काय आहे कॅण्डल मॅनिक्युअर-पॅडिक्युअर

– मिनी सिंह

सर्व मोसमांत हिवाळयाचे दिवस उत्तम मानले जात असले तरी या मोसमात त्वचा खूपच कोरडी आणि रुक्ष होते. यामुळे ती निर्जीव दिसू लागते. या मोसमात त्वचेला ओलावा अर्थात मॉइश्चरायजिंगची विशेष गरज असते.

हिवाळयात अनेकदा ओलाव्याच्या कमतरतेमुळे ओठ फुटू लागतात. हातापायाच्या त्वचेवर सफेद भेगा पडू लागतात, टाचांनाही भेगा पडू  लागतात. कधीकधी तर त्यातून रक्तही येऊ लागते, यामुळे खूपच वेदना होतात. त्यामुळेच या मोसमात त्वचेची खूपच काळजी घेणे गरजेचे असते. अशावेळी साधारण मॅनिक्युअर-पॅडिक्युअरमुळे काहीच फायदा होत नाही, उलट विशेष प्रकारच्या मॅनिक्युअर-पॅडिक्युअरची गरज असते. यासाठी तुम्ही कॅण्डल मॅनिक्युअर-पॅडिक्युअर थेरपीचा वापर करू शकता.

काय आहे कॅण्डल मॅनिक्युअर-पॅडिक्युअर

कॅण्डल मॅनिक्युअर-पॅडिक्युअर ट्रीटमेंट काही वैशिष्टयपूर्ण कॅण्डल्स म्हणजे मेणबत्ती वितळवून दिली जाते. हा मॅनिक्युअर-पॅडिक्युअरचा नवीन प्रकार आहे.

कसा करतात या ट्रीटमेंटचा वापर

या ट्रीटमेंटमध्ये कॅण्डल वितळवून त्याचा वापर स्क्रबिंग आणि मसाजसाठी केला जातो. या ट्रीटमेंटमध्ये मृत त्वचा काढून टाकली जाते. हिवाळयाच्या मोसमात ही ट्रीटमेंट खूपच उपयोगी ठरते.

याला कसे बनवतात

ही कॅण्डल बनवण्यासाठी वॅक्ससोबतच यात जोजोबा ऑईल, कोकोआ बटर, व्हिटॅमिन इ आणि आवश्यक तेलांचा वापर केला जातो. अशा कॅण्डल तुम्हाला बाजारात सहज मिळतील. वाटल्यास तुम्ही त्या घरीही बनवू शकता.

याचे फायदे

कॅण्डल मसाज त्वचेला पोषण देणे, एक्सफॉलिएट करणे आणि त्वचेतील पेशी पुनरुर्जीवित करण्यासाठीचा एक उत्तम उपाय आहे.

कसा कराल याचा उपयोग

कॅण्डल थेरपीदरम्यान मॅनिक्युअर-पॅडिक्युअरची सुरुवात सर्वसामान्य पद्धतीने केली जाते. सर्वात आधी नखे कापून, फॉईल, शेपिंग, क्युटिकल्सवर क्रीम लावून ती स्वच्छ केली जातात. यानंतर स्पेशल कॅण्डल वितळवली जाते. तयार वॅक्सचा वापर स्क्रबप्रमाणे केला जातो. यामुळे मृत त्वचा निघून जाते. त्यानंतर गरम टॉवेल गुंडाळून त्वचा स्वच्छ केली जाते.

यानंतर क्रीम बनवण्यासाठी पुन्हा कॅण्डल वितवळली जाते. या वॅक्सपासून बनवलेल्या क्रीमचा वापर चांगल्या प्रकारे मॉइश्चरायजिंग करण्यासाठी केला जातो. त्यानंतर हात आणि पायांसाठी स्क्रिन ब्रायटनिंग पॅकचा वापर केला जातो. याशिवाय पुरेशा प्रमाणात फळे खा, जास्तीत जास्त लिक्विड डाएट घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें