७ सोप्या टीप्स राखतील फिट अॅन्ड फाइन

* मोनिका अग्रवाल

तुम्ही तंदुरुस्त राहू इच्छित असाल, तर काही टीप्सचा तुम्ही अवलंब केला पाहिजे. तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम करता आणि डाएटही कंट्रोल करता. सुरूवात तर एकदम उत्साहाने करता, पण काही वेळाने हा उत्साह धरू लागतो आणि तुम्ही फास्टफूड खायला सुरूवात करता. मग हळु हळु पुर्वपदावर येता, असं तुम्हीच नाही तर प्रत्येक स्त्री करते.

फिट राहण्यासाठी ध्येय ठरवा : तुम्हाला सर्वात आधी ध्येय ठरवावं लागेल की कशाप्रकारे तुम्हाला फिटनेस हवा आहे. यासाठी तुम्ही मोठे नाही तर लहान ध्येय ठेवा. फिटनेस दिवा शिल्पा शेट्टीनुसार फिट राहण्यासाठी स्मार्ट ध्येय निश्चित करा. स्मार्ट ध्येय म्हणजे असा व्यायाम करा की जो सहजतेने करता येईल आणि परिणामही लवकर समोर येईल. सुरूवातीच्या दिवसात थोडं अंतरच पळा जे १५-२० मिनिटातच पूर्ण केलं जाऊ शकेल.

ठरवून जेवण तयार करा : कामाची घाई गडबड असो अन्य आणखीन काही महत्वाचा कार्यक्रम असो वेळेवर खाल्लंच पाहिजे. खाण्याची वेळ टाळू नये वा हलगर्जीपणा करू नये. योजना आखून पूर्ण आठवडयासाठी पोषण तत्वांनी परिपूर्ण असं जेवण बनवा. थोडा वेळ काढून पोषक तत्वांनी युक्त जेवण गरम करून खात जा. घरातून बाहेर जाताना आपलं जेवण आणि पाणी सोबत घेऊन जा.

चांगला जोडीदार निवडा : फिट राहण्यासाठी एका चांगल्या साथीदाराची निवड करा. त्यामुळे तुमच्यात उत्साह संचारेल. दोघं एकमेकांना प्रेरित कराल आणि रोजच्या दिनक्रमात उशीर होणार नाही. शक्य असेल तर एखाद्या व्यायाम शिकविणाऱ्या इंस्ट्रक्टरचा सल्ला घ्या.

मनावर नियंत्रण ठेवा : समजा बर्गर, पिझ्झा, चाट तुमची आवड आहे आणि तुम्ही ते बघून स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही, तर आपला मार्ग बदला. खाण्याची इच्छा झाली, राहावलं नसेल तरी या भावनांवर नियंत्रण ठेवणं आपल्याच हाती आहे.

व्यायामाचा आनंद घ्या : फक्त कॅलरी कमी करायची आहे, हा विचार करून व्यायाम करू नका. तुम्हाला जे काम करायला आवडतं जसं की घराची सफाई, बागकाम, नृत्य यासारखी कामं मन लावून करा. आनंद घेत बॅडमिंटन, रश्शीउडया, टेनिस खेळणे वगैरे फिटनेस मेण्टेन करायचे सोपे प्रकार आहेत.

स्वत:ला बदला : जर दररोजच्या आयुष्याला कंटाळला असाल तर काहीतरी नवीन करा, ज्याने तुम्हाला आनंद मिळेल. जेव्हा फार कंटाळा येईल, तेव्हा काहीतरी नवीन करा, मग भले ते स्वयंपाक करणं असेल किंवा डांसिंग असेल किंवा इतर काही हलकफुलकं जे तुम्ही ऐन्जॉय कराल.

व्यस्त राहा स्वस्थ रहा : बारीक व्हायचं आहे, हा विचार करुन स्वत:ला त्रास करून घेऊ नका. काहीच न खाणं किंवा शिळं अन्न खाणं योग्य नाही. मनावर नियत्रंण ठेवून हलकंफुलकं आणि पौष्टीक खा. भरपूर पाणी प्या. उपाशी पोटी राहू नका आणि नियमित व्यायाम करा. विश्वास ठेवा तुम्हाला पाहुन आरसाही लाजेल.

Festival Special : सणांमध्ये कसे राहावे निरोगी

* सतकाम दिव्य, सीईओ, क्लिनिक अॅप्स

आज कोरोना दरम्यान सणउत्सव साजरे करताना आपण सेवन करत असलेले खाद्यपदार्थ घरी बनलेले असावे ही बेसिक काळजी सर्वांनीच घेणे जरूरीचे आहे. सणांमध्ये शरीर निरोगी व वजन नियंत्रणात ठेवणे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुम्ही ही काळजी घ्याल, की तुम्ही काय आणि किती खाता. आहाराचा प्रकार व पोर्शनचा आकार तुम्हाला हे जाणण्यात मदत करतो, की तुम्ही रोज किती कॅलरी घेत आहात. जर तुम्ही निरोगी व योग्य शेपमध्ये राहू इच्छिता, तर गरजेचे आहे की अन्न विचार करून खावे. आपण सर्व जाणतो, की सण हा आनंदासोबतच मिठाईचादेखील काळ असतो. मिठाईसोबत तुम्ही जास्त कॅलरीचे सेवन करता. यामुळे तुमचे शरीर व स्वास्थ्यदेखील खराब होऊ शकते.

काय खावे काय खाऊ नये

आहारासंबंधी या बेसिक गोष्टींची काळजी उत्सवाच्या काळात घेतली गेली पाहिजे. यादरम्यान डायट खूप महत्त्वाचे आहे व बेसिक गोष्टींची सुरुवात यादरम्यान खाण्यासाठी योग्य पदार्थांचा स्टॉक ठेवून केली जाऊ शकते. जर तुम्ही कॅलरीवर लक्ष ठेवून असता, तर गरजेचे आहे की तुमच्याजवळ खाण्यासाठी योग्य गोष्टी असाव्यात. यामुळे तुम्ही आनंदी व मिठायांसोबत असूनदेखील तुमचा आहार निरोगी ठेवू शकाल.

हवे असल्यास तुम्ही याकाळात ड्रायफ्रूट्सची निवड करू शकता. यात स्वास्थ्यकर फॅट्स असतात, जे वजनाला काही हानी न पोहोचवता तुमची त्वचा व केसांना नीट करण्यात मदत करू शकतात. मूठभर मेवा, जसे की मनुके, बदाम, पिस्ता, काजू, जर्दाळू, अंजीर इत्यादी सणांच्यावेळी काही आरोग्यदायी पदार्थ व भेट देण्याचे उत्तम पर्याय आहेत.

हे देखील महत्वाचे आहे, की तुम्ही पांढरी साखर, तूप वा तेलात तळलेल्या गोष्टींपासून दूर राहावे. यांच्या ऐवजी गूळ वा डार्क चॉकलेट व ड्रायफ्रूट्स बनलेल्या मिठायांचे सेवन करा. हा एक चांगला पर्याय असेल. मैदा, साखर वा तुपाने बनलेल्या मिठाया कमीत कमी खा. जेणेकरून खूप जास्त कॅलरीजना दूर ठेवू शकाल.

मसाल्याऐवजी आरोग्यदायी गोष्टींचा उपयोग केला जायला हवा. गोड पदार्थांमध्ये लवंग, केसर, दालचिनी, वेलची व काळीमिरी इत्यादींचा उपयोग केला जाऊ शकतो. हे खाद्यपदार्थांना चांगली चव देण्यासोबतच पुष्कळ जैविक गुणांनीदेखील समृद्ध असतात व यामुळेच आरोग्याला खूप प्रकारचे फायदे देतात.

खरेदीच्या दरम्यान हलकेफुलके खाण्याची रीतदेखील आहे. यादरम्यान तुम्ही काय खाता याची काळजी घेणे तब्येतीसाठी महत्त्वाचे आहे. तुम्ही काय खाता याकडे लक्षदेणे गरजेचे आहे.

आरोग्यदायी डाएटसाठी काही टिप्स

स्वत:ला निरोगी व फिट ठेवण्यासाठी खालील उपायांचा अवलंब करू शकता.

* जर तुम्ही रोज काही वर्कआउट करता तर आपल्या या दिनचर्येची पालन करीत रहा, कारण वर्कआउटमध्ये बाधा आल्यानंतर खाण्यात जरादेखील गडबड झाली, तर जास्त नुकसान होऊ शकते. तुमचे वजन वाढेल.

* अन्न बनवणे बऱ्याच जणांसाठी तणाव कमी करण्याचे काम करते. वास्तविक रिकाम्या पोटी अन्न बनवण्यानेमध्ये खाण्याची इच्छा होते. यापासून वाचण्याचा उपाय हा, की तुम्ही अशा वेळी पदार्थ बनवा, जेव्हा तुम्ही भुकेलेल्या नसाल किंवा मग अनारोग्यदायी गोष्टी जवळ ठेवू नका. तुम्ही जो पदार्थ बनवाल, तो आरोग्यदायी असावा याची काळजी घ्या व यासाठी आरोग्यदायी गोष्टींचा वापर करा. गोडाच्या जागी मध, गूळ व ताज्या फळांचादेखील उपयोग केला जाऊ शकतो.

* सणांच्या पूर्वतयारी दरम्यान खरेदीचा संबंध काही सिद्धांतानुसार व्हायला हवा. यात फक्त आरोग्यदायी पदार्थ निवडणे व सुरुवातीपासूनच अनारोग्यदायी गोष्टींना दूर ठेवणे यांचा सहभाग आहे.

* मांसाहारी भोजनाचे सेवन टाळा व खाण्यात जास्त करून नैसर्गिक गोष्टी, भाज्या, फळे घ्या. जर हे शक्य नसेल, तर मांसाहारी व शाकाहारी भोजन यांच्यामध्ये संतुलन पाळण्याच्या मंत्राचे पालन करा.

* हायड्रेटेड राहायला विसरू नका. पुष्कळ पाणी व इतर पेय पदार्थ प्या. उत्सवांमध्ये आपण घाईतदेखील असतो. आपल्याला आपल्या कामासोबत फिरणे, खरेदी करणे व पुष्कळ बाकी गोष्टींचा समन्वय साधायचा असतो. या व्यस्ततेत आपण कधी पोषण व स्वास्थ्य विसरता कामा नये. इतकेच नाही, कित्येक वेळा तहानेलाच भूक मानले जाते. मग जास्त खाणे खाल्ले जाते. पाणी कमी प्यायले जाते. यामुळे अनिश्चित काळासाठी पाण्याचे असंतुलन होऊ शकते व शरीरावर तणाव होऊ शकतो. यामुळे यावेळी लग्न वा सणांच्या खरेदीदरम्यान पुष्कळ पाणी व हलके पदार्थ घ्या व आनंदी राहा.

मान्सून स्पेशल : पावसाळ्यात कसा असावा आहार

* अनु जायस्वाल, फादर डायरेक्टर वैदिक सूत्र वेलनेस सेंटर

वर्षा ऋतूत जर तुमचे खाणेपिणे बरोबर असेल तर तुम्ही डिहायड्रेशन, डायरिया, घाम, थकवा येणे, भूक न लागणे, उलटया, हीट स्ट्रोक, अन्नातून विषबाधा यासारख्या समस्यांपासून दूर राहू शकता.

या समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील पदार्थ समाविष्ट करू शकता :

सॅलड

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि लाईकोपिन असल्याने पौष्टिक घटकांचे हे पॉवरहाऊस फळ आणि भाजी दोन्हीमध्ये गणले जाते. एका टोमॅटोत ३५ ते ४० कॅलरी असतात, पण हा दिवसात ४० टक्के व्हिटॅमिन सी आणि २० टक्के विटामिन ए ची गरज पूर्ण करू शकतो.

टोमॅटोचे आणखीसुद्धा अनेक फायदे आहेत. लाईकोपिनसारखे अँटीऑक्सिडंट असल्याने हा अनेक प्रकारच्या कँसरच्या लढयात मदत करतो. संशोधनात असे आढळते की लाईकोपिन एलडीएल अथवा वाईट कोलेस्ट्रॉलपासून सुरक्षित ठेवते, ज्यामुळे हृदयरोगाची शक्यता कमी होते.

काकडी सॅलडच्या स्वरूपात जास्त वापरली जाते. यात पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास सहाय्य करते. अल्सरच्या उपचारातसुद्धा काकडीचे सेवन आरामदायक ठरते. पेपर अथवा काळी मिरी यातसुद्धा बीटा कॅरोटीनसारखे अँटीऑक्सिडंट असते, जे प्रतिकारशक्ती बळकट करते आणि फ्री रॅडिकल्समुळे  होणारे नुकसान कमी करते. पण काही आजार जसे मुतखडयात  टोमॅटोचे सेवन डॉक्टरांना विचारूनच करावे.

फळं

या ऋतूत अनेक लो कॅलरी फळं उपलब्ध असतात, ज्यात फायबर, कॅल्शियम व इतर महत्वाच्या पौष्टिक घटकांचे योग्य प्रमाण उपलब्ध असते. हे शरीरात पाण्याचे प्रमाण कायम ठेवते. या ऋतुतील फळं जसे कलिंगड, लिची, काकडी, टरबूज, संत्री, अंगूर वगैरे याचे सेवन लाभदायक असते. सोडियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी ने परिपूर्ण असलेले कलिंगड शरीरासाठी अत्यंत लाभदायक असते.

ज्यूस

चिपचिप्या उन्हाळयात शरीराला पाण्याची जास्त गरज असते, म्हणून पेयपदार्थांचे सेवन जास्त करायला हवे, जेणेकरून शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळेल आणि तुम्हाला कंटाळवाण्या दुपारी उत्साही वाटेल. म्हणून तुमच्या आहाराच्या यादीत ज्यूससुद्धा समाविष्ट करा. लिंबू पाण्यापेक्षा उत्तम अन्य कोणता ज्यूस नाही. संत्री, मोसंबी यासाख्या फळांचे रससुद्धा तुम्ही घेऊ शकता. शहाळयाच्या पाण्यात अनेक आवश्यक खनिजे असतात, जे शरीराला हायड्रेटेड ठेवतात. हे पोटॅशियमचे  उत्तम स्रोत आहे.

भाज्या

आहारात त्या त्या हंगामी भाज्या जसे दुधी भोपळा, भेंडी, कारले, लालभोपळा, टोमॅटो, काकडी आणि मिरची अवश्य समाविष्ट करा. दुधीभोपळयात कॅलरी कमी आणि फायबर आणि पाणी जास्त असते. लो कॅलरी असल्याने ही भाजी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढण्याचा धोका नसतो. कारल्यात तांबे, लोह आणि पोटॅशियम असते. याचे सेवन केल्यास शरीरातील रक्तशर्करा आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते. कारले शरीरात क्षाराचा प्रभाव वाढवते, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

लाल भोपळयात लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम यासारखे घटक असतात. कच्च्या लाल भोपळयाचा रस शरीरातील विषारी घटकांना बाहेर टाकतो. अॅसिडिटी कमी करण्यातसुद्धा हा फारच लाभदायक असतो.

निरोगी राहण्याच्या ७ टीप्स

* निधी धवन

सणासुदीचा काळ सुरु आहे, म्हणून आम्ही तुम्हाला काही अशा टीप्स सांगत आहोत, ज्यामुळे साखरयुक्त पेय आणि अधिक कॅलरी असलेल्या मिठाईचे सेवन कमी करता येऊ शकते :

  1. आपल्या डाएट प्लानचे पालन करा
  • हेवी ब्रेकफास्ट करा. याने तुमचे पोट खूप वेळ भरलेले राहील. सणांच्या काळात हेवी ब्रेकफास्ट करा, जो फायबर आणि पौष्टिक पदार्थांनी परिपूर्ण असेल. दुपारच्या जेवणात प्रथिनांचे प्रमाण अधिक असावे. हे पोटाला खूप काळ भरलेले ठेवेल ज्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात खाल. आपल्या फ्रिज आणि किचनमध्ये पौष्टीक स्नॅक्स, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचे अनेक प्रकार जास्त प्रमाणात ठेवा.
  1. विचार करून खा
  • तुम्ही जे काही खात आहात, त्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवा. यामुळे जर तुम्ही मिठाई किंवा इतर कोणता जास्त कॅलरी असलेला पदार्थ थोडया प्रमाणात खाल्ला तर तुमचा कॅलरी इनटेक वाढणार नाही.
  1. पाणी भरपूर प्या
  • रोज भरपूर प्रमाणात पाणी प्या. दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करा. सकाळी रिकाम्या पोटी २-३ ग्लास पाणी प्या, याने तुमची पचनसंस्था साफ राहील. यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची पातळी कायम राहील आणि रक्तातील विषारी पदार्थ बाहेर टाकेल. दिवसातून कमीतकमी ३ लिटर पाणी अवश्य प्या.
  1. व्यायाम करायचा नसेल तर डान्स करा
  • जर व्यायाम करणे तुमच्यासाठी कठीण असेल तर मनापासून नृत्य करा. यामुळे खूप प्रमाणात कॅलरीज जळतात. कित्येक प्रकारच्या मिठाई आणि तुपाचे सेवन करूनही स्वस्थ राहण्याकरिता डान्स हे सगळयात चांगलं वर्कआऊट आहे.
  1. आरोग्यासाठी उत्तम उपाय निवडा
  • नेहमी चांगले आणि पौष्टीक पदार्थ निवडा. अतिखाणे टाळा. मिठाईऐवजी सुका मेवा, फळं, फ्लेवर्ड दही यांना प्राधान्य द्या.
  1. खरेदीसाठी जा
  • सणांच्या काळात कोणालाही खरेदी करायला आवडते आणि येथे आम्ही तुम्हाला आणखी एक कारण सांगत आहोत की खरेदी करणे तुमच्यासाठी कसे उपयोगी ठरू शकते. आपली शॉपिंगची योजना अशी बनवा की तुम्हाला अधिकाधिक चालावे लागेल. कारचा वापर न करण्याचा प्रयत्न करा. ऑनलाईन शॉपिंग करण्याऐवजी जर तुम्ही बाजार अथवा मॉल फिरून शॉपिंग केली तर जास्त प्रमाणात कॅलरी बर्न कराल
  1. डीटॉक्सिफिकेशन तंत्र
  • तसे पाहता आपल्या शरीराची रचना अशी असते की ते आपोआपच शरीरातील अपायकारक रसायने बाहेर फेकते, तरीही सणांच्या काळात शरीरातील विषारी पदार्थांचे प्रमाण वाढते. म्हणून आपल्या शरीरातून यांना काढून टाकायचा प्रयत्न करा. चहा आणि कॉफीऐवजी ग्रीन टी प्या. आपल्या दिवसाची सुरूवात १ ग्लास कोमट पाणी लिंबाचा रस मिसळून घ्या.
  • जर कॅलरी इनटेक जास्त झाले तर दुसऱ्या दिवशी वर्कआउट किंवा वॉकची वेळ १० मिनिटे वाढवा. सणांमध्येही आपले व्यायामाचे रुटीन चालू ठेवा. बस कार्डिओ थोडे वाढवा.
अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें