विणकामभरतकाम कौशल्याने करा व्यवसाय

* गरिमा पंकज

कोरोनामुळे आगामी काळात सोशल डिस्टंसिंग कायम राहणार आहे. याच कारणामुळे वर्क फ्रॉम होम आणि घरगुती व्यवसायात वेगाने वाढ होतेय. यामध्ये कसलाच संशय नाहीए की घरच्या घरी सामान बनवणं आणि ते विकून पैसे कमावणं एक खूपच चांगली बाब आहे. घरबसल्या तुम्ही तुमचा छंद, कला वा तुमच्या आवडीलादेखील व्यवसायात बदलू शकता. विणकामभरतकाम या अशा कला आहेत, ज्यामुळे घरबसल्या मिळकतीचा उत्तम मार्ग होऊ शकतो.

हातात कला असेल तर

याकाळात तसंही लोकांचे व्यवसाय बंद होत आहेत. अशावेळी विणकाम, शिवणकाम आणि भरतकाम काही असे व्यवसाय आहेत, जे तुम्ही आतादेखील सुरु करू शकता. यासाठी अधिक पैशाचीदेखील गरज नाहीए. तुमच्याजवळ जर कला असेल तर तर तुम्ही थोडा पैसा लावूनदेखील सहजपणे हा व्यवसाय सुरु करून पुढे जाऊ शकता. तुम्ही छोटया गावात असा वा मोठया शहरात तुमच्या हातात कला असेल तर हा व्यवसाय वाढण्यास कोणीच रोखू शकत नाही.

तुम्ही घरबसल्या मुलं आणि मोठयांसाठी कपडे शिवू शकता. विविध डिझाईनचे सुंदर स्वेटर बनवू शकता. तसंही कोरोना काळात बाहेरून जेवढया कमी वस्तू खरेदी कराल तेवढं योग्यच आहे. तुम्ही घरी विणलेले स्वेटर मुलांनी घातले तर तुम्हाला त्यांनी योग्य पेहराव घातल्याचं समाधान तरी मिळेल. हाताने बनविलेले असल्यामुळे यामध्ये वेगळंच आकर्षण असेल.

मुलांच्या कपडयांना कायमच खूप मागणी असते. तुम्ही सहजपणे घरच्या घरी मुलांचे सुंदर पेहराव बनवू शकता. अलीकडे अशा प्रकारची कामे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगाने पुढे वाढू शकतात. पोस्ट कोरोना काळात अशाप्रकारे घरातूनच तुम्ही तुमचा छान बिझनेस चालवू शकता.

व्यायामदेखील आहे

अशा प्रकारे विविध कपडे जसं की टेबलक्लॉथ, बेडशीट, ड्रेसेस इत्यादीवर कशिदा काढून तुम्ही त्यांना छान लुक देऊ शकता. तुम्ही घरच्या घरी स्वत:चा भरतकामाचा व्यवसाय सुरु करू शकता. विणकामभरतकामाची कला तुम्हाला विविध प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांपासूनदेखील वाचविते. विणकामभरतकाम केल्यामुळे बोटे व हात सक्रिय राहतात आणि सांध्याचे आजार होत नाहीत. विणकामभरतकाम केल्यामुळे मनदेखील सक्रिय राहतं, कारण यामुळे दोन्ही हातांबरोबरच डोकंदेखील एकत्रित काम करतं, ज्यामुळे एकाग्रता वाढते.

महत्वाचं म्हणजे कला कोणतीही असो ती तुम्हाला रिलॅक्स ठेवते. कोरोना काळ खूपच समस्यानीं भरलेला आहे आणि अशा वेळी विणकामभरतकामसारखी कामं अर्थाजनाबरोबरच तुमचा तणाव कमी करण्यातदेखील मदतनीस ठरू शकतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें