Holi Special : या 4 सोप्या पद्धतीने घराच्या टाइल्स साफ करा

* गृहशोभिका टींम

चमकदार पांढर्‍या टाइल्स असलेले सुंदर घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण होळीचा महिना आला की मग पांढऱ्या फरशांचं काय? रंगांच्या विपुलतेमध्ये घराची स्वच्छता देखील महत्त्वाची आहे. होळीचे रंग आमच्या घराच्या फरशाही त्यांच्याच रंगात रंगवतात. अशा परिस्थितीत पांढऱ्या टाइल्सचे सौंदर्य बिघडू शकते. मग आपण काय करावे? प्रत्येकासाठी महाग फ्लोअर क्लीनर खरेदी करणे शक्य आहे का? कदाचित नाही, आणि ते देखील आवश्यक नाही. होय, आता आपल्या घराच्या फरशा सोप्या पद्धतीने साफ करणे हे स्वप्न नाही. होळीच्या वेळी या पांढऱ्या फरशा स्वच्छ करण्यासाठी अशा काही पद्धती प्रभावी ठरतील.

येथे काही उपयुक्त टिपा आहेत

  1. ऑक्सिजन ब्लीच

पांढऱ्या टाईल्स आणि ग्रॉउट साफ करण्यासाठी ७५ टक्के पाण्यात २५ टक्के ब्लीच किंवा ऑक्सिजन ब्लीच मिसळा आणि स्क्रब किंवा ब्रशने स्वच्छ करा आणि मग टाइल नवीन सारख्या चमकू लागतील.

  1. व्हिनेगर द्रावण

एक गॅलन कोमट पाण्यात अर्धा कप व्हिनेगर मिसळून तुम्ही तुमच्या टाइलवरील डाग पुसून टाकू शकता.

  1. डिटर्जंट पावडर

पाण्यात डिटर्जंट टाकून डाग साफ केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात आणि फरशा चमकू शकतात.

  1. डिटर्जंट पावडर आणि अमोनिया

डिटर्जंट पावडर आणि अमोनियाचे द्रावण हे स्वयंपाकघरातील टाइलमधून मेण काढून टाकण्याचा उत्तम मार्ग आहे. यासाठी तुम्ही अर्धा कप अमोनियाचे द्रावण एका कप लाँड्री डिटर्जंटमध्ये मिसळा आणि त्यात एक गॅलन पाणी घाला. हे द्रावण डाग असलेल्या भागावर लावा आणि कठोर स्क्रब ब्रशने मेण घासून घ्या, यामुळे तुमच्या पांढऱ्या टाइल्सवरील डाग निघून जातील.

उपयुक्त बेकिंग सोडा

– माधुरी गुप्ता

घराच्या स्वच्छतेसाठी आपण बहुतेकदा रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतो, जे महागडे तर असतातच पण कधी कधी हातांना चट्टे, अॅलर्जी हेही उद्भवू शकते. अशात तुम्ही कधी विचार केला आहे की सोडा बायकार्बोनेट किती फायदेशीर आहे? याला खाण्याचा सोडा असेही म्हटले जाते. प्रत्येक घरात हा असतोच आणि याचा वापर केक, इडली, ढोकळा इ. बनवण्यासाठी केला जातो. पण घरातील स्वच्छतेसाठीही सोड्याचा वापर केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, मग आम्ही सांगतो कसा ते :

* टाइल्स स्वच्छ करण्यासाठी एक बादली पाण्यात अर्धा कप बेकिंग सोडा मिसळा. याने फरशी पुसल्याने फरशी चमकू लागेल.

* रसायनयुक्त एअर फ्रेशनरऐवजी बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. एका छोट्याशा बाऊलमध्ये बेकिंग सोडा घेऊन त्यात काही थेंब ऐसेंशअल ऑइल घाला व खोलीत ठेवा. रूममध्ये ताजेपणा राहिल. हो, पण दर तीन महिन्यांनी हे बदलणे गरजेचे आहे.

* एखाद्या मऊ कापडावर थोडा बेंकिग सोडा भुरभुरावा व याने मायक्रोवेव्हची स्वच्छता करा. बेकिंग सोड्याने ओव्हनची स्वच्छता करायची असल्यास ओव्हनमध्ये थोडा बेकिंग सोडा घालून पाणी शिंपडावे. रात्रभर ते तसेच राहू द्यावे. सकाळी जरा व्यवस्थित पुसून घ्यावे. मग दुसऱ्या ओल्या फडक्याने पुसावे.

* कपडे धुताना डिटर्जंट पावडरमध्ये अर्धा कप बेकिंग सोडा मिसळावा. यामुळे अपेक्षेपेक्षा कपडे अधिक उजळ व स्वच्छ होतील.

* जर बेसीन किंवा सिंक तुंबले असेल तर रात्री अर्धा कप बेकिंग सोड्यात अर्धा कप व्हिनेगर मिसळून सिंकमध्ये टाकावे. सकाळी थोडे गरम पाणी घालावे.

* कारपेटवर रात्री बेकिंग सोडा शिंपडून ठेवा. सकाळी व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करून घ्या. कारपेटवरची धूळ निघून जाईल.

* किचनमधील स्लॅब, कॅबिनेट, गॅसशेगडी इ. वरून चिकटपणा दूर करण्यासाठी एखाद्या ओल्या कपड्यावर बेकिंग सोडा शिंपडून स्वच्छता करा. सर्व चिकटपणा निघून जाईल.

* हाताला जर कांदा लसणाचा वास येत असेल तर हातावर बेकिंग सोडा रगडा व हात स्वच्छ धुवून घ्या. हाताचा दुर्गंध निघून जाईल.

* समप्रमाणात मीठ आणि बेकिंग सोडा घेऊन मुंग्या लागलेल्या जागी शिंपडावे, मुंग्या निघून जातील.

* फळे व भाज्या ताज्या ठेवण्यासाठी त्यांना बेकिंग पावडर घातलेल्या पाण्यात थोडा वेळ ठेवावे. मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

* फुले ताजी राहण्यासाठी फुलदाणीत १ छोटा चमचा बेकिंग सोडा घाला.

* फ्रीजमध्ये वेगवेगळ्या वस्तूंचा वास येऊ नये म्हणून एका वाटीत बेंकिग सोडा ठेवावा. यामुळे हरतऱ्हेचा दुर्गंध शोषून घेतला जातो.

* एक मोठा चमचा पाण्यात ३ मोठे चमचे बेकिंग सोडा मिसळून पेस्ट चांदीच्या दागिन्यांवर स्पंजने लावा. मग हलक्या हाताने घासून स्वच्छ करून घ्या. भांडी चमकतील.

* मळलेले कंगवे ब्रश स्वच्छ करण्यासाठी एक कप पाण्यात १ छोटा चमचा बेकिंग सोडा घालून त्यात कंगवे, ब्रश एक तास ठेवावेत. सर्व मळ निघून जाईल. मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत.

* खिडकीच्या काचा स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्यात पाणी घालून पेस्ट बनवून घ्या. मग ती पेस्ट ओल्या कपड्याने काचेवर लावून नंतर कोरड्या फडक्याने धुवून घ्या.

* किचनमधील सिंक चमकवण्यासाठी सोड्यामध्ये पाणी मिसळून पेस्ट करून घ्या. ओल्या कपड्याने ही सिंकमध्ये लावून काही वेळाने पाण्याने स्वच्छ करा. सिंक चमकू लागेल.

* बोनचायना, पोर्सलीन, मेलामाइनचे कप किंवा भांड्यावरील डाग काढण्यासाठी त्यावर सोडा व पाण्याची पेस्ट बनवून लावा. काही वेळ तसेच ठेवा. नंतर हाताने स्वच्छ करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. सर्व डाग निघून जातील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें