सेन्सीबायो जेल मोसेंट जे पावसाळ्यात तुमच्या त्वचेची काळजी घेते

* पारुल भटनागर

पावसाळा हा जितका उष्णतेपासून दिलासा देणारा आहे तितकाच दमट असल्यामुळे जीवाणूंच्या वाढीसही पोषक आहे. म्हणूनच अशा हवामानात त्वचेला हायड्रेट ठेवताना त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. जेणेकरून हवामानाचा आनंद घेण्याबरोबरच तुमची त्वचा स्वच्छ, गुळगुळीत आणि मॉइश्चराइज्ड राहील. यासाठी तुम्हाला जास्त सौंदर्य उत्पादने उपयोग करण्याची गरज नाही, त्याऐवजी तुम्ही बायोडर्माचे सेन्सीबायो जेल मोसेंट वापरा. त्यामुळे तुमची त्वचा निरोगी होण्यास मदत होते.

विशेष काळजी आवश्यक : चिकट आणि दमट हवामानात पुरळ आणि बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते आणि अशा परिस्थितीत जेव्हा आपण त्वचेची काळजी घेत नाही किंवा माहितीच्या अभावामुळे चांगले क्लिंझर वापरत नाही तेव्हा आपल्या त्वचेतील घाण निघू शकत नाही. अशा परिस्थितीत या ऋतूमध्ये त्वचा नैसर्गिकरित्या हायड्रेटेड ठेवण्यासह ती साफ करणारे सेन्सीबायो जेल मोसेंट वापरावे, कारण दमट ऋतू हा बॅक्टेरिया आणि अॅलर्जीने भरलेला असतो, ज्यामुळे त्वचेची छिद्रे बंद होण्याबरोबरच मुरुमं आणि ब्रेकआउट्स होतात. पण एक चांगला क्लिंझर त्वचेला स्वच्छ आणि संरक्षित करण्यासाठी त्वचेवर अडथळा म्हणून काम करतो.

हे कसे काम करते : तुम्हाला बाजारात असे अनेक क्लिंझर्स सापडतील, जे पावसाळयात तुमच्या त्वचेची काळजी घेण्याचा दावा करतात. पण जेव्हा तुम्ही विचार न करता अशी उत्पादने खरेदी करता किंवा इतरांचे बघून तुमच्या त्वचेवर घटक न पाहता उत्पादने वापरता, तेव्हा यातील बहुतांश उत्पादने रसायनांच्या जास्त वापरामुळे तुमच्या त्वचेची नैसर्गिक आर्द्रता चोरण्याचे काम करतात. तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल नष्ट झाल्यामुळे पावसाळयात मुरुमांची स्थिती अधिकच बिकट होते. हे यासाठीदेखील विशेष आहे कारण यात डीएएफ कॉम्प्लेक्स आहे, जे विशेषत: संवेदनशील त्वचेला लक्षात घेऊन बनवलेले आहे. याव्यतिरिक्त त्यात कोको ग्लुकोसाइड आणि ग्लिसरील ओलेटसारखे सक्रिय घटक आहेत, जे त्वचेला खोलवर स्वच्छ करण्याबरोबरच त्वचेचे मॉइश्चरायझिंग गुणधर्म रिस्टोर करण्याचे कार्य करतात.

अमिनो अॅसिड आधारित क्लिंर : आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की अमीनो अॅसिड्स आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो, कारण ते बिल्डिंग ब्लॉक्स् असतात. जे आपल्या शरीरात होणाऱ्या प्रत्येक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. योग्य प्रमाणात वापरल्यास ते निरोगी त्वचेची निर्मिती, देखभाल आणि उपचारास्तव आवश्यक असलेली योग्य प्रथिने तयार करू शकतात आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या क्लिंझरमध्ये अमिनो अॅसिड, क्लीनिंग अॅसिड आहे, ज्यामुळे ते इतर क्लिंझरपेक्षा वेगळे बनते.

पीएच पातळी राखते : हे जेल मोसेंट त्वचेच्या पीएच पातळीला संतुलित करून त्वचेवर संरक्षणात्मक अडथळा म्हणून कार्य करते. यामुळे त्वचेवर संसर्ग आणि बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता खूप कमी होते. यासोबतच त्वचेला बाह्य वातावरणामुळे होणाऱ्या नुकसानीपासूनही संरक्षण मिळते आणि त्वचेची आर्द्रताही कायम राहते. जे निरोगी आणि आकर्षक त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे.

डर्मेटोलॉजिकली टेस्टेड : हे उत्पादन त्वचा विज्ञान चाचणी केलेले असल्याने तुम्ही ते तुमच्या त्वचेवर सुरक्षितपणे वापरू शकता. कारण त्यात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकाचे बारकाईने निरीक्षण केले जाते, कसून चाचणी केली जाते, जेणेकरून ते त्वचेला कोणत्याही प्रकारे हानी तर पोहोचवत नाही ना हे कळू शकेल.

तुमच्या सकाळ-संध्याकाळच्या दिनचर्येत याचा समावेश करा : जसे तुम्ही तुमच्या त्वचेच्या निगा राखण्याच्या दिनचर्येत इतर सौंदर्य उत्पादनांचा समावेश करता त्याचप्रमाणे तुमच्या सकाळ आणि संध्याकाळच्या नित्यक्रमात हे क्लिंझर सामील करा. यामुळे प्रदूषण, धूळीमुळे त्वचेवरील साचलेली घाण निघून जाण्यासोबतच तुमची त्वचा स्वच्छ आणि चमकदार ही बनेल. त्यामुळे तुम्ही हे दोन्ही वेळ वापरा. यासाठी तुम्ही ओल्या चेहऱ्यावर हे क्लिंझर लावा. नंतर चेहऱ्याला हलक्या हातांनी मसाज करा आणि नंतर चेहरा धुवा. काही दिवसातच तुमची त्वचा चमकण्यासोबत समस्यामुक्तदेखील होईल.

पावसाळ्यात या गोष्टी ही लक्षात ठेवा

चेहरा रोज धुवा : पावसाळयात त्वचेवर जास्त घाण आणि तेल जमा होते. पण जर तुम्ही दिवसातून किमान दोन वेळा चांगल्या क्लिंझरने तुमची त्वचा स्वच्छ केली तर त्यामुळे त्वचेवर साचलेले अतिरिक्त तेलही निघून जाईल आणि छिद्र अडकण्याची समस्याही उद्भवणार नाही. यासोबतच या ऋतूत तुम्ही तुमच्या त्वचेला बुरशीजन्य संसर्गापासूनदेखील वाचवू शकाल.

आपली त्वचा हायड्रेट करा : पावसाळयात जास्त घाम आल्याने त्वचा निस्तेज आणि निर्जीव वाटू लागते. अशा परिस्थितीत त्वचेची हायड्रेशन पातळी राखण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक असते, ज्यामुळे त्वचेचे डिटॉक्सिफिकेशन होऊ शकेल, जे त्वचेला मुरुममुक्त करण्याचे काम करते.

इंग्रीडिएंट्स पहाणे आवश्यक : ऋतू कोणताही असो, त्वचेची काळजी घेणारी उत्पादने तुम्ही नेहमी घटक बघून आणि संशोधन करूनच खरेदी केली पाहिजेत जेणेकरुन तुम्हाला तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य सौंदर्य उत्पादन मिळू शकेल, जे तुमच्या त्वचेसाठी सुरक्षित तसेच प्रभावीदेखील असेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें