बॅक टू ऑफिस असा साधा ताळमेळ

* पारुल भटनागर

कोरोना वायरसमुळे ऑफिस बंद होताच ऑफिस फ्रेंड्सचं आपापसात बोलणं कमी झालं. आता फक्त कामाबाबतच गोष्टी होत होत्या. ऑफिसमध्ये जी ग्रुप मस्ती होत होती ती आता झुम मीटिंगमध्ये नव्हती आणि ना ही मेसेजमध्ये होती. अशी जाणीव होत होती की जसं काही जिवलगांपासून खूपच दूर झालो आहोत. घरूनच काम होत असल्यामुळे वर्कलोडदेखील खूपच वाढलं होतं, ज्यामुळे ऑफिस फ्रेंड्सची अनेक दिवसांतून अनेकदा बोलणं व्हायचं परंतु बोलणं फक्त कामाबाबतच सिमित असायचं. ना फिरणं आणि ना ही मस्ती. आपण सर्वजण ते मिस करत होतो. मनातल्या मनात हाच विचार करत होतो की पुन्हा ऑफिस सुरू झालं तर आपल्याला ती जुनी मस्ती पुन्हा करता येईल.

शेवटी एकदाचं सगळं पूर्ववत झालं आणि ऑफिसदेखील सुरू झालं. एके दिवशी झुम मीटिंगच्या माध्यमातून बॉसकडून समजलं की पुढल्या आठवडयापासून ऑफिस सुरू होणार आहे. ही बातमी ऐकून असं वाटलं की जणू काही पुन्हा आपल्याला मोकळया हवेत श्वास घेण्याची संधी मिळतेय.

कामासोबतच आपण सर्वजण आपल्या ऑफिसच्या फ्रेंड्ससोबत मस्तीचे क्षण व्यतीत करू जे वर्क फ्रॉम होममध्ये शक्य नव्हतं. अशावेळी जेव्हा पुन्हा ऑफिसचे जुने दिवस परतत आहेत तर आपापसात ताळमेळ बसवण्यासाठी पुन्हा काही जुन्या गोष्टी व्यतीत करा म्हणजे काही वर्षांपूर्वीचा दुरावा काही क्षणातच वेगळा पुन्हा दूर होईल. तर जाणून घ्या यासाठी काय करावं :

एकमेकांना भेटवस्तू द्या

गिफ्टस म्हणजेच भेटवस्तू घ्यायला प्रत्येकालाच आवडतं. अशावेळी जेव्हा आपण दीर्घ काळानंतर ऑफिसमध्ये जात आहोत तेव्हा मनात उत्सुकता तर खूपच असणार कारण एवढ्या दिवसानंतर ऑफिस पाहणार, ऑफिस फ्रेंड्स ना भेटणार, त्यांच्याशी गप्पा मारणार. अशावेळी जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल तेव्हा आहे असं सांगून गिफ्ट द्या की हे तुझ्या बर्थडेचं गिफ्ट आहे. जे दूर असल्यामुळे देऊ शकली नव्हती. यामुळे तुमच्या ऑफिसच्या मित्र मैत्रिणींना जाणीव होईल की अजूनदेखील तुम्हाला त्यांची काळजी आहे. यामुळे पुन्हा ताळमेळ साधण्यात सहजता येईल आणि पुन्हा त्यांच्या आवडीची गोष्ट गिफ्ट देऊन जुन्या गोष्टी पुन्हा उजळता येतील.

टी टाईममध्ये मस्ती

वर्क फ्रॉम होमच्या दरम्यान ज्या टी टाईमला तुम्ही मिस करत होता, आता तो पुन्हा जगण्याची वेळ आली आहे. कारण ऑफिस तर उघडलं आहे. रामूच्या चहाच्या दुकानावर ऑफिस वर्कपासून पर्सनल टॉपिक्स जे शेअर होत होते. अशावेळी जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये परतला असाल तर टी टाईम एन्जॉय करायला विसरू नका. हा विचार करून टी टाईम सोडू नका की घरी तर आपण टी टाईम घेणंच सोडलं होतं.

टी टाईममुळे तुम्हाला स्वत:ला फ्रेश वाटेलच सोबत या बहाण्याने ऑफिसच्या मित्रांसोबत पुन्हा मोकळेपणाने गप्पागोष्टी होतील, मस्ती होईल, जुने दिवस परतील आणि हा टी टाईम तुमच्यातील बॉण्डिंगला स्ट्राँग करण्यात मदतनीस ठरेल.

लंच टाईममध्ये लंचदेखील आणि मस्तीदेखील

घरी जेव्हा मन करेल तेव्हा लंच केलं आणि हे लंचदेखील कामासोबतच एका टेबलवर वा बेडवर एकट्याने बसून केलं. जे ना खाण्याचा आनंद घेऊ देत होतं आणि ना ही या ब्रेकमध्ये आपण मस्ती करू शकत होतो. जर थोडं रिलॅक्स करण्याबद्दल विचार केला तरीदेखील हातात फोनवर वा फेसबुक पाहत असायचे वा मग व्हाट्सअप वा काही आणखीन शोधत असायचो, जे ऑफिसच्या लंच टाईमच्या अगदीच वेगळं होतं, ज्यामुळे आपण घरी मिस करण्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नव्हतो.

परंतु आता जर ऑफिस सुरू झालं असेल तर लंच टाईममध्ये पूर्वीप्रमाणे मित्रांसोबत काही मिनिटं लंच करून मस्तीसाठी कधी जवळच्या मार्केटमध्ये जा वा मग लंच ब्रेकमध्ये मस्तीचे क्षण व्यतीत करा. जुन्या आठवणी ताज्या करा. या मस्तीमुळे तुम्ही पुन्हा पूर्वीप्रमाणे एकमेकांजवळ याल.

ऑफिसनंतर आऊटिंग

पूर्वी जेव्हा तुमचं ऑफिस सुटायचं आणि त्यानंतर तुम्ही कधी ऑफिसच्या मित्रांसोबत खाण्यासाठी, कधी जवळच्या लोकर मार्केट वा मग शॉपिंगसाठी जात होते. आठवतात ना तुमचे ते दिवस. परंतु मध्येच वर्क फ्रॉम होममुळे या सर्वांवर ती जणू ब्रेक लागला होता.

परंतु आता जर पुन्हा ऑफिसला जाण्याची संधी मिळत आहे तर ऑफिस वर्कसोबतच ऑफिसनंतर आऊटिंग वा मग मस्ती नक्की करा. यामुळे एकतर ऑफिसच्या स्ट्रेसपासून सुटका मिळेल, दुसरं तुम्ही तुमच्या ऑफिसच्या फ्रेंड्ससोबत मनापासून मस्तीदेखील करू शकाल.

चटपटीत गोष्टींसाठीदेखील वेळ

वर्क फ्रॉम होम जेवढे सुरुवातीला छान वाटत होतं तेवढंच नंतर कंटाळवाणं होऊ लागलं. अशावेळी बॅक टू ऑफिस या कंटाळयापासून तुम्हाला बाहेर काढेल सोबतच तुम्हाला ऑफिसच्या मित्रांसोबत चटपटीत गोष्टींसाठीदेखील वेळ मिळेल. जसं यार प्रिया छोटी ड्रेसमध्ये किती हॉट दिसते आहेस, बघ ना रोहन नेहाला इम्प्रेस करण्यासाठी तिच्या मागे पुढे फिरत असतो.

असं वाटतंय की या वेळेस स्नेहा टारगेट पूर्ण करण्यासाठी काहीही करेल, वगैरे वगैरे. अशा गोष्टी भलेही योग्य नाहीत परंतु अशा गोष्टी करायला खूप मजा येते.

रोमान्सचीदेखील संधी मिळेल

अरे घरात बसून काम केल्याने आपण ऑफिसमध्ये रोमान्स खूपच मिस करत होतो. आता जेव्हा कोणाला पाहाण वा भेटणं होत नव्हतं तर कोणावर क्रश होणं तर खूपच दूरची गोष्ट होती. अशावेळी आता जेव्हा ऑफिस पुन्हा उघडलं आहे तर कामा मस्तीसोबतच रोमांसचीदेखील पूर्ण मजा घेऊ शकाल. ज्यामुळे तुमच्यामध्ये एक नव्या ऊर्जेचा संचार होण्याचं काम करेल. तुम्हाला जी आवडते तिला पाहून काम करण्याची वेगळीच मजा असणार.

नव्या लोकांना जाणून घेण्याची संधी

या दरम्यान अनेक लोकांना ऑफिस सोडलं असणार  व त्यांच्या जागी बदलून आलेल्या नव्या लोकांनी ऑफिस जॉईन केलं असेल परंतु वर्क फ्रॉम होममुळे तुमची त्या नवीन लोकांशी बॉण्डिंग तेवढी स्ट्राँग बनू शकली नसेल. अशावेळी बॅक टू ऑफिसमध्ये तुम्हाला नव्या लोकांना जाणून घेण्याची, त्यांना समजण्याची, त्यांच्यापासून काही नवं शिकण्याचीदेखील संधी मिळेल, सोबतच तुम्ही त्यांना कामाच्या छानशा टिप्स देऊ शकाल, जे तुम्हाला  एकमेकांना जवळ आणण्याचं काम करेल.

प्रोत्साहित करा

भलेही वर्क फ्रॉम होममुळे तुम्ही सर्वजण बऱ्याच काळापासून एकमेकांपासून दूर होतात, परंतु आता जेव्हा पुन्हा ऑफिसला जाण्याची संधी मिळत आहे तर एकमेकानां पूर्वीप्रमाणेच प्रोत्साहित करायला विसरू नका. त्यांना कामात मदतदेखील करा, त्यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहितदेखील करा. यामुळे तुम्हा सर्वांमध्ये पुन्हा एक स्ट्राँग बॉण्डिंग बनेल. हे तुमच्या तणावालादेखील कमी करण्याचे काम करेल कारण जेव्हा तुम्ही कोणाला प्रोत्साहित कराल तेव्हा तेदेखील तुम्हाला प्रोत्साहित केल्याशिवाय राहणार नाही, जे तुमच्या प्रॉडक्टिव्हिटीला वाढविण्यात मदतनीस ठरेल. अशा प्रकारे तुम्ही पुन्हा बॅक टू ऑफिसमध्ये ताळमेळ साधू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें