आईचं दूध वाढवी बाळाची इम्युनिटी

* पारूल भटनागर

कोरोनासारख्या महामारीपासून लढण्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढी इम्युनिटी वाढवणं खूपच गरजेचं आहे. हे वाढविण्यासाठी आज बाजारात अनेक सप्लीमेंट्स उपलब्ध आहेत. परंतु जर आपण नवजात शिशुबद्दल बोलत असू तर त्यांची इम्युनिटी वाढविण्यासाठी आईच्या दूधापेक्षा सर्वोत्तम काहीच असू शकत नाही. म्हणून तर प्रत्येक नवजात आईला हा सल्ला दिला जातो की तिने सुरुवातीचे सहा महिने आपल्या बाळांना फक्त आपलं दुध द्यायला हवं. कारण आईचं दूध विटामिन्स, मिनरल्स आणि अनेक न्यूट्रिएंट्सचा पुरेपूर खजिना असतो.

ब्रेस्ट फीडिंग वाढवते इम्युनिटी

अनेकदा नवजात माता आपली फिगर मेंटेन ठेवण्यासाठी व मुलांची भूक शांत करण्यासाठी सुरुवातीच्या काही महत्वाच्या महिन्यातच फॉर्मुला मिल्क द्यायला सुरुवात करतात. त्यामुळे त्यांची भूक शांत होते, परंतु शरीरातील न्यूट्रिशन संबंधित गरजा पूर्ण होऊ शकत नाही. तर आईच दूध प्रोटीन, फॅट्स, शुगर, अँटीबॉडीज व प्रोबायोटिकने पुरेपूर असतं, जे मुलांचं मौसमी आजारांपासून संरक्षण करून त्यांची इम्युनिटी बुस्ट करण्याचं काम करतं. जर आईला एखादं इन्फेक्शन झालं असेल तर त्या इन्फेक्शनपासून लढण्यासाठीदेखील शरीरात अँटीबॉडीज बनवणे सुरू करतं आणि मग याच अँटीबॉडीज आईच्या दुधाच्या माध्यमातून मुलांमध्ये पोहोचून त्यांची इम्युनिटी वाढविण्याचं काम करतं.

अनेक संशोधनाने सिद्ध झालं आहे की जी मुलं सुरवातीच्या सहा महिन्यांमध्ये फक्त आईचं दूध पितात, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अॅलर्जी, अस्थमा व संसर्गाचा धोका खूपच कमी होतो. म्हणूनच आईचं दूध बाळांसाठी औषधाचं काम करतं.

ब्रेस्टफीडिंग स्तनपान सप्ताह

महिलांमध्ये ब्रेस्ट फीडिंगबाबत जागरूकता पसरविण्याच्या उद्देशाने दरवर्षी एक ते सात ऑगस्टच्या दरम्यान जागतिक स्तरावर ब्रेस्ट फीडिंग वीक साजरा केला जातो. त्यांना दरवर्षी जागोजागी आयोजित कार्यक्रमांच्या माध्यमातून शिक्षित केलं जातं की आईच दूध दिल्याने बाळ आजारापासून दूर राहतं त्याबरोबरच तर आईचादेखील यामुळे ओवेरियन व ब्रेस्ट कॅन्सरच्या रिस्कपासून बचाव होतो. यामुळे रिलीज होणार हार्मोन ऑक्सिटोसिनमुळे आपल्या पूर्वीच्या आकारात येतं, सोबतच ब्लीडिंगदेखील कमी होतं.

ब्रेस्ट फिडींगचे इतर फायदे

न्यूट्रिशन अण्ड प्रोटेक्शन : आईच्या स्तनातून येणाऱ्या पहिल्या दूधाला कोलॉस्ट्रम म्हणतात. जे बेकार समजून वाया घालू घालवू नका. कारण हे न्यूट्रिएंट्सचा खजिना असण्याबरोबरच यामध्ये फॅटचे प्रमाणदेखील कमी होतं. ज्यामुळे मुलांसाठी हे पचवणं खूपच सहज सोपं होतं. सोबतच हे मुलाच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज बनविण्याचं काम करतं.

स्ट्राँग बॉण्ड बनविण्यात मदतनिस : लहानपणापासूनच आई आणि मुलाचं बोंड स्ट्राँग बनतं, यासाठी ब्रेस्टफीडिंगची महत्वाची भूमिका असते. ब्रेस्ट फिडींग केल्यामुळे आई आणि मुलाला एकमेकांचा स्पर्श होतो. ब्रेस्टफीडिंग केल्यामुळे ऑक्सिटोसिन हार्मोन ज्याला बॉण्डिंग हार्मोनदेखील म्हणतात, हेच हार्मोन जेव्हा तुम्ही किस वा हग करता तेव्हादेखील रिलीज होतं.

ब्रेस्टफीड बेबी मोर स्मार्ट : वेगवेगळया संशोधकांनी ब्रेस्टफीडिंग व ज्ञानात्मक विकासाशी सरळ संबंध जोडला आहे. अनेक शोधांमुळे हा निष्कर्ष काढला गेला आहे की ज्या मुलांना दीर्घकाळपर्यंत ब्रेस्टफीड केलं जातं त्यांचा आयक्यू लेवल खूप उत्तम असण्याबरोबरच ते प्रत्येक गोष्टीत खूपच स्मार्टदेखील होतात. कारण आईच्या दुधामध्ये बुद्धिमत्ता उत्तम करण्याचे न्यूट्रिशन, कोलेस्ट्रॉल, ओमेगा थ्री फॅटी आढळले आहेत. ब्रेस्ट मिल्क सहजपणे पचतं कारण यामध्ये फॅटचे प्रमाण खूपच कमी असतं. ज्यामुळे मुलाला कफ, गॅससारख्या तक्रारींचा सामना करावा लागत नाही. म्हणूनच पाचन तंत्र उत्तम ठेवण्यासाठी ब्रेस्टफीड हे बेस्ट आहे.

एसआयडीएसचा धोका कमी होतो : एका निष्कर्षांमुळे एक गोष्ट समोर आली आहे की कमीत कमी दोन महिन्यापर्यंत ब्रेस्टफीडिंग केल्यामुळे एसआयडीएस म्हणजेच सडन इन्फेन्ट डेथ सिंड्रॉमचा धोका ५० टक्यांपर्यंत कमी होतो. असं म्हटलं जातं की जी मुलं स्तनपान घेतात ते सहजपणे उत्तम झोप घेतात. यांची इम्युनिटी वाढविण्यात महत्त्वाची भूमिका आहे. तर मग आपण आपल्या बाळाला निरोगी ठेवण्यात ब्रेस्ट फिड नक्की करा.

स्तनपानावेळी घ्या ही दक्षता

* प्रतिनिधी

स्तनपान करणाऱ्या मातांनी स्तनाच्या स्वच्छतेकडे खूपच लक्ष देणे आवश्यक आहे. स्वच्छतेसंबंधी टीप्स प्रत्येक आईने जाणून घेणे गरजेचे आहे :

* बाळाला दूध पाजताना हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे कारण, तुम्ही दिवसभरात हाताने बरीच कामे करता. त्यामुळे हात आणि बोटे खराब होण्याची, संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक असते. शिवाय संसर्ग पसरवणारे जीवाणू आणि विषाणू इतके सुक्ष्म असतात की नुसत्या डोळयांनी दिसत नाहीत आणि बाळाला दूध पाजताना स्थानांतरीत होतात. यामुळे बाळाला अनेक आजार होऊ शकतात. म्हणूनच बाळात संसर्ग पसरण्याआधीच आईने आपले हात व्यवस्थित धुणे आवश्यक आहे.

* स्तन आणि निपल स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे कारण, कपडयांमुळे निपलवर घाम जमा झाल्यामुळे तेथे किटाणू तयार होतात, जे ब्रेस्ट फीडिंगवेळी बाळाच्या पोटात जातात आणि बाळ आजारी पडू शकते. म्हणून बाळाला दूध पाजण्याआधी स्तन आणि निपल हे कोमट पाण्यात कापासाचा बोळा किंवा स्वच्छ कपडा बुडवून त्याने साफ करून घ्या. निपलला आलेली सूज कमी करण्यासाठी दुधाचे ४-५ थेंब निपलवर लावून ते सुकू द्या. अनेकदा बाळ दूध पिताना दातांनी चावतो, त्यामुळे जखम होते आणि दुखू लागते. या वेदना  कमी करण्यासाठी आईचे दूध खूपच उपयुक्त आहे.

* बाळाच्या जन्मानंतर आईच्या स्तनात बदल होतो. अशावेळी घट्ट ब्रा घालू नये. कारण घट्ट ब्रा घातल्यामुळे बरेच नुकसान होते. एकतर बाळाला दूध पाजताना अडचण येते आणि दुसरे म्हणजे स्तनात दूध जमून राहते, जे नंतर गाठीत रुपांतरीत होते.

* बऱ्याच माता दूध पाजताना निपल शिल्डचा वापर करतात, जो दूध पाजताना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठीचा अल्पकालीन पर्याय आहे. निपल शिल्ड वापरताना त्याच्या स्वच्छतेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ते लावून दूध पाजण्यापूर्वी प्रत्येक वेळी त्याला स्टेरलाईज करायला हवे, जेणेकरून शिल्डवर असलेले किटाणू नष्ट होतील आणि बाळाच्या पोटात जाणार नाहीत.

* ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या माता रेग्युलर ब्रा ऐवजी नर्सिंग ब्रा घालतात, ज्यामुळे बाळाला दूध पाजणे सोपे होते कारण, या साधारण ब्राच्या तुलनेत खूपच आरामदायी आणि फ्लेक्सिबल असतात. कॉटनपासून बनवलेल्या या ब्रामध्ये हवा खेळती राहते शिवाय, याला लावलेले इलास्टिक त्वचेला खूपच सॉफ्ट टच देते. तुम्ही नुकत्याच आई झाला असाल आणि बाळाला ब्रेस्ट फीड करत असाल तर त्वचेचे संरक्षण करणारी नर्सिंग ब्रा एक चांगला पर्याय आहे. अशा प्रकारच्या ब्रामध्ये फक्त निपलवाली जागा उघडण्याची सोय उपलब्ध असते आणि मागे हुकही जास्त असतात, ज्यामुळे तुम्ही ब्रा तुमच्या गरजेनुसार सैल किंवा घट्ट करू शकता. या ब्राची रचना अशी असते की जी स्तनांना चांगल्या प्रकारे आधार देते. पण अनेकदा दूध पाजताना ते ब्रावर पडल्यामुळे तिथे बॅक्टेरिया तयार होतात शिवाय, ती खराबही होते. म्हणून नर्सिंग ब्रा दररोज बदला.

* स्तनपानासाठी तुम्ही जी साधने वापरता जसे की तुम्ही ब्रेस्ट पंपाचा वापर करत असाल तर त्याची स्वच्छताही गरजेची आहे. ब्रेस्ट पंप धुण्यासाठी स्वयंपाकघरातील किंवा बाळाची बाटली धुण्यासाठी असलेल्या ब्रशचा वापर अजिबात करू नका. तो स्वच्छ करण्यासाठी वेगळे ब्रश वापरा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें