या उत्सवात भीती नाही आनंद आणा

* पारुल भटनागर

सण-उत्सवाचा अर्थ आनंदाचा काळ, परंतु गेल्या वर्षभरापासून कोरोना आपल्यामध्ये राहील्यामुळे आपण सतत आपल्या घरात राहण्यास विवश झालो आहोत आणि जर बाहेर पडलो तरीदेखील अजूनही भीती मनात असतेच. यामुळे लोकांना भेटणं फारसं होतच नाहीए.

आता सणउत्सवात ती एक्साइटमेंटदेखील पहायला मिळत नाही, जी पूर्वी मिळत होती. अशावेळी गरजेचं झालंय की आपण सणउत्सव मोकळेपणाने साजरे करावेत. स्वत:देखील सकारात्मक रहावं आणि दुसऱ्यांमध्येदेखील ही सकारात्मकता निर्माण करावी.

तर चला आपण जाणून घेऊया अशा टीप्सबद्दल ज्यामुळे तुम्ही या सणावारी तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण कसं टिकवून ठेवू शकता :

घरामध्ये बदल करा

सणवार येण्याचा अर्थ घराची साफसफाई करण्यापासून खूप सारी खरेदी करणं, घरातील इंटेरियरमध्ये बदल करणं, घर व स्वत:साठी प्रत्येक अशी गोष्ट खरेदी करणं, जी घराला नवीन लुक देण्याबरोबरच आपल्या जीवनात आनंद आणण्याचेदेखील काम करेल. तर या सणावारी तुम्ही असा विचार अजिबात करू नका की कोण कशाला घरी येणार आहे वा जास्त बाहेर जायचंच नाहीए, उलट असा विचार करुन घर सजवा की यामुळे घराला नवेपणा मिळण्याबरोबरच तर घरात आलेल्या बदलामुळे तुमच्या आयुष्यातील उदासपणा सकारात्मकतेमध्ये बदलेल.

यासाठी तुम्ही जास्त बाहेर पडू नका तर स्वत:च्या क्रिएटिविटीने घराला सजविण्यासाठी छोटया-छोटया वस्तू बनवा वा बाजारातदेखील बजेटमध्ये सजावटीच्या वस्तू खरेदी करू शकता आणि जर तुम्ही बराच वेळापासून घरासाठी काही मोठं सामान विकत घेण्याबद्दल विचार करत असाल आणि तुमचं बजेटदेखील असेल तर या सणावारी त्याची खरेदी कराच. विश्वास ठेवा हा बदल तुमच्या आयुष्यातदेखील आनंद देण्याचं काम करेल.

करा सोबत सेलिब्रेट

सणवार असेल आणि तुमच्या जिवलगांची भेट होत नसेल तर सणावारी तेवढी मजा येत नाही, जी तुमच्या जिवलगांसोबत सेलिब्रेशन करण्यामध्ये येते. या सणावारी तुम्ही सावधानता बाळगून तुमच्या जिवलगांसोबत आनंदाने उत्सव साजरा करा. जर तुम्ही व तुमचे कुटुंबीय हे जिवलग आणि मित्रांसोबत सण साजरा करण्याचा प्लान करत आहात आणि जर ते पूर्णपणे व्हॅक्सिनेटेड असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत योग्य काळजी घेऊन सण साजरा करू शकता. या दरम्यान मोकळेपणाने मस्ती करा. खूप सेल्फी घ्या, भरपूर खूप डान्स करा, पार्टी करा, आपल्या लोकांसोबत गेम्स खेळून आनंदाच्या रात्रीदेखील सजवा.

पार्टीमध्ये एवढी मजा करा की तुमच्या आयुष्यातील सर्व उदासीनता गायब होईल आणि तुम्ही या दिवसांमध्ये केलेली मजा लक्षात राहील, हाच विचार करा की सगळे दिवस असेच असोत. म्हणजेच सेलिब्रेशनमध्ये एवढी मजा असो की तुम्हाला त्याची आठवण येताच तुमच्या चेहऱ्यावर आपोआप समाधानाचं हास्य परतेल.

स्वत:लादेखील रंगांमध्ये रंगवा

तुम्ही सणावारी घर तर सजवलं परंतु सणाच्या दिवशी तुमचा लुक अगदीच साधा असेल तर तुम्हालादेखील उत्सवाची अनुभूती होणार नाही. अशावेळी घर सजविण्याबरोबरच तुमच्या आयुष्यातदेखील रंग भरण्यासाठी आनंदी राहण्याबरोबरच नवीन कपडे विकत घ्या आणि स्वत:ला सजवा म्हणजे तुमच्यामध्ये आलेला नवीन बदल पाहून तुमचादेखील उत्साह वाढेल.

स्वत:ला वाटू लागेल कि तुम्ही सण मनापासून साजरा करत आहात. तुमच्या नवीन आऊटफिट्सवर तुमचा फुललेला चेहरा दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरदेखील हास्य फुलवीण्याचं काम करेल. तुम्ही भलेही कोणाला भेटा वा भेटू नका, परंतु सणावारी नटूनथटून नक्की रहा, कारण हा बदल आपल्या मनामध्ये सकारात्मकता आणण्याचं काम करतं.

भेटवस्तूनी दुसऱ्यांमध्ये आनंद वाटा

जेव्हादेखील तुम्ही सणावारी कोणाच्या घरी जाल वा कोणी तुमच्या घरी येईल तेव्हा तुम्ही त्याला मोकळया हाताने परत पाठवू नका. आपापसात आनंद वाटण्यासाठी भेटवस्तूंची देवाण-घेवाण करा. भलेही भेटवस्तू जास्त महागडी नसेल, परंतु हे मनाला अशा प्रकारे आनंद देईल की याचा अंदाजदेखील तुम्ही लावू शकत नाही.

भेटवस्तू मिळाल्याच्या आनंदापासून ते खोलण्याचा व पाहण्याचा आनंद आपल्याला आतल्या आत उत्तम फिल देण्याचं काम करतं. सोबतच यामुळे कोणत्यातरी स्पेशल डेचीदेखील जाणीव होते. तुम्ही ऑनलाईनदेखील तुमचे गिफ्ट पाठवू शकता. तर मग या सणावारी तुमच्या जिवलगांच्या चेहऱ्यावर भेटवस्तूंनी आनंद आणा.

मिठाईचा आनंद घ्या

जर तुम्हाला सणावारी सणासारखा आनंद घ्यायचा असेल तर या दिवसात बनणाऱ्या पक्वान्नांचा खूप आनंद घ्या. असा विचार करू नका की जर आपण चार दिवस गोड, तळलेलं खाल्लं तर जाडजूड होऊ. उलट या दिवसात बनणाऱ्या प्रत्येक ट्रॅडिशनल फराळाची मजा घ्या. स्वत:देखील खा आणि दुसऱ्यांनादेखील  खायला द्या.

कोरोनामुळे सणउत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत नक्कीच बदल झाला आहे, परंतु तुम्ही सणवार पुरेपूर एनर्जीसोबत साजरे करा, जसे पूर्वी साजरे करत होते. भलेही कोणी नाही आलं तरी तुम्ही तुमच्या लोकांसाठी फराळ बनवा. जेव्हा घरात फराळ बनेल आणि त्यांच्यासोबत तुम्ही एकत्रित बसून खाल तेव्हा सणाची मजा अधिक द्विगुणित होईल.

सजावटीमुळे मिळते सकारात्मकता

जर तुम्ही तुमच्या घरात एकच वस्तू अनेक वर्षापासून पाहून कंटाळला आहात आणि घरात सकारात्मकता आणायची असेल, तर घरात छोटया छोटया गोष्टींमध्ये बदल करा. जसं खोलीमध्ये एकच भिंत हायलाइट करा. यामुळे तुमच्या पूर्ण खोलीचा लुक बदलला जाईल. तसंच घरात नावीन्यपणा आणण्यासाठी कुशन कव्हर, टेबल कव्हर बेडशीटमध्येदेखील रंगसंगती आणा. तुम्ही बाहेर बाल्कनीमध्ये हँगिंगवाल्या कुंडया लावण्यासोबतच रिकाम्या बाटल्यादेखील सजवून त्यामध्ये रोपटी लावू शकता.

असं केल्यामुळे तुम्हाला मनापासून आनंद मिळण्या बरोबरच तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी आणण्याचं कामदेखील करेल. तसंच खोलीतील भिंती ज्या घराची शान असतात, त्यांनादेखील तुमच्या हाताने बनविलेल्या वस्तुनी सजवा आणि पहा पुन्हा घर हसेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें