* पारूल टनागर

हायजीनचे नाव येताच आपल्या मनात स्वत:ला स्वच्छ ठेवण्याचा विचार सुरु होतो, कारण जर आपण स्वत:ला स्वच्छ ठेवले, तरच आपण स्वत:ला आजारांपासून दूर ठेवू शकतो. पण स्वच्छतेचा अर्थ केवळ वरकरणी स्वच्छतेशी नाही तर हेअर रिमूव्ह करण्याशीसुद्धा आहे, कारण हा त्वचेचा महत्वाचा भाग जो आहे.

पण आता लोक कोरोनाच्या भीतिने तडजोड करण्यास लाचार झाले आहेत. घरात राहून निश्चित झाले आहेत आणि असा विचार करून की आता तर घरातच राहायचे आहे, आता आपल्याला कोण पाहणार आहे आणि आता सलून सुरू झालेच आहेत तेव्हा एकदमच छान तयार होऊ या. पण तुमचा हा विचार अगदी चुकीचा आहे कारण सध्या बराच काळ सलूनमध्ये जाणे अतिशय धोकादायक असू शकते. म्हणून तुम्ही घरीच हेअर रिमुव्ह करून हायजिनकडे लक्ष देण्याची गरज आहे.

घरच्या घरी हेअर रिमुव्ह कसे करायचे

भले तुमच्या मनात येत असेल की सलूनसारखे घरी कसे होऊ शकेल? कारण सलूनमध्ये जाऊन शरीर स्वच्छ करूवून घेण्यासोबतच आपल्याला रिलॅक्स व्हायची संधीही मिळते, जी घरी मिळणे शक्य नसते. तुमची ही मानसिकता चुकीची आहे, कारण तुम्हाला भले घरात थोडी जास्त मेहनत करावी लागेल पण जेव्हा तुम्ही घरच्या घरी हेअर रिमुव्हचा पर्याय निवडता, तेव्हा तुम्ही आपल्या त्वचेसाठी उत्तम उत्पादनं वापरता, ज्यामुळे वेळोवेळी स्वत:च्या त्वचेच्या हायजीनकडे लक्ष देऊ शकता आणि त्वचेवर कोणतीही अॅलर्जी येण्याची भीती राहाणार नाही. याउलट पार्लरमध्ये असे नसते. तुमच्याकडून पैसे तर पूर्ण घेतले जातात आणि या गोष्टीची खात्रीसुद्धा देत नाही की उत्पादन ब्रँडेड आहे अथवा नाही. मग विलंब करू नका, आम्ही तुम्हाला सांगत आहोत सोपे उपाय, ज्यांचा अवलंब करून तुम्ही नको असेलल्या केसांपासून सुटका मिळवू शकाल.

हेअर रिमूव्हालं क्रीमच उत्तम असते

जर तुम्ही असा विचार करत असाल की हेअर रिमूव्हर क्रीम लावल्याने केस मुळापासून निघणार नाही तर हे फारच चूक आहे. कारण सध्या बाजारात असे हेअर रिमूव्हर क्रीम्स आले आहेत, जे मुळापासून केस नाहीसे करण्यास सक्षम असतात व दीर्घकाळ केस पुन्हा येत नाहीत. ही क्रीम्स व्हिटॅमीन ई, एलोवेरा आणि शिया बटर यासारख्या गुणांनी युक्त असल्याने ते त्वचेला अनेक फायदे देतात.

रेडी टू यूज वॅक्स स्ट्रीप्स

तुम्ही पार्लरमध्ये वॅक्स लावल्यावर स्ट्रिपने हेअर रिमुव्ह करताना पाहिले असेलच. पण तुम्ही कधी विचार केला का की आता रेडी टू यूज वॅक्स स्ट्रीप्सच्या सहाय्याने अगदी सहज घरबसल्या नकोसे केस काढू शकता. यासाठी तुम्हाला केवळ स्ट्रीप केसांच्या दिशेने लावायची असते आणि मग त्याच्या उलटया दिशेने ओढून सहज तुमच्या केसांना काढू शकता. विश्वास ठेवा की याने तुम्हाला अगदी पार्लरप्रमाणे फिनिशिंग मिळते आणि महिनाभर तुम्हाला केस काढायची गरज भासत नाही.

शॉवर हेअर रिमूव्हल क्रीम

आत्तापर्यंत तुम्ही असा विचार करून घरी केस काढणे टाळत असाल की कोण इतका वेळ बसून केस काढत बसेल. पण या समस्येचे उत्तर आहे शॉवर हेअर रिमूव्हल क्रीम, जे बाजारात सहज उपलब्ध होते आणि तुमच्या त्वचेला मुलायम आणि स्वच्छ बनवते. बस्स तुम्हाला एवढेच करायचे आहे की तुम्ही अंघोळ करायला जाण्याच्या २ मिनिट आधी ज्या भागातील केस तुम्हाला काढायचे आहेत, त्या भागावर क्रीम लावा आणि २ मिनिटांनी स्नान करा. थोडया वेळातच तुम्हाला स्वच्छ त्वचा आढळेल, तीही अगदी सोप्या पद्धतीने. याद्वारे तुम्ही तुमच्या खाजगी अवयवांची खास काळजी घेऊ शकाल.

नो स्ट्रीप्स वॅक्स

वाढ कितीही कमी का असेना १-२ महिन्यात केस दिसू लागतातच. विशेषत: फोरहेड, अप्पर लीप, बिकिनी एरिया अंडर आर्म्सवर आणि हे तुम्ही पार्लरमध्ये जाऊन काढून येत असाल. पण आता नो स्ट्रीप्स वॅक्सने तुमच्या मर्जीप्रमाणे केस नाहीसे करून व्यवस्थित दिसू शकता. तुम्ही याद्वारे अगदी सहज तुमच्या आयब्रोजचे केस काढून अचूक आकार देऊ शकता. याचे वैशिष्टय हे आहे की यासाठी तुम्हाला कोणत्या स्ट्रीपची आवश्यकता नाही उलट वॅक्स छोटया छोटया भागांवर लावून हलक्या हाताने काढा. यामुळे केस मुळापासून तर निघतातच शिवाय त्वचा भाजण्याची भीती राहात नाही.

बीन्स वॅक्स

याचे परिणाम उत्तम असतात तसेच कॅरी करायलासुद्धा फार सोपे असते. वास्तविक पाहता बीन्स वॅक्स बारीक बारीक दाण्यांच्या रूपात असते. जेव्हा केव्हा लावायचे असेल तेव्हा हे दाणे हिटरमध्ये टाकून गरम करून घ्या व ज्या भागावर लावायचे तिथे स्पॅटूलाच्या सहाय्याने लावा. जर तुमच्याकडे हिटर नसेल तरीही तुम्ही हे एखाद्या भांडयात गरम करू शकता. हे लावायला फार सोपे असते आणि याचे परिणामसुद्धा एवढे छान असतात की तुमची नेहमी हेच वापरायची इच्छा होईल आणि तुम्ही पार्लरमध्ये जाणे विसरून जाल. तर मग हेअर रिमूव्हलचे इतके सगळे पर्याय आहेत तर मग त्वचेच्या हायजीनशी तडजोड कशाला?

का आवश्यक आहे त्वचेचे हायजीन

त्वचेवरील नकोसे केस कोणाला आवडतात, हे न केवळ आपल्या सौंदर्याला कमी करतात तर यामुळे आपल्या आवडीचे स्टायलिश व सेक्सी कपडेसुद्धा वापरू     शकत नाही. हे आपल्या लुकलासुद्धा खराब करतात आणि यामुळे आपल्याला   अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. असेही आढळले आहे        की पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया त्वचेच्या हायजीनकडे जास्त लक्ष देतात, जे   आवश्यकही आहे.

वास्तविक आपण जेव्हा केसांची वाढ  होऊ देतो, तेव्हा इन्फेक्शनची शक्यता      अनेक पटीने वाढते. कारण खाजगी अवयवांची गोष्ट असो वा काखेची, नेहमी झाकलेले असल्याने यात घाम जमा होतो जो फंगल इन्फेक्शनचे कारण बनतो. आणि जर आपण दीर्घ काळ हे स्वच्छ केले नाही तर खाज, गजकर्ण यासारख्या समस्या उद्भवू शकतात ज्या पुढे गंभीर बनू शकतात. म्हणून तुम्ही तुमच्या त्वचेच्या हायजीनकडे विशेष लक्ष देऊन आपले सौंदर्य सदाबहार राखून ठेवा.

याकडे दुर्लक्ष करू नका

* कोणतेही उत्पादन खरेदी करताना त्याची एक्सपायरी अवश्य तपासा.

* स्थानिक उत्पादन खरेदी करताना सावध राहा.

* घाईत एखादे उत्पादन लावू नका. १५ ते २० दिवसानंतर ते परत त्वचेवर लावा.

* क्रीम वा वॅक्सच्या टेस्टिंगसाठी ते त्वचेच्या लहानशा भागात लावून पहा, जर कोणत्याही प्रकारची रिअॅक्शन झाली नाही तर मग सर्व ठिकाणी लावा.

* जर पुरळ वा खाज वा कोणत्याही प्रकारची एलर्जी आली तर ते हेअर रिमूव्हल प्रोडक्ट वापरू नका.

* वॅक्सिंगनंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

* वॅक्सिंगनंतर साधारण ४-५ तास उन्हात जाऊ नका, जर जावेच लागले तर स्वत:ला झाकून घ्या.

* वॅक्स नेहमी केसाच्या दिशेने लावल्यावर उलटया दिशेने ओढायचे असते.

* जर क्रीम अथवा वॅक्समुळे त्वचा हलकी लाल झाली तर त्यावर बर्फ लावा.

अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या अतिशय थोडया वेळात मुलायम आणि स्वच्छ त्वचा मिळवू शकता. तेही आपल्या बजेटमध्ये सोप्या पद्धती आणि टिप्स सहीत.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...