अखेर भारत चीनपेक्षा मागे का आहे?

* प्रतिनिधी

भारतातील महिलांना चीनपेक्षा जास्त चिनी म्हणजे साखरेच्या दराची चिंता असते. प्रत्यक्षात चीनचा धोका आणि स्पर्धा आपल्या डोक्यावर सतत थैमान घालून नाचत असते.

तसे तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपला कार्यकाळ रूसचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याप्रमाणे अमर्यादित ठेवला आहे, पण सध्या तरी ते आपला देश आणि जगाच्या नजरेत खलनायक ठरलेले नाहीत. जेव्हा की, तुर्कीचे रजब तय्यब एर्दोगन आणि रूसचे अध्यक्ष पुतीन अशाच प्रकारच्या परिवर्तनासाठी लोकशाहीचे हत्यारे आणि जगासाठी धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

पुतीन यांच्या अगदी विरोधी अशी शी जिनपिंग यांची ओळख एक अत्यंत सौम्य आणि साधासरळ नेता अशी आहे. जे मालक कमी आणि संरक्षक जास्त वाटतात. चीनची धोरणेही अशीच आहेत. शी जिनपिंग यांच्या रस्ते आणि बेस्ट योजनांचे लक्ष्य सर्व देशांना एकाच मार्गाने जोडण्याचे आहे. ते बऱ्याच देशांना आवडले आहे, कारण बरेच एकाकी पडलेले देश आणि मोठया देशांच्या दूरवर पसरलेल्या भागांमधून हे मार्ग जाऊ लागले आहेत.

शी जिनपिंग यांनी मागच्या ३ दशकांमध्ये सरकारी सवलतींचा लाभ घेऊन धनाढय चिनी लोकांच्या आर्थिक नाडया आवळायला सुरुवात केली आहे. चीनमध्येही अंबानी आणि अदानींची कमतरता नाही. ज्यांनी केवळ ओळखी आणि खात्यांमध्ये हेरफेर करून पैसे कमावले आहेत आणि कम्युनिस्ट म्हणजे साम्यवादी देशात कॅपिटॅलिस्ट म्हणजे भांडवलदारशाहीची मजा लुटत आहेत. अलिबाबा कंपनीच्या जॅक मा यांचे उदाहरण सर्वात मोठे आहे, ज्यांचे पंख नुकतेच छाटण्यात आले आहेत.

चिनी नेते आता पुन्हा एकदा पक्षीय राजवट आणण्याच्या प्रयत्नात आहेत, जी योग्य सिद्ध होईल की नाही, हे आताच सांगता येणार नाही. हे मात्र नक्की की, गरम डोक्याचे का होईना, पण कट्टरपंथीय माओत्सेतुंग यांनीच चीनला जुन्या परंपरांमधून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक जुनी गोष्ट उद्धवस्त करून टाकली होती. त्यानंतर जो चीन उदयाला आला तो संपूर्ण जगासाठी आव्हान ठरला आहे.

चीन आपल्या सैन्यालाही अधिक सक्षम करत आहे आणि आपली विमाने, जहाज, विमानवाहू नौका निर्मितीचे काम करत आहे. भारताला घाबरवण्यासाठी चीन पश्चिमी देशांच्या मदतीने भारतीय सीमेजवळ विमानतळ आणि रस्त्यांचे जाळे निर्माण करत आहे.

शी जिनपिंग यांच्या चीनमुळे अमेरिका भीतीच्या सावटाखाली आहे. म्हणूनच ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारतासोबत मिळून करार करण्यात आला आहे. या चारही देश एकजुटीने चीनचा सामना करू शकतील, हाच यामागील उद्देश आहे. परंतु, या चारही देशांना ठाम विश्वास आहे की, ते चीनला आपले तंत्रज्ञान, सामर्थ्य, कुटनीतीद्वारे घाबरवू शकत नाहीत.

शी जिनपिंग यांचा कम्युनिस्ट पक्ष तेच काम करत आहे जे आता काँग्रेस राहुल गांधींच्या पुढाकाराने करत आहे. जोपर्यंत या देशातील प्रत्येक सर्वसामान्य माणूस पोटभर जेवत नाही आणि त्याला सर्व जनता सारखीच आहे, याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याची मदत देशाच्या प्रगतीसाठी होणार नाही.

अलिबाबा किंवा अदानी अथवा अंबानी हे कोणत्याही देशाच्या प्रगतीचा पाया बनू शकत नाहीत. ते असे परजीवी आहेत की, जे सर्वसामान्य जनतेच्या धमन्यांमधील रक्त शोषून घेत आहेत. आपले मंदिर, हिंदू-मुस्लीम नीतीही काहीशी अशीच आहे. शी जिनपिंग या सर्वांपासून वेगळे दिसत आहेत. पण हो, एक मजबूत चीन भारतासाठी सतत धोकादायक ठरेल जोपर्यंत आपण त्याच्याइतके भक्कम होत नाही. सध्या तरी आपल्याकडील सर्व भांडवल पंतप्रधानांच्या स्वप्नातील संसद परिसर आणि राम मंदिरासाठी वापरले जात आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें