सिंगापूर नाही पाहिले तर काय पाहिले

* राजेश गुप्ता

तसेही सिंगापूरचे बाजार, सँटोसा आयलँड्स, नाइट सफारी, भव्य मॉल, पर्यटन पॉइंट इ. बाबत खूप काही लिहिले जाते, पण डाउनटाउन ईस्टबद्दल अजून तेवढे लिहिले गेलेले नाहीए. कोणत्या जमान्यात सिंगापूरच्या कर्मचाऱ्यांसाठी बनवला गेलेला क्लब आता पूर्णपणे रिसॉर्ट बनलेला आहे, त्यात वॉटरगेम आहेत, खाण्या-पिण्याच्या अनेक सुविधा आहेत, मनमोहक वातावरण आहे आणि सिंगापूरमध्ये कडक कायदेही नाहीत.

स्वतंत्र एक छोटेसे शहर असल्यामुळे आपल्याला दुसरीकडे कुठे जायची गरजही भासत नाही. याच्यामधून ना रस्ते जातात, ना इथे ट्रॅफिकचा गोंधळ आहे. राहण्यासाठी अनेक रेस्टॉरंटची सुविधा आहे. भारतीय पर्यटकांसाठी देशी जेवणही सहजपणे उपलब्ध होते.

अनेक एकर जमिनीवर विस्तारलेले नदी किनारी हिरवेगार डाउनटाउन ईस्ट शहर मेन सिंगापूरपासून वेगळे दिसते. हे छंगी एअरपोर्टपासून जास्त दूरही नाहीए आणि राहण्याची सुविधा स्वस्त आहेत. एकदा इथे प्रवेश केला की कोणताही पर्यटक आपले २-३ दिवस आरामात बाहेर न पडता घालवू शकतो.

हे जरूर पाहा

डाउनटाउन ईस्टचे मुख्य आकर्षण तेथील वाइल्डवाइल्ड वेट वॉटर पार्क आहे. त्यात ट्यूबमधून निघणारे वोर्टेक्स आहे, पाण्यात खास उंचीवरून सरकणारे ब्रोकन रेसर्स आहेत. वोर्टेक्सची उंची १८.५ मीटरपर्यंत आहे आणि स्लाइड १३४ मीटरची आहे. त्यातून घसरत जाण्याचा स्पीड ६०० मीटर प्रती मिनीटपर्यंत होतो. आपले वजन थोडे जास्त असेल, तर काळजी करू नका. १३६ किलोपर्यंतच्या पर्यटकांना परवानगी आहे. ब्रोकन रेसर्स १३ मीटरचे आहेत आणि स्लाइड ९१ मीटरची आहे.

वॉटर पार्कमध्ये रॉयन फ्लशही आहे, त्यामध्ये गोल फिरणाऱ्या पाण्यात नवीन थ्रील निर्माण होते. हेही १६ मीटर उंच आहे. फ्री फॉल एकदम सरळ पाण्यातून वाहावत आणते आणि ५५ किलोमीटर प्रतितासाच्या स्पीडने एका मोठ्या पाँडमध्ये टाकतो.

जर या थोड्या भीती उत्पन्न करणाऱ्या वॉटर गेम्सची मुलांना भीती वाटत असेल, तर त्यासाठी किड्स झोन, वेट अँड वाइल्ड फाउंटेन, स्प्लॅश प्लेही उपलब्ध आहे. आराम करण्यासाठी टेंटसारखे तंबूही मिळतात.

डाउनटाउन ईस्टमध्ये जेवणाचे ५०हून अधिक जास्त रेस्टॉरंट पावलोपावली आहेत. काहींमध्ये उत्तम प्रकारचे भारतीय जेवण मिळते.

डाउनटाउन ईस्ट भले कधी काळचे सिंगापूरच्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी बनलेले शॉपिंग आणि मनोरंजनाचे केंद्र असेल, पण आता ते सिंगापूरचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. तिथे राहून मौजमस्तीचा आनंद घेऊ शकता.

लिटिल इंडिया

पीकॉक चौक म्हणजेच मोरांच्या चौकाजवळच एक लिटिल इंडिया नावाचा भाग आहे. त्याला सिंगापूरचे केंद्र म्हटले जाऊ शकते. हा भाग भारतीय लोकांसाठी खूपच आकर्षणाचे केंद्र आहे. कारण एक म्हणजे याचे नाव आपल्या देशाशी जोडलेले आहे, दुसरं म्हणजे तिथे खूप भारतीय लोक राहतात. तेथील वातावरण बऱ्याच प्रमाणात भारतीय आहे.

लिटिल इंडियामध्ये बहुतेक मद्रासी लोकांची दुकाने आहेत. इथे पंजाबी जेवणही सहजपणे उपलब्ध होते. याच भागात एक खूप मोठा अनेकमजली मॉलही आहे, तिथे खूप वस्तू मिळतात. याचे नाव मुस्तफा मॉल आहे. ही इमारत २-३ भागात विभागलेली आहे. हा मॉल २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस खुला असतो. इथे बरेचसे भारतीय आणि पाकिस्तानी लोक काम करतात.

लिटिल इंडियामधल्या एका सामान्य भारतीयाला हिंदी, तामिळी आणि पंजाबी बोलणारे लोक सहजपणे भेटतात. ज्या लोकांना इंग्रजी बोलायला येत नाही, तेही इथे आरामात काही सांगू शकतात किंवा ऐकू शकतात. येथील वातावरण बऱ्याच प्रमाणात भारतासारखेच आहे. त्यामुळे याला छोटा भारत असेही म्हटले जाते.

याच भागात भारतीय आणि पाकिस्तानी लोकांची हॉटेल्सही आहेत. इथे त्यांना आपआपल्या देशाप्रमाणे जेवण मिळते. येथील हॉटेलांमध्ये नेहमीच इंग्रजी लोकही भारतीय आणि पाकिस्तानी जेवणाचा आनंद घेताना आढळतात. इथे आनंद भवन नावाचे एक मद्रासी रेस्टॉरंट आहे. तिथे स्वादिष्ट मद्रासी जेवण योग्य किंमतीला मिळते.

इथे क्राइम रेट झिरो आहे. लोकही खूप इमानदार आहेत. व्यवसायही नीटनेटक्या पध्दतीने चालवतात. संपूर्ण सिंगापूर शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे. अपहरण करणारा इथून वाचून जाऊ शकत नाही. त्यामुळेही हे शहर गुन्हेमुक्त आहे. इथे आपल्याला कुठेही असे लिहिलेले आढळणार नाही की पाकीटमारांपासून सावध राहा. येथील इंटरनेट सेवाही उत्तम दर्जाची आहे. इथे उत्पादनाच्या नावाखाली क्वचितच काही उत्पादित होत असेल. बहुतेक वस्तू दुसऱ्या देशातूनच मागवल्या जातात. उदा. पाणी मलेशियातून, दूध-फळे-भाज्या न्यूझिलँड व ऑस्ट्रेलियातून, डाळ-तांदूळ आणि रोजच्या उपयोगातील वस्तू थायलँड व इंडोनेशियामधून आयात केल्या जातात.

सिंगापूरला जाण्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडे पासपोर्ट असणे आवश्यक आहे. पंजाबमधील लोकांसाठी अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वात उत्तम पर्याय आहे. दिल्लीहूनही सिंगापूरला जाण्यासाठी उड्डाणे मिळू शकतात. भारतीय लोकांनी हॉटेल बुक करण्यापूर्वी याची जरूर काळजी घेतली पाहिजे किंवा जाणून घेतले पाहिजे की ते लिटिल इंडियामध्येच असेल, जेणेकरून आपल्याला बाजारात फिरण्यासाठी व खरेदी करण्यात काही अडचण येणार नाही.

पीकॉक चौकाच्या एका बाजूला लिटिल इंडिया आहे, तर दुसऱ्या बाजूला बुग्गी स्ट्रीट आहे. जो आपल्या बाजारांसारखाच बाजार आहे. तिथे प्रत्येक प्रकारच्या सामानाची दुकाने आहेत. इथे दिवसभर खूप गर्दी असते. सिंगापूर एक पर्यटनप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्याला इथे प्रत्येक प्रकारचे पर्यटक दिसतील.

सुचारू प्रवास

सिंगापूरची दळवळण व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. रस्ते खूपच सुंदर आणि व्यवस्थित आहेत. मोठ्या आणि छोट्या गाड्यांसाठी वेगवेगळ्या लेन बनलेल्या आहेत. पायी चालणाऱ्यांसाठी आणि सायकल चालवणाऱ्यांसाठीही वेगवेगळे मार्ग बनलेले आहेत. पायी चालण्याच्या रस्त्यावर थोड्या-थोड्या अंतरावर आराम करण्यासाठी ठिकठिकाणी काचेचे वॉटरप्रूफ शेड आणि मोठमोठे वॉटरप्रूफ टेंट लावलेले आहेत. त्याखाली लोक पाऊस आणि गरमीपासून मुक्ती मिळवण्यासाठी झोपलेले किंवा बसलेले आढळतात.

पर्यटक देश असल्यामुळे इथे बरीचशी ठिकाणे पाहण्यायोग्य आहेत. उदा. सिंगापूर शहर, सिंगापूर फ्लायर, युनिव्हर्सल स्टुडिओ, सी अॅक्वेरियम, सँटोसा, बीच, मॅरीनाबे, जू, नाइट सफारी, जोरांगबर्ड पार्क, केबल कार राइड, स्काय राइड, लक्यूज, स्काय टॉवर, गार्डन बाय द वे इ. मूलत: सिंगापूर मॅन मेड देश आहे. त्याला पर्यटनाच्या दृष्टीने खूप नियोजनपूर्ण पध्दतीने विकसित करण्यात आले आहे. या सर्व ठिकाणांना आणि वस्तूंना खूपच आधुनिक पध्दतीने डिझाइन करण्यात आले आहे. जेणेकरून पाहणाऱ्याची उत्सुकता कायम राहील.

इथे जायला विसरू नका

भारतीयांसाठी सर्वात मोठे आकर्षण लिटिल इंडिया आहे. त्यामध्ये बाजार, मुस्तफा मॉल, बुग्गी स्ट्रीट आहे. दुसरे आकर्षण सिंगापूर फ्लायरचे आहे. हे सिंगापूरचा आणि आशियाचा मोठा झोपाळा आहे. त्याची उंची ५१४ फुटांची आहे. यात २८ एअर कंडिशन कॅप्सूल लावलेले आहेत. त्यात प्रत्येक कॅप्सूलमध्ये २८ लोक बसून त्याचा आनंद घेऊ शकतात.

मॅरिलिन पार्कमध्ये पर्यटकांची खूप गर्दी असते. हे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. हे पार्क मॅरिना बे येथे आहे. इथे फोटो काढण्यासाठी खूपच उपयुक्त वातावरण आहे. इथे वाघाचा एक पुतळा बनलेला आहे. त्याच्या मुखातून पाण्याची एक धार सतत वाहत असते. या पुतळ्याचे तोंड वाघाचे आहे आणि धड माशाचे आहे. सँटोसामध्ये केबल कार राइड लोकप्रिय आहे. ही लोखंडाची एक खूप सुंदर वातानुकूलित केबिन असते. ती खूपच आधुनिक पध्दतीने बनवली गेली आहे. त्यात ८ जण बसू शकतात. हे माउंट फॅबरहून सँटोसापर्यंत १५ मिनिटांत पोहोचते. हा रोप वे १६५० मीटर लांबीचा आहे. केबिनच्या खाली संपूर्ण समुद्र दिसतो. त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूचे जंगल याच्या चारही बाजूला लावलेल्या सुंदर काचांमधून पाहणे एक अनोखा अनुभव असतो. हे पूर्णपणे सुरक्षित बनवलेले आहे. मॅडम तुसाद म्युझियम इंबाह, सँटोसामध्ये आहे. इथे आपल्याला सिंगापूरच्या सुरुवातीपासून वर्तमानापर्यंत संपूर्ण कहाणी एका फिल्म आणि तेथील पुतळ्यांच्या रूपात आवाज आणि प्रकाशाच्या माध्यमातून दर्शवली आणि सांगितली जाते की कशाप्रकारे एक सामान्य देश आपली विचारधारा, मेहनत आणि प्रामाणिक उद्देशामुळे कुठल्या कुठे पोहोचला. यात आपल्या भारतीयांचे मोठे योगदान आहे. या म्युझियममध्ये जगातील प्रसिध्द क्रांतिकारक, राजकारणी, कलाकार, खेळाडूंचे मेणाचे पुतळे बनवण्यात आले आहेत. स्काय राइड मॅडम तुसादच्या अगदी बाजूलाच आहे. हा एक सोफा सॅटीसारखा झोपाळा आहे. त्यावर ४ व्यक्ती बसू शकतात. हे अगदी मोकळे असते. यावर बसून आपण हवेत विहरू शकता. हा लोखंडाच्या मजबूत तारांवर चालतो. याच्या सीटच्या पुढे एक लोखंडाचे हँडलसारखे लॉक असते. त्याने आपली सीट लॉक केली जाते आणि आपण आपल्या सुरक्षेसाठी याला पकडून बसू शकता. हेही रोप वे ने चालते.

विंग्स ऑफ टाइम म्हणजेच वेळेचे पंख. हेही तिथेच सँटोसामध्ये आहे. हा समुद्र किनारी लेजर प्रकाशाद्वारे प्रस्तुत केला जाणारा एक शो आहे. प्रकाशाचा शो असल्यामुळे हा संध्याकाळच्या वेळी चालतो. हा शो सँटोसामध्येच सिलीसी बीचवर समुद्राचे पाणी हवेत उडवून लेझर प्रकाशाने एका फिल्मच्या रूपात प्रस्तुत केला जातो.

युनिव्हर्सल स्टुडिओ एक खूप मोठा म्हणजेच आशियातील दुसरा सर्वात मोठा आणि थीम बेस पार्क आहे. हा ४९ एकर जमिनीवर पसरलेला आहे. हा सँटोसा आयलँडमध्ये आहे. हा मनोरंजक पार्क खूपच बुध्दीचा वापर करून बनवण्यात आला आहे. यात २१ राइडमध्ये ६ रोलर झोपाळे आणि २ वॉटर राइड आहेत. जे खूपच धाडसी लय निर्माण करतात. गार्डन बाय द बे एक नैसर्गिक पार्क आहे. हा सिंगापूरच्या मध्य मॅरीना बेमध्ये आहे. हा चांगला पिकनिक स्पॉट आहे. इथे लोक पिकनिकला येतात. इथे छोटी आणि मोठी मुले आपापल्या शाळांतर्फेही पिकनिकला येतात.

जोरांग बर्ड पार्कच्या नावानेच स्पष्ट होते की हे पक्ष्यांचे पार्क आहे. इथे काही पक्षी पिंजऱ्यात, काही वाड्यांमध्ये, काहींसाठी मोकळे स्थान, तर काहींसाठी तलावासारखे वातावरण बनवण्यात आले आहे. इथे प्रत्येक पक्षाला त्याच्या स्वभावानुसार वातावरण देण्यात आले आहे. जोरांग बर्ड पार्क एक खूपच मोठे जंगलयुक्त पार्क आहे. नाइट सफारी, ज्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागते. हा प्रवास सूर्य मावळल्यानंतर सुरू होतो आणि मध्यरात्रीपर्यंत सुरू असतो. हे सिंगापूरमधीलच नव्हे, तर जगातील पहिली विशेष नाइट सफारी आहे. यात जवळपास १२० प्रकारचे १०४० प्राणी आहेत. हे जंगल ४ लाख स्क्वेयर मीटरमध्ये वसवण्यात आले आहे. या जंगलाला ७ झोनमध्ये विभागण्यात आले आहे. रात्रीच्या चमकत्या चंद्रप्रकाशात आणि लुकलुकत्या ताऱ्यांच्या प्रकाशात या प्राण्यांच्या नैसर्गिक हालचाली करताना पाहून तुम्ही एक अद्भुत आनंद मिळवू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें