स्प्रिंग वेडिंग सीझन नववधूचा लेहेंगा असावा खास

* गरिमा पंकज
प्रत्येक नववधू आपल्या लग्नात सर्वात सुंदर लेहेंगा परिधान करू इच्छिते,
जेणेकरून ती स्वप्नातली नवरी दिसावी. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा भावी
नवववधूला लेहेंग्यासंदर्भातील लेटेस्ट ट्रेंडची माहिती असेल. तरच ती स्वत:च्या
पसंतीचा, लेटेस्ट स्टाइलचा लेहेंगा खरेदी करू शकेल. चला तर मग सध्या कशा
प्रकारच्या लेहेंग्याची चलती आहे हे फॅशन डिझायनर आशिमा शर्मा यांच्याकडून
जाणून घेऊया :
प्रीड्रैप्ड दुपट्टा
ही फॅशन स्टाइल आजकाल बऱ्यापैकी ट्रेंडमध्ये आहे. तुम्हाला सतत दुपट्टा
सावरण्याची गरज नसते, कारण तो लेहेंग्यासोबतच शिवलेला असतो. यातील दोन
प्रकारचे दुपट्टे ट्रेंडमध्ये आहेत. पहिला हेडेड चोळी, यात तुम्ही फक्त डोक्यावर
ओढून घेण्यापुरता दुपट्टा वापरु शकता. दुसरा चुन्नी साइड, ज्याचा पदरासारखा
वापर करू शकता.
स्टेटमेंट स्लीव्स
अशा प्रकारची डिझाईनही फॅशनच्या यादीत अग्रस्थानी आहे. यामध्ये चोळी
एकतर एका साईडने छोटी किंवा एका साईडने मोठी असते किंवा एकाच साईडला
बाह्या असतात. तुम्हाला जर वेगळे काही ट्राय करायचे असेल तर यापेक्षा चांगले
काही नाही. हे १८ व्या शतकातील फॅशन स्टेटमेंटसारखा लुक देते.
इलूजन नेकलाइन

सध्या इल्यूजन नेकलाइनसारख्या डिझाईन्स ट्रेंडमध्ये आहेत. अशा प्रकारच्या
ड्रेसमध्ये गळयाजवळ जी मोकळी जागा असते, तिथे सुंदर कलाकुसर करून ड्रेसचे
सौंदर्य अधिकच खुलवले जाते. नेकलाईन डिझाईनसाठी नेट किंवा लेससारख्या
फॅब्रिकचा वापर केला जातो.
लेहेंग्यासह हाय लो कुर्ता
गेल्या वर्षी याची खूपच फॅशन होती. यावर्षी तो अॅडव्हान्स फॉर्ममध्ये उपलब्ध
आहे. सध्या लेहेंग्यासह हाय लो कुर्ता हे कॉम्बिनेशन सर्वांच्याच पसंतीचे ठरले
आहे. अशा प्रकारच्या डिझाईन्समध्ये कुर्ता पुढून फक्त गुडघ्यापर्यंत असतो
आणि मागून त्याची लांबी जमिनीला स्पर्श करेल एवढी मोठी असते. पुढे आणि
मागे दोन्हीकडे फक्त कंबरेपर्यंतच डिझाईन असते. याला पेपलम डिझाईन असेही
म्हणतात.
तुम्ही अशा प्रकारचा कुर्ता मॅचिंग लेहेंग्यासोबत किंवा कॉन्ट्रास्टिंग पॅटर्नसह घालू
शकता. अशा डिझाइनसह दुपट्टा न घेतल्यास जास्त चांगला लुक देईल.
यामध्ये तुम्ही काही नेक डिझाईन्स पसंत करू शकता. एक म्हणजे हाय नेक
आणि दुसरा क्लीव्हेज कट.
जॅकेट्स
लग्न हिवाळयाच्या मोसमात असेल तर हे डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करायला
हवे. अशा प्रकारच्या कपडयात वेलवेट वापरले जाते. तुम्ही लाँग रुफल जॅकेटसह
वेलवेट कोटही घालू शकता. अशा डिजाईन्स हिवाळयातील लग्नासाठी उत्तम
ऑप्शन आहे. यामुळे ऊब आणि कम्फर्ट दोन्ही मिळेल. तुम्ही या कोटवर
जरीकाम करू शकता, जे तुमच्या इतर आऊटफिटसोबतही मॅच होईल.
पेस्टल कलर

  • पेस्टल हा यावर्षीच्या सर्वात हॉटेस्ट ट्रेंडपैकी एक आहे. काही प्रसिद्ध डिझायनर
    आपल्या कलेक्शनमध्ये पेस्टलचा वापर करतात, तर काही नावाजलेल्या
    डिझायनर्सने पेटल पिंक, पावडर ब्लू, पेल पीच, लाईट मिंट ग्रीन असे काही
    स्वत:चे नवे कलर पॅलेट्सही तयार केले आहेत.
    पेपलम आणि एम्पायर वाईस्ट
    या फॅशन ट्रेंडवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आहे. जी आजकाल फॅशन
    शोमध्येही पाहायला मिळते. डिझायनर लेहेनगारेयर यांनी छोटी पेपलम चोळी
    आणि एम्पायर वाईस्ट गाउन टॉपचे प्रदर्शन भरविले आणि ही डिझाईन कशी
    कॅरी करायची हे लोकांना सांगितले. तुम्ही तुमच्या बस्ट लाइनला फ्लॉट
    करण्यासाठी पेपलम टॉपसह लो वेस्ट लेहेंगा घालू शकता.
    काही खास टिप्सफॅशन डिझायनर कमल भाई लग्नाचा लेहेंगा खास
    बनविण्यासाठी टीप्स देताना सांगतात :
  • लेहेंग्याला बेल्टसह एक्सेसराइज करा : कपडयाच्या बेल्टपासून ते फुलांच्या
    ज्वेलरीच्या बेल्टसारखे काही बेल्ट लेहेंग्यासोबत कंबरेवर बांधणे, हे सध्या खूपच
    पसंत केले जात आहे. दुपट्टा बेल्टमध्ये दाबून घेतल्यास लुक अधिकच खुलतो.
    लग्नाच्या या मोसमात लेहेंगा बेल्ट खूपच पसंत केला जाईल. दुपट्टा जागेवरच
    ठेवण्याची ही चांगली पद्धत आहे. अशाप्रकारे बेल्टला नववधूची उत्तम एक्सेसरी
    म्हणूनही वापरता येते. यामुळे तुमच्या कंबरेचे सौंदर्यही खुलून दिसेल. तुम्ही
    लेहेंग्याच्या रंगाचा बेल्ट घेऊ शकता किंवा याला ब्लाऊज आणि दुपट्टा यांच्याशी
    कॉन्ट्रास्ट करू शकता.
  • लेहेंग्याला बनवा कॅनव्हास : प्रत्येक दाम्पत्याकडे सांगण्यासारखी अशी एक
    प्रेमकहाणी असते आणि तिचे वर्णन करण्यासाठी लग्नाच्या लेहेंग्यापेक्षा उत्तम
    कॅनव्हास काय असू शकेल? होय, तुम्ही तुमची प्रेमकहाणी तुमच्या पेहेरावाशी
    अनुकूल बनवू शकता आणि त्यासाठी लेहेंग्यावर कशिदाकारी करता येऊ शकेल.
  • हाय नेक : हाय नेक एकप्रकारे नेकलेसचे काम करते. हाय नेकचा ड्रेस
    घातल्यानंतर कुठलाच नेक पीस वापरण्याची गरज पडत नाही. क्लासी चोकर बँड
    डिझाईनचा हाय नेक चोळीची सध्या खूपच फॅशन आहे. हे डिझाईन तुम्ही उंच
    असल्याचा आभास देतात.
  • फ्लोरल टच : फ्लोरल स्टाईल प्रत्येक नववधूला आवडते. लग्नाच्या निमित्ताने
    अनेक नामांकित सेलिब्रिटींनी ही स्टाईल कॅरी केली आहे.
    बॉलिवूड तारकांच्या लग्नातील लेहेंग्याचे जलवे

अनुष्का शर्माविराट कोहली आणि अनुष्का शर्माचे लग्न भलेही इटलीत झाले
असेल पण लग्नाचा पोषाख पूर्णपणे भारतीय होता. अनुष्का लग्नात डिझाईनर
सब्यसाचीने डिझाईन केलेल्या लेहेंग्यात पाहायला मिळाली. यावर सिल्वरगोल्ड
मेटल धागे आणि मोत्यांचे भरतकाम होते. अनुष्का शर्माच्या या लेहेंग्याची बरीच
चर्चा झाली आणि ती होणारच होती, कारण तिचा लेहेंगा खूपच सुंदर होता.
अनुष्काने जी ज्वेलरी घातली होती ती हातांनी डिझाईन केली होती. ज्वेलरीत
कटिंग न केलेले हिरे जडविले होते. हेदेखील सब्यसाची यांच्या हेरिटेज
कलेक्शनचाच एक भाग होते. यात जपानचे मोती लावण्यात आले होते आणि
याचा रंग सौम्य पिवळा आणि गुलाबी होता.

दीपिका पादुकोणबॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणसह अभिनेता रणवीर सिंहचे
लग्न १४-१५ नोव्हेंबरला इटलीतील लेक कोमो येथील विला डेल बालबीएनलो
येथे झाले. कोकणी रीतीरिवाजानुसार झालेल्या या लग्नात दीपिकाने गोल्डन रेड
कलरचा लेहेंगा घातला होता. प्रसिद्ध डिझाईनर सब्यसाची यांनी हे आऊटफिट
डिझाईन केले होते. नववधूच्या या लेहेंग्यात दीपिका खूपच सुंदर दिसत होती.
सब्यसाची यांनी डिझाईन केलेल्या दीपिकाच्या या लेहेंग्याची किंमत सुमारे ८.९५
लाख रुपये होती, असा अंदाज आहे.

सोनम कपूरसोनम कपूरचे लग्न दिल्लीतील व्यावसायिक आनंद आहुजा
यांच्याशी नुकतेच मुंबईत झाले. लाल रंगाच्या लेहेंग्यात सोनम कपूर खूपच सुंदर
दिसत होती. लग्नात पाहुण्यांचा ड्रेसकोड इंडियन ट्रेडिशनल स्टाईल असा होता.
लग्नसमारंभात तिने गडद रंगाचा पारंपरिक ड्रेस परिधान केला होता. लग्नाच्या
एक दिवस आधी संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सोनम
डिझायनर लेहेंग्यात दिसून आली. तो तयार करण्यासाठी जवळपास १८ महिने
लागले होते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें