चॉकलेट फेशिअल वाढत्या वयातील सौंदर्य…

* अनुराधा गुप्ता

वाढत्या वयात त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवणं महिलांसाठी एक मोठं आव्हान असतं. खासकरून तिशीला पोहोचलेल्या महिलांना त्वचेतील सैलपणा आणि सुरकुत्यांच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. खरंतर तिसाव्या वर्षानंतर त्वचेमधील नैसर्गिक माइश्चरायझर बनवण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे त्वचेमध्ये पूर्वीसारखं तेज राहात नाही. चॉकेलेट फेशिअलचा तिशीतील महिलांना नक्कीच फायदा होतो.

ब्यूटी एक्सपर्ट मीनू अरोरा यांनीही या गोष्टीला दुजोरा देत म्हटलं, ‘‘चॉकलेटमध्ये अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टीएजिंग प्रॉपर्टीज असतात, जे लिंफेटीक डे्रनेजसह त्वचेवर चढलेल्या डेड सेल्स काढून टाकतात आणि त्वचेला तजेला आणि चमक प्राप्त होते.’’

चॉकलेट फेशिअलमुळे आराम मिळतो

शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालं आहे की चॉकलेटचा स्वाद आणि सुगंध दोन्हीमुळे मानवी शरीरात हॅप्पी हार्मोन्स स्त्रवतात. यामुळे मानसिक तणाव दूर होऊन व्यक्ती आनंदी राहते. चॉकलेट फेशिअलचे काम काहीसं असंच असतं. कारण या फेशिअलमुळे रक्तातील सॅरोटेनिन यौगिक वाढवतं. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

योग्य स्क्रबिंगमुळे होतो योग्य परिणाम

चॉकलेट फेशिअल करताना सुरूवातीला चेहऱ्याला दुधाने क्लिजिंग केलं जातं. यानंतर ओटमील, डिस्प्रीन टॅबलेट, शुगर फ्री चॉकलेटचे विरघळलेले तुकडे, एक चमचा कॉफी पावडर आणि मधाने चेहऱ्याला स्क्रब केलं जातं.

स्क्रबिंगची योग्य पद्धत सांगताना मीनू म्हणतात, ‘‘कधी स्क्रब करताना चेहरा रगडू नये. काहीवेळ स्क्रबर चेहऱ्यावर लावून ठेवावा आणि मग हळुहळु बोटांनी गोलाकार फिरवून स्क्रबिंग केलं पाहिजे. यामुळे रक्तपुरवठा सुरू होतो आणि त्वचेचे डेड सेल्स निघून जातात.’’

कोल्ड कंप्रेशर आवश्यक

स्क्रबिंगनंतर त्वचेला हॉट कंप्रेशर देण्यासाठी स्टीमऐवजी पाण्यामध्ये बोरिक अॅसिड मिसळून त्यात भिजवलेला रूमाल चेहऱ्यावर काहीवेळ ठेवला जातो. हॉट कंप्रेशरमुळे त्वचेवरचे पोर्स उघडून त्यांचा आकार मोठा होतो. मोठे पोर्स कुरूप दिसतात. त्यामुळे हॉट कंप्रेशरनंतर लगेच कोल्ड कंप्रेशर देणं आवश्यक असतं. यासाठी थंड पाण्याची किंवा बर्फाचा वापर केला जातो.

मसाजचं महत्व

त्वचेला पेनिटे्रट करण्यासाठी चॉकलेटचे विरघळलेले तुकडे एलोवेरा जेलमध्ये मिसळून त्वचेवर लावले जातात आणि नारळाच्या पाण्यासह अल्ट्रासोनिक मसाज दिला जातो. सीसॉल्ट घालून त्वचेला मसाज दिला जातो. वास्तविक सीसॉल्ट त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेतं.

स्कीन टाइटनींग क्रिमने चेहऱ्यावर करण्यात येणारा मसाज अॅन्टीएजिंग फेशिअलमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यामुळे त्वचेला तजेला आणि चमक दोन्ही येते. मीनू सांगतात की या मसाजमध्ये चेहऱ्याचे काही खास प्रेशर पॉइंट्स दाबले जातात यामुळे रक्तभिसरण वाढते आणि आराम मिळतो.

फेशिअलचा शेवटचा टप्पा

सर्वात शेवटी ग्लो पॅकमध्ये विरघळलेलं चॉकलेट घालून ५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावलं जातं. यानंतर पुन्हा चेहऱ्याला हॉट कंप्रेशर आणि कोल्ड कंप्रेशर दिलं जातं.

चॉकलेट फेशिअलनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने जरूर धुवा, कारण चेहऱ्यावर चॉकलेटचा चिकटपणा तसाच राहातो. एसपीएफ क्रिम न लावता उन्हात जाऊ नका, त्वचा पातळ होते आणि पातळ त्वचा होरपळू शकते.

फेशिअल करण्याआधी हे लक्षात ठेवा

* फेशिअलच्या आधी ब्लीच करू नका. ब्लीचमुळे त्वचेवर केमिकलचा थर जमतो. त्यामुळे फेशिअलचा परिणाम चेहऱ्यावर कमी दिसतो.

* फेशिअलच्या दोन तास आधी काहीही खाऊ नका. कारण शरीर एकावेळी एकच कार्य करू शकते. एकतर अन्नपचन करू शकते किंवा मानसिक तणाव कमी करून रक्ताभिसरण करू शकते.

* चेहऱ्यावर पिंपल्स असतील किंवा पुरळ असेल तर आधी त्यावर उपचार करून घ्या. फेशिअल करण्याच्या आठवडाभर आधी कच्च्या दुधात लवंग भिजवून पुरळांवर लावा. ३ दिवसांत पुरळ सुकेल.

* दर २५ दिवसांनी फेशिअल करा. त्याआधी केलं तर त्वचेतील मृतपेशींसह कार्यरत पेशीही निघून जातील, जे त्वचेसाठी हानिकारक ठरते.

चॉकलेट फेशिअलचे फायदे

* चॉकलेट फेशिअल कोणत्याही प्रकारच्या त्वचेवर केले जाऊ शकते.

* चॉकलेटमध्ये असलेले अॅन्टीऑक्सिडंट्स त्वचेला फ्री रॅडिकल डॅमेजपासून वाचवतात.

* चॉकलेटमध्ये त्वचेला टॅनिंगपासून वाचवण्याची क्षमता असते.

* यामुळे त्वचा हायडे्रट होते आणि त्वचेची कोमलता टिकून राहाते.

* चॉकलेट फेशिअल त्वचेमध्ये वेगाने कोलोजन बनवते. यामुळे त्वचेची लवचिकता टिकून राहाते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें