नारळाच्या झाडाचा रस नीरा

* प्रतिनिधी

नारळाच्या झाडाच्या फुलांच्या गुच्छातून जो रस बाहेर येतो तीच नीरा आहे. यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण अजिबात नसतं आणि हे अतिशय पौष्टिक व आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे. हे लोहयुक्त आणि उर्जादायीसुद्धा आहे. एकूणमिळून हे उत्साहवर्धक, चपळता आणणारं आणि नवचैतन्य प्रदान करणारं पेय आहे.

याचं वैशिष्ट्य हे आहे की हे चरबी व कोलेस्ट्रॉलमुक्त आहे. याचा ग्लायसिमिक इंडेक्स अवघा ३५ आहे, जो बहुतांश फळांच्या आणि भाज्यांच्या तुलनेत अतिशय कमी आहे, जेणेकरून रक्तातील शर्कऱ्याच्या पातळीवर याचा प्रभाव खूप कमी होतो. त्यामुळे हे मधुमेहींसाठी, मधुमेहाच्या प्राथमिक अवस्थेत असणाऱ्यांसाठी आणि रक्तातील साखरेचं प्रमाण ठराविक पातळी ओलांडण्यापासून बचाव करू इच्छिणाऱ्यांसाठी योग्य आहे.

नीरा महत्त्वपूर्ण व्हिटामिन बी १२सह सर्व व्हिटामिन्सने युक्त आहे. यातील व्हिटामिनमध्ये इनोसिटोल (व्हिटामिन बी) सर्वाधिक आढळून येतो, जे आरोग्यवर्धक पेशींच्या निर्मितीकरता आवश्यक आहे. हे अस्वस्थता तसेच डिप्रेशनसाठीही फायदेशीर आहे. यामध्ये कमी प्रमाणात व्हिटामिन बी १२ आढळून येतं, जे इतर झाडाझुडपांमध्ये अजिबात आढळून येत नाही. हे सर्व बी व्हिटामिन पेशींच्या चयापचय प्रक्रियेत सहाय्यक ठरतात आणि उर्जा प्रदान करतात. यामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, नायट्रोजन, मॅग्निशिअम, मॅग्नीज, कॉपर, झिंक, कॅल्शिअम आणि सोडिअम वगैरे खनिजही असतात.

शहाळ्याच्या झाडापासून नीरा कशी निघते

नीरा काढण्यासाठी शहाळ्याच्या बंद फुलांचे गुच्छ बांधून तयार केले जातात. यानंतर फुलांची टोकं कापली जातात. मग त्यातून टपकणारी नीरा जमा केली जाते. वास्तविक बंद फुलांची टोकं कापल्यावर त्या फ्लोयम कोशिकेतून पाझरणारा रस नीराच्या रूपात जमा केला जातो. तंदुरुस्त शहाळ्याच्या झाडांच्या प्रत्येक पानाच्या कक्षेमध्ये नियमितपणे फुलांचा गुच्छ तयार होतो, तेव्हा वर्षभर त्यातून नीरा निघते.

फुलांचे गुच्छ बांधण्याच्या ३ आठवड्यांच्या आत त्यातून नीरा बाहेर यायला सुरूवात होते. रसाचं प्रमाण हळूहळू वाढतं आणि जेव्हा ते अधिकाधिक वाढतं तेव्हा रस दिवसातून दोन वेळा जमा केला जातो. एका शहाळ्याच्या झाडावरून नीराचं साधारण उत्पादन दरदिवशी २.१ लिटर होतं.

नीरापासून बनणारी उत्पादनं

नीराच्या प्रोसेसिंगद्वारे नीरा सिरप, नीरा हनी, नीरा गूळ तसंच नीरा साखर वगैरे बनवले जातात. नीरा गूळ आणि साखर दोन्ही अत्यंत पौष्टिक आहेत. पांढऱ्या साखरेविरोधात जी मोहीम सुरू आहे, ती लक्षात घेता नीरा साखरेच्या आरोग्यवर्धक गुणांमुळे लोकांमध्ये त्याची लोकप्रियता वाढत आहे. खाद्य उद्योगामध्ये नीरा सिरप आणि हनीची मोठी मागणी आहे. घरांमध्ये जे चॉकलेट, केक, बिस्किट, जाम, गुलाबजाम, लाडू, जिलेबी वगैरे पदार्थ बनवतात त्यात गोडव्यासाठी नीरा हनी वा साखर मिसळून मिठायांचा ग्लायसिमिक इंडेक्स कमी करून ते हेल्दीसुद्धा बनवू शकता.

रोजगाराचं नवीन साधन

नारळ विकास बोर्डाचे आलुवा येथील वाषक्कुलममधील नाविबो प्रौद्योगिकी संस्था (सीआयटी) आणि बोर्डामध्ये रजिस्टर नारळ उत्पादक फेडरेशनमध्ये नीरा तंत्रज्ञांना प्रशिक्षण दिलं जात आहे. नीरा उत्पादनातून हे नीरा तंत्रज्ञ दरमाही साधारणपणे रु. ३०,०००पर्यंत कमवू शकतात.

नीरा एक नवीन उत्पादन आहे. त्यामुळे लोकांमध्ये याप्रति खूप साशंकता आहे. नीराचं स्थान बाजारात उपलब्ध साधारण लघू पेयांमध्ये वा फळांच्या रसांमध्ये नाही, तर प्रोटीन आणि व्हिटामिन समृद्ध पेयांमध्ये आहे. नीराचं वैशिष्ट्य हे आहे की हे कृत्रिम पद्धतीने पौष्टिक बनवलेलं नाही, तर नीरा नैसर्गिकरित्या पौष्टिक आहे.

नीरा प्लाण्ट लावण्यासाठी अपेक्षित खर्चाच्या २५ टक्के आर्थिक सहाय्य नारळ प्रौद्योगिकी मिशनअंतर्गत असणारे बोर्ड देत आहेत. म्हणून नीरा आणि नारळ शर्करासारख्या पौष्टिक गुणांनी युक्त आरोग्यवर्धक उत्पादनं घरगुती आणि निर्यात बाजारात आपलं स्थान निर्माण करत आहेत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें