कोणत्याही वयात दिसा हॉट

* पूनम

प्रत्येक वयात सुंदर दिसण्यासाठी फक्त मेकअप करणे पुरेसे नाही तर वयानुसार तुमच्या ड्रेसिंग सेन्सकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. हे मान्य की, तरुण पिढी त्यांना हवा असलेला कोणताही फॅशन ट्रेंड स्वीकारू शकते, पण ज्या महिलांनी तिशी ओलांडली आहे त्याही कोणापेक्षा कमी नाहीत.

काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्यांनाही ट्रेंड सेंटर म्हणता येईल. या वयात तरुणींसारखे सुंदर दिसण्यासाठी महिला कोणत्या प्रकारचे पोशाख घालू शकतात, या संदर्भात काही फॅशन डिझायनर्सशी बोलल्यानंतर काही टीप्स मिळाल्या त्या खालीलप्रमाणे :

कोवळया वयात सुंदर बाई दिसण्यासाठी तुम्हीही कधी आईची साडी नेसली असेल तर कधी मावशीच्या चपला घातल्या असतील, पण आता तुम्ही मोठया झाला आहात, म्हणजे आता तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी फार काही करण्याची गरज नाही. तुमच्या वॉर्डरोबचा मेकओव्हर करून तुम्ही काही मिनिटांत प्रेझेंटेबल लुक मिळवू शकता.

शेपवेअरला बनवा तुमचा जोडीदार

म्हातारपणी तुमची फिगर ३६-२४-३६ असावी असे नाही, पण याचा अर्थ असाही नाही की, तुम्ही फिटिंगचे कपडे घालणे बंद करावे. परिपूर्ण आकार दिसण्यासाठी शेपवेअर घाला. याच्या मदतीने तुमचे शरीर आकारात दिसेल आणि त्यावर तुम्हाला हवे ते परिधान करता येईल.

जर फक्त तुमचे पोट चिकटत असेल आणि इतर सर्व काही आकारात असेल, तर तुमचे पोट लपविण्यासाठी टमी टकर घाला. जर तुमच्या कमरेची रेषा कमी होत असेल तर सपोर्टिव्ह ब्रा घालून तिला आकार द्या. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवर तुम्हाला बॉडी शेपर्स, शेपवेअर, सपोर्टिव्ह ब्राचे अनेक प्रकार सहज मिळतील.

काळया शेड्सचा संग्रह ठेवा

तुमच्या वॉर्डरोबमध्ये काळया शेड्सचे ड्रेस, टॉप, कुर्ती, साडी, जीन्स इत्यादी नक्की ठेवा. सदाबहार ब्लॅक शेड्स कधीच कालबाह्य होणार नाहीत. तुम्ही ते कोणत्याही ऋतूमध्ये आणि पार्टीला किंवा औपचारिक बैठकीला घालू शकता. काळया पोशाखांप्रमाणेच काळया रंगाच्या हँडबॅग्ज, घडयाळे, पादत्राणेही नेहमीच फॅशनमध्ये असतात. म्हणूनच त्यांचाही संग्रह ठेवा.

पार्टीला गुडघ्यापर्यंतचा ड्रेस घाला

आतापर्यंत तुम्ही पार्टीला फॅशनेबल ड्रेस घालून जात होता, मग आताच तो घालणे का टाळता? तिशी ओलांडल्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही यापुढे फॅशनेबल ड्रेस घालू शकत नाही आणि पार्टीचा आनंद घेऊ शकत नाही. फॅशनसोबतच आरामदायकताही लक्षात घेऊन शॉर्ट्सऐवजी नीलेंथ म्हणजे गुडघ्यापर्यंतचा ड्रेस घाला. विश्वास ठेवा, यात तुम्ही खूप सुंदर दिसाल.

स्ट्रेपी टॉप्स घालणे टाळू नका

हॉट लुकसाठी, तुम्ही २० वर्षांच्या असताना स्ट्रेपी टॉप्स घातले असतील, मग आता ते घालणे का टाळता? आजही तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये स्ट्रेपी टॉप्स ठेवू शकता. होय, पण रुंद पट्टयांचे स्ट्रॅपी टॉप खरेदी करा. यामध्ये तुम्हाला आरामदायक वाटेल आणि ते स्टायलिशही दिसेल.

वन पीसही आहे सर्वोत्तम

वन पीस, गाऊन, मॅक्सी, बीच ड्रेस इत्यादी तुम्ही वयाच्या ३० वर्षांनंतरही घालू  शकता. असे आउटफिट्स खूपच फॅशनेबल दिसतात. तुम्ही पार्टीत वन पीस किंवा गाऊन घालू शकता आणि उत्सवादरम्यान बीच ड्रेसमुळे तुमचे व्यक्तिमत्व खुलून दिसू शकते. त्याचप्रमाणे नियमित वापरासाठी तुम्ही मॅक्सी ड्रेसही ट्राय करू शकता.

जीन्स आहे सदासर्वकाळचा आवडता पोशाख

जीन्स हा असा पोशाख आहे, जो केवळ किशोरवयीन मुलीच नाही तर प्रौढ महिलाही परिधान करू शकतात. होय, ही वेगळी गोष्ट आहे की, या वयात तुम्ही जीन्ससोबत टाईट फिट टी-शर्ट घालू शकत नाही, पण फॉर्मल शर्ट किंवा कुर्ती घालून स्मार्ट दिसू शकता. लक्षात ठेवा, लांब कंबरेऐवजी हार्ट वेस्ट जीन्स तुम्हाला जास्त शोभेल.

साडीही आहे चांगला पर्याय

जर तुम्हाला नेहमीच्या लुकचा कंटाळा आला असेल तर तुम्ही वेगळया लुकसाठी साडी ट्राय करू शकता. शरीरातील दोष लपवण्यासोबतच साडी आकर्षक लुकही देते. साध्या साडीसोबत स्लीव्हलेस, बॅकलेस, हॉल्टर किंवा टी नेक ब्लाऊज घाला. यामुळे तुम्ही स्टायलिश दिसाल. त्याचप्रमाणे कोणत्याही खास प्रसंगी रॉयल लुकसाठी डिझायनर साडयाही नेसता येतात. जरी आजकाल साडी फारच क्वचित परिधान केली जात असली तरी तिच्या अभिजात सौंदर्याला पर्याय नाही.

स्कर्ट वापरून पाहा

खूप लहान किंवा खूप मोठा नाही, पण तुम्ही गुडघ्यापर्यंत लांब स्कर्ट घालू शकता. टी-शर्ट किंवा क्रॉप टॉपऐवजी शॉर्ट कुर्ती घाला. या लुकमध्ये तुम्ही खूप स्मार्ट दिसाल. गडद किंवा फिकट शेडच्या स्कर्टसह साधी आणि फिकट रंगाची कुर्ती तुम्हाला चांगला लुक देईल.

जाकिट किंवा कोट

तुम्ही जीन्स किंवा स्कर्टसोबत टाईट फिटिंग टॉप, टी-शर्ट किंवा शर्ट घातले असाल तर त्यावर जाकिट किंवा कोट घाला, तो तुम्हाला अत्याधुनिक लुक देईल. त्याचप्रमाणे शॉर्ट ड्रेससह कार्डिगन घालून तुम्ही पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकता. जर तुम्ही फूलस्लीव्हज आउटफिट घातला असाल तर त्यासोबत स्लीव्हलेस जाकिट किंवा कोट शोभून दिसेल.

अॅक्सेसरीजही आहेत महत्त्वाच्या

मिस ब्युटीफुलल म्हणवून घ्यायचे असेल तर परफेक्ट मेकअप, प्रेझेंटेबल आउटफिटसोबत अॅक्सेसरीज घालणे गरजेचे आहे. जास्त नाही, पण आउटफिटशी जुळणाऱ्या २-३ अॅक्सेसरीज घाला किंवा तुमच्या स्टाईल स्टेटमेंटप्रमाणे हँगिंग कानातले, लाँग ड्रेस, ब्राइट कफ किंवा फुलसाईज फिंगर रिंग यापैकी कुठल्याही एकाला तुमचे स्टाईल स्टेटमेंट बनवा आणि तुमच्या आउटफिटशी मॅच करा.

लाईट आउटफिट्स ब्राईट अॅक्सेसरीज

मान्य आहे की, या वयात तुम्ही खूप गडद किंवा चमकदार पोशाख घालू शकत नाही, पण किमान तुमच्या लाइट शेडच्या पोशाखांना चमकदार टच देऊ शकता जसे की –

* लाईट शेड असलेल्या ड्रेससोबत ब्राईट स्कार्फ घाला, जसे की पांढऱ्या टॉपवर गडद केशरी रंगाचा स्कार्फ.

* हलक्या शेडच्या जीन्सला चमकदार किंवा रत्नजडित बेल्ट लावा.

* ठळक शेडच्या हेअर अॅक्सेसरीज जसे की क्लिप, हेअर बँड इत्यादी केसांमध्ये लावा.

* पार्टीसारख्या प्रसंगी सॉफ्ट शेड आउटफिटसह सिल्व्हर किंवा गोल्डन क्लच कॅरी करा.

* निऑन शेडसचे बेली, मोजे, शूजही हलक्या रंगाच्या पोशाखासह आकर्षक दिसतात.

* रंगीबेरंगी फ्रेम्स असलेले सनग्लासेसही तुमचे सौंदर्य वाढवू शकतात.

* चमकदार लुकसाठी सिंगल आउटफिटवर आकर्षक डायमंड सेट घाला.

* डार्क आणि ब्राइट शेडचे नेलपॉलिश लावून तुम्ही तुमच्या लाइट शेडच्या ड्रेसला ट्रेंडी लुक देऊ शकता.

 

प्रसंगानुरुप अशा तयार व्हा…

* डॉ. नीरजा श्रीवास्तव नीरू

प्रत्येक पेहरावाचे आपले एक महत्त्व असते, परंतु ते परिधान करण्याचे प्रसंग मात्र वेगवेगळे असतात. काही शालीन, काही भडक, काही र्ट्रैडिशनल, काही मॉडर्न, तर काही इंडोवेस्टर्न आउटलुक असलेले ड्रेस आपण आपली इच्छा आणि गरजेनुसार किंवा मग प्रसंगानुरूप परिधान करतो. घरी तर आपण काहीही परिधान करू शकता, जे आपल्याला कंफर्टेबल वाटेल, पण याचा अर्थ असा नव्हे की, आपण दिवसभर नाइटी घालून फिराल. घरात घालायचे पेहराव काम करताना सोईस्कर आणि घरातील सदस्यांच्या उपस्थितीनुसार असले पाहिजेत. कुर्ता-सलवार, कुर्ता-पायजमा, कुर्ता-कॅपरी, टॉप, शॉर्ट्स, फ्रॉक, साडी इ. काहीही. मात्र जर गोष्ट बाहेर जाण्याची किंवा खास प्रसंगाची असेल, तेव्हा विशेष लक्ष देण्याची गरज असते. यादृष्टीने ड्रेसेसना काही भागांत विभागले जाऊ शकते, जेणेकरून वापरण्यास, काळजी घेण्यास व मॅनेज करण्यास सोपे होईल :

पार्टी वेअर

पार्टी, उत्सव व सणांच्या निमित्ताने आपण व्हाइब्रंट कलर्ड पेहरावांचा वापर करून आपला जलवा दाखवा व खूश व्हा. डयूअल आणि मल्टी टोन साडया आजकाल खूप प्रचलित आहेत. चंदेरी साडी तर नेटचा पदर, सिल्क, कांजिवरम, बांधणी, कलकुट्टी व बनारसी इ. पारंपरिक साडया कोणत्याही एज ग्रुपसाठी खूप छान दिसतात. थंडीच्या मोसमात तर पश्मीना शाल खांद्यावर स्टाईलमध्ये घेतली जाऊ शकते, तसेच हाल्टर कॉलर ब्लाउज, गराराशरारा, पटियाला सलवार, चुडीदारवर कळयांची अनारकली किंवा ऑब्लिक कॉलरवाला लांब ब्रॉकेड कुर्ता अथवा ग्लॉसी फॅब्रिक, फ्लाजोसोबत लांब काँट्रास्ट साइड मिडल कटवाला डिझायनर कुर्ता, वर भरतकाम केलेला हायनेक फ्रंट ओपन बॉर्डरचा, स्लिव्हलेस श्रग गाउन किंवा लांब सुंदरसे जॅकेट घाला. बया कफ्तान, स्टायलिश लेस मॅक्सी गाउनमध्ये आपण चाळीशी पार केलेली असेल तरी यंग दिसाल आणि आपला लुकही एकदम वेगळा आय कॅचिंग दिसेल. कमी वयाच्या महिला, मुली शायनिंग ब्राइट कलरवाले जंप सूट, फ्लॅशी टॉपसोबत लाँग स्कर्ट, अक्ने फ्लोरोसेंट कलर्ड थ्री फोर्थ गाउनसोबत हॉल्टर कॉलरवाले सुंदर फुलांच्या प्रिंटचे लाँग फ्रॉक, पॅचवर्क असणाऱ्या लांब बाह्यांसोबत कॉकटेल पोर्म ड्रेस ट्यूनिक, स्पॅगेटी, काहीही असे परिधान करू शकता, जे वातावरण आणखी छान बनवतील. स्टोल, बेल्ट, कॅप, हॅट, ग्लव्ज, स्कार्फ, रंगीबेरंगी मिटन इ. अॅक्सेसरीजने आणखीही आकर्षक स्टायलिंग करू शकता.

पिकनिक, मौजमस्तीसाठी बनविलेला हिप्पी ब्लाउजवाला बोहो ड्रेस, काँट्रास्ट टॉपवाले जंप सूट, कॅपरी टॉप, डॅनिम ब्लू ब्लॅक जीन्स पँट. शिमर किंवा नेट पलाजो लेगिंग, प्लेन कुर्ता अथवा कुर्त्यासोबत प्रिंटेड स्लिव्हलेस जॅकेट किंवा हायनेक कोटी. क्राफ्ट टॉप्स, प्लेअर्ड जीन्स, डेनिम शॉर्ट्स, थंडीमध्ये मिनी स्कर्टसोबत जाड कपडयाचे कलरफुल टाइट किंवा थर्मल लेगिंग वापरा. वेगवेगळे ब्राइट कलरचे ड्रेस लेअरिंग स्टाईलमध्ये परिधान करा. स्लीव्हलेस जॅकेटसोबत टर्टल कॉलरचा शर्ट बऱ्याच कालावधीपासून वापरला जातो, जो छान दिसतो.

ऑफिस वेअर, फॉर्मल वेअर

जर तुम्ही ऑफिसला जात असाल आणि तिथे एखादा ड्रेस कोड असेल, तर तोच वापरा अन्यथा तिथे जशी पद्धत असेल, त्यानुसार साडीसूट किंवा शर्टपँट, टायकोट, कट कॉलर, प्लेन कॉलर कोट, बंद गळयाचा टर्टल कॉलर कोट, लाँग कोट इ. असे वेअर वापरा. हलक्या प्रिंटचे सोबर सूट, साडया अथवा शरीराला शालीनतेने झाकणारे उत्तम स्मार्ट् ड्रेसेस ऑफिससाठी उपयुक्त आहेत. जिथे ब्लॅक, ब्लू डेनिम जीन्ससोबत व्हाइट किंवा लाइट कलर्ड बटनअप शर्ट खूप छान दिसतो, तिथे भडक, ब्राइट कलर, डिझायनर व अंगप्रदर्शन करणारे ड्रेस वापरणे टाळा. जेणेकरून इतरांच्या कार्यात तुमच्यामुळे बाधा येऊ नये. वर्क प्लेसमध्ये स्वत:चाच नव्हे, तर इतरांच्या कामाचाही टेम्पो भंग न करण्यात समजदारी आहे. कपडे स्मार्टली वापरा, जेणेकरून ऑफिसमधील काम तुम्ही व्यवस्थित करू शकाल. जर तुम्ही ऑफिस गोइंग नसाल, पण आपल्याला कधीतरी ऑफिसला जावे लागत असेल, तरीही या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. अशा ठिकाणी मीटिंग्जमध्ये थंडीत स्मार्ट ब्लॅक जॅकेट किंवा ब्लेझर अथवा ग्रे, स्किन, कॉफी कलर व खांद्यावर घेतलेली शाल छान सूट करेल.

लग्न व सेरेमोनियल

लग्नासाठी गोल्डन सिल्व्हर शायनिंग ब्राइट बोल्ड कलर्सचा ड्रेस अधिक पसंत केला जातो. जरीची भारी बनारसी साडी, ब्लाउज खूप छान दिसेल. जर घरातील संबंधितांचे लग्न असेल किंवा मैत्रिणीचे, तेव्हा आपण हेवी वर्कवाल्या ओढणीसोबत जयपुरी लेहंगा, स्टे्रट किंवा कळयांचा, जरदोसी काम केलेला चमकदार वेलींचा घेरेदार लेहंगा, वर बॅकलेस पूर्ण बाजू हेवी वर्क असलेली सोनेरी, चमकणारी चोली किंवा कुर्ताही घालू शकता किंवा मग दुसरे काहीतरी, ज्यामध्ये तुम्ही आनंदाने डान्सची मजा लुटू शकता. लेटेस्ट लेहंग्यांमध्ये रॉयल लूक देण्यासाठी जॅकेट, रोब्स कॅप्सचाही उत्तमप्रकारे वापर केला जाऊ शकतो.

रिसेप्शनसाठी थोडी हलकी जरी, मोती-टिकल्या किंवा शिंपल्या जडलेल्या साडीसोबत स्लिव्हलेस किंवा फोर्थ बाजू असलेले बॅकलेस एलिगेंट ब्लाउज अथवा अनारकली सूट, नेट लेस किंवा टिश्यूवर एम्ब्रॉयडरी केलेला लाँग स्कर्ट किंवा जास्त वर्क केलेला फिल्मी लांब आभूषणांसोबत आपल्याला स्टायलिश लुक देईल.

हळदी समारंभाला जात असाल, तेव्हा पिवळया रंगाचा पेहराव करून जा, सुंदर दिसेल. अशा प्रकारे मेंदीच्या कार्यक्रमाला जात असाल, तेव्हा मेंदी कलरच्या पेहरावाची निवड करा. त्यामुळे तुम्ही खरोखरच त्यांच्या आनंदात मनापासून सहभागी आहात असे जाणवेल.

एक्सरसाइज, वॉक जॉग वेअर

वॉकिंगसाठी सैल कुर्ता, कुर्ती-पायजामा, टॉप, ट्राउजर, कॅपरी, जॉगिंगसाठी ट्रॅक सूट, व्यायामासाठी गुडघ्यांपर्यंत स्किनी लेगिंग, शॉर्ट्स, कॉटन स्लीव्हलेस टॉप इ. योग्य ठरतात, जेणेकरून बॉडीची आरामात हालचाल करू शकता आणि घामही शोषला जातो.

साधेसरळ ड्रे

असे अनेक प्रसंग येतात, जिथे चमकदार, नक्षीदार महागडे कपडे परिधान करून जाणे मुळीच योग्य नसते. उदा. आजारी व्यक्तिला हॉस्पिटल किंवा त्याच्या घरी पाहायला जायचे असेल किंवा शोकसभेला, तेव्हा साधे सफेद किंवा हलके रंग आणि प्रिंटवाले सोबर कपडे परिधान करा.

नाइट वेअर

नाइट गाउन किंवा नाइटी काही महिलांना तर एवढी प्रिय असते की त्यांना घरी त्यातच वावरायला आवडते. भाजी खरेदी करायला जायचे असेल तरी त्या त्याच कपडयांत जातात, पण असे करणे अशोभनीय आहे. पायजमा, कुर्ता, टॉपवाला नाइट सूटही योग्य आणि सोइस्कर आहे.

स्पोर्ट्स वेअर

सैल टॉप शॉर्ट्स किंवा स्कर्ट्स, स्किनी शॉर्ट्स खेळताना सोईस्कर आणि चपळपणासाठी सहायक असतात. पोहण्यासाठी विविध प्रकारचे स्वीमिंग सूट मिळतात. टू पीस किंवा वन पीस बिकिनी आपल्या आवडीनुसार निवडा. इतर पेहराव पोहण्यासाठी सोइस्कर नसतात आणि हास्यास्पदही ठरतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें