सौंदर्य समस्या

* एल्पस ब्युटी क्लीनिकच्या फाउंडर, डायरेक्टर डॉ. भारती तनेजा

मी डँड्रफ समस्येने त्रासली आहे. मी अनेक शाम्पू वापरले. परंतु सर्व व्यर्थ. सोबतच डॅन्ड्रफ इचिंगदेखील होतं. कृपया उपाय सांगा?

डँड्रफची समस्या सामान्यपणे कोरड्या आणि तेलकट दोन्ही प्रकारच्या केसांमध्ये निर्माण होते. यावर वेळेतच उपाय नाही केले तर केस गळून त्वचेत इन्फेक्शन पसरण्याची भीती असते. सोबतच केसांची मूळंदेखील कमजोर होतात. ज्यामुळे हेअर फॉलची समस्या निर्माण होते, म्हणून वेळेतच उपचार आवश्यक आहेत. यासाठी आठवडयातून कमीत कमी तीन वेळा केसांमध्ये शाम्पू करा आणि केस धुण्यासाठी गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा. याच्या इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी तुम्ही तुमचा कंगवा, टॉवेल व उशी वेगळी ठेवा आणि यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या. जेव्हा केस धुवाल तेव्हा या तिन्ही गोष्टी व्यवस्थित एखाद्या अँटीसेप्टिक पाण्यामध्ये अर्धा तास बुडवून ठेवा आणि उन्हात सुकवूनच पुन्हा वापर करा.

डोक्यात तेलकट केस असल्यामुळे कोंडा असेल तर एक चमचा त्रिफळा पावडर एक ग्लास पाण्यामध्ये टाकून थोडया वेळासाठी उकळवा. थंड झाल्यावर हे गाळून घ्या आणि पुन्हा दोन मोठे चमचे विनेगर एकत्रित करून रात्री केसांना व्यवस्थित मसाज करून घ्या. सकाळी एखाद्या चांगल्या शाम्पूने केस धुवा.

एवढं करूनसुद्धा त्रास कायम असेल तर एखाद्या चांगल्या कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये जाऊन ओझान ट्रीटमेंट वा बायोप्ट्रोनची सीटिंग्स घेऊ शकता. यामुळे डँड्रफवरती नियंत्रण राहील, सोबतच डॅन्ड्रफमुळे होणाऱ्या केस गळतीवरदेखील नियंत्रण मिळेल.

त्वचेला इन्स्टंट ग्लो आणण्यासाठी पिल ऑफ मास्क किती महत्त्वाचा आहे? मी माझ्या हनिमूनच्या दरम्यान ते वापरू शकते का?

तुम्ही आरामात तुमच्या हनिमूनच्यादरम्यान हे वापरू शकता. बाजारात अलीकडे अनेक चांगल्या कंपनीचे पील ऑफ मास्क मिळत आहेत. पील ऑफ मास्क अनेकदा फळांच्या साली आणि पानांनी बनलेले असतात. म्हणून यामध्ये असणारे अनेक अँटीऑक्सिडंट नैसर्गिकरित्या फ्री रेडिकल्सशी लढण्यास मदत करतात, ज्यामुळे तुमच्या त्वचेवर वयोपरत्वे होणारे बदल खूप हळू होतात आणि तुम्ही दीर्घकाळ तरुण दिसता. पील ऑफ मास्क चेहऱ्याला व्हाईटन आणि ब्राईटन करण्याचं काम करतं. हे लावल्यानंतर चेहऱ्यावर नवीन त्वचेचा थर येतो. ज्यामुळे चेहऱ्याचं कॉम्प्लेक्शन क्लीन अँड क्लिअर दिसतं. सूर्य किरणांमुळे चेहऱ्यावर येणारे टॅनिंग दूर करण्यासाठीदेखील याचा वापर केला जातो. कोरडया त्वचेला मुलायम बनविण्यासाठी पील ऑफ मास एक उत्तम उपाय आहे.

माझी त्वचा सेन्सिटिव्ह आहे, म्हणून वॅक्सिंगनंतर माझ्या त्वचेवर लाल पुरळ येतं, तसंच मला नको असलेला केसांपासून सुटका हवी आहे त्यासाठी मी काय करू?

त्वचेवर लाल पुरळ येऊ नये यासाठी तुम्ही वॅक्सिंग पूर्वी अँटीअॅलर्जीक टॅबलेट घेऊ शकता. नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पल्स लाईट ट्रीटमेंटच्या सीटिंग्स घेऊ शकता. हे एक इटालियन तंत्रज्ञान आहे जे नको असलेले केस रिमुव्ह करण्याचा सर्वात वेगवान, सुरक्षित व वेदनारहित उपाय आहे. पल्स लाईटच्या काही सीटिंग्समुळे ८० टक्के नको असलेले केस दूर होतात आणि उरलेले केस एवढे पातळ आणि हलक्या रंगाचे होतात की ते दिसूनदेखील येत नाही.

मी माझ्या चेहऱ्यावरच्या केसांबाबत खूपच त्रासलेली आहे. ते दूर करण्यासाठी लेडीज रेरचादेखील वापर केला, परंतु काहीच फायदा झाला नाही?

सामान्यपणे चेहऱ्यावर केस उगविण्याचं प्रमुख कारण हार्मोन्सचा असमतोलपणा आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्ही हार्मोन्सची तपासणी करा. यासाठी एखाद्या चांगल्या एंडोक्राईनोलॉजीस्टचा सल्ला घ्या. लेडीज लेझर चेहऱ्यावर वापर करू नका कारण याच्या वापरामुळे राठ केस येतात. सोबतच त्वचा काळी पडते. यासाठी योग्य उपाय हाच आहे की या केसांना कायमच हटविण्यासाठी पल्स लाईट ट्रीटमेंटच्या सीटिंग्स घ्या. हा सर्वात सुरक्षित आणि सहजसोपा उपाय आहे. यामध्ये डाग पडण्याची भीती नसते आणि कोणताही त्रास होत नाही.

माझ्या पोटावर केस आहेत. यामुळे मी शॉर्ट टॉप व ब्लाऊज घालूच शकत नाही. मी ते शेविंगने काढू शकते का?

अजिबात नाही, तुम्ही रेझरचा वापर करून हे काढू शकत नाही कारण यामुळे पुन्हा केस अधिक राठ येतील. जर तुमच्या पोटावर केस कमी असतील तर तुम्ही ते ब्लिच करू शकता. ब्लीचने केस हलक्या रंगाचे होतील, यामुळे त्रासण्याचीदेखील गरज नसते. ते दूर करण्यासाठी तुम्ही हेअर रिमूवल क्रीमचा वापर करू शकता. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या क्रीमचा तुम्ही वापर करणार आहात ती तुमच्या त्वचेला सूट करणारी असावी. तुम्ही पोटाचे केस वॅक्सिंगने काढण्यासाठी पल्स लाईट लेझरचा वापर करू शकता.

सौंदर्य समस्या

* समस्यांच्या समाधानासाठी एल्पस ब्युटी क्लीनिकच्या फाउंडर, डायरेक्टर डॉ. भारती तनेजा

माझे हात खूपच कोरडे राहतात. मॉइश्चरायर लावूनदेखील ते निस्तेज दिसतात. एखादा उपाय सांगा ज्यामुळे ते मऊ मुलायम राहतील?

हाताच्या त्वचेवर ऑइल ग्लॅन्डस नसल्यामुळे त्यांना ऑइल द्यावं लागतं. म्हणून ते मऊ आणि मुलायम राहण्यासाठी हात धुतल्यानंतर नेहमी एखादं घट्ट क्रीम लावा. हे तुमच्या त्वचेतील तेलकटपणा कायम राखण्यास मदत करेल.

तुम्ही हात धुण्यासाठी कोणता साबण वापरता याकडेदेखील लक्ष द्या. अनेकदा साबण तुमच्या हातांना कोरडं बनवतो, म्हणून लिक्विड सोप योग्य आहे. रात्री तुम्ही थोडसं व्यासलीन तुमच्या हातावर लावून ते एक ओव्हरनाईट ट्रीटमेंटप्रमाणे वापरू शकता. फक्त हात धुतल्यानंतर तुमच्या हातांवर लावा आणि कॉटनचे हात मोजे घालून झोपा.

माझं वय २२ वर्षे आहे. माझी त्वचा खूपच सेन्सिटिव्ह आहे. मी जेव्हादेखील एखादं क्रीम, मेकअप प्रॉडक्ट वापरते तेव्हा चेहऱ्यावर पुरळ येतं. अशावेळी मला खूप त्रास होतो. सांगा मी काय करू?

यासाठी तुम्ही प्रयत्न करा की वापरण्यात येणारी क्रीम सुगंधित नसावी. कदाचित त्याच्या सुगंधाची तुम्हाला एलर्जी असावी, म्हणून तुम्ही सेन्सिटिव्ह स्किनसाठी वापरणारी जाणारी क्रीम विकत घ्या. जेव्हादेखील हे क्रीम वापराल तेव्हा ते लावण्यापूर्वी स्किन टोनर लावून सुकू द्या. त्यानंतर क्रीम लावा. जर तुम्हाला पुरळ येत असेल तर ब्रॅण्डेड प्रायमरचा वापर केल्यामुळे तुमची अडचण सुटू शकते. तुम्ही तेलमुक्त प्रायमरचा वापर करायला हवा.

माझं वय ३० वर्षे आहे. माझ्या आय लॅशेज खूपच विरळ आणि लहान आहेत. मला एखादा उपाय सांगा ज्यामुळे त्याची वाढ होईल?

दाट आयलॅशेजसाठी एरंडेल तेल खूपच फायदेशीर मानलं जातं. यामध्ये रिसीनोलिक अॅसिड आढळतं. हा केसांच्या मुळाशी रक्तप्रवाह वाढवतो आणि पापण्यांच्या वाढीसाठी उत्तेजित करतं.

एरंडेल तेलाने तुम्ही तुमच्या पापण्या दाट बनवाल. त्याबरोबरच या पापण्या तुटणारदेखील नाहीत. हे लावण्यापूर्वी तुमचा चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा. लक्षात ठेवा की तुमच्या डोळयांवर कोणत्याही प्रकारचा मेकअप नसावा. आता स्वच्छ मस्कारा ब्रश घ्या. हा ब्रश एरंडेल तेलमध्ये बुडवा आणि पापण्यांवर लावा. हे रात्रभर पापण्यांवर राहू दे आणि सकाळी गुलाब पाण्याने वा नंतर मेकअप वाइप्सच्या मदतीने स्वच्छ करा.

माझं वय १६ वर्षे आहे. माझ्या चेहऱ्यावर पुटकुळया आल्या आहेत. त्या मी फोडल्या होत्या. आता त्याचे डाग राहिले आहेत. जे दिसायला खूपच वाईट दिसतात. एखादा घरगुती उपाय सांगा. ज्यामुळे हे डाग निघून जातील. तसंच माझ्या चेहऱ्यावरची चमकदेखील परतेल.

अनेकदा पुटकुळया फोडल्यामुळे त्वचेवरती गडद डाग बनतात. तुम्ही घरच्या घरी दररोज सकाळ संध्याकाळ तुमचा चेहरा स्वच्छ धुवा. एएचए सिरमने फेस मसाज करू शकता. असं केल्यामुळे डाग खूपच कमी होतील. परंतु जर असं झालं नाही तर तुम्ही मायक्रोडर्मा एब्रेजर व लेझर थेरेपीच्या सीटिंगदेखील घेऊ शकता. या थेरपीमध्ये लेझर किरणांनी त्वचेला रिजनरेट करून नवरूप दिलं जातं. यानंतर यंग स्किन मास्कने तुमची त्वचा उजळवू शकता.

वॅक्सिंगनंतर माझ्या त्वचेवरती लाल पुरळ येतं. नको असलेले केस काढण्यासाठी दुसरा एखादा उपाय सांगू शकता का?

तुम्ही वॅक्सिंग करण्यापूर्वी अँटी एलर्जी टॅबलेट घेऊ शकता. तसंही या समस्येपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी पल्स लाईट ट्रीटमेंटची सेटिंग्स घेऊ शकता. हे एक इटालियन तंत्रज्ञान आहे, जे नको असलेले केस काढण्याचं सर्वात प्रभावी सुरक्षित व वेदना रहित साधन आहे. लेझर अंडर आर्मच्या केसांवरती अधिक इफेक्टिव्ह असतं.

यामुळे याच्या काही सेटिंग्जमध्ये केस नसल्यास सारखेच असतात. यामुळे ८० टक्के नको असलेले केस जातात आणि उरलेले इतके पातळ आणि हलक्या रंगाचे असतात की ते दिसूनदेखील येत नाही.

माझ्या चेहऱ्यावरती ब्लॅकहेड्स आहेत जे सहजपणे काढता येत नाहीत. सांगा मी काय करू?

ब्लॅकहेड्स फेस पॅकच्या माध्यमातून काढणं शक्य नाही आहे कारण ते पोर्सच्या आतमध्ये असतात आणि पोर्स खोलून क्लीन केल्यानंतर स्क्रब करणं गरजेचं असतं. हे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या कॉस्मेटिक क्लिनिकमधून वेज वा फ्रुट पील करू शकता. पंधरा दिवसातून एकदा पील केल्यामुळे ब्लॅकहेड्स व व्हाईट हेड्स निघून जातील आणि सोबत चेहरादेखील उजळेल. यासोबतच दररोज तुमचा चेहरा क्लीन करण्यासाठी स्क्रब बनवा. घरच्या घरी बदाम व भरड  जाडसर वाटून पावडर बनवा त्यात चिमूटभर हळद, गुलाब पाणी एकत्रित करून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमचं नाक आणि चेहऱ्यावर लावून हलक्या हातांनी स्क्रब करा आणि थोडयावेळानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.

सौंदर्य समस्या

ब्यूटि एक्सपर्ट इशिका तनेजा द्वारा

मी माझ्या केसांच्या कलरसाठी पावसाळ्यात काय काळजी घेऊ?

जर केस पावसात भिजले असतील तर धुवून ताबडतोब केस कोरडे करा, कारण पावसाचे पाणी प्रदूषणयुक्त असते. ज्यामुळे कलर आणि केस दोन्ही खराब होऊ शकतात. केस धुण्यासाठी कलरसेव्ह शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करा. म्हणजे केसांचा कलर जास्त काळपर्यंत टिकू शकेल. केस धुतल्यानंतर त्यांना सीरम जरूर लावावे. असं केल्याने क्युटिकल्स बंद होतील, तसेच केस सॉफ्ट व सिल्कीसुद्धा होतील. तसेच सीरमच्या वापरामुळे कलरलासुद्धा चमक येईल. पावसाळ्यात हवेत आर्द्रता असल्याने केसांचे क्युटिकल्स उघडत असतात. त्यामुळे डॅमेज होण्याची शक्यता वाढते. केसांना डॅमेजपासून वाचवण्यासाठी एखाद्या कॉस्मेटिक क्लिनिकमधून कलर्ड हेअरस्पा करवून घेत जा. याबरोबरच स्टाइलिंग करत असताना केसांना अॅन्टीह्यूमिडिटी प्रॉडक्टचा वापर करावा. यामुळे केसांचे बाहेरच्या ओलाव्यापासून रक्षण होईल. ज्यामुळे कलर सुरक्षित राहिल. तसेच हेअरस्टाइलही जास्त वेळ टिकून राहिल.

माझे वय ३६ वर्षं आहे. माझ्या मानेवर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत. गळ्याच्या व चेहऱ्याच्या रंगातही खूपच फरक दिसतो. कृपया काही उपाय सुचवा.

जर त्वचेला पोषण मिळाले नाही तर सुरकुत्या येऊ शकतात. यासाठी चेहऱ्याच्याबरोबरीनेच मानेलाही नरिशमेट द्या. रात्री झोपण्याआधी एएचए क्रिमने चेहऱ्याचा व मानेचा मसाज करावा. रोज सकाळी अंघोळीआधी व्हिटामिन ई तेलाचे काही थेंब आणि दोन चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळून मानेवर लावावे. १५ ते २० मिनिटांनी थंड पाण्याने धुऊन घ्या. क्लिनिकल ट्रिटमेंटच्या रूपात लेजरच्या सिटिंग्ज व कोलोजन मास्कही लावू शकता. जेव्हा फेशिअल करून घ्याल तेव्हा मानेचा मसाजही करून घ्या. मानेचा रंग उजळावा म्हणून कच्च्या पपईची फोड मानेला चोळावी.

मी प्रायव्हेट जॉब करते. त्वचेची चमक वाढवण्यासाठी रोज बॉडी पॉलिशिंग करून घेऊ शकत नाही. असे काही उपाय सांगा, ज्यामुळे माझी त्वचा चमकदार दिसू शकेल.

पार्लरमध्ये जाऊन रोज कोणीच बॉडी पॉलिशिंग करून घेऊ शकत नाही. पण त्वचेचा चमकदारपणा टिकावा म्हणून तुम्ही घरीसुद्धा त्वचेची काळजी घेऊ शकता. यासाठी दिवसाआड बॉडी स्क्रब करू शकता. यासाठी चोकरमध्ये साय व चिमूटभर हळद घालून पूर्ण शरीरावर लावून नंतर हलक्या हाताने चोळून पाण्याने धुवून घ्या. याबरोबरच रोज अंघोळीपूर्वी पूर्ण शरीराला ऑलिव्ह ऑइलने मसाज करावा. याशिवाय दिवसातून १० ते १२ ग्लास पाणी जरूर प्यावे. तसेच प्रथिनयुक्त आहार घ्यावा.

मी २० वर्षांची आहे. मला खूप घाम येतो. ज्यामुळे दुर्गंधीही येते. त्यामुळे खूपच लाजिरवाणे वाटते. दिवसातून २-३ वेळा कपडे बदलावे लागतात. एखादे हर्बल लोशन किंवा काही उपाय सुचवा.

घामाच्या समस्येपासून वाचण्यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता.    याशिवाय शरीरावर मुलतानी मातीचा पॅकही लावू शकता. असे केल्याने त्वचेची रंध्र होतील व घाम येणार नाही. रोज रात्री अंघोळीच्या पाण्यात लिंबाचे साल घालून ठेवावे. सकाळी त्या पाण्याने अंघोळ करावी. असे केल्याने पूर्ण दिवसभर ताजेतवाने वाटत राहिल.

मेकअप अॅप्लीकेशनसाठी योग्य पर्याय काय आह  बोट की ब्रश. यामुळे फिनिशिंगमध्ये काही फरक पडतो का?

बोट आणि ब्रश दोघांचीही आपापली अशी वेगळी कार्य आहेत. जेव्हा चेहऱ्यावर तुम्ही बोटाच्या सहाय्याने मेकअप करता, तेव्हा त्यातील हीटमुळे ते चेहऱ्यावर व्यवस्थित मर्ज होते आणि चेहऱ्याला फ्लालैस लुक मिळतो. तर ब्रशने चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांना परफेक्शन दिले जाते. लिप ब्रशने ओठ, लाइनर ब्रशने डोळे, एअरब्रश इफेक्टने बेसला परफेक्ट ब्लेंड करून फ्लालैस लुक दिला जातो. बाहेर पडताना फक्त कॉटन किंवा शिफॉन फॅब्रिकचे फुलस्लिव्हज कपडे घालण्याचा प्रयत्न करा.

माझ्या हाताच्या नखांची मागील त्वचा निघत राहते ही माझी समस्या आहे. ज्यामुळे रक्त निघते व वेदनाही खूप होतात. बरे झाल्यानंतर तेथील त्वचा काळी पडते जे दिसायला खूपच वाईट दिसते. असे होऊ नये म्हणून उपाय सुचवा.

तुम्ही एखादी चांगल्या दर्जाची क्यूटिकल क्रिम किंवा ऑलिव्ह ऑईल कोमट करून आपली नखे व त्याच्या आसपास मसाज करावा. न्यूटिकल्स स्वत: काढू नयेत. एखाद्या पार्लरमध्ये जाऊन मेनीक्योर करून घ्यावे. तिथे तंज्ज्ञांकडून सोप्या पद्धतीने काढले जातील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें