पावसाळ्यातील गरमागरम मेजवानी

* पाककृती सहकार्य : ओम प्रकाश गुप्ता

  • पिनट पकोडा

साहित्य

*  १ कप शेंगदाणे

*  १ मोठा चमचा बेसन

*  १ छोटा चमचा बारीक चिरलेलं आलं

*  १ छोटा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची

*  १ छोटा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर

*  चिमूटभर हळद

*  अर्धा छोटा चमचा लाल तिखट

*  १ छोटा चमचा धणे पावडर

*  अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर

*  तेल गरजेपुरतं

*  मीठ चवीनुसार.

कृती

शेंगदाणे व तेल सोडून बाकी सर्व साहित्य एकत्रित करा आणि पुरेसं पाणी टाकत घट्ट पेस्ट बनवा. कढईत तेल गरम करा. शेंगदाणे या पेस्टमध्ये घोळवून मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्या. हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

  • बेक्ड टोफू पोटली

साहित्य

*  अर्धा कप टोफू मॅश केलेला

*  १ कप मैदा

*  १ मोठा चमचा शेंगदाण्याचा जाडसर कूट

*  १ छोटा चमचा हिरवी मिरची पेस्ट

*  १ छोटा चमचा आलं लसूण पेस्ट

*  २ मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर

*  १ छोटा चमचा चाट मसाला

*  अर्धा छोटा चमचा जिरे

*  १ छोटा चमचा धणे पावडर

*  अर्धा छोटा चमचा कुटलेली लाल मिरची

*  चिमूटभर हिंग

*  २ छोटे चमचे तेल

*  मीठ चवीनुसार.

कृती

मैद्यात चिमूटभर मीठ आणि १ चमचा तेल टाकून व्यवस्थित रगडून घ्या. नंतर थोडं थोडं गरम पाणी टाकून मळून घ्या आणि झाकून ठेवा. कढईत १ चमचा तेल टाकून गरम करून घ्या. यामध्ये हिंग, जिरे, आलंलसूण पेस्ट आणि हिरवी मिरची पेस्ट टाकून परतवून घ्या. मॅश केलेला टोफू आणि इतर साहित्यदेखील टाकून व्यवस्थित परतवून घ्या. मिश्रण आचेवरून उतरवून थंड होऊ द्या. मळून ठेवलेलं मैद्याचं पीठ पुन्हा मुलायम मळून घ्या आणि त्याचे छोटेछोटे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळयाची लाटी लाटून घ्या. १-१ मोठा चमचा टोफू मिश्रण घेऊन त्यांच्या पोटल्या बनवून घ्या. वरून तेल लावून २०० डिग्री सेन्टीग्रेट प्रिहीटेड ओव्हनमध्ये १९-२० मिनिटं ठेवा. पोटल्या जर ब्राऊन झाल्या नसतील तर ३-४ मिनिटं अजून ठेवा. पोटल्या पूर्णपणे बेक झाल्यानंतर टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें