लेहंग्यात सजलेली नववधू

* भारती तनेजा

जेव्हा सौभाग्याचे तेज हातांवर लावलेल्या मेहेंदीपासून शरीरावर शोभणाऱ्या लेहंग्यापर्यंत पसरते, तेव्हा कुणाचे तरी होणार असल्याच्या भावनेतूनच रूप खुलते. जी बाब लेहंग्यात आहे, ती इतर कुठल्या पेहरावात कशी असेल. विवाह सोहळयात नववधूच्या लेहंग्यासह मेकअपसाठी कोणत्या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे, हे ऐल्पस ब्युटी क्लिनिक आणि अकॅडमीच्या संस्थापक भारती तनेजा यांच्याकडून जाणून घेऊया.

स्ट्रेट कट लेहंगा

बर्ड ऑफ पॅराडाईज मेकअप स्ट्रेट कट लेहंग्यावर सूट होतो. ही नवी स्टाईल आहे, जी स्मोकी आय किंवा कॅट आय मेकअपचे सुधारित वर्जन आहे. हा आय मेकअप करण्यासाठी जास्त रंगांचा भरपूर वापर केला जातो. तुम्हाला हा रंग जास्त गडद वाटत असेल तर त्याला काळया रंगासोबत आकर्षक बनवता येईल. असे लुक मिळवण्यासाठी निऑन किंवा गुलाबी रंगाऐवजी मोरपिशीसारख्या रंगाची निवड करा.

मेकअप करताना या गोष्टीकडे लक्ष द्या की हे रंग एकसारखे नसावेत. यासाठी नरिशिंग मॉइश्चरायजरने चेहरा आणि मानेवर मसाज करा. गाल आणि कपाळाच्या वरील भागावर कंटुरिंगसाठी गडद शेड लावा. डोळयांखाली करेक्टर लावा.

चेहऱ्याच्या बहुतांश भागावर फाउंडेशन लावा. ओल्या स्पंजच्या मदतीने ते एकसमान पसरवा. गालांच्या वरील भागावर हायलायटर लावा आणि गालांच्या फुगीर भागावर गुलाबी ब्लश लावा. नॅचरल लुकसाठी ते एकसमान पसरवा. गडद शेडच्या जांभळया रंगाच्या आयशॅडोला पेन्सिल ब्रशच्या मदतीने पंखांच्या आकाराप्रमाणे लावा. याची सुरुवात लॅशलाईनपासून करून ते डोळयांच्या बाहेरील भागापर्यंत लावा आणि त्यानंतर तुमच्या नॅचरल क्रीझ लाईनपर्यंत न्या. पापण्यांच्या मधोमध चमकदार निळी आयशॅडो लावा. निळयातील गडद शेड घ्या आणि जांभळया व चमकदार निळया आयशॅडोला एकजीव करण्यासाठी त्याचा वापर करा. खालच्या लॅशलाईनवर गुलाबी किंवा जांभळी आयशॅडो लावा. तर खालच्या वॉटरलाईनवर काजळ लावा. गुलाबी न्यूड लिप कलरने आपला लुक कम्प्लिट करा.

अनारकली लेहंगा

अनारकली लेहंग्यासोबत पारंपरिक लुकमधील मेकअप खूपच शोभून दिसतो. पारंपरिक मेकअपसाठी काजळ खूप गरजेचे आहे. जर एखाद्या डे इव्हेंटसाठी साधा अनारकली लेहंगा घातला असेल तर बेसिक आयलायनर लावल्यानंतर खालच्या लॅशलाईनवर काजळ लावा.

रात्रीचा इव्हेंट असेल तर स्मोकी आईज मेकअपसाठी डार्क काजळ लावून सौंदर्यात भर घालता येईल. पारंपरिक पेहेरावासोबत जी ज्वेलरी घालणार असाल त्याला अनुसरून मेकअप करणे गरजेचे आहे.

हेवी गोल्ड ज्वेलरीसोबत हायलाइट मेकअप जसे की ग्लिटरी ड्रेमेटिकल मेकअप करणे सौंदर्याच्या पायाभूत नियमांच्या विरुद्ध आहे. पारंपरिक लुकसाठी ब्लश केलेला चेहरा चांगला दिसतो.

यासाठी मेकअप करण्यापूर्वी चेहरा क्लीन करून त्याला फ्रेश लुक द्यायला हवा. पारंपरिक लुकसाठी फिक्या शेडऐवजी उठावदार रंगाची लिपस्टिक खुलून दिसते.

फिश कट लेहंगा

फिश कट लेहंग्यासोबत न्यूड मेकअप करून तुम्ही उजळ आणि आकर्षक लुक मिळवू शकता. न्यूड मेकअप तुमच्या त्वचेला एकसारखा पोत देतो. मेकअप बेस जितका न्यूट्रल असेल तितक्या तुम्ही सुंदर दिसाल. डार्क स्किनच्या न्यूड मेकअपसाठी ब्रोंज गोल्डन कलरची लिपस्टिक तुम्हाला चमकदार लुक देईल. डार्क स्किन टोनवर गोल्डन बाऊन आयशॅडोसोबत पिंक ब्राऊन शेडमधील ब्लशर वापरा. मिडियम स्किनवरील न्यूड मेकअपसाठी मोव कलरची लिपशेड खुलून दिसते. अशा प्रकारच्या त्वचेसाठी पेल गोल्डन ब्राऊन आयशॅडोसह पिंक ब्राऊन कलरचे ब्लश करा. हे तुम्हाला नॅचरल लुक देईल.

फेअर स्किनच्या न्यूड मेकअपसाठी गालांवर हनी अॅप्रिकोट कलरचे ब्लश लावा. कपाळावर लाईट कलरच्या शिमरी आयशॅडोचा वापर करा. ओठांना मॅट लावू नका किंवा ओव्हरग्लॉसी होऊ देऊ नका. तुम्ही क्रीम बेस्ड लिपशेड किंवा लिपबाम वापरू शकता. यामुळे तुमचा चेहरा अधिकच खुलून दिसेल. नॅचरल मेकअपसह मोकळे सोडलेले सिल्की केस, छोटीशी बिंदी आणि मांगात सजवलेली भांगपट्टी हा लग्नाच्या दिवशी तुमचा परफेक्ट लुक ठरेल.

हेवी वर्क लेहेंगा

यासोबतच तुम्ही अरेबिक मेकअप ट्राय करू शकता. अरेबियन लुकमध्ये डोळयांचा मेकअप सर्वात महत्त्वाचा असतो. यात डोळयांचा मेकअप खूपच व्हायब्रंट आणि कलरफूल केला जातो. डोळयांना आकर्षक बनवण्यासाठी त्यांच्या आतील कॉर्नरवर सिल्वर, मध्यभागी गोल्डन व बाहेरील कॉर्नरवर गडद रंगाचे आयशॅडो लावतात. त्यानंतर कट क्रीझ लुक देऊन काळया रंगाने डोळयांच्या आजूबाजूला कंटुरिंग केले जाते. यामुळे डोळे स्मोकी, मोठे व आकर्षक दिसतात. आयब्रोजखाली पर्ल गोल्ड शेडने हायलायटिंग करतात. डोळयात चमक दिसण्यासाठी पापण्यांवर ग्लिटर्स लावतात.

डोळयांना सेन्सुअल लुक देण्यासाठी पापण्यांवर आर्टिफिशिअल लॅशेज नक्की लावा. लॅशेज आयलॅश कर्लरने कर्ल करून मस्काऱ्याचा कोट लावा, जेणेकरून हे नैसर्गिक भासतील. वॉटर लाईनवर ठळकपणे काजळ लावून डोळयांचा मेकअप पूर्ण करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें