ब्लीच जे करेल चेहरा सुंदर

* प्रतिनिधी

सणउत्सवात तुम्हाला असं वाटतं का की तुमची त्वचा अशी ग्लो करावी की पाहणाऱ्यांनी तुम्हाला विचारल्याशिवाय राहूच नये की यामागचं रहस्य काय आहे. परंतु जर तुम्ही असा विचार करत असाल की असा ग्लो मिळविण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन तुमचं पाकीट रिकामे करावे लागणार आहे. तर तुम्हाला सांगावसं वाटतंय की तुमचं असा विचार करणं चुकीचं आहे. कारण आम्ही तुम्हाला सांगत आहोत एका अशा प्रॉडक्टबद्दल जे घरबसल्या मिनिटातच तुमच्या त्वचेला ग्लोईंग बनवून फेस्टिवलसाठी तुम्हाला तयार करेल.

फेम ब्लीच करेल चेहऱ्यावर मॅजिक

होय, आम्ही इथे फेशियल करण्याबद्दल बोलत नाही आहोत, तर फेम ब्लीचबद्दल बोलत आहोत. जे मिनिटात चेहऱ्याचा निस्तेजपणा दूर करून तुम्हाला चमकदार त्वचा देण्याचं काम करतं.

हे पूर्णपणे सेफ आणि परिणामकारक आहे. कारण हे अमोनिया फ्री आहे. हे मृत त्वचेला रिमूव्ह करून चेहऱ्यावरचा निस्तेजपणा दूर करून ती ब्राईट बनवण्याचं काम करतं. सोबतच नवीन पिगमेंटेशन सेल्स जनरेट होऊ देण्यापासून रोखतं. ते देखील काही मिनिटातच कोणत्याही त्रासाशिवाय.

खऱ्या सोन्यासारखा ग्लो

डाबर फेमचा स्पेशल गोल्डन ग्लो विथ २४ कॅरेट गोल्ड डस्ट ब्लीच देईल तुम्हाला अगदी खऱ्या सोन्यासारखी चमक, कारण यामध्ये आहे गोल्ड डस्ट, जे तुमच्या त्वचेला चमकविण्याचे काम करतं. तर मग या दिवाळीत तुमच्या किटमध्ये या ब्लीचचा नक्कीच समावेश करा.

चंद्रासारखा उजळ चेहरा

आज आपल्यासमोर वाईट आहार व हार्मोन्सचा संमतोल बिघडल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर अतिरिक्त केस येतात. जे तुमचं सौंदर्य कमी करण्याचं काम करतात. याबरोबरच यामुळे दुसऱ्यांच्या समोर जावसं वाटत नाही. कारण सामान्यपणे स्त्रियांच्या चेहऱ्यावर केस नसतात. परंतु फेम ब्लीच तुमच्या या त्रासात तुमच्यासोबतच आहे, म्हणून तर हे उत्पादन चेहऱ्यावर लावताच तुमच्या चेहऱ्यावरचे केस कलर होऊन हलके दिसू लागतात.

फायदे

इवन स्किन टोन : हायपर पिग्मेंटेशनमुळे तुमची त्वचा कुठून गडद किंवा कुठून थोडीशी वेगळी दिसू लागते. ज्यामुळे त्वचेचा रंग बदलून जातो. परंतु ब्लीचमुळे त्वचेला इवन टोन मिळाल्यामुळे त्वचा छान उजळते.

डाग कमी करते : तेलकट त्वचा असल्यामुळे त्वचेवर अॅक्नेची समस्या निर्माण होते. ज्यामुळे त्वचा कुरूप दिसते. अशावेळी ब्लिच मुरुमांच्या डागांना लाईट करण्याबरोबरच त्वचेला समान लुक देण्याचं काम करतं.

कसं कराल अप्लाय

ब्लीच अप्लाय करण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ करा. त्यानंतरच पॅकवर केलेल्या सूचनेनुसार तुमच्या क्रीममध्ये थोडसं अॅक्टिवेटर मिसळून ते व्यवस्थित मिक्स करण्याची गरज आहे. नंतर ते ब्रशच्या मदतीने चेहरा व मानेवर एक समान लावून १५ मिनिटांसाठी लावा. या दरम्यान तुम्हाला जर गरजेपेक्षा जास्त जळजळ होत असेल, तर ते त्वरित काढून टाका. नंतर १५ मिनिटानंतर ब्लिच कापसाच्या मदतीने काढून चेहऱ्यावर थंड पाण्याने धुवा. तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ करताच फरक दिसून येईल.

कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल

* ब्लीच केल्यानंतर कुठेही त्वरित बाहेर जाऊ नका. कारण युवी किरणांचा त्वचेवर वाईट परिणाम होतो.

* त्वचेला रिलॅक्स करण्यासाठी थंड पाण्याने चेहरा धुवा.

* कधीही ब्लीच मेटल कंटेनरमध्ये मिक्स करू नका. कारण मेटल केमिकलच्या संपर्कात आल्यामुळे त्वचेवर रिअॅक्शन होऊ शकते.

* रात्रीच्या वेळीच ब्लीच करण्याचा प्रयत्न करा. कारण तेव्हा युवी किरणांच्या संपर्कात येण्याची भीती नसते.

* जर त्वचेवर कोणत्याही प्रकारची अॅलर्जी येत असेल तर ब्लीच करू नका.

* ब्लीच करण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें