते खरेदी करा. मग त्यावर रेड शेडच्या आयलायनरने थोड्या थोड्या अंतरावर तिरक्या रेषा बनवा.

डे पार्टी किंवा गेटटुगेदरमध्ये फंकी लुकसाठी कॅन्डी केन आयलायनर लावू शकता. सुंदर लुक दिसणारे हे कॅन्डी केन आयलायनर तेव्हाच लावा, जेव्हा तुमच्या डे्रसचा रंग व्हाईट आणि रेड असेल.

बबल आयलायनर

जर तुम्ही नेहमीसारखे स्टे्ट आयलायनर लावून कंटाळला असाल तर बबल आयलायनर ट्राय करून पाहा. स्टे्ट आयलायनर प्रमाणेच हे आयलायनरही तुम्ही नेहमी लावू शकता. यासाठी नेहमी वापरण्यात येणारे ब्लॅक आयलायनर नेहमीप्रमाणे स्टे्ट न लावता डॉट डॉट करून बबलप्रमाणे बनवावेत म्हणजे ती सरळ लाईन न दिसता वर खाली दिसू लागेल.

तुम्हाला आवडत असेल तर बबलच्या मधोमध व्हाईट पेन आयलायनरने डॉट बनवून त्याला अधिक आकर्षक लुक देऊ शकता. बबल आयलायनर तुम्ही रोज लावू शकता व दैनंदिन आऊटफिटसोबत ते मॅचसुद्धा होते.

रिबन आयलायनर

स्टे्ट, राऊंड आणि फिश कटशिवाय काही वेगळी आयलायनर स्टाइल ट्राय करायची असेल तर रिबन आयलायनर स्टाइल ट्राय करून पाहा. यासाठी वरच्या पापणीवर ब्लॅक लिक्विड वा जेल आयलायनर लावा. आता खालील पापणीवर ब्लॅक आणि ब्राउन किंवा अन्य एखाद्या शेडचे पेन आयलायनर लावा आणि शेवटच्या टोकाला जाताच वर लावलेल्या ब्लॅक आयलायनरला रिबीनप्रमाणे लपेटून लावल्याप्रमाणे लावा.

रिबन आयलायनर स्टाइल तुम्ही कुठल्याही विशेष प्रसंगी किंवा रेग्यूलर दिवशीही लावू शकता. पारंपरिक कपड्यांपेक्षा वेस्टर्नवर हे स्टायलिश दिसते.

ग्लिटर आयलायनर

ग्लिटर लिपस्टिक, ग्लिटर आयशॅडो आणि ग्लिटर हेअर हायलायटर याबरोबरीनेच सध्या ग्लिटर आयलायनरचीसुद्धा चलती आहे. हे पारंपरिक व वेस्टर्न वेअरवरही सूट होते. हे फक्त वर किंवा वर खाली दोन्ही पापण्यांना लावू शकता. केवळ ग्लिटर आयलायनर किंवा ब्लॅक, ब्राऊन, ब्लू यांसारख्या दुसऱ्या शेडचे आयलायनर लावून त्यावरही ग्लिटर आयलायनर लावू शकता.

सिल्वर, गोल्डन याबरोबरच पिंक, ब्लू, पर्पल, रेड, यलो असे शेड्ससुद्धा या ग्लिटर आयलायनरमध्ये उपलब्ध आहेत. आकर्षक दिसण्यासाठी जेल आयलायनर वापरा. नाईट पार्टी किंवा समारंभात मेकअप हायलाइट करण्यासाठी ग्लिटर आयलायनर स्टाइलहून उत्तम पर्याय असूच शकत नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें