* पारुल भटनागर
आमच्या मैत्रिणीने अतिशय गडद रंगाची नेलपॉलिश लावली, हे पाहून तुम्ही तिच्या हाताचे वेडे झाले आहात आणि काहीही विचार न करता तुम्हीही ती विकत घेण्याचे ठरवले. पण जेव्हा तुम्ही तुमच्या नखांवर ट्राय केला तेव्हा ना तुम्हाला कोणतीही प्रशंसा मिळाली आणि ना तुमच्या हातांची शोभा वाढली, जे पाहून तुमची निराशा झाली.
पण तुमच्यासोबत असं का झालं याचा तुम्ही विचार केला आहे का? याचे कारण म्हणजे ज्याप्रमाणे त्वचेचा टोन आणि त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन क्रीम्सची निवड केली जाते, अगदी तशीच नेल पॉलिशचीही निवड केली जाते. जेणेकरून ती तुमचे हात कुरूप न बनवता त्यांचे सौंदर्य वाढवण्याचे काम करेल. चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या प्रकारची नेलपॉलिश कोणत्या स्किन टोनवर चांगली दिसेल :
त्वचेचा टोन लक्षात ठेवा
* जर तुमची त्वचा पांढरी असेल आणि तुम्हाला खूप गडद शेड्स लावायचे असतील, तर गडद निळा, लाल, मार्जेन्टा, केशरी, रुबी शेड्स तुमच्या हातांवर खूप चांगले उठून दिसतील, कारण ते तुमचे हात अधिक उजळ बनवण्याचे काम करतात. तुम्ही पारदर्शक शेड्स वापरून पाहू नका, कारण ते तुमच्या त्वचेशी मिसळल्यामुळे तुमचे हात निस्तेज दाखवायचेच काम करतील.
* जर तुमचा त्वचेचा टोन डस्की म्हणजे सावळा असेल तर तुम्ही बहुतेक नेल पेंट्स वापरून पाहू शकता, कारण डस्की ब्युटीशी कुठली स्पर्धाच नाही. बहुतेक गोष्टी त्याच्यावर शोभून दिसतात. त्यावर गुलाबी, पिवळा, केशरी यांसारख्या तेजस्वी आणि चमकदार रंगांसह धातूचे रंग जसे गोल्ड आणि सिल्वर रंगदेखील छान दिसतात.
* जर तुमच्या त्वचेचा टोन गडद असेल आणि तुम्ही असा विचार करत असाल की कोणतीही नेलपॉलिश माझ्या नखांना शोभणार नाही, तर तुमचा हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे, कारण जर तुम्ही तुमच्या नखांवर डीप रेड, गुलाबी आणि निऑन रंग लावले तर हे रंग चांगले मिसळून तुमच्या त्वचेला व्हायब्रेन्ट लुक देण्याचे काम करतात.
नेल पॉलिश कसे लावायचे
तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार नेलपॉलिश निवडली असली तरी ती योग्य प्रकारे लावली नाही तर तुमची सगळी मेहनत वाया जाऊ शकते.
त्यामुळे जेव्हाही तुम्ही नेलपॉलिश लावाल तेव्हा सर्वप्रथम नखांना व्यवस्थित फाईल करा जेणेकरून नेलपॉलिश उठून दिसू शकेल. तसेच नेलपॉलिश नेहमी कोरडया नखांवरच लावा, कारण यामुळे ती निघण्याची भीती नसते, नेलपॉलिशचे फिनिशिंग नखांवर नेहमीच दिसून यावे, यासाठी तुम्ही प्रथम एकच कोट लावा. मग ते सुकल्यानंतरच दुसरा कोट लावा, नेल पेंट लावल्यानंतर क्यूटिकल ऑइल अवश्य वापरा, कारण ते नखे हायड्रेट ठेवते.
नेहमी बँडेड नेल पॉलिश खरेदी करा
त्वचेच्या टोननुसार नेलपॉलिश खरेदी करणे जितके आवश्यक आहे तितकेच बँडेड नेलपॉलिश खरेदी करणे देखील महत्त्वाचे आहे, कारण जरी तुम्हाला लोकल नेलपॉलिश स्वस्त दरात आणि वेगवेगळया रंगात उपलब्ध होत असल्या तरी त्या नखे कमकुवत बनवण्यासोबतच त्यांचा ओलावाही चोरतात. तसेच जास्त केमिकल्स असलेल्या नेलपॉलिश वापरल्याने नखे पिवळी होऊ लागतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही नेलपॉलिश खरेदी कराल तेव्हा नेहमी फक्त बँडेड खरेदी करा.