परिधान करा ५ एक्सेसरीज बॉलिवूड स्टाइलने

* पूनम

कपडेच नाहीत तर दागिनेदेखील स्टाइल स्टेटमेंट बनू शकतात. पण त्यासाठी काही गोष्टी ध्यानात ठेवणे जरूरी आहे. त्या म्हणजे तुमचे कपडे, तुमचं व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन जर दागिने आणि कपडे परिधान केले तर तुम्हीदेखील बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे ग्लॅमरस दिसू शकता. तेव्हा दागिने निवडताना काही गोष्टी लक्षात घेणं जरूरी आहे.

नेकपीस

काही सेकंदात स्टायलिश दिसण्यासाठी आपल्या ज्वेलरी बॉक्समध्ये वेगवेगळ्या स्टाइलचे, आकाराचे नेकपीस जरुर ठेवा.

* ट्युनिक, कुर्ती आणि फुललेंथ टीशर्ट सोबत लाँगलेंथ नेकपीस घाला.

* कॉलरवाल्या ड्रेसवर बीडेड नेकपीस घाला. यामुळे ग्लॅमरस लूक मिळेल.

* मोहक लूक मिळवण्यासाठी स्पार्किंग स्टेटमेंट नेकलेस घ्या. तो गाऊन, वनपीस आणि ऑफशोल्डर ड्रेसवर शोभून दिसतो.

* ट्रायबल आदिवासी दागिनेदेखील आजमावू शकता.

* कॉलेज गर्ल फंकी लूकसाठी ३-४ नेकपीस एकत्र घालू शकता.

* प्यूजन वेअर असल्यास मोहक दिसण्यासाठी टेंपल ज्वेलरी नेकपीस हा उत्तम पर्याय होऊ शकतो.

* नेहमीच सगळ्याच कपड्यांवर सूट होणारा काळ्या रंगाचा नेकपीस आपल्या ज्वेलरी बॉक्समध्ये असायलाच हवा.

* नियॉन शेड्सचे नेकपीस नेहमीच फ्रेश लूक देतात. तेदेखील असायलाच हवेत.

इयररिंग्स

तुमची इच्छा असेल तर नेकपीस ऐवजी फक्त इयररिंग्स घालून आपला लूक स्टायलिश करू शकता.

* बोल्ड लूकसाठी मोठ्या आकाराचे इयररिंग्स निवडा.

* गाऊन, ड्रेससोबत हिरे किंवा मोत्याचे मोठे टॉप्स घाला.

* नेहमीच्या नॉर्मल लूकसाठी मिडलेंथ हँगिंग इयररिंग्स घाला. ते खूपच स्टायलिश दिसतात.

* शोल्डरलेंथ इयररिंग्स घालून ग्लॅमरस लूक येऊ शकतो.

* मिस मॅच लूकसाठी वेस्टर्न वेअरसोबत फुल साईज झुमके घाला.

* गर्दीत सर्वांचं लक्ष तुमच्याकडे वेधून घ्यायचं असेल तर इअर कफ घाला.

* सुपर स्टायलिश लूकसाठी फक्त एकाच कानात एक्सट्रिम लेंथ (गळ्याच्या खालपर्यंत) इयररिंग्स घाला.

* फंकी लूकसाठी फूटवेअर, फळं व प्राण्यांच्या आकाराचे इयररिंग्स घालू शकता.

बांगड्या

* हातांचे सौंदर्य वाढवण्यासोबतच आपलं व्यक्तिमत्त्व उठून दिसावं म्हणून ब्रेसलेट ज्वेलरी बॉक्समध्ये असायला हवं.

* डिसेंट लूकसाठी हिरेजडीज कफ घालू शकता.

* डेनिमसोबत लेदरचे ब्रेसलेट घाला

* फ्रेश लूकसाठी बाइट गडद रंगाच्या शेड्सचे बीडेड, मोती असलेलं कफ वापरू शकता.

* ३-४ कफ एकत्र घालून स्टायलिश लूक मिळवू शकता.

* सोन्याच्या आणि चांदीच्या बांगड्या ज्वेलरी बॉक्समध्ये असायलाच हव्यात. या सहज कोणत्याही ड्रेस, कपड्यांसोबत मॅच होतात.

* फंकी लूकसाठी ब्रॅण्ड कफ वापरून पाहू शकता.

* रॅप कफ कलेक्शनमध्ये असावेत. डेनिमसोबत खूपच छान दिसतात.

रिंग

फक्त ब्रेसलेट नव्हे तर अंगठीदेखील तुमच्या हाताच्या सौंदर्यात भर घालते.

* बोल्ड लूक हवा असल्यास मोठ्या आकाराच्या अंगठ्या घालाव्यात.

* फॅशनबेल लूकसाठी डबल फिंगर रिंग नक्की वापरून बघा.

* नेलआर्टसाठी वेळ नसेल तर नेलआर्ट रिंग घाला.

* सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनायचे असल्यास साखळी रिंग वापरू शकता.

* स्टयलिश लूकसाठी फुल फिंगर रिंग म्हणजेच संपूर्ण बोटात घालायची रिंग हा उत्तम पर्याय आहे.

* फोर फिंगर सध्या तेजीत आहे. त्यामुळे तीदेखील ट्राय करू शकता.

घड्याळ

घड्याळ हा एक असा दागिना आहे, ज्यामुळे व्यक्तिमत्त्वह झळकतं. स्टायलिश लूकसाठी घड्याळ नक्की विकत घ्या.

* वेगळ्या आणि हटके लूकसाठी कॉलेजगोईंग मुलींसारखे ब्रेसलेट वॉच वापरू शकता.

* लेदर बेल्टचं घड्याळ तुमचं व्यक्तिमत्त्व प्रभावी करतं.

* कफ वॉच हे कलेक्शनमध्ये असायलाच हवं. हे वेस्टर्न आउटफिटसोबत खूप छान दिसते.

* स्पॉर्ट्स वॉचमुळे खेळाडूप्रमाणे लूक करता येईल.

* नेहमीच्या वापरासाठी मेटल वॉच विकत घ्या.

* पार्टी, फंक्शन प्रसंगी रत्नजडीत घड्याळ वापरू शकता.

* कपड्यांच्या रंगाना मॅच होणारी रंगीबेरंगी घड्याळंदेखील वापरायला काहीच हरकत नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें