5 टिप्स : 40 वर्षांवरील महिलांसाठी सौंदर्य टिप्स

* मोनिका अग्रवाल

तुमचे वय 40 वर्षे किंवा त्याहून अधिक झाल्यावर त्वचेमध्ये अनेक बदल होऊ लागतात. यावेळी तुमच्या त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात आणि वृद्धत्वाची चिन्हे त्वचेवर दिसू लागतात. काही महिलांना अनेक पिंपल्स आणि मार्क्सची समस्या देखील असते. वृद्धत्वाची लक्षणे यावेळी थांबवता येत नसली तरी त्वचेची अशी स्थिती पाहून अनेक महिलांना आत्मविश्वास कमी वाटतो. म्हणूनच काही जीवनशैली आणि त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्स वापरून तुम्ही त्वचा थोडी सुधारू शकता.

अशाप्रकारे त्वचेची काळजी घ्या

तुम्ही तुमच्या वयानुसार आणि त्वचेच्या प्रकारानुसार क्लीन्सर, मॉइश्चरायझर आणि टोनरचा समावेश असलेल्या चांगल्या स्किन केअर उत्पादनांमध्ये गुंतवणूक करावी. बारीक रेषा, सुरकुत्या आणि वयाच्या डागांना लक्ष्य करणारी उत्पादने तुम्ही निवडावी. त्वचेला हायड्रेशन आणि पोषण देण्यासाठी सीरम आणि फेस ऑइलचा देखील वापर केला जाऊ शकतो.

  1. उन्हापासून त्वचेचे संरक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे

सूर्यकिरण तुमच्या त्वचेसाठी खूप हानिकारक असतात. जर तुमची त्वचा परिपक्व होऊ लागली असेल आणि त्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागली असतील, तर सूर्य तुमच्या त्वचेसाठी आणखी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे उच्च एसपीएफ असलेल्या सनस्क्रीनचा वापर करावा. यापेक्षा जास्त वयाची लक्षणे दिसणार नाहीत आणि त्वचा खराब होण्यापासून वाचेल.

  1. हायड्रेशनदेखील महत्वाचे आहे

त्वचेसोबतच शरीराला हायड्रेट करणंही खूप गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही भरपूर पाण्याचं सेवन केलं पाहिजे जेणेकरून तुमचं शरीर आणि त्वचा हायड्रेट होईल आणि त्वचा चमकदार दिसेल. यामुळे त्वचेची लवचिकता टिकून राहून त्वचा चमकते.

  1. डोळ्यांची काळजी

डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा खूप नाजूक आहे, म्हणून आपण तिची काळजीपूर्वक काळजी घेतली पाहिजे. डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे कमी करण्यासाठी आणि तिथली सूज कमी करण्यासाठी आय क्रीम वापरणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या फाइन लाईन्सही कमी होतात. काकडीचे काप किंवा टी बॅग डोळ्यांवर भिजवून ठेवू शकता.

  1. मेकअप वापरा

जर तुम्हाला तुमची त्वचा तरुण आणि चमकदार दिसायची असेल तर तुम्ही मेकअपचा वापर करावा. याच्या मदतीने तुमची वैशिष्ट्ये आणखी वाढवता येतील. यासाठी तुम्हाला हलक्या वजनाचे मॉइश्चरायझर वापरावे लागेल. फाउंडेशन फक्त वजनाने हलके घ्या आणि नैसर्गिक मेकअप लुकप्रमाणे मेकअप करून पहा. तुम्ही जड पावडर किंवा जड उत्पादने वापरू नका जी तुमच्या बारीक रेषांमध्ये स्थिर होऊ शकतात. तुमचा चेहरा अधिक फ्रेम करण्यासाठी तुमचे डोळे आणि डोळ्यांच्या भुवया परिभाषित करा.

  1. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा

जर तुम्हाला स्वतःला नैसर्गिकरित्या थोडा जास्त काळ तरुण ठेवायचे असेल तर तुम्ही निरोगी जीवनशैलीचे पालन केले पाहिजे. यासाठी तुम्हाला संतुलित आहार घ्यावा लागेल आणि शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामही करत राहावे.

या टिप्स फॉलो केल्यास या वयातही तुमची त्वचा थोडी सुधारू शकते. यासोबतच, तुम्ही तुमचा आत्मविश्वास आणि तुमची शरीराची स्थिती योग्य ठेवली पाहिजे जेणेकरून तुम्ही अधिक मजबूत आणि तरुण दिसाल. त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्ससह, आपण निरोगी जीवनशैलीचे देखील पालन केले पाहिजे.

काय आहे कॅण्डल मॅनिक्युअर-पॅडिक्युअर

– मिनी सिंह

सर्व मोसमांत हिवाळयाचे दिवस उत्तम मानले जात असले तरी या मोसमात त्वचा खूपच कोरडी आणि रुक्ष होते. यामुळे ती निर्जीव दिसू लागते. या मोसमात त्वचेला ओलावा अर्थात मॉइश्चरायजिंगची विशेष गरज असते.

हिवाळयात अनेकदा ओलाव्याच्या कमतरतेमुळे ओठ फुटू लागतात. हातापायाच्या त्वचेवर सफेद भेगा पडू लागतात, टाचांनाही भेगा पडू  लागतात. कधीकधी तर त्यातून रक्तही येऊ लागते, यामुळे खूपच वेदना होतात. त्यामुळेच या मोसमात त्वचेची खूपच काळजी घेणे गरजेचे असते. अशावेळी साधारण मॅनिक्युअर-पॅडिक्युअरमुळे काहीच फायदा होत नाही, उलट विशेष प्रकारच्या मॅनिक्युअर-पॅडिक्युअरची गरज असते. यासाठी तुम्ही कॅण्डल मॅनिक्युअर-पॅडिक्युअर थेरपीचा वापर करू शकता.

काय आहे कॅण्डल मॅनिक्युअर-पॅडिक्युअर

कॅण्डल मॅनिक्युअर-पॅडिक्युअर ट्रीटमेंट काही वैशिष्टयपूर्ण कॅण्डल्स म्हणजे मेणबत्ती वितळवून दिली जाते. हा मॅनिक्युअर-पॅडिक्युअरचा नवीन प्रकार आहे.

कसा करतात या ट्रीटमेंटचा वापर

या ट्रीटमेंटमध्ये कॅण्डल वितळवून त्याचा वापर स्क्रबिंग आणि मसाजसाठी केला जातो. या ट्रीटमेंटमध्ये मृत त्वचा काढून टाकली जाते. हिवाळयाच्या मोसमात ही ट्रीटमेंट खूपच उपयोगी ठरते.

याला कसे बनवतात

ही कॅण्डल बनवण्यासाठी वॅक्ससोबतच यात जोजोबा ऑईल, कोकोआ बटर, व्हिटॅमिन इ आणि आवश्यक तेलांचा वापर केला जातो. अशा कॅण्डल तुम्हाला बाजारात सहज मिळतील. वाटल्यास तुम्ही त्या घरीही बनवू शकता.

याचे फायदे

कॅण्डल मसाज त्वचेला पोषण देणे, एक्सफॉलिएट करणे आणि त्वचेतील पेशी पुनरुर्जीवित करण्यासाठीचा एक उत्तम उपाय आहे.

कसा कराल याचा उपयोग

कॅण्डल थेरपीदरम्यान मॅनिक्युअर-पॅडिक्युअरची सुरुवात सर्वसामान्य पद्धतीने केली जाते. सर्वात आधी नखे कापून, फॉईल, शेपिंग, क्युटिकल्सवर क्रीम लावून ती स्वच्छ केली जातात. यानंतर स्पेशल कॅण्डल वितळवली जाते. तयार वॅक्सचा वापर स्क्रबप्रमाणे केला जातो. यामुळे मृत त्वचा निघून जाते. त्यानंतर गरम टॉवेल गुंडाळून त्वचा स्वच्छ केली जाते.

यानंतर क्रीम बनवण्यासाठी पुन्हा कॅण्डल वितवळली जाते. या वॅक्सपासून बनवलेल्या क्रीमचा वापर चांगल्या प्रकारे मॉइश्चरायजिंग करण्यासाठी केला जातो. त्यानंतर हात आणि पायांसाठी स्क्रिन ब्रायटनिंग पॅकचा वापर केला जातो. याशिवाय पुरेशा प्रमाणात फळे खा, जास्तीत जास्त लिक्विड डाएट घ्या.

समर-स्पेशल सनशाइन मेकअप : बनवी समर दीवा

– गुंजन गौड

मैत्रिणींनो, डे आउट असो किंवा इव्हनिंग पार्टी, सनशाइन मेकअप प्रत्येक कारणासाठी अगदी उत्तम आहे. असा लुक शिमरी असला तरी या उन्हाळ्यासाठी एकदम कूल आहे, तर जुन्या लुकला करा बायबाय आणि उन्हाळ्यासाठी काही शेड्सचे प्रयोग करून या उन्हाळ्याशी दोस्ती करूया.

सर्वप्रथम बेसपासून सुरूवात करू. या मोसमात पावडरयुक्त बेसचा वापर करा. यामुळे घाम कमी येईल आणि मेकअप दीर्घकाळ टिकेल. यासाठी तुम्ही गोल्डन टिंटयुक्त शिमरी पॅन केकचा वापर करू शकता. त्यामुळे चेहऱ्यावर मॅट आणि शिमरी लुक दिसून येईल.

उन्हाळ्यातील चीकचीक, घाम, गरमी यामुळे आपल्याला साधा आणि नो मेकअप लुक जास्त आवडतो. पण रात्रीसाठी चेहऱ्यावर चमक आली तर काय हरकत आहे?

दीर्घकाळ मेकअप टिकण्यासाठी

डोळ्यांच्या मेकअपसाठी पिवळ्या रंगाची शायनी आयशॅडो डोळ्यांच्या आतून कॉर्नरला लावा. मध्ये आणि बाहेरच्या टोकाला ज्यूसी, ग्लॉसी ऑरेन्ज शेड लावा. आय मेकअप दीर्घकाळ टिकण्यासाठी आयशॅडो लावण्याआधी डोळ्यांवर आयप्रायमरदेखील लावू शकता. यामुळे मेकअप जास्त काळ टिकेल आणि आयशॅडोचे रंगदेखील उभारून येतील.

आता डोळ्याला परफेक्ट फिनिशीन देण्यासाठी बारीक आयलायनर लावा अणि पापण्यांना मसकारा लावा. ओठांना सूर्याचा इफेक्ट देण्यासाठी ऑरेन्ज लिपशेडचा वापर करा.

नक्कीच हा संध्याकाळसाठीचा सनसेट लुक आहे, पण उन्हाळ्यात चेहऱ्यावर घाम येणं साहजिकच आहे. त्यामुळे फक्त वॉटरप्रूफ उत्पादनं आणि वॉटर रेजिस्टंट उत्पादनंच वापरा.

याव्यतिरिक्त आठवड्यातून दोनदा स्क्रब करू शकता. त्यासाठी जाडसर वाटलेली मसूर डाळ, ऑरेन्ज पील पावडर, मुलतानी माती आणि जवाचे पीठ कच्या दुधात एकत्र करून लावा. या हर्बल स्क्रबमध्ये ऑरेन्ज पीलच्या ऐवजी मोसंबी किंवा लिंबाच्या सुक्या सालीदेखील वापरू शकता.

जर घाम जास्त येत असेल तर रूमाल किंवा टिशू पेपरने टिपून घ्या. यासोबतच टू वे केक जवळ असू द्या. गरज पडल्यास थोड्या थोड्या वेळाने टचअप करत राहा. हल्ली बाजारात बऱ्याच प्रकारचे रिफ्रेशिंग स्प्रे मिळतात, जे अगदी थोड्या वेळात ताजंतवानं करतात. जर तुम्ही वॉटरप्रूफ मेकअप केला असेल तर अशा स्प्रेचा वापर करू शकता. हा स्प्रे चेहऱ्यावर मारून सुकू द्या. तुम्हाला अगदी ताजंतवानं आणि रिफ्रेशिंग वाटेल.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी

सनशाइन मेकअप टिप्स वापरून तुम्ही समर दीवा नक्कीच दिसू शकता, पण या रखरखीत उन्हात गळणाऱ्या घामामुळे मेकअप वाचणं थोडं कठीणच. म्हणूनच या काही टिप्स आहेत, ज्यामुळे तुम्ही मेकअप जास्त काळ टिकवू शकता.

* या दिवसांत चेहरा धुण्यासाठी डीप पोर फेस वॉशचा वापर करा. यामुळे त्वचा मुळातून स्वच्छ होईल.

* दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे टोनिंग. यामुळे त्वचेची छिद्र बंद होतात. त्यामुळे घाम कमी येतो. टोनिंगसाठी एस्ट्रिजेंट उत्तम पर्याय आहे. अल्कोहोलयुक्त एस्ट्रिजेंटमुळे थंड आणि फ्रेश वाटतंच आणि त्वचेवरील तेलकटपणा कमी होतो. छिद्र कमी करण्यासाठी चेहऱ्यावर कोल्ड कंप्रेशनदेखील करू शकता. म्हणजेच एका मऊ मलमलच्या कपड्यात बर्फाचे तुकडे घेऊन चेहऱ्यावर मसाज करू शकता. त्यामुळे छिद्र बंद होतात.

* उन्हाळ्यात त्वचा तेलकट होते असं काहींना वाटतं. त्यामुळे कधीकधी स्त्रिया मॉश्चरायझर वापरत नाहीत. पण या तेलाव्यतिरिक्त त्वचेला ओलाव्याची गरज असते. ही कमतरता भरून काढण्यासाठी चेहऱ्यावर जेल बेस्ड मॉश्चरायझर लावू शकता. याव्यतिरिक्त त्वचेचा पोत सुधारण्यासाठी कोरफड जेलदेखील लावू शकता. यामुळे त्वचा ताजीतवानी होऊन त्वचा उजळ व चकचकीत दिसेल. तसेच हे त्वचेचं उन्हापासून रक्षण करेल.

* मोसम कोणताही असो, सूर्याची हानिकारक किरणं त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे त्वचेचं रक्षण करण्यासाठी एसपीए आणि पीएयुक्त सनस्क्रीन लोशन वापरणं गरजेचं आहे. यामुळे तुमचे युवीए आणि यूव्हीबी या दोन्हींपासून रक्षण होतं. मेकअप करण्याआधी कमीत कमी दहा मिनिटं आधी सनस्क्रीन लावा; कारण सनस्क्रीन लावल्यावर घाम यायला सुरुवात होते. अशावेळी टिशू पेपरने दाबून घाम पुसा, जेणेकरून सनस्क्रीन त्वचेत मिसळून जाईल.

* चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी फेसपॅकचा वापर करू शकता. त्यासाठी अर्धा चमचा चंदन पावडर व अर्धा चमचा कॅलमाइन पावडरमध्ये टोमॅटोचा गर व मध घालून चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. हा पॅक वापरल्यामुळे रोमछिद्र बंद होतात आणि घामही येत नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें