लिपस्टिक लुक बनवते आकर्षक

* गरिमा पंकज

सुंदर गुलाबी ओठांवर कितीतरी कविता केलेल्या आहेत. कोणत्याही महिलेच्या किंवा मुलीच्या पर्समध्ये मेकअपचे अन्य साहित्य असेल किंवा नसेलही, पण लिपस्टिक किंवा लिपग्लॉस असतोच. मेकअपमध्ये लिपस्टिकचे काय महत्त्व आहे, हे फक्त महिलांनाच माहीत असते. लिपस्टिकच्या रंगापासून ते त्याच्या विविध प्रकारांबद्दल कोणतीही महिला तडजोड करू इच्छित नाही.

आजकाल बाजारात लिपस्टिकचे असंख्य रंग आणि प्रकार उपलब्ध आहेत, त्यामुळे आपल्या गरजेनुसार निवड करणे थोडे कठीण होऊ शकते. याशिवाय लिपस्टिकशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत ज्या प्रत्येक महिलेने जाणून घेणे गरजेचे आहे.

या संदर्भात तज्ज्ञ, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट गुंजन अघेरा पटेल यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यानुसार, लिपस्टिकचे अनेक प्रकार आहेत :

मॅट लिपस्टिक

ओठांना कोरडा लुक देण्यासह तो दीर्घकाळ टिकवण्यासाठी मॅट लिपस्टिक चांगली आहे. जर तुमच्या ओठांना भेगा पडल्या असतील तर ही लिपस्टिक लावल्याने लुक बिघडू शकतो. ती लावण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ती दीर्घकाळ टिकते, त्यामुळे तुम्ही प्रदीर्घ बैठकीत किंवा पार्टीत ती लावू शकता.

क्रीम लिपस्टिक

याचा लुकही मॅट लिपस्टिकसारखा दिसतो, पण ती लावल्यानंतर ओठ कोरडे दिसत नाहीत, कारण क्रीम लिपस्टिकमध्ये मॅटपेक्षा जास्त मॉइश्चरायझर असते, ज्यामुळे ओठांना मुलायम लुक मिळतो. ही देखील अनेकदा पसरते, त्यामुळेच तुम्ही ती फक्त अशा ठिकाणी लावा जिथे खाण्यापिण्याचे काम कमी असेल किंवा तुम्ही पुन्हा लिपस्टिक लावू शकता. ही लावण्यापूर्वी, ओठांची बाह्यरेषा अखून घ्या.

लिप ग्लॉस

ओठ चमकदार दिसण्यासाठी लिपग्लॉस लावला जातो. तो लिपस्टिकवर लावल्यास लिपस्टिकचा रंगही चमकदार दिसतो.

लिप टिंट

जर तुम्ही लिपस्टिक लावण्याच्या मूडमध्ये नसाल आणि लिपस्टिकसारखा लुक हवा असेल तर लिप टिंट ही गरज पूर्ण करू शकते. हे आजकाल खूपच ट्रेंडी आहे आणि तुमच्या ओठांना नैसर्गिक लुक देते.

लिक्विड लिपस्टिक

लिक्विड लिपस्टिक दीर्घकाळ टिकणारी असते. यामुळे ओठांना मॅट फिनिशही मिळते आणि ते जास्त काळ टिकते.

शियर लिपस्टिक

जर तुम्हाला नैसर्गिक लुक हवा असेल तर शियर लिपस्टिक हा उत्तम पर्याय आहे. अशी लिपस्टिक लावण्यापूर्वी, ओठांवर कन्सिलर बेस बनवणे किंवा हलका बाम लावून ओठांना पोषण देणे योग्य ठरते. असे केल्यास ही लिपस्टिक तुमच्यावर जास्त शोभून दिसेल.

लिप क्रेयॉन

क्रेयॉन लिपस्टिक आकाराने थोडी मोठी असते. ती ओठांवर बामसारखी लावता येते. या प्रकारची लिपस्टिक भेगा पडलेल्या आणि कोरडया ओठांसाठी चांगली आहे.

टिंटेड लिप बाम

टिंटेड लिपस्टिकप्रमाणेच टिंटेड लिप बामही खूप ट्रेंडमध्ये आहे. यामुळे ओठ आरामदायी राहतात. हा तुम्ही कार्यालय किंवा महाविद्यालयात कुठेही घेऊन जाऊ शकतात.

लिपस्टिक दीर्घकाळ कशी टिकवून ठेवायची?

* लांब कुठेतरी जायचे असल्यास मॅट लिपस्टिक लावा. ती दीर्घकाळ टिकते आणि लवकर खराबही होत नाही.

* क्रीम लिपस्टिक लावल्यानंतर, ट्रान्सलूसेंट पावडर नक्की लावा. ती लिपस्टिक सेट करेल आणि त्यामुळे लिपस्टिक टिकेल.

* लिपस्टिक लावून पार्टी किंवा सोहळ्याला गेला असाल तर तेलकट पदार्थ खाणे टाळा, अन्यथा लिपस्टिक खराब होऊ शकते. लिपस्टिक लावताना ती दातांना लागणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा ते लाजिरवाणे होऊ शकते.

* लिपस्टिक लावल्यानंतर अनेक महिलांचे ओठ काळे पडतात. हे टाळण्यासाठी लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप कन्सिलर लावा, यामुळे रंगही उठावदार दिसेल.

लिपस्टिकशी संबंधित मूलभूत गोष्टी

* लिपस्टिक दातांना लागू देऊ नका.

* जर लिपस्टिक पसरली असेल तर तुम्ही ती कन्सिलरने लपवू शकता.

* लिपस्टिक गडद असेल तर तुम्ही ती कन्सिलरने कमी करू शकता.

* ओठ अधिक उठावदार करण्यासाठी, ओठांचा कडांवर कन्सिलर लावा.

* लिपस्टिक शेडचा एखादा आयशॅडो तुटला असेल तर तुम्ही तो टिंटमध्ये मिसळून लिपस्टिक म्हणून वापरू शकता.

कोणत्या त्वचेसाठी कोणती लिपस्टिक?

लिपस्टिकचा रंग नेहमी त्वचेच्या रंगानुसार निवडला पाहिजे. बऱ्याच महिलांना माहीत नसते की, लिपस्टिकचा कोणता रंग त्यांच्या त्वचेला शोभेल. याकडे लक्ष न देता लिपस्टिक लावल्याने लुक खराब होऊ शकतो. त्यामुळे लिपस्टिकची निवड नेहमी त्वचेच्या रंगानुसारच करावी.

* हलका गुलाबी, न्यूड गुलाबी आणि लाल रंग यासारख्या उजळ रंगाच्या लिपस्टिक नेहमी गोऱ्या त्वचेवर शोभतात.

* जर त्वचेचा रंग सावळा असेल तर तुम्ही चेरी, मिडीयम तपकिरी आणि मरून रंग लावून पाहू शकता. या सर्व शेड्स तुम्हाला शोभतील. याशिवाय तुम्ही न्यूड शेड्सही लावून पाहू शकता.

लिपस्टिक खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

लिपस्टिकच्या बाबतीत, प्रत्येक महिला आणि मुलीला लिपस्टीकशी संबंधित छोटी-मोठी सर्व माहिती असणे आवश्यक आहे. कुठलीही लिपस्टिक विकत घेऊन लावल्याने तुमच्या लुकवर वाईट परिणाम होऊ शकतो.

* तुम्ही खरेदी करत असलेली लिपस्टिक दीर्घकाळ टिकणारी हवी.

* लिपस्टिकचा रंग नेहमी तुमच्या त्वचेच्या रंगाला पूरक असावा.

* तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात घेऊनच लिपस्टिक निवडा.

* ओठ कोरडे आणि रखरखीत असतील तर क्रीम लिपस्टिक वापरा, ओठ तेलकट असतील तरच मॅट लिपस्टिक निवडा.

* जर तुम्ही डीप शेड लिपस्टिक वापरत असाल तर तुमचे ओठ लहान दिसतील आणि जर गडद शेडची लिपस्टिक वापरत असाल तर तुमचे ओठ मोठे दिसतील.

* लिपस्टिक घेण्यापूर्वी एकदा ती नक्की लावून पाहा.

कोणती लिपस्टिक खरेदी करावी?

अशा अनेक महिला आहेत ज्यांना खिशाला परवडणारी लिपस्टिक खरेदी करणे आवडते, तर अनेक महिलांना ब्रँडेड आणि महागड्या लिपस्टिक खरेदी करणे आवडते. मात्र, लिपस्टिक कोणतीही असो, ती वापरण्याचे तंत्र चांगले असले पाहिजे. महागडया लिपस्टिकबद्दल बोलायचे तर भारतात सर्वात महागडी लिपस्टिक ब्रँड टॉम फोर्ड, मॅक, बॉबी ब्राउन, फेंटी ब्युटी, हूड ब्युटी, केट वॉन डी, गुच्ची, शेरलोट टिलबरी, पॅट मॅकग्राथ, डायर, नताशा मूर इत्यादी आहेत, ज्यांचा दर्जा सर्वोत्कृष्ट आहे. पण याची किंमत २-३ हजार रुपयांपासून सुरू होऊन ८-१० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. अनेक पॉकेट फ्रेंडली ब्रँड्स आहेत ज्यांच्या लिपस्टिक चांगल्या दर्जाच्या आहेत आणि त्या महिलांमध्ये लोकप्रियही आहेत. जसे की, लॉरियन मेबेलिन, फेसस कॅनडा, लॅक्मे, शुगर कॉस्मेटिक्स, इन्साइट, प्लम, एली १८ इत्यादी.

या लिपस्टिक शेड्स ऑफिस लूकसाठी योग्य आहेत

* दिव्यांशी भदौरिया

तुम्हाला मेकअप आवडत असेल आणि ऑफिस लूकसाठी परफेक्ट लिपस्टिक शेड शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. सामान्यत: महिलांना मेक-अप करायला खूप आवडते, त्यामुळे त्या अनेकदा मेक-अप उत्पादने खरेदी करत असतात. महिलांच्या दैनंदिन जीवनात लिपस्टिकला विशेष महत्त्व आहे. लिपस्टिकशिवाय मेकअप अपूर्ण आहे, लिपस्टिक हे मेकअपचे प्राण आहे.

अनेक वेळा महिला त्यांच्या ऑफिस लूकसाठी अशा प्रकारच्या लिपस्टिक शेड्सची निवड करतात, ज्यामुळे त्यांचा लूक खूप जास्त दिसतो. पण आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही लिपस्टिक शेड्स घेऊन आलो आहोत, जे तुमच्या ऑफिस लूकसाठी योग्य आहेत.

कोरल रंग

कोरल लिपस्टिक्स अत्यंत बोल्ड असतात, पण तुम्ही तुमच्या ऑफिस लूकसाठी हा रंग नक्कीच वापरू शकता. कोरल लिप कलर लावताना लक्षात ठेवा की तुमचा उर्वरित मेकअप तटस्थ असावा. अशा प्रकारे तुम्ही तुमचे डोळे मऊ ठेवू शकता आणि लाइट ब्लश लावू शकता. कोरल शेड्स प्रत्येक त्वचेच्या टोनवर चांगले दिसत नाहीत, म्हणून ते कधीही ऑनलाइन खरेदी करा, खरेदी करण्यापूर्वी नेहमी आपल्या चेहऱ्यावर वापरून पहा.

  1. पीच

ही सॉफ्ट लिपस्टिक शेड आहे, जी बहुतेक महिलांच्या आवडत्या लिपस्टिक शेडमध्ये समाविष्ट आहे. परंतु गडद त्वचा टोन असलेल्या महिलांनी ही सावली लागू करणे टाळावे. ऑफिस लूकसाठी जर तुम्हाला गडद आणि भडक रंगांचा वापर टाळायचा असेल तर ही लिपस्टिक शेड तुमच्यासाठी योग्य आहे.

  1. मौव

Mauve शेड्स कोणत्याही प्रसंगासाठी सर्वोत्तम लिपस्टिक शेड आहेत. तुमच्या ऑफिस लूकसाठी तुम्ही mauve लिप शेड निवडू शकता. ही लिपस्टिक शेड दिसायला अजिबात चमकदार नाही. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही ही शेड प्रत्येक हंगामात वापरू शकता.

  1. तपकिरी रंग

आजकाल तपकिरी लिपस्टिक शेड खूपच ट्रेंडी आहे. महाविद्यालयीन तरुणींपासून ते बॉलिवूड अभिनेत्रींनाही हा शेड घालायला आवडतो. तपकिरी लिपस्टिक प्रत्येक त्वचेच्या टोनशी जुळते आणि ते तुमच्या लूकला शोभा देण्यास मदत करते यात शंका नाही.

  1. मऊ गुलाबी सावली

महिलांना हा रंग खूप आवडतो आणि प्रत्येक स्त्रीला या रंगाची लिपस्टिक लावायला आवडते. लग्न असो, पार्टी असो, डेटिंग असो किंवा ऑफिस असो, ते एकदम परफेक्ट आहे.

लिपस्टिक गेम चेंजर

* पारुल भटनागर

साधारणत: आपण फेस मेकअपवर लक्ष देतो आणि लिपस्टिककडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे चेहऱ्यावर ते तेज आणि चमक येऊ शकत नाही जी यायला हवी. जेव्हा की लिपस्टिकची मेकअपमध्ये अतिशय महत्वपूर्ण भूमिका असते. साधे लिपस्टिकसुद्धा सगळया चेहऱ्याचा लुक बदलवून टाकते. मग अशावेळी गरज आहे मेकअपला लिपस्टिकने फायनल टच देण्याची.

मेकअपतज्ज्ञसुद्धा कबूल करतात की लिपस्टिक गेमचेंजर असते. भले ती आपण शेवटी लावतो. पण ही सगळयात महत्वाची आणि आवश्यक स्टेप असते, जी संपूर्ण चेहऱ्याचा लुक बदलवायचे काम करते.

अलीकडे बाजारात ढीगभर लिपस्टिकची व्हरायटी आली आहे, जी चेहऱ्यावर वेगवेगळा परिणाम दर्शवते. म्हणून हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि फिनिशिंगच्या हिशोबाने कोणती लिपस्टिक वापरू इच्छिता.

लिपस्टिकचे प्रकार

मॅट लिपस्टिक, टीकते खूप वेळ : मॅट लिपस्टिक क वेगळा प्रभाव टाकते. विशेषत: याचे मॅट फिनिश वेलवेट टेक्स्चर आणि उत्तम कलर्सचे  आउटपुट महिलांना फार आवडते.

ही लिपस्टिक विशेषत: पिगमेंटेड लिप्सकरीता खूप चांगली आहे.

लिप क्रीम देतं एक्स्ट्रा मॉइश्चर : अनेकदा ऋतू बदलल्याने आपले ओठ रुक्ष होतात, ज्यासाठी गरज असते ओठांना मॉइश्चर देण्याची आणि यासाठी लिप क्रीमपेक्षा दुसरे काहीच चांगले नाही. कारण त्यात वॅक्स आणि भरपूर प्रमाणात तेल असल्याने ओठांना अतिरिक्त मॉइश्चर देण्याचे काम करते. हे तुम्ही रोज लावून छान फिल करू शकता.

लिप क्रेयॉनने मिळवा स्मूद टच : मेकअप प्रॉडक्ट्स कोणाला आवडत नाही. अशात लिप क्रेयॉन खूप चांगले असते, कारण एकतर स्मूद फिनिशसोबत याचे टेक्श्चर खूपच सॉफ्ट असते. तसेच  तुम्ही हे लिप लायनरप्रमाणे अथवा लिप कलर करण्याकरिता वापरू शकता.

लिप ग्लॉसने मिळवा ग्लॉसी लिप्स : ग्लॉसी लिप्स जितके छान दिसतात, तितकाच त्याचा आऊटफिट्सची ग्रेस वाढवण्यात महत्त्वाचा वाटा असतो. अलिकडे लिपस्टिकमध्ये लिपग्लॉसची मागणी वाढली आहे, कारण यामुळे पातळ आणि लहान ओठ योग्य आकारात नजरेत भरतात आणि रुक्ष ओठांचा कोरडेपणासुद्धा नाहीसा होतो. कारण यात मॉइश्चर खूप जास्त असते. शिवाय याचे सेमी शीर फिनिश ग्लॉस लुक आणखीनच सुंदर करते.

लिक्विड लिपस्टिक टिकते खूप वेळ : ही आपल्या टेक्स्चरमध्ये ग्लॉसी असल्याने लावल्यावर तुम्हाला सेमीमॅट फिनिश देते आणि खूप काळ टिकून राहते.

लिप  स्टेन : हे लिक्विड आणि जेल रूपात असते, जे लवकर वाळण्यासोबतच खूप काळ टिकून राहते.

लिप लायनरने द्या योग्य आकार : साधारणत: आपण लिपलायनर लिपस्टिक आणि ग्लॉसला योग्य आकार देण्यासाठी वापरतो. आजच्या काळातील मेकअपप्रेमी लिपलायनरला टु इन वन म्हणजे ओठांची आऊटलाईन करण्यासोबतच रंग भरण्यासाठीसुद्धा वापरतात.

लिपस्टिक लावण्याची योग्य पद्धत

अनेकदा आपण छान शेडची लिपस्टिक खरेदी करतो  पण तरीही ती ओठांवर तेवढी सुंदर दिसत नाही, जेवढी दिसायला हवी. अशावेळी योग्य पद्धतीने लिपस्टिक लावायची गरज असते. यासाठी या गोष्टी आत्मसात करा.

* ज्याप्रमाणे चेहऱ्यासाठी एक्सफोलिएशन आवश्यक आहे, जेणेकरुन मृत त्वचापेशी नाहीशा होतील. अगदी त्याचप्रमाणे ओठांसाठीसुद्धा जेणेकरुन ओठ सॉफ्ट दिसतील.

* लिप प्रायमर ओठांना स्मुद करण्यासोबत तुमच्या शेडला खूप काळ टिकवून ठेवण्याचे काम करते आणि तुम्हालासुद्धा हेच हवे असते.

* प्रायमरनंतरसुद्धा जर तुमचे ओठ पिगमेंटेड वाटत असतील तर त्यावर कंसीलर लावा.

* परफेक्ट पाऊट देण्यासाठी तुमचा चेहरा नेहमी तयार असायला हवा यासाठी ओठांना आकार देणे खूप गरजेचे असते.

* शेवटी आपल्या ओठांना कलारबार वेल्वेटमेंट लिपस्टिक फ्युशियाने फायनल  टच द्या.

आता तुम्हाला कळले असेल की लिपस्टिक योग्य पद्धतीने लावली तर किती अमेझिंग लुक मिळतो.

पण अनेक असे प्रश्न जे नेहमी लिपस्टिक लावताना आपल्यासमोर उभे ठाकतात आणि आपण ते समजू शकत नाही की अशा परिस्थितित हे कसे सोडवायचे. या जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित उत्तरं.

लिपस्टिक खूप काळ राहण्यासाठी काय करावे?

लिपस्टिक खूप काळ टिकवून ठेवण्यासारही तुम्ही सगळयात आधी लिपस्टिक लावा. त्यानंतर आपल्या ओठांमध्ये ब्लॉटिंग पेपर लावून दोन्ही ओठ दाबा. नंतर ते काढून परत लिपस्टिक लावा. तुम्ही पाऊटवर टिशू पावडर लावून लिपस्टिकचा दुसरा थर लावू शकता.

लिपग्लॉसला मॅट लुक कसा द्यायचा?

सगळयात आधी लिप ग्लॉस लावा. मग ओठांमध्ये ब्लॉटिंग पेपर ठेवून हलके दाबा. यानंतर स्पंज अॅप्लिकेटरने साधी पावडर लावा. ही क्रिया तोवर करत राहा, जोवर तुम्हाला हवा तसा लुक मिळत नाही.

मॅट लिपस्टिकने कसा मिळेल ग्लॉसी टच?

मॅट लिपस्टिकवर थोडासा क्लिअर लिप बाम व ग्लॉस लावल्याने तुम्हाला ग्लॉसी लुक मिळू शकतो.

लिपस्टिकसा इतर मेकअप प्रोडक्टच्या रूपात वापरू शकतो का?

अर्थातच, तुम्ही लिपस्टिक ब्लश अथवा आय शॅडो म्हणून वापरू शकता. तुम्ही न्यूड शेडचा फेस काँटूर आणि व्हायब्रण्ट शेड्सचा कलर करेक्टर म्हणून वापर करू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें