हेअरस्टाइल खास उन्हाळ्याकरता…

* भारती तनेजा

उहाळ्याच्या मोसमात हेअर कट आणि हेअर डू असा असला पाहिजे की सातत्याने केस नीट करावे लागणार नाहीत आणि स्टाइलही अबाधित राहील. या, आपण जाणून घेऊ अशाच काही हेअरस्टाइल्स…

लॉब कट

खूप लहानही नाहीत आणि खूप मोठेही नाहीत. अशा केसांच्या स्टाइलला लॉब कट म्हणतात. ही स्टाइल त्या स्त्रियांकरता खूप खास आहे, ज्या उकाड्यापासून बचावही करू इच्छितात परंतु त्यांना केस अधिक आखूड नको आहेत. अशा स्टाइलला तुम्ही बँग्स वा रोलर्ससह फ्लोट करू शकतात.

एसिमिट्रिक बॉब कट

या कटमुळे तुमचा चेहरा अधिक उठून दिसतो. यात मागचे केस लहान आणि पुढचे केस मोठे असतात. अलीकडे या कटमध्ये डाव्या बाजूच्या तुलनेत उजव्या बाजूस मोठे केस ठेवण्याचा ट्रेण्ड आहे. तसं बघता या कटसोबत साइडला एक मोठी फ्रिंजही ठेवू शकता.

बॉब वेव्स

शॉर्ट हेअर्सची ही आधुनिक स्टाइल अलीकडच्या काळात पसंत केली जाते. रोमॅण्टिक लुक निर्माण करणाऱ्या वेव्स आता लहान केस ठेवूनही कॅरी करता येतात. या स्टाइलद्वारे तुम्हाला सॉफ्ट लुक आणि कुल फिलिंग मिळेल.

क्रॉप स्टाइल

उकाड्यापासून बचाव करण्यासाठी केस छोटे ठेवू इच्छिता, सोबतच एखादी स्टाइलही कॅरी करायची असेल तर क्रॉप स्टाइल करून पाहा. यात केसांची टोकं ब्रोकन एम स्टाइलमध्ये कापलेली असतात आणि हे मेंटेन करण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागत नाही.

३ डी मॅजिक

केस मोठे ठेवून कोणतीही स्टाइल कॅरी करू इच्छित असाल तर तुम्हाला ३ डी मॅजिक हेअर कट नक्कीच पसंत पडेल. यामध्ये वरचे केस लहान, खालचे केस मोठे आणि मधले केस सामान्य लेन्थचे कापलेले असतात.

या कटमुळे केस मोठे आणि घनदाट दिसतात. ही स्टाइल तुम्हाला स्मार्ट लुक देते. ३ डी मॅजिक कटची जादू मॉडर्न आणि ट्रेडिशनल दोन्ही पेहरावांसोबत शोभून दिसते.

साइडलेअर कट

स्वत:ला वेगळ्या लुकमध्ये पाहू इच्छित असाल तर केसांना साइड लेअरिंग स्टाइल देऊ शकता. हा तर एसिमिट्रिकल ढंगात दिसतो. यासाठी कटला वेट ड्रायरद्वारे हलकेच सेट करण्याची गरज असते. परंतु लक्षात घ्या, केस शोभून दिसतील त्याच साइडला सेट करा. साइड लेयरिंग तुम्हाला मॉडर्न आणि चेहऱ्याला यंग लुक देतं. जर केस कलर केले तर हे लेयरिंग खूप स्टायलिश दिसतात.

सॉक बन

मोठे केस कुणाला बरं आवडत नाहीत? परंतु कडकडीत उन्हामुळे व घामामुळे ते सांभाळणं खूप कठीण होऊन बसतं. त्यामुळे या सीझनमध्ये सॉक बन बनवणं क्विक व ईझि आहे. सोबतच ट्रेण्डीसुद्धा आहे. फॅशनबद्दल बोलायचं झाल्यास अलीकडच्या काळात बाहेरच्या रॅम्प शोजमध्ये ही स्टाइल खूप हिट आहे. ही स्टाइल बनवण्यासाठी तुम्हाला बाहेरून कोणतीही अॅक्सेसरी खरेदी करण्याची गरज नाही. केवळ घरी असणाऱ्या जुन्या मोज्यांद्वारे ही स्टाइल बनवता येते. ही स्टाइल खूप रीजनेबल असते, सोबतच केसांमध्ये व्हॉल्यूमही दिसून येतो.

फिशटेल

फिशटेल पाहायला थोडी कठीण वाटते, परंतु ही तुम्ही ५ मिनिटात सहजी बनवू शकता. ही बनवण्यासाठी केस दोन भागांमध्ये विभाजित करा. आता एका साइडचे थोडे केस घ्या, त्यानंतर दुसऱ्या साइडचे घ्या आणि वेणी घाला. अशाप्रकारे खालपर्यंत वेणी बनवा. ही वेणी वेस्टर्न आणि ट्रेडिशनल दोन्ही प्रकारच्या ड्रेसवर शोभून दिसेल.

स्लीक्ड बॅक पोनी

पोनीटेल बनवण्याचा हा लेटेस्ट पॅटर्न केवळ तुमच्या फॉर्मल आउटफिटवरच नव्हे, तर कॅज्युअलवरही छान शोभून दिसेल. केसांना प्रेसिंग मशिनद्वारे स्ट्रेट लुक द्या आणि त्यानंतर त्यात हलकेच जेल लावा. असं केल्याने लुक स्लीक्ड दिसेल आणि स्टाइलही बराच काळ टिकून राहील. यानंतर क्राउन एरियापासून केस विंचरत केस उचला आणि खालच्या बाजूस कानांपर्यंत टाइट पोनीटेल बांधा.

कॉर्पोरेट बन

आपल्या लुकला कॉर्पोरेट स्टाइल देण्यासाठी हे जरूर आहे की केस एकदम व्यवस्थित बांधलेले असतील, जेणेकरून ते सतत चेहऱ्यावरही येणार नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम कंगव्याने केसाचा गुंता सोडवून जेल लावून ते सेट करून घ्या, जेणेकरून ते सहज चिकटतील. यानंतर साइड पार्टीशन करून पुढून फिंगर कोंब करा आणि सर्व केस मागे घेऊन जात बन बनवा आणि बॉब पिनने व्यवस्थित बांधा.

बनला हलकेच फॅशनेबल टच देण्यासाठी ते स्टायलिश अॅक्सेसरीजद्वारे सजवा वा मग कलरफुल पिनने सेट करा. या स्टाइलमुळे सगळे केस बांधलेले राहातील आणि तुम्ही उकाड्याने त्रासणारही नाही.

पन

हाफ बन हाफ पोनीची ही लेटेस्ट स्टाइल उन्हाळ्यामध्ये सर्वांच्या पसंतीस उतरेल. ही स्टाइल ऐकायला जितकी मजेदार आहे, तितकीच करण्यासाठी सोपी आहे, तर मग वाट कसली पाहाता, क्यूट व कूल स्टायलिंगसाठी या उन्हाळ्याच्या मोसमात पन स्टाइल करून पाहा.

रीवर्स वेज

गायिका रिहानासारखे या हेअरस्टाइलमध्ये मागचे केस लहान आणि पुढचे मोठे असतात. ही हेअरस्टाइल करून तुम्ही सडपातळ व तरुण दिसाल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें