गुपित नितळ त्वचेचे

* भारत भूषण श्रीवास्तव

त्वचेवरील डाग व्रण नाहीसे करण्यासाठी महिला न जाणे कोणकोणते उपाय करून पाहतात. एवढे करूनही डाग वा व्रण गेले नाहीत तर चिडचिड होणे सहाजिक आहे. लाखो घरगुती उपाय व टीप्स आहेत आणि अनेक क्रीम्स बाजारात उपलब्ध आहेत. सगळे वापरूनही डाग वा व्रण कायमचे जात नसतील तर डागयुक्त असलेली त्वचा नक्कीच एक शाप आहे.

त्वचेवरील डाग वा व्रण नाहीसे करण्याकरीता आधी त्याची कारणे जाणून घेणे गरजेचे आहे, ज्यामुळे हे त्वचेवर दिसू लागतात व परत जायचे नाव घेत नाहीत.

त्वचेच्या आपल्या अशा काही गरजा असतात, ज्या आपण वेळीच समजून घेतल्या नाहीत तर वाढत्या वयानुसार हे डाग वा व्रण वाढत जातात आणि वेळ अशीही येते की कोणताही उपाय कामी पडत नाही.

खरेतर त्वचेवरील डाग वा व्रण बाह्य व अंतर्गत दोन्ही कारणे एकदम वरचढ झाल्याने ते आपल्याला भक्ष्य बनवतात आणि अशाप्रकारे बनवतात की आपल्याला समजतसुद्धा नाही की पहिला डाग केव्हा आला होता ते. म्हणजेच निष्काळजीपणा हेसुद्धा एक मोठे कारण आहे.

या, जाणून घेऊ नितळ त्वचा मिळवण्याची काही गुपितं, जेणेकरून चेहरा लपवावा लागणार नाही व आत्मविश्वासही कायम राहील.

आहार

त्वचेचा थेट संबंध आपल्या आहाराशी असतो, हे सगळयांना माहीत असते. पण असे असूनही जेवणातील काही घटकांच्या अभाव वा कमतरतेमुळे आपल्या लक्षात येत नाही आणि हेच त्वचेवर डाग वा व्रण येण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून नव्या दृष्टीने जेवणाकडे बघायला हवे. जसे की :

* जेवणात जीवनसत्वे, प्रथिने, खनिजे व इतर घटक समाविष्ट असावेत.

* जेवणात ऋतूनुसार फळं, भाज्या, डाळी अवश्य समाविष्ट करा.

* दही, ताक आपल्या जेवणाचा भाग बनवा.

* व्हिटॅमिन ई व सी असलेलले खाद्यपदार्थ म्हणजे लिंबू वगैरे जेवणात असायला हवे.

* रात्रीचे जेवण झोपण्याच्या ३-४ तास अगोदर घ्यावे.

* सकाळचा नाश्ता पौष्टिक व तंतुमय असावा.

* संतुलित प्रमाणात सुका मेवा आपल्या आहारात सामाविष्ट करा.

अनेक कारणांमुळे डाएट चार्ट पाळणे शक्य होत नाही. पण जेवणात काय असावे व काय असू नये याकडे नक्कीच लक्ष असू शकते. जसे :

हे अजिबात घेऊ नका : दारू. पांढरा ब्रेड, शीत पेये, सोया मिल्क, स्ट्राबेरी, चॉकलेट. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या पदार्थांचे अति सेवन केले तर ते त्वचा विकार निर्माण करतात. म्हणून हे पदार्थ घेतले नाही तरी चालतात.

मर्यादेत ठेवा : चहा, कॉफी, दूध, मीठ, साखर, शेंगदाण्याचे तेल व सालसा.

नियमित घ्या : सफरचंद, टोमॅटो, लिंबू, दही आणि फळांचा रस.

केवळ अंघोळ करणे हे त्वचेसाठी पुरेसे नाही, उलट त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी हे उपायसुद्धा अवलंबले पाहिजेत :

* आठवडयातून एकदा उटणे वापरा.

* महिन्यातून एकदा फेशियल व बॉडी मसाज अवश्य करा.

* चेहऱ्याकडे खास लक्ष द्या. पहिला डाग दिसताच जागे व्हा. त्वरित ब्युटिशियन वा त्वचारोगतज्ञाचा सल्ला घ्या.

* कमीतकमी ७-८ तासांची झोप पूर्ण करा.

* पोट साफ ठेवा. बद्धकोष्ठता हे त्वचेववरील डाग वा व्रणाचे एक प्रमुख कारण आहे.

* चेहऱ्यावर ठराविक काळाने मध, हळद, लिंबाचा रस, गुलाबजल, बेसन किंवा सायीचा वापर करा. हे वापरल्याने मृत त्वचा नाहीशी होते.

* नियमित सनस्क्रीन वापरा.

* ताण, अपचन, निद्रानाश यापासून दूर राहा. बऱ्याचदा डोळयांखाली काळी वर्तुळं यामुळेच येतात.

इंदोरच्या अनुभवी ब्युटिशियन मीनाक्षी पुराणिक सांगतात की किशोरावस्थेत ज्याप्रमाणे मुरूम येऊ लागतात त्याचप्रमाणे मेनापॉजच्या काळातही त्वचेच्या समस्या निर्माण होऊ लागतात, जसे सुरकुत्या येणे, पिगमेंटेशन येणे, डोळयांच्या आजूबाजूला रेषा व डार्क स्पॉटस येणे वगैरे.

या सांगतात की अलीकडे ब्युटी क्लिनिक्समध्ये फेशियलशिवाय अनेक नॉनसर्जिकल ट्रीटमेंट्स दिल्या जातात जसे मायक्रोडर्माटोजन, फ्रुट पील, केमिकल पिल, लिंफेटिक थेरपी, मॅगनेट थेरपी, अरोमा थेरपी, स्टोन थेरपी, मरीन ट्रीटमेंट वगैरे. ह्या सगळया ट्रीटमेंट्स त्वचा डागविरहित करतात. शक्य असेल तेवढी आपली जीवनशैली आणि आहार व्यवस्थित ठेवा. असे केल्याने त्वचेवरील चमक कायम राहील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें