चॉकलेट खा, खुश व्हा

* दीपा पांडेय द्य

चॉकलेट खायला सगळयांनाच आवडते. अनेकदा कुणालातरी चॉकलेट खाताना पाहून आपल्यालाही ते खाण्याचा मोह होतो, पण दात किडण्यापासून वाचवण्यासाठी आणि वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण स्वत:ला आवरले पाहिजे. तरीही डार्क चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे आहेत. कोको या पदार्थापासून बनवलेल्या चॉकलेटमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात जे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.

कोकोची वैशिष्टये

अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, झिंक याशिवाय कोकोच्या झाडात इतर अनेक पोषक घटक असतात ज्यापासून डार्क म्हणजेच गडद चॉकलेट बनवले जाते. याशिवाय यामध्ये कॅफिनचे प्रमाणही कमी असते. म्हणूनच जरी आपण हे चॉकलेट कमी प्रमाणात खाल्ले तरी ते आपल्याला भरपूर ऊर्जा देते.

शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला अँटिऑक्सिडंट्सचा डोस हवा असतो. संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, कोकोमध्ये ब्ल्यूबेरीपेक्षा चांगले अँटिऑक्सिडंट असतात.

डार्क आणि साखर नसलेले चॉकलेट मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर असते. ते पित्त आणि इन्सुलिनच्या स्त्रावावर परिणामकारक ठरते, ज्यामुळे मधुमेहाचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.

ते नैराश्य आणि तणाव कमी करण्यासाठीही खूप फायदेशीर असते. आपण सर्वच आपल्या स्वभावातील चढ-उतारांमुळे त्रस्त असतो. कधी मन खूपच उदास किंवा चिडचिडे होते. अशा स्थितीत डार्क चॉकलेट खूपच लाभदायक ठरते. त्यात असलेल्या कोको पॉलिफेनॉल्सच्या सेवनामुळे चांगल्या प्रकारच्या कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होते.

लीन बार

हरियानाचे टॉपर असलेल्या देवांश जैन यांनी २०१८ मध्ये प्रदीर्घ संशोधनानंतर एक असे चॉकलेट बनवले जे वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. त्यांनी चोको, सिपिरुलिना, बदाम, मनुका आणि मुसलीचा (ओट्स आणि इतर तृणधान्ये, सुकामेवा आणि काजू यांचे मिश्रण) वापर करून हे चॉकलेट तयार केले. त्याला नंतर स्टार्टअपचे स्वरूप दिले. आज ऑनलाइन ‘द हेल्थी’च्या माध्यमातून ५० हजारांहून अधिक ग्राहकांनी या चॉकलेटची खरेदी केली आहे.

चॉकलेटचे तोटे

डार्क चॉकलेटमध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असते. म्हणूनच ते मर्यादित प्रमाणातच खायला हवे. ते जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे झोप न येणे, डिहायड्रेशन, डोकं गरगरणे, उलटी, वजन वाढणे असे आजार उद्भवतात.

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. हेच चॉकलेटसाठीही लागू होते. दररोज डार्क चॉकलेटचे १ किंवा २ तुकडेच खायला हवेत. ते किती खावे यासाठी तुम्ही डॉक्टरचा सल्लाही घेऊ शकता.

सर्वसामान्यपणे चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण जास्तच असते, जे दात आणि शरीरासाठी नुकसानकारक ठरते. विचारपूर्वक मर्यादित प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्यास त्याच्यातील गुणांचा फायदा करून घेता येतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें