दांपत्य जीवनातील ९ वचनं

* डॉ. नीरजा श्रीवास्तव

बदलत्या काळाबरोबर बदलही आवश्यक आहे. आजच्या युगात दांपत्य विशेषकरून नवविवाहित जोडप्यांना आपल्या वैवाहिक जीवनाच्या आनंदासाठी आपल्या भावना आणि विचारांचा अंदाज थोडा बदलायलाच हवा. पूर्वी विवाहाचा अर्थ फक्त प्रेम आणि त्याग होता, ज्यात बहुतेकदा स्त्रियाच पती आणि त्याच्या घर-कुटुंबासाठी समर्पित राहण्यात आपल्या जीवनाची धन्यता मानत असत आणि त्याग व कर्तव्याची मूर्ती बनून सारे जीवन आनंदाने व्यतित करायच्या. घरकुटुंबात यामुळेच त्यांना सन्मानही मिळत असे.

पुरुष पण अशी पत्नी मिळाल्याने आनंदीत व्हायचे. त्यांची मानसिकताही स्त्रियांप्रति हीच होती. पण आज परिस्थिती बदललेली आहे. स्त्री-पुरुष दोघांनाही ही गोष्ट समजली आहे. आज स्त्रियाही पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत, प्रगती साधत आहेत.

वर-वधू लग्नाच्या वेळेस रीती-रिवाजाच्या नावावर ७ वचने घेतात आणि बहुतेक खूप लवकर विसरूनही जातात.परंतु दांपत्य सर्वेक्षणाच्या आधारावर निष्कर्षाच्या रूपातील या वचनांचा विवाहानंतरही स्विकार करा, यांना लक्षात ठेवा आणि निभवासुद्धा. दोघांनाही एकमेकांच्या कामात सहकार्याच्या रूपाने ताळमेळ बसवून चालण्याची आवश्यकता आहे, ज्यातून सगळयांच्या विचार-विमर्शातून निघालेली ही खालील वचने मोठया कामाची आहेत :

  1. जे माझे आहे ते तुझेही : लखनौऊचे आर्किटेक्ट सुहास आणि त्यांची पत्नी सीमामध्ये सुरुवातीला छोटया-छोटया गोष्टींवरून नेहमी भांडणे होत. सीमा म्हणते, ‘‘जसे माहेरून मिळालेल्या महाग बेड कव्हर, क्रॉकरी इत्यादीचा जेव्हा सुहास आपल्या मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी उपयोग करायचे, तेव्हा मला अजिबात आवडायचे नाही. त्याचप्रमाणे त्यांनाही माझे नातेवाईक, मैत्रिणींद्वारे त्यांचे म्युझिक सिस्टम किंवा पुस्तके हाताळणे एकदम असह्य व्हायचे. नंतर एके दिवशी आम्ही ठरवले की जर आपण एक आहोत तर एकमेकांच्या वस्तूंचा उपयोग का नाही करायचा. त्यादिवसापासून सगळा परकेपणा दूर झाला.
  1. जसे मला आपले आई-बाबा,भाऊ-बहिण,मित्र-नातेवाईक प्रिय आहेत, तसेच तुम्हालाही आपले :
  • जयपुरचे डॉ. राजेश आणि त्यांची होममेकर पत्नी इशाने या गोष्टीचा खुलासा केला की पती-पत्नी दोघांच्या कुटुंबाचा, नातेवाईकांचा घरात समान आदर होणे आवश्यक आहे. राजेशने आपली बहिण रिमाच्या घरी आपली व आपल्या आई-बाबांची पुन्हा-पुन्हा अपमानित होण्याची घटना सांगितली. बहिण आपल्या पतिकडून होणाऱ्या अपमानजनक व्यवहारामुळे दु:खी असायची. यामुळे त्यांचे आपसातील नाते कधी गोड झाले नाही. ही तर चुकीची अपेक्षा आहे की फक्त पत्नीने पतिच्या घरच्यांचे प्रेमाने स्वागत करायचे आणि पतिने तिच्या माहेरच्या लोकांचा आदर न करता जेव्हा-तेव्हा अपमान करायचा. पतिचेही तेवढेच कर्तव्य आहे. पत्नी अर्धांगिनी आहे, जीवनसाथी आहे, गुलाम नाही.
  1. जशा माझ्या गरजा आवश्यक तशाच तुमच्याही : सुजाता एका कॉर्पोरेट ऑफिसात काम करते. नेहमी तिला घरी येण्यास उशीर होतो. घरी असतानाही तिला कधी-कधी ऑफिसचे काम करावे लागते. यावर पती विशाल चिडचिड करत असे. एके दिवशी सुजाताने त्याला बसवून चांगल्याप्रकारे समजावले की विशाल मी लग्नाच्या अगोदरच तुम्हाला सांगितले होते, तेव्हा तर तुम्हाला माझ्या चांगल्या पॅकेजपुढे सर्व स्वीकार होते. जेव्हा तुम्ही आपल्या बिझनेस मीटिंगमधून उशिरा येता तेव्हा तर माझी काही हरकत नसते. तर मग तुम्ही का समजून घेत नाही? मी नोकरी सोडू शकत नाही. आईचे प्रत्येक महिन्याला ब्लड ट्रान्सफ्युजन मी थांबवू शकत नाही. नि:संदेह तुम्ही मला सोडू शकता. माझी यालाही काही हरकत नाही. मी डिवोर्ससाठी तयार आहे. मी उद्याच दुसरीकडे कोठे शिप्ट होईल.
  2. आपल्या सवयी, छंद, संस्कार जसे माझे तसेच तुमचे : पती-पत्नी वेगवेगळया परिवारातून, वेगवेगळया वातावरणातून येतात पण दुसऱ्याकडून आपल्यासारखे आचरण व राहणीमानाची अपेक्षा करतात किंवा वेगळे पाहून टर उडवतात तर हे योग्य नाही, त्यापेक्षा याचे समाधान शोधणे योग्य असते. स्कूल टीचर दीप्ती आपल्या बँक मैनेजर पती शिखरला अनवाणी पायांनी घरात फिरल्यानंतर अंथरुणात घुसण्याने वैतागत असे. तर शिखर तिचे बाहेरून कोठून आल्यावर कपडे चेंज करून अंथरुणावर टाकणे पसंत नव्हते. शेवटी एके दिवशी बसून दोघांनी समस्येचे समाधान शोधले. आता पायांच्या अस्वच्छतेपासून वाचण्यासाठी शेखरने कार्पेट अंथरले तर दीप्तीनेही शिखरचे बघून कपडे व्यवस्थित हँग करायला सुरूवात केली. त्यांचे जीवन पुन्हा सुरेल सुरावट बनली.
  3. दुसऱ्यांच्या समोर एकमेकांचे दोष किंवा टर उडवायची नाही : दिल्लीच्या ग्रेटर कैलाश येथील माला पहिल्यांदा विवाहानंतर विमानयात्रा करत होती. पती अंश व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट होता. त्याचा एक मित्रही पत्नीसहित त्यांच्याबरोबर होता. सर्व एका तिसऱ्या मित्राच्या लग्नाला जात होते. बेल्ट बांधण्याची सूचना झाली तर मालाने घाईत जवळच्या सीटचा बेल्ट उचलला आणि लावण्याचा प्रयत्न करू लागली. हे पाहून अंश हसू लागला, ‘‘अक्कल चरायला गेली आहे काय? एवढेपण कळत नाही.’’ हे बघून सर्व हसू लागले. तेव्हा मालाला खूप वाईट वाटले. मग ती म्हणाली, ‘‘तुम्हाला हसण्याऐवजी माझी मदत करायला हवी होती किंवा यांच्यासारखी श्रीमंत घरातील पत्नी आणयला हवी होती.’’ अंशला आपली चुक कळाली की त्याने असे बोलायला नको होते.

अशाचप्रकारे बरेली निवासी गीताचे भाऊ-वहिनी तिला भेटण्यासाठी आले. तेव्हा पती दिपक बाटलीनेच पाणी पित होता. त्याने गीताच्या भावालाही तीच पाण्याची बाटली ऑफर केली.

‘‘थांबा, मी ग्लास आणते. आमच्या येथे कोणी अडाण्यासारखे पाणी पित नाही,’’ गीता म्हणाली.

दिपकला तिचे म्हणणे खटकले. म्हणाला, ‘‘आणि आमच्या येथेही पतिशी असे कोणी बोलत नाही.’’

भावाने गीताला टोकले व विषय सांभाळला, नंतर दोघांनी एकमेकांना सॉरी म्हटले आणि दुसऱ्यांच्या समोर एकमेकांची टर न उडवण्याचे आणि दोष न काढायचे वचन दिले.

  1. जशी माझी सामाजिक बांधिलकी तशीच तुमचीही : दीपांकरची पत्नी जया लग्नाच्या आधीपासूनच फार सामाजिक होती. सर्वांच्या सुखदु:खात, सणासुदीच्या प्रसंगी सामील होत आली होती. ऑफिस असो किंवा शेजारी, नातेवाईक सगळयांशी मिळून-मिसळून राहायची. आणि अजूनही राहत आहे. दीपांकरही तिला सहकार्य करतो, त्यामुळे जयासुद्धा दीपांकरच्या सामजिक नातेबंधांची काळजी घेते.
  2. जशी मला काही स्पेस हवी तशीच तुम्हालाही : पारुलने सांगितले संपूर्ण दिवस तर ती पती रवीमागे हात धुवून लागत नाही. काही वेळ त्याला एकटे सोडते, जेणेकरून तो आपले काही काम करू शकेल. पतिसुद्धा या गोष्टीची काळजी घेतो की मला स्पेस मिळावी.दोघांमध्ये या गोष्टीवरून वाद होत नाही. दुसऱ्या दिवसाचा होमवर्कही सहज होतो. सोबत असल्यावर छान पटतं.
  3. जसे माझे काही सिक्रेट्स न सांगण्यासारखे, माझी इच्छा तशीच तुझीही : लग्नाच्या आधी काय झाले होते पतीबरोबर किंवा पत्नीबरोबर वा त्यांच्या घर-कुटुंबात. जर ही गोष्ट कोणी सांगू इच्छित नसेल तर ठीक आहे, खोदून-खोदून का विचारावे? शंकेत वा संभ्रमात राहणे व्यर्थ आहे. कॉलेजचे इंग्रजीचे प्रोफेसर डॉ. नगेंद्र आणि त्यांची हिंदीची प्रोफेसर पत्नी नीलमचे हेच मत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नात्याच्या वाढीसाठी हे आवश्यक आहे. वर्तमान बघावे, एकमेकांचा आत्मसन्मान टिकवून ठेवावा.
  4. पॉकेटमनीच्या खर्चावर अडवणूक नको : ‘‘आमच्या दोघांच्या छान जीवनाचा हाच तर सरळ फंडा आहे. घरखर्च आम्ही सहमतीने सारखा शेअर करतो आणि पॉकेटमनीवर एकमेकांना रोखत नाही,’’ स्टेट बँक कर्मचारी प्रिया आणि तिच्या असिस्टंट मॅनेजर पती करणने आपल्या गमतीशीर गोष्टीने अजून एक महत्वाचे वचनही सांगून टाकले. तर मग आता विलंब कशाचा. लग्नाच्या वेळेस ७ वचने घेतली होती, तर लग्नानंतरही पती-पत्नी दोघांनी ही वचनं आत्मसात करावी आणि प्रेमाने हे नाते निभवावे.
अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें