सौंदर्याचा मेडिकल डोस महिलांहून पुढे आहेत पुरूष

* डॉ. मानव विकास

आता महिलांमधील लोकप्रिय चिकित्सकीय ब्युटी उपचार आता चाळीशी पार केलेल्या पुरुषांनाही आकर्षित करत आहे. कारण आता सौंदर्यावर केवळ महिलांचीच मक्तेदारी नाही, तर पुरुषही आपल्या सौंदर्याची विशेष काळजी घेत आहेत.

सर्वाधिक लोकप्रिय ट्रीटमेंट

बोटोक्स : बोटोक्सचे इंजेक्शन मसल्स म्हणजेच मांसपेशींमध्ये दिलं जातं. त्यामुळे वय कमी दिसू लागते, कारण हे त्वचेवर निर्माण झालेल्या रेषा व सुरकुत्यांना नष्ट करण्याचे काम करते. २८ वर्षांपासून ते ६५ वर्षांपर्यंतचे लोक याचा वापर करतात.

फिलर्स : हेही एक प्रकारचे इंजेक्शनच आहे. त्याचा वापर त्वचा कसरदार करण्यात व सुरकुत्या नष्ट करण्यासाठी केला जातो. हे इंजेक्शन त्वचेच्या केवळ वरच्या स्तराला स्पर्श करतं. हे बोटोक्सप्रमाणे त्वचेच्या आत जात नाहीत.

लाइपोसक्शन : ही ट्रीटमेंट चरबीच्या त्रासापासून मुक्तता करते. लठ्ठपणाने त्रस्त लोक या तंत्राचा आधार घेतात.

लेर थेरपी : ही ट्रीटमेंट त्वचेवरील डाग व खड्डे नष्ट करण्यासाठी उपयुक्त आहे. चेहऱ्यावरील नको असलेले केस हटवण्यासाठीही या थेरपीचा वापर केला जातो.

वेगाने वाढणारी लोकप्रियता

डॉ. सुनील चौधरी सांगतात की, सौंदर्याच्या या वैद्यकिय पद्धती यापूर्वीही उपलब्ध होत्या, परंतु तेव्हा यांचा वापर मॉडेल, अॅक्टर किंवा अन्य हाय प्रोफाइल लोकच करत असत किंवा मग केवळ महिला. पण आज या तंत्राद्वारे सुंदर बनण्याच्या शर्यतीत सर्वात जास्त चाळीशी पार केलेले पुरुष सहभागी आहेत.

योग्य सेंटरची निवड

सौंदर्याबाबत वाढते पुरुषांचे आकर्षण चांगले आहे. परंतु कुठूनही ट्रीटमेंट घेण्याची घाई करणे वाईट आहे. सौंदर्याच्या मोहात अशा चुका करू नका, ज्या आरोग्यावर दुष्पपरिणाम करतील. अनेक लोक जाहिरात वाचून अशा ब्यूटी सेंटरमध्ये जातात, जिथे कोणी कॉस्मॅटिक सर्जन किंवा डर्मेटोलॉजिस्टच नसतो.

केवळ कॉस्मॅटिक सर्जन किंवा डर्मेटोलॉजिस्टलाच या ट्रीटमेंट देण्याचा अधिकार आहे. या ट्रीटमेंट्समध्ये अनेक प्रकारच्या बारकाव्यांची काळजी घ्यावी लागते.

साइड इफेक्ट : या ब्युटी ट्रीटमेंट्स पूर्णपणे नुकसानरहित नाहीत. यांचे साइड इफेक्टही होतात. जे लोक वाढत्या वयात कधीतरी अर्थात २-३ वेळाच हे उपचार घेतात, ते धोक्यापासून दूर राहतात, पण जे लोक कमी वय अर्थात, १८ ते २० वर्षांपासून याचा आधार घेतात, त्यांना अनेक प्रकारचे साइड इफेक्ट्स होतात. अनेकदा ज्या भागाला ट्रीटमेंट दिलेली असते, त्याच्या आजूबाजूची त्वचा संक्रमित होते. त्वचा लालसर होते, ती रूक्ष होते, तिच्यावर छोटे-छोटे फोड येतात.

सावधगिरी : एखाद्या कॉस्मॅटिक सर्जनच्या सल्ल्यानेच अशी एखादी ब्यूटी ट्रीटमेंट घ्या. कमी किमतीला बळी पडू नका. ओळखीच्या ठिकाणावरूनच ट्रीटमेंट घ्या. डॉक्टरला आपली मेडिकल हिस्ट्री जरूर सांगा. कार्डियोव्हॅस्क्यूलर आणि न्यूरोमस्क्यूलरसारख्या आजारांना बळी पडला असाल तर कोणत्याही ट्रीटमेंटपासून दूर राहा. एक्स्पर्ट डाएटमध्ये जे बदल सुचवलेले आहेत, त्यांचे पालन करा.

या दीपोत्सवाला असा करा श्रृंगार

– पूनम पांडे

दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे, हे मान्य, या सणाच्या चाहुलीनेच आपण आपल्या घरकुलाला सजविण्यात व्यस्त होता. परंतु या खास पर्वानिमित्त केवळ आपल्या घरकुलाला सजवणं व विविध खमंग, रुचकर पदार्थ बनवणं पुरेसं नाही. तर या सणाला आकर्षक दिसण्यासाठी आपली पर्सनॅलिटी उजळविणे आवश्यक आहे. या खास दीपोत्सवानिमित्त आपलं सौंदर्य आणखी खुलविण्यासाठी आम्ही फेस्टिव्ह मेकअप लुक्ससोबतच मेकअपच्या काही खास आणि नवीन प्रॉडक्ट्सची व्यवस्था केली आहे.

अर्थात, आपण एव्हाना दिवाळीच्या दिवशी लागणाऱ्या पेहरावाची खरेदी केलीच असेल. परंतु आकर्षक लुक्ससाठी केवळ कपडयांची खरेदी करणं पुरेसे नाही. आपल्याला आपला चेहराही मेकअपने हायलाइट करावा लागेल. आपण कितीही महागडे कपडे वापरा, पण आपल्या चेहऱ्यावर मेकअप नसेल, तर आपण सौंदर्य सम्राज्ञी दिसू शकणार नाही. उलट साधा पेहराव करून, जर मेकअप योग्यप्रकारे केलेला असेल तर काही मिनिटांतच आपले रूप खुलून दिसते. खरं तर मेकअप चेहऱ्याचं सौंदर्य खुलविण्याबरोबरच चेहऱ्याच्या उणिवा लपवतो. म्हणजेच मेकअप केल्यानंतर सुंदर दिसणार नाही, असे होणारच नाही.

अर्थात, या दिवाळीनिमित्त बॅलन्स्ड लुकसाठी मेकअप आर्टिस्ट क्रिस्टल फर्नांडिसने सांगितलेले हे डिफरन्ट फेस्टिव लुक्सही ट्राय करू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या की केवळ फेस्टिव सिझनमध्येच नव्हे, इतर वेळीही मेकअप करताना या गोष्टींची काळजी घेणंही खूप आवश्यक आहे.

बॅलन्स लुकसाठी ट्राय करा हे ६ फेस्टिव लुक

1. ज्वेल्ड लुक : ज्वेल्ड लुकसाठी आय मेकअपपासून सुरुवात करा. सर्वप्रथम आय लीडवर शँपेन शेड किंवा आयशॅडो लावा. मग ज्वेल टोंड जेल किंवा लिक्विड आयलाइनर लावा. ब्लॅक मस्काऱ्याचा सिंगल कोट लावून आय मेकअप पूर्ण करा. लिप मेकअपसाठी फ्रेश टोंड लिपग्लॉस अप्लाय करा. आपण पिंक किंवा ब्राउन शेड्सचे ब्लशऑन करून चिकबोन्सला हायलाइट करा.

2. शिमर गर्ल लुक : शिमर गर्ल लुकसाठी सर्वप्रथम आयब्रोज   बोन्सवर व्हाइट शिमर आयशॅडो लावा, जेणेकरून आयशॅडो आणि आयलाइनर खुलून दिसेल. ज्या शेड्सचा आयशॅडो लावत असाल, त्याची डार्क शेड आयलाइनरसाठी यूज करा. उदा. आयशॅडोसाठी सी ग्रीन शेड निवडत असाल, तर आयलाइनरसाठी डार्क ग्रीन निवडा. आता मस्काऱ्याचे दोन कोट लावून आय मेकअप पूर्ण करा. ओठांसाठी लिपग्लॉस आणि चिकबोन्ससाठी फ्रेश शेड ब्लशरची निवड करा.

3. बोल्ड लुक : जर आपण गोऱ्या असाल, तर पिंकीश रूबी किंवा रेड, सावळया किंवा गव्हाळ वर्णाच्या असाल, तर डार्क बरगंडी शेड्सची लिपस्टिक लावा. आय मेकअपसाठी पापण्यांवर स्नोव्हाइट शेडचा आयशॅडो अप्लाय करा आणि मग लाइट शेड्सचा आयलाइनर लावा व ब्लॅक मस्कारा लावून आय मेकअप कंप्लीट करा. आता चिकबोन्सला हायलाइट करण्यासाठी नॅचरल शेड्सचा ब्लशर लावा.

4. शाइनी सिल्व्हर लुक : डार्क शेडची लिपस्टिक लावून लिप मेकअपला हेव्ही लुक द्या. आता आय मेकअपसाठी सिल्व्हर आयशॅडो लावा आणि मग ग्रे कलरचं आयलायनर लावा. त्यानंतर सिल्व्हर मस्कारा लावून आय मेकअप कंप्लीट करा. चिकबोन्ससाठी लाइट शेड्सची निवड करा.

5. गोल्डन ग्लो लुक : पापण्यांवर गोल्डन शेड्सचा आयशॅडो लावा. आता डार्क चॉकलेट शेड्सचा आयलाइनर यूज करा. पिंक किंवा गोल्डन शेड्सची शीयर लिपस्टिक लावा आणि शेवटी नॅचरल ब्लशरने चिकबोन्सला हायलाइट करा. याबरोबरच गोल्डन ग्लोसाठी पंपकिन, कॉपर किंवा जिंजरब्रेड शेड्सचा वापरही चिक्स, लिप्स आणि आय मेकअपसाठी करू शकता.

6. चॉको लुक्स : आयशॅडोसाठी कॉपर शेडचा वापर करा. आता डोळयाच्या कोनांमध्ये डार्क ब्राउन कलरचा आयलाइनर लावा. वरच्या आणि खालच्या आयलीडवर ब्लॅक कलरचा पेन्सिल आयलायनर अप्लाय करा. आता ब्लॅक मस्काऱ्याचे दोन कोट लावून, आय मेकअप कंप्लीट करा. ओठांवर गोल्डन ब्राउन लिपग्लॉस लावा.

खास मेकअप प्रोडक्ट्स

आपला विचार असेल की रेग्युलर मेकअप शेड्सनी आपल्याला फेस्टिव लुक मिळू शकतो, तर आपण चुकीच्या आहात. फेस्टिव लुकसाठी आपल्याला आपल्या वॅनिटी बॉक्समध्ये काही खास मेकअप प्रॉडक्ट्सना जागा द्यावी लागेल. या, जाणून घेऊ हे मेकअप प्रॉडक्ट्स कोणकोणते आहेत? :

  1. मूस : बेस मेकअपसाठी आपण वॅनिटी बॉक्समध्ये कॉपॅक्ट आणि फाउंडेशनऐवजी मूस ठेवा. मेकअपची सुरुवात करण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवा. मग संपूर्ण चेहऱ्याला मूस लावून मेकअप बेस तयार करा. मूसची निवड आपला स्किनटोन लक्षात घेऊन करा.
  2. व्हाइट आयशॅडो : आय मेकअपला क्लीन बेस देण्यासाठी वॅनिटी बॉक्समध्ये व्हाइट आयशॅडो जरूर ठेवा. आय मेकअपची सुरुवात करण्यापूर्वी आयब्रोज बोनवर व्हाइट आयशॅडो लावा. त्यानंतर मनपसंत आयशॅडो, आयलाइनर यूज करा. असे केल्याने आयब्रोजही हायलाइट होतील.
  3. जेट ब्लॅक आयलाइनर : आय मेकअपला काही मिनिटांत ड्रॅमॅटिक लुक देण्यासाठी जेट ब्लॅक आयलाइनर जरूर खरेदी करा. हा लावल्यानंतर मस्कारा किंवा आयशॅडो लावायची गरज नाही. जेट ब्लॅक आयलाइनर आय मेकअपला स्मोकी इफेक्ट देण्यासाठी पुरेसा आहे.
  4. शिमर ब्लशर : फेस्टिव सिझनमध्ये आपल्या लुकला ग्लॅमी टच देण्यासाठी शिमर ब्लशरचा वापर करा. शिमर ब्लशऑन लावल्यानंतर आय मेकअप आणि लिप मेकअपसाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही. याच्या वापराने चेहरा शाइन करेल.
  5. न्यूड लिप कलर : लिपस्टिकच्या डार्क शेड्स लिप्सला बोल्ड लुक देतात, हे मान्य असले, परंतु लिप मेकअपला हायलाइट करण्याचा हा फॉर्म्युला आता जुना झाला आहे. अलीकडच्या काळात लिपस्टिकच्या न्यूड शेड्सची डिमांड आहे. लिपस्टिकचे पिच, पिंक यासारख्या शेड्स हॉट लुक देऊ शकतात.
  6. ग्लिटर फॉर हेअर : लिप आणि आय मेकअपबरोबरच केसांवर ग्लिटरचा वापर करून आपण फेस्टिव लुक देऊ शकता. म्हणून आपण वॅनिटी बॉक्समध्ये ग्लिटर स्प्रेला खास स्थान देऊ शकता. सिल्व्हर आणि गोल्डनसोबतच वेगवेगळया कलर्सचे हेअर ग्लिटर्सही मिळतात. आपण त्यांचीही निवड करू शकता.
  7. बॅलरीना पिंक नेलपेंट : नेलपेंटच्या डार्क आणि निऑन शेड्सला बाय बाय करा आणि फेस्टिव लुकसाठी बॅलरीना पिंक नेलपेंट खरेदी करून आणा. हेव्ही मेकअपसोबत नखांना लावलेली ही लाइट शेड नेलपेंट आपले सौंदर्य आणखी खुलवेल.

हे खरं आहे की, मेकअप आपलं सौंदर्य वाढवतो, पण मेकअपच्या वेळी केलेली चूक आपलं सौंदर्य बिघडवू शकते. म्हणून मेकअप प्रॉडक्ट्सचा वापर विचारपूर्वक करा.

चॉकलेट फेशिअल वाढत्या वयातील सौंदर्य…

* अनुराधा गुप्ता

वाढत्या वयात त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवणं महिलांसाठी एक मोठं आव्हान असतं. खासकरून तिशीला पोहोचलेल्या महिलांना त्वचेतील सैलपणा आणि सुरकुत्यांच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. खरंतर तिसाव्या वर्षानंतर त्वचेमधील नैसर्गिक माइश्चरायझर बनवण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे त्वचेमध्ये पूर्वीसारखं तेज राहात नाही. चॉकेलेट फेशिअलचा तिशीतील महिलांना नक्कीच फायदा होतो.

ब्यूटी एक्सपर्ट मीनू अरोरा यांनीही या गोष्टीला दुजोरा देत म्हटलं, ‘‘चॉकलेटमध्ये अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टीएजिंग प्रॉपर्टीज असतात, जे लिंफेटीक डे्रनेजसह त्वचेवर चढलेल्या डेड सेल्स काढून टाकतात आणि त्वचेला तजेला आणि चमक प्राप्त होते.’’

चॉकलेट फेशिअलमुळे आराम मिळतो

शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालं आहे की चॉकलेटचा स्वाद आणि सुगंध दोन्हीमुळे मानवी शरीरात हॅप्पी हार्मोन्स स्त्रवतात. यामुळे मानसिक तणाव दूर होऊन व्यक्ती आनंदी राहते. चॉकलेट फेशिअलचे काम काहीसं असंच असतं. कारण या फेशिअलमुळे रक्तातील सॅरोटेनिन यौगिक वाढवतं. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

योग्य स्क्रबिंगमुळे होतो योग्य परिणाम

चॉकलेट फेशिअल करताना सुरूवातीला चेहऱ्याला दुधाने क्लिजिंग केलं जातं. यानंतर ओटमील, डिस्प्रीन टॅबलेट, शुगर फ्री चॉकलेटचे विरघळलेले तुकडे, एक चमचा कॉफी पावडर आणि मधाने चेहऱ्याला स्क्रब केलं जातं.

स्क्रबिंगची योग्य पद्धत सांगताना मीनू म्हणतात, ‘‘कधी स्क्रब करताना चेहरा रगडू नये. काहीवेळ स्क्रबर चेहऱ्यावर लावून ठेवावा आणि मग हळुहळु बोटांनी गोलाकार फिरवून स्क्रबिंग केलं पाहिजे. यामुळे रक्तपुरवठा सुरू होतो आणि त्वचेचे डेड सेल्स निघून जातात.’’

कोल्ड कंप्रेशर आवश्यक

स्क्रबिंगनंतर त्वचेला हॉट कंप्रेशर देण्यासाठी स्टीमऐवजी पाण्यामध्ये बोरिक अॅसिड मिसळून त्यात भिजवलेला रूमाल चेहऱ्यावर काहीवेळ ठेवला जातो. हॉट कंप्रेशरमुळे त्वचेवरचे पोर्स उघडून त्यांचा आकार मोठा होतो. मोठे पोर्स कुरूप दिसतात. त्यामुळे हॉट कंप्रेशरनंतर लगेच कोल्ड कंप्रेशर देणं आवश्यक असतं. यासाठी थंड पाण्याची किंवा बर्फाचा वापर केला जातो.

मसाजचं महत्व

त्वचेला पेनिटे्रट करण्यासाठी चॉकलेटचे विरघळलेले तुकडे एलोवेरा जेलमध्ये मिसळून त्वचेवर लावले जातात आणि नारळाच्या पाण्यासह अल्ट्रासोनिक मसाज दिला जातो. सीसॉल्ट घालून त्वचेला मसाज दिला जातो. वास्तविक सीसॉल्ट त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेतं.

स्कीन टाइटनींग क्रिमने चेहऱ्यावर करण्यात येणारा मसाज अॅन्टीएजिंग फेशिअलमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यामुळे त्वचेला तजेला आणि चमक दोन्ही येते. मीनू सांगतात की या मसाजमध्ये चेहऱ्याचे काही खास प्रेशर पॉइंट्स दाबले जातात यामुळे रक्तभिसरण वाढते आणि आराम मिळतो.

फेशिअलचा शेवटचा टप्पा

सर्वात शेवटी ग्लो पॅकमध्ये विरघळलेलं चॉकलेट घालून ५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावलं जातं. यानंतर पुन्हा चेहऱ्याला हॉट कंप्रेशर आणि कोल्ड कंप्रेशर दिलं जातं.

चॉकलेट फेशिअलनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने जरूर धुवा, कारण चेहऱ्यावर चॉकलेटचा चिकटपणा तसाच राहातो. एसपीएफ क्रिम न लावता उन्हात जाऊ नका, त्वचा पातळ होते आणि पातळ त्वचा होरपळू शकते.

फेशिअल करण्याआधी हे लक्षात ठेवा

* फेशिअलच्या आधी ब्लीच करू नका. ब्लीचमुळे त्वचेवर केमिकलचा थर जमतो. त्यामुळे फेशिअलचा परिणाम चेहऱ्यावर कमी दिसतो.

* फेशिअलच्या दोन तास आधी काहीही खाऊ नका. कारण शरीर एकावेळी एकच कार्य करू शकते. एकतर अन्नपचन करू शकते किंवा मानसिक तणाव कमी करून रक्ताभिसरण करू शकते.

* चेहऱ्यावर पिंपल्स असतील किंवा पुरळ असेल तर आधी त्यावर उपचार करून घ्या. फेशिअल करण्याच्या आठवडाभर आधी कच्च्या दुधात लवंग भिजवून पुरळांवर लावा. ३ दिवसांत पुरळ सुकेल.

* दर २५ दिवसांनी फेशिअल करा. त्याआधी केलं तर त्वचेतील मृतपेशींसह कार्यरत पेशीही निघून जातील, जे त्वचेसाठी हानिकारक ठरते.

चॉकलेट फेशिअलचे फायदे

* चॉकलेट फेशिअल कोणत्याही प्रकारच्या त्वचेवर केले जाऊ शकते.

* चॉकलेटमध्ये असलेले अॅन्टीऑक्सिडंट्स त्वचेला फ्री रॅडिकल डॅमेजपासून वाचवतात.

* चॉकलेटमध्ये त्वचेला टॅनिंगपासून वाचवण्याची क्षमता असते.

* यामुळे त्वचा हायडे्रट होते आणि त्वचेची कोमलता टिकून राहाते.

* चॉकलेट फेशिअल त्वचेमध्ये वेगाने कोलोजन बनवते. यामुळे त्वचेची लवचिकता टिकून राहाते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें