* मोनिका गुप्ता

ब्रा घालण्याचे आपले काही फायदे आहेत, परंतु यासाठी योग्य आकाराची ब्रा घालणे फार महत्वाचे आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की १० पैकी ८ स्त्रिया चुकीची ब्रा निवडतात. जर ब्रा शरीरात योग्य प्रकारे फिट नसेल तर ब्रेस्टचा आकार योग्य दिसत नाही आणि आपण कितीही स्टाईलिश कपडे परिधान केले तरीही ते आपल्यास चांगले दिसणार नाहीत.

ब्रेस्टच्या आकारानुसारच ब्रा घातली पाहिजे. बऱ्याच वेळा स्त्रिया एकतर मोठया आकाराची ब्रा परिधान करतात किंवा मग लहान आकाराची, ज्यामुळे ब्रेस्ट सैल होऊ लागतात आणि आकारातही बदल दिसू लागतो. बऱ्याच वेळा घट्ट ब्रा घातल्यामुळे त्वचेवर एलर्जीदेखील होऊ शकते.

योग्य ब्रा कशी निवडायची आणि ती परिधान करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे आपण समजू घेऊ :

ब्राचे योग्य माप

ब्राचे योग्य माप मिळविण्यासाठी इंचटेप वापरा. ब्राचा आकार मोजण्यासाठी बँड साईज आणि कप साईजचे माप मोजावे लागते.

बँड साईज मोजा

बँड साईज मोजण्यासाठी ब्रेस्टच्या खालून चारी बाजूची लांबी मोजा. हात खालच्या दिशेने असावेत हे लक्षात ठेवा. जर आपली बँड साईज ऑड क्रमांकामध्ये येत असेल तर त्यात १ जोडा. जर आपली बँड साईज २९ असेल तर त्यात १ जोडल्यावर त्यास ३० मानले जाईल, म्हणजे आपली बँड साईज ३० असेल.

कप साईज अशी मोजा

कप साईज मोजण्यासाठी इंचटेपला ब्रेस्टच्या मध्यभागी ठेवून मोजा. कप साईज नेहमी बँड साईजपेक्षा जास्त असेल. जर आपल्या कपची साईज ३२ असेल आणि आपल्या बँडची साईज ३० असेल तर यात २ इंचाचा फरक आहे. २ इंच म्हणजे बी कप, अर्थात आपल्या ब्राची साईज ३२ बी आहे. जर आपल्या कप साईज आणि बँड साईजमध्ये १ इंचाचा फरक असेल तर याचा अर्थ ए कप आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

बऱ्याच स्त्रिया आणि मुली प्रत्येक ड्रेससह कोणतीही साधी ब्रा घालतात. परंतु काही कपडयांसाठी विशेष ब्रा डिझाइन केल्या जातात. जर आपण त्या पोशाखांसह योग्य ब्रा घातली असेल तर आपण अधिक चांगले दिसाल.

कोणत्या पोशाखात कोणती ब्रा घालावी हे जाणून घेऊ :

पुशअप ब्रा : पुशअप ब्रा बहुधा त्या मुली आणि स्त्रिया घालणे पसंत करतात ज्यांचे ब्रेस्ट कमी असतात. बऱ्याचदा, जेव्हा टाईट कपडे परिधान करतात तेव्हा ब्राच्या लाईन ओळखल्या जातात. परंतु पुशअप ब्रामध्ये असे होत नाही.

स्पोर्ट्स ब्रा : ज्या मुली जिममध्ये जातात किंवा खेळात भाग घेतात त्यांनी त्यावेळी स्पोर्ट्स ब्रा वापरावी. ही संपूर्णपणे ब्रेस्ट व्यापते. अनेक मुली नाचताना किंवा जिममध्ये कसरत करतांना सामान्य ब्रा वापरतात. म्हणून मुलींनी क्रीडा प्रकारात स्पोर्ट्स ब्रा वापरली पाहिजे.

स्टिक ऑन ब्रा : स्टिक ऑन ब्रा शरीरास सहजपणे चिकटते. ही दोन कपांसह येते. तिला पट्टा नसतो. जर आपण बॅकलेस किंवा स्ट्रॅपलेस कपडे परिधान करत असाल तर ही ब्रा आपल्यासाठी योग्य आहे.

अंडरवायर ब्रा : अंडरवायर ब्रामध्ये एक पट्टी किंवा वायर असते, जी ब्राच्या आत असते. ही ब्रा घातल्यानंतर ही ब्रेस्टच्या खाली सेट होते, आपण ब्लाऊज आणि टॉपसह ब्रा घालू शकता.

मोल्डेड कप ब्रा : ही ब्रा एक गोल आणि सिमलेस शेप बनवते. ही परिधान केल्यावर कोणतीही लाइन दिसत नाही. ही ब्रा हायनेक आणि टी-शर्टसह परिधान करण्यास उत्तम आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...