पावसाळ्यात पुरळ आणि तेलमुक्त त्वचा मिळवा

* पारुल भटनागर

मान्सूनच्या आगमनाने उन्हापासून दिलासा मिळत असल्याने प्रत्येकजण पावसाची वाट पाहत असतो. पण हे हवामान जितके आल्हाददायक असते, तितकेच या ऋतूत आर्द्रताही असते, ज्यामुळे मुरुमे होतात. तेलकट आणि कॉम्बिनेशन स्किन असणाऱ्यांसाठी हा ऋतू कुठल्या समस्येपेक्षा कमी नाही. पण अस्वस्थ होण्याने समस्या सुटत नाही, तर अशा वेळी योग्य सौंदर्यप्रसाधनांचा वापर करण्याची गरज असते, जे त्वचेच्या स्वच्छतेसोबतच तिची पीएच पातळी संतुलित ठेवतात आणि तुम्ही मजेने पावसाळयाचा आनंद घेऊ शकाल आणि त्वचेवर पुरळ येण्याची समस्यादेखील नसणार. यासाठी बायोडर्माचे सीबम जेल मोसेंट हे सर्वोत्तम उत्पादन आहे, जे त्वचा स्वच्छ आणि निरोगी बनवण्याचे काम करते.

मुरुमांची समस्या का होते?

पावसाळयात भरपूर आर्द्रता असते, त्यामुळे त्वचेमध्ये जास्त प्रमाणात सीबम तयार झाल्यामुळे त्वचा तेलकट वाटू लागते, जे बॅक्टेरियाच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण मानले जाते कारण चिकट म्हणजे तेलकट चेहऱ्यावर घाण, घाम सहज चिकटतो. जो अॅलर्जी आणि छिद्रे बंद होण्यासह मुरुम आणि ब्रेकआउट्सचे कारण बनतो, विशेषत: तेलकट आणि कॉम्बिनेशन त्वचा असलेल्यांना मुरुमांच्या समस्येला अधिक सामोरे जावे लागते. त्वचेची काळजी न घेतल्याने स्किन बॅरियर योग्यरित्या कार्य करू शकत नाही, ज्यामुळे त्यावर लगेच अॅलर्जीची प्रतिक्रिया निर्माण होते तसेच छिद्र्रे ब्लॉक होतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांसोबतच तुमच्या चेहऱ्याचा रंगही हळूहळू निस्तेज होऊ लागतो. अशा परिस्थितीत योग्य स्किन प्रोडक्ट म्हणजेच क्लिन्जरने त्वचेची काळजी घेण्याची गरज असते.

बायोडर्मा सेबम जेल मोसेंट

हे विशेष यासाठी आहे कारण ते त्वचेला कोरडे न करता स्वच्छ करण्याचे काम करते. यात झिंक सल्फेट आणि कॉपर सल्फेटसारखे घटक असतात, जे त्वचेला हानी न पोहोचवता तिची एपिडर्मिस लेयर म्हणजेच त्वचेचा बाह्य थर स्वच्छ करून सेबम स्राव ही कमी करण्याचे काम करतात, ज्यामुळे मुरुमांची समस्या उद्भवत नाही. त्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांमुळे होणारे डागही कमी होतात. त्याचा साबण-मुक्त फॉर्म्युला त्वचेची पीएच पातळीदेखील संतुलित ठेवतो, ज्यामुळे त्वचेवर कोणतीही समस्या न होता त्वचेच्या समस्या दूर होतात.

युएसपी जाणून खरेदी करा

तुमची त्वचा हळूवारपणे स्वच्छ करा : त्वचेसाठी केवळ तीच उत्पादने चांगली असतात, जी त्वचेवर कठोर परिणाम न करता ती स्वच्छ करतात कारण सौम्य उत्पादने केवळ त्वचेतील घाण सहजपणे काढून टाकण्याचेच काम करत नाहीत तर त्वचेचे नैसर्गिक तेलदेखील त्वचेत टिकवून ठेवतात. ज्यामुळे त्वचा हायड्रेटेडही राहते, तसेच त्वचेतील धूळ, घाण निघून जाते, जे त्वचेस सुंदर बनवण्याबरोबरच मुरुम मुक्त त्वचा देण्याचे काम करतात.

पीएच पातळी राखणे : सेबम जेल मॉसेंट त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवण्यासोबतच त्वचेवर संरक्षणात्मक अडथळा म्हणूनही काम करते. यामुळे त्वचेवर संसर्ग आणि बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता मोठया प्रमाणात कमी होते, तसेच बाह्य वातावरणामुळे होणाऱ्या नुकसानीपासून त्वचेचे संरक्षण होते आणि त्वचेची आर्द्र्रताही टिकून राहते, जी निरोगी आणि आकर्षक त्वचेसाठी खूप महत्वाची असते.

सेबमचे जास्त उत्पादन थांबवा : जेव्हा त्वचेवर सेबमचे जास्त उत्पादन सुरू होते, तेव्हा ते त्वचेवर स्निग्ध प्रभाव देण्याचेच काम करत नाही तर छिद्रदेखील बंद करते आणि मुरुमांना कारणीभूत ठरते. परंतु सेबम जेल मोसेंटमध्ये झिंक सल्फेटची उपस्थिती त्वचेवर अतिरिक्त तेल तयार होण्यापासून रोखण्यास मदत करते. यासोबतच यातील कॉपर सल्फेट त्वचेवरील बॅक्टेरियाची वाढ रोखण्यासोबतच त्वचा निरोगी बनवण्यातही मदत करते.

छिद्रे अडकणे प्रतिबंधित करा : हे उत्पादन नॉन-कॉमेडोजेनिक, नॉन ड्राय आहे आणि त्याच्या साबण-मुक्त फॉर्म्युल्यामुळे ते मुरुमांच्या प्रवण, तेलकट आणि कॉम्बिनेशन त्वचेसाठी सर्वोत्तम उत्पादन आहे. जर तुम्ही विचार न करता आणि त्यातील घटक न बघता सौंदर्य उत्पादने खरेदी केली तर अनेक वेळा त्यात जास्त केमिकल वापरले गेल्यामुळे छिद्रे बंद होतात. जे मुरुम आणि त्वचेच्या अॅलर्जीचे एक मोठे कारण आहे, मात्र हे उत्पादन आपण सुरक्षितपणे वापरू शकता.

डर्मेटोलॉजिकली टेस्टेड : जेव्हापण तुम्ही बाजारातून कुठले सौंदर्यप्रसाधन खरेदी कराल, तेव्हा ते त्वचा विज्ञानाच्या दृष्टीने तपासले पाहिजे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे उत्पादन डर्मेटोलॉजिकली टेस्टेड आहे, ज्यामुळे ते त्वचेवर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया निर्माण करणार नाही, ते मुरुमांवर उपचारदेखील करेल आणि त्वचेचे नैसर्गिक तेलदेखील टिकवून ठेवेल. जगभरातील सेलिब्रिटीदेखील हे उत्पादन वापरण्याची शिफारस करतात. सौम्य असण्यासोबतच ते त्वचेसाठीदेखील चांगले आहे आणि डोळयांनादेखील कोणतीही हानी पोहोचवत नाही.

अप्लाय कसे करायचे

तुम्ही आठवडयातील सातही दिवस तुमच्या सकाळ आणि संध्याकाळच्या नित्यक्रमात याचा समावेश करा. तुम्हाला फक्त तुमच्या ओल्या चेहऱ्यावर हे क्लिंझर लावण्याची गरज आहे. लक्षात ठेवा हे फोम पद्धतीने कार्य करेल. त्यानंतर चेहरा पाण्याने नीट धुवून तुम्ही आरामात चेहरा स्वच्छ करा. याने तुमचा चेहरा स्वच्छ होईल तसेच काही दिवसातच तुम्हाला मुरुम मुक्त त्वचा मिळेल. त्यामुळे आजच तुमच्या ब्युटी रुटीनमध्ये हे समाविष्ट करून निरोगी आणि मुरुममुक्त त्वचा मिळवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें