१७ अनोख्या स्टायलिंग टीप्स

– प्रतिनिधी

फेस्टिव्ह गेटटूगेदर असो किंवा कुटुंब किंवा मित्रांसोबत बाहेर जाण्याचा बेत, आपल्या रेग्युलर आऊटफिटलाच स्टाईल आणि या नव्या स्मार्ट टीप्स लक्षात ठेवून तुम्हीही फॅशनेबल बनवू शकता.

१. जर फुलस्लिव्ह कॅज्युअल शर्ट, टीशर्ट किंवा टॉप घालत असाल तर ते २-३ वेळा फोल्ड करून थ्री फोर्थ स्लिव्ह्ज बनवा. ही स्टाईल तुम्हाला फॅशनेबल लुक देईल.

२. शर्टस् आणि टिशर्टच्या स्लिव्हजप्रमाणेच जीन्स, जेगिंग्ज पॅन्ट अशा बॉटम वेअरलाही नेहमीप्रमाणे न वापरता व्यवस्थित फोल्ड करून सिंगल किंवा डबल कफ बनवून घ्या. त्यामुळे रेग्युलर बॉटम वेअरलाही तुम्ही फॅशनेबल लुक देवू शकता.

३. जर तुम्ही टॉप, टिशर्ट, शर्ट किंवा शॉर्ट वा लाँग ड्रेसवर जॅकेट घालणे तुम्हाला आवडत असेल तर पुढच्या वेळी जॅकेट घालण्याऐेवजी दोन्ही खांद्यावरून त्याच्या स्लिव्हज तशाच खाली सोडून द्या. जॅकेट कॅरी करण्याची ही पद्धत लोकांना आकर्षित करेल.

४. ह्यूज साइजसोबत स्मॉल साईजच्या आउटफीटचे कॉम्बीनेशनसुद्धा फॅशनेबल लुक देतात. जसे क्रॉप टॉपसोबत प्लाजो, शॉर्ट शर्टसोबत लेयर्ड स्कर्ट, शॉर्ट्ससोबत ओवरसाइज्ड टॉप, शॉर्ट ड्रेससोबत किंवा अँकल लेंथ जॅकेट किंवा मग श्रग.

५. फुल व्हाईट लुकसुद्धा तुम्हाला फॅशेनबल लुक देवू शकतो जसे की व्हाईट जीन्ससोबत व्हाईट शर्ट घाला. त्यासोबत व्हाईट फुटवेअर व व्हाईट हॅन्डबॅग कॅरी

करा. इतर अॅक्सेसरीज जसे की वॉच, इयररिंग्स, नेकपीस, कफ इ. मात्र रंगीत निवडा.

६. जर तुम्हाला फॅशनेबल दिसायचे असेल तर व्हाईटसोबत ब्लॅक, ग्रीनसोबत रेड असे कॉमन कॉम्बिनेशन घालण्याऐवजी अनकॉमन शेड ट्राय करा. जसे बेबी ब्ल्यूसोबत डीप यलो, ब्ल्यूसोबत इंडिगो, प्लमसोबत मस्टर्ड शेड, पर्पलसोबत रेड, डार्क ब्ल्यूसोबत सी ब्ल्यू, ऑरेंजसोबत यलो इ.

७. प्रिंटेड आऊटफिटसोबत सिंगर शेड वेअरचे कॉम्बिनेशसुद्धा तुम्हाला मिस ब्युटिफुलचा किताब मिळवून देऊ शकतो. जसे प्लेन व्हाइट टॉपसोबत प्रिंटेड स्कर्ट वापरा. प्रिंटेड पॅन्टसोबत प्लेन व्हाईट ऑफ व्हाईट किंवा यलो शर्ट, प्रिंटेड डे्रसवर सिंगल शेड जॅकेट इ.मात्र रंगीत निवडा.

८. डिफरन्ट आऊटफिटसोबत स्कार्फ, स्टोल आणि शाल हे कॉम्बिनेशनसुद्धा सुपर फॅशनेबल लुक मिळवून देते. जसे की वेस्टर्न टॉप किंवा टिशर्टसोबत स्कार्फ गळ्यात

घाला. इंडियन ट्यूनिक आणि कुर्तीसोबत स्टोल एका बाजूने खांद्यावर घ्या आणि साडीवर शाल दोन्ही बाजूंनी घ्या.

९. बेल्ट, नॉट आणि रिबिनसुद्धा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला स्टायलिश बनवू शकते. जसे स्किनी जीन्ससोबत थीन बेल्ट वापरा. शॉटर्स किंवा लाँग ब्रोच ड्रेसवर असणारा बेल्ट वापरा. स्कर्ट आणि फ्लाझोवर रिबिन बांधा. बेल्टचे शेड्स बोल्ड निवडा. हे तुमच्या पर्सनॅलिटीला हायलाइट करतील.

१०. आपल्या व्यक्तिमत्त्वानुसार फॅशनेबल टच देण्यासठी राऊंडेड हॅटसुद्धा जरूर बाळगा आणि जेव्हा तुम्ही आऊटडोर किंवा प्रवासासाठी बाहेर जाल, तेव्हा ती हॅट घाला. पण हॅट जेव्हा, घालाल तेव्हा केस मोकळे ठेवा आणि जास्त स्टायलिश लुकसाठी हॅट थोडी क्रॉस करून घाला.

११. तुमच्या केसांची स्टायलिंग आणि कटसुद्धा तुम्हाला फॅशनेबल बनवू शकतात. यासाठी स्टेप, लेअर किंवा फ्रंट बँग्स असणारा हेअर कट निवडा. मग केसांची पोनी,

मेस्सी बन बांधा. जर तुमची हेअर स्टाईल तुम्हाला जास्त काळ फॅशनेबल बनवायची असेल तर हेअर कलर करा किंवा स्टे्रट कर्ल करवून घ्या.

१२. आउटफिटशी मॅचिंग असणारे मोठ्या साईजचे कानातले, लाँग नेकपिस, स्टायलिश हँन्ड कफ, डल सिल्वर फिंगर रिंग, हँड हारनेस, हँड गिअरसारख्या ट्रेंडी अ‍ॅक्सेसरीज पैकी कुठल्याही एकाला आपली स्टाईल स्टेटमेंट बनवून तुम्ही फॅशनेबल दिसू शकता.

१३. हेअर अ‍ॅक्सेसरीज जसे हेअर बँन्ड, ह्यूज हेअर क्लिप, क्यूट बकल, स्मार्ट हेअरपिन, हेअर बोसुद्धा तुम्हाला फॅशनेबल लुक देण्यासाठी पुरेसे आहे. पण यांची निवड तुमचे आऊटफिट लक्षात घेऊनच करा.

१४. आऊटफिटची स्टायलिंग आणि अ‍ॅक्सेसरीज च नव्हे मेकअपच्या स्मार्ट ट्रीकसुद्धा तुम्हाला फॅशनेबल बनवू शकतात. जसे स्मोकी आयमेकअप, डस्की आयशॅडो, नॅचुरल शेड ब्लशऑन, ओठांवर लावलेली बोल्ड शेडची मॅट लिपस्टिक इ.

१५. वेगळ्या प्रकारच्या आकर्षक नेल आर्टसोबत लांब नखांवर लावलेली प्लेन ब्लॅक, व्हाईट, सिल्व्हर, गोल्डन किंवा बोल्ड शेड जसे की रेड, पिंक, ऑरेंज, ब्ल्यूमध्ये मॅट फिनिश नेलपॉलिशसुद्धा तुम्हाला फॅशन आयकॉन बनवू शकतात.

१६. फॅशनेबल लुकसाठी आऊटफिटला मॅच न करणारे फुटवेअर वापरा जसे जीन्ससोबत मोजडी, शॉर्ट्ससोबत ग्लॅडिएटर सॅन्डल, लेंगिग्जसोबत पेन्सिल हील सॅन्डल इ. मिस्ड मॅचचे हे कॉम्बिनेशन लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल.

१७. नेहमीच्या घड्याळांऐवजी तुम्ही मोठ्या आकाराचे स्पोर्टी, गोल्डन, सिल्व्हर, मेटल किंवा ज्वेल्ड वॉच वापरूनसुद्धा लोकांमध्ये सेंटर ऑफ अटॅ्रक्शन बनू शकता. जेंन्टस वॉचसुद्धा तुम्हाला वेगळा लुक मिळवून देईल.

पण लक्षात ठेवा की ड्रेसपेक्षा जास्त महत्त्वाचे हे आहे की तुम्ही तो कसा कॅरी केला आहे आणि कशा प्रकारच्या अ‍ॅक्सेसरीज निवडल्या आहेत. म्हणून फॅशनेबल स्टाईलसाठी अंगिकारण्यासाठी स्वत:ची फिगर, ड्रेसची निवड आणि मॅचिंगअ‍ॅक्सेसरीजकडे विशेष लक्ष ठेवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें