सौंदर्य समस्या

– समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा

माझ्या चेहऱ्यावर केस उगवत आहेत, त्यामुळे कुठे येण्या-जाण्यास मला लाज वाटते. कृपया असा एखादा उपाय सांगा, ज्यामुळे ते हटवता येतील?

हार्मोनलच्या बदलामुळे चेहऱ्यावर केस उगवण्याची समस्या येऊ शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करा. केस हाताने प्लक करण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. तुम्ही जेवढे केसांना प्लक करणार, त्याच्या दुप्पट वेगाने ते उगवणार. वाटल्यास आपण ब्युटी पार्लरमधून यासाठी कटोरी व्हॅक्सिंग करू शकता. जर चेहऱ्याच्या केसांवर कायमस्वरूपी उपचार करायचा असेल, तर एक्सपर्टकडून लेझर ट्रीटमेंट करून घ्या.

क्रीमचा वापर केल्याने चेहरा काळा पडतोय, काय करू?

सर्वप्रथम केमिकलयुक्त क्रीम चेहऱ्याला प्रमाणापेक्षा जास्त लावणे बंद करा. त्यानंतर घरी बनवलेल्या फेसपॅक आणि स्क्रबच्या मदतीने चेहरा रोज स्वच्छ करा. आपला काळवंडलेला चेहरा पूर्ववत होईल.

माझ्या लिप्सवर व्हाइट स्पॉट होत आहेत, ते कसे बरे करता येतील?

लिंबू, संत्रे यासारख्या आंबट फळांचा रस पाण्यात मिसळून ओठांना लावल्यास डाग कमी करण्यास मदत होऊ शकते. हा रस आपण कापसाच्या बोळ्याने डागांवर लावू शकता. या सोप्या घरगुती उपायाने काही दिवसांतच डाग गायब होऊ लागतात. आपल्या आहारात लसणीचे सेवन वाढवल्याने आपल्याला सफेद डाग कमी करण्यास मदत मिळेल.

प्रेग्नंसीनंतर केस खूप गळत आहेत, असे का?

गर्भावस्थेत महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजन नावाच्या हार्मोनचे संतुलन बिघडते. त्यामुळे केस वेगाने गळतात. गर्भावस्थेत आहाराकडे लक्ष दिल्याने हे काही प्रमाणात कमी करता येते.

माझ्या चेहऱ्यावर तीळ आहेत आणि माझी त्वचा कोरडी आहे. मी काय करू, जेणेकरून माझी त्वचा उजळ होईल आणि डागांपासून माझी सुटका होईल?

चेहऱ्याच्या डाग असलेल्या भागावर लिंबाचा रस लावा. तो ३० मिनिटे राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. लिंबाचा रस चेहऱ्यावरील डाग कमी करतो. २ महिने ही प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला फरक दिसेल.

संवेदनशील त्वचेच्या देखभालीसाठी काही घरगुती उपाय सांगा?

जर आपली त्वचा संवेदनशील असेल, तर आपण त्वचारोग तज्ज्ञाला दाखवून तपासून घ्या. आपल्याला आपल्या त्वचेबाबत माहीत असले पाहिजे की कोणत्या कारणाने आपली त्वचा एवढी संवेदनशील होतेय. त्वचारोग तज्ज्ञाला दाखवल्यानंतर आपल्याकडे त्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी उत्तम मार्ग व साधने असतील.

आपली त्वचा संवेदनशील असेल, तर तिची विशेष काळजी घेण्याची गरज असते. उन्हात जाण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रीन लावा. खूप पाणी प्या आणि प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन करा.

माझे केस कर्ली आहेत आणि जेव्हा ओले असतात, तेव्हा केवळ त्यावेळीच व्यवस्थित असतात. सुकल्यानंतर ते खूप हार्ड होतात. मी कशाप्रकारे माझ्या केसांना मृदू आणि सॉफ्ट करू शकते, एखादा उपाय सांगा?

केसांना मऊ बनवण्यासाठी आणि त्यांच्यात चमक आणण्यासाठी अंड्यापेक्षा उत्तम दुसरे काहीच नाही. हे एवढे प्रभावी आहे की एकदा वापरल्यानंतर आपल्याला फरक जाणवेल. यामध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन, फॅटी अॅसिड आणि लॅक्टिन असते. ते केसांना निरोगी बनवते. त्यात ऑलिव्ह ऑइल मिसळून लावल्याने फायदा होईल.

दातांचा पिवळेपणा कसा दूर करता येईल?

तुळस तोंड आणि दातांच्या आजारांपासून आपले रक्षण करते. याची पाने उन्हात वाळवून पावडर बनवून मग टूथपेस्टमध्ये मिसळून रोज ब्रश करा. पिवळेपणा दूर होईल. मिठामध्ये सोडियम आणि क्लोराइड दोन्हीचे मिश्रण असते. ते दातांचा पिवळेपणा कमी करण्यास मदत करते. परंतु याचा जास्त वापर दातांच्या इनॅमलचे नुकसान करू शकते. तसेही मीठ आणि राईच्या तेलाने दातांना चमक आणण्याचा उपाय प्रचलित आहे. चिमूटभर मिठात २-३ थेंब तेल मिसळून दात स्वच्छ करा.

माझे वय २८ वर्षे आहे. मी खूप बारीक आहे. माझी मानही खूप बारीक आहे. त्यामुळे कोणताही नेकपीस मला शोभून दिसत नाही. मी कशा प्रकारचे नेकपीस व एक्सेसरीजचा वापर करू, कृपया मला सांगा?

तुम्ही ज्याप्रकारे आपल्या शरीराच्या ठेवणीबाबत माहिती दिलीय, त्यावरून वाटते की तुमची मान लांब असावी. उंच मान असणाऱ्या महिलांना कुठल्याही लांबीची चेन शोभून दिसते. उंच व बारीक असणाऱ्या महिलांना मध्यम आकाराचे दागिने जास्त चांगले दिसतात. सामान्यपणे दागिने कपड्यांच्या हिशोबाने घातले जातात. इथे लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे आपले टॉप, कुर्ती किंवा ब्लाउजच्या गळ्याच्या डिझाइनवरही आपल्या नेकपीसचा लुक अवलंबून असतो. ड्रेसच्या गळ्याच्या आकाराची माळ असू नये. उदा. गोल गळ्याच्या ड्रेसवर गोल आकाराची माळ घालू नये. मोठ्या गोल गळ्याच्या ड्रेसवर छोटी चेन आणि व्ही नेकवाल्या ड्रेसवर छोटी गोल किंवा अंडाकार माळेचा वापर करावा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें