२०२३ हेअरस्टाईल ट्रेंड

* सोमा घोष

सुंदर आणि आकर्षक दिसावे असे प्रत्येक महिलेला वाटत असते. मेकअपसोबतच हेअरस्टाईलमुळेही चेहरा खुलून दिसू शकतो. यासाठी चेहऱ्याला साजेशी हेअरस्टाईल करणे गरजेचे असते. जास्त करून बॉलिवूडमधील हेअरस्टाईल बघून त्यानुसारच हेअरस्टाईल केली जाते, कारण अभिनेत्रीसारखेच दिसावे, असे महिलांना वाटत असते. हेच अचूक ओळखून हेअरस्टायलिस्ट दरवर्षी नवनवीन स्टाईल घेऊन येतात, ज्यात केसांच्या रंगापासून ते हेअरस्टाईलपर्यंत सर्व काही असते.

२०२१ मध्ये कोरोना संसर्गामुळे बहुसंख्य महिला घरीच आहेत किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत आणि कोरोना संसर्ग कमी होण्याची वाट पाहात आहेत, जेणेकरून पुन्हा एकदा कुठल्याही भीतीशिवाय घराबाहेर पडता येईल.

यासंदर्भात बियॉड द फ्रिंज सलूनच्या हेअरस्टायलिस्ट आणि शिक्षणतज्ज्ञ आशा हरिहरन यांनी सांगितले की, इतिहासात डोकावल्यास असे लक्षात येईल की, अनेकदा महामारी, नैसर्गिक आपत्ती, महागाई अशी अनेक संकटे जगावर ओढावली. याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला आहे, पण ब्युटी इंडस्ट्रीवर विशेष परिणाम जाणवला नाही. आता हळूहळू ‘स्वत:ची सर्व कामे स्वत:च करा’ असा नवा ट्रेंड जोरात आहे.

महिला फक्त सण-उत्सव किंवा लग्नाला जाण्यासाठीच मेकअप करत नाहीत तर मेकअप करून सतत सुंदर दिसायला त्यांना आवडते. नवीन वर्षात हेअरस्टाईलही खूप वेगळया असतील, काही अशा प्रकारे :

* यापूर्वी केसांची एखादी बट किंवा एक भाग रंगगवण्याची स्टाईल होती. मात्र आता ज्यांनी अशा प्रकारे केस रंगवले आहेत ते रंगवलेले केस महामारीच्या काळात वाढल्यामुळे रंग सौम्य होऊन केसांच्या मुळापासून ६ ते ८ इंच खाली आला असेल. यासाठीच ‘मनी पीस’ नावाचे नवीन तंत्रज्ञान आले आहे. याच्या माध्यमातून रंग कितीही खाली उतरला असला तरी याचे ६ ते ८ फॉईल्स प्रभावी ठरतात.

* याशिवाय महिलांच्या चेहऱ्याची ठेवण लक्षात घेऊन केसांचे २ पट्टे रंगवले तरी नवीन लुक मिळतो. फेस कंटूरिंग तंत्रज्ञानामुळे चेहऱ्यावर नाविन्याचे तेज झळकते. यासाठी लाल, चॉकलेटी, निळा, राखाडी असा कोणताही रंग वापरता येईल.

* आजच्या नववधूला साधी पण नवरीसारखी दिसणारी हेअरस्टाईल आवडते. पूर्वीसारखे भलेमोठे आंबाडे नवीन वर्षात चालणार नाहीत. सध्या नैसर्गिक मेकअपला जास्त पसंती मिळत आहे.

* गडद मेकअपचे युग आता कालबाह्य झाले आहे. नवरीला सुंदर, स्वच्छ आणि ग्लॅमरस रूप आवडते. तिला मेकअपला साजेशी अशीच हेअरस्टाईल आवडते आणि नवीन वर्षातही हा ट्रेंड कायम राहणार आहे. उदाहरणार्थ डिजॉल्व्स बन, हाय फॅशन पोनी विथ फ्रंट मेसी, मेसी वेणी इत्यादी. या तीन जास्त पसंत केल्या जातील. बनमध्येही छोटा किंवा मध्यम आकाराचा बन सर्वांना आवडतो.

केसांना चांगला आकार देण्यासाठी त्याची वाढ चांगल्या प्रकारे होणे आवश्यक असते. त्यासाठी पुढील उपाय नियमित करणे गरजेचे आहे :

* केस निरोगी राहण्यासाठी आठवडयातून एकदा केसांच्या मुळांना तेल लावा. केसांच्या टोकांना कमी तेल लावा. १ किंवा २ वेळा शाम्पू केल्यावर तेल निघून जाईल, एवढेच तेल लावा. जास्त तेल लावल्यास ते काढण्यासाठी जास्त शाम्पू लावावा लागतो. यामुळे केस रुक्ष आणि निर्जीव होतात.

* शाम्पू आणि कंडिशनर केल्यानंतर जेव्हा २० ते ४० टक्के पाणी केसांमध्ये राहते तेव्हा सिरम केसांच्या मधल्या भागावर आणि टोकांवर लावा. त्यानंतर केसांवर व्यवस्थित हात फिरवून ते डोक्यावर लावा. केसांना टॉवेल गुंडाळून ते सुकू द्या. सुकल्यावर टॉवेल काढा. केसांवर चमक येऊन ते सिल्की दिसतील, जे कुठल्याही महिलेच्या सौंदर्यात भर घालतील.

दररोज नवीन हेअर लुक

* ज्योति

सौंदर्याबद्दल बोलणे चालू असेल आणि केसांचा उल्लेख नसेल असे कसे शक्य आहे. केसांच्या स्तुतीसाठी आतापर्यंत ना जाणे किती कशिदे वाचले गेले आहेत, कधी-कधी गडद संध्याकाळ तर कधी काळया ढगांची उपमा दिली जाते. महिलांना केस लहान असोत की मोठे खूपच आवडतात.

अशा परिस्थितीत जेव्हा आपण आपल्या केसांची निगा राखण्यास कोणतीही कमतरता सोडत नाही तर मग त्यांचे सौंदर्य वाढविण्यात काय हरकत आहे. कदाचित याचे कारण आपल्या जीवनात काम अधिक आणि वेळ कमी आहे. म्हणून आम्ही येथे तुमच्यासाठी काही सोप्या हेअर हॅक्स घेऊन आलो आहोत, जे थोडयाच वेळात तुमच्या केसांना नवा लुक देतील.

पोनीटेल तीच पद्धत नवीन

मुलींच्या आयुष्यात केसांशी निगडित एक सामान्य समस्या आहे आणि ती म्हणजे केस पातळ होणे. स्टाईलच्या चक्करमध्ये आपण कधीकधी केसांना रंग, रीबॉन्डिंग किंवा कर्लसारखे बरेच काही केसांसह करतो. अशा स्थितीत केस पातळ होतात, मग आपले हेच रडगाणे असते की केसच नाहीत, तर कसली स्टाईल बनवू? तर आता आपण पोनीटेलबद्दल बोलूया, जी जवळजवळ प्रत्येक मुलीची पसंत असते.

तीन मिनिटांत कर्ल करा

जर आपल्याला पार्टीत जायचे असेल आणि कर्लिंग करण्यास वेळ नसेल तर ही युक्ती आपल्यासाठी उपयुक् ठरू शकते. सर्वप्रथम ऊंच पोनीटेल बनवा. यानंतर, केसांना पुढच्या दिशेने घेऊन त्यांस ३ भागात विभाजित करा. यानंतर, त्यांना कर्ल करा आणि स्प्रे केल्यानंतर केसांचा बँड काढून घ्या.

दुतोंडी केस टक्यात दूर होतील

दुतोंडी केस आपले सौंदर्य खराब करतात, म्हणून त्यांच्यापासून मुक्त होणे खूप महत्वाचे आहे. आता यासाठी पार्लरमध्ये जाण्याचे झंझट कोण करेल. म्हणून हे हॅक तुमच्यासाठी आहे. आपण त्यांना घरीच ट्रिम करू शकता. प्रथम संपूर्ण केस पुढे आणा आणि हेअरबँडने सुरक्षित करा. यानंतर, दोन ते तीन इंच सोडून पुन्हा एक हेअरबँड लावा. असे पुन्हा दोनदा करा. असे केल्याने, शेवटी, केवळ दुतोंडी केस शिल्लक राहतील, जे आपण कात्रीने कापू शकता.

व्हॉल्यूमने काम बनेल

केसांमध्ये व्हॉल्यूम असल्यास ते दाट दिसतात. आपल्यालाही आपल्या केसांमध्ये व्हॉल्यूम हवे असेल, परंतु आपल्याकडे स्टाईल करण्यास वेळ नसेल तर नक्कीच हे हॅक आजमावून पहा. रात्री झोपेच्या आधी सर्व केस पुढच्या दिशेने आणा आणि एक साधी वेणी बनवून झोपी जा.

कर्लरशिवाय केस कुरळे करा

ही युक्ती आपल्या कामाची आहे, खासकरुन जेव्हा आपल्याकडे कर्लर नसेल. आपण आपले केस बऱ्याच भागांमध्ये गुंडाळून घ्या आणि नंतर त्यांना आयर्निंग करा. यानंतर, कुरळ्या केसांची जादू बघतच राहावीशी वाटेल. पार्लरमध्ये लागणारा वेळ आणि केश विन्यास साधनांचा हेयर स्टाइलिंग टूल्सचा अभावदेखील आपल्याला स्टाईलिश दिसण्यापासून रोखू शकणार नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें