* सुमन बाजपेयी
एखादी कंपनी चालवणे म्हणजे लग्न मॅनेज करण्यासारखे असू शकते. ऐकायला हे विचित्र वाटेल. पण जर आपण विचार केला तर दोघांमध्ये साम्य दिसून येईल. तर मग आपला व्यवसाय किंवा व्यावसायिक लाईफसारखे वैवाहिक जीवन मॅनेज करण्यात काय हरकत आहे?
जसे की आपण एखादा व्यवसाय चालविण्यासाठी अर्थसंकल्प तयार करता, लोकांना कामे सोपवता, त्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करता, बक्षिसे देता. तशाच प्रकारे वैवाहिक जीवनातही बजेट तयार करावे लागते, एकमेकांना कामे दिली जातात, जबाबदाऱ्या वाटून दिल्या जातात, जोडीदारास प्रोत्साहन दिले जाते, वेळोवेळी प्रेम व्यक्त करण्यासाठी भेटवस्तू देऊन हे दाखविले जाते तो/ती त्याच्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे.
वाढत्या व्यवसायासारखा याचा विचार करा
कोणालाही त्याच्या विवाहित जीवनाची तुलना व्यवसायाशी करणे आवडत नाही. असे केल्याने, संबंधातून प्रेमाचा अंत होऊ लागतो. पण लग्नातदेखील अपेक्षा आणि मर्यादा कंपनीसारख्याच असतात. आर्थिक जबाबदाऱ्या, आरोग्यविषयक लाभ आणि नफा मार्जिन हे वैवाहिक नात्यातही पाहिले जाऊ शकते. जर आपण आपले नातेसंबंध एका वाढत्या व्यवसायाप्रमाणे बघत असाल, ज्यात भविष्यातील योजना असतात, तर आपले वैवाहिक जीवन देखील ग्रो करू शकते.
आपल्याला भावनिक संसाधने तयार करण्यासाठी, आर्थिक स्थिरता वाढविण्यासाठी आणि अनपेक्षित परिस्थितींचा सामना करण्यासाठी वैकल्पिक योजना बनवण्यास वेळ हवा असतो. हीच गोष्ट व्यवसायावरदेखील लागू होते, ज्यामध्ये केवळ योग्य रितीने डिझाइन केलेल्या योजना लक्ष्य गाठायला मदत करतात.
भागीदारी करार आहे
सरळ शब्दात सांगायचे तर, लग्न जणू एका प्रकारची भागीदारी आहे असे समजा, जी तुम्हाला यशस्वी करायची आहे. विवाह समुपदेशक दिव्या राणा म्हणते की ध्येय ठेवा आणि ते एका टीमप्रमाणे पूर्ण करण्यास सहमती दर्शवा. लक्षात ठेवा की सर्वात यशस्वी भागीदारी प्रत्येक भागीदाराची सर्वोत्तम आणि अद्वितीय वैशिष्ट्ये वापरते. तुमच्यातील एक जण आर्थिक व्यवहार हाताळण्यात तज्ज्ञ असू शकतो तर दुसरा योजना आखण्यात. आपण एकमेकांच्या या वैशिष्ट्यांचा तसाच आदर केला पाहिजे ज्याप्रमाणे व्यवसायातील भागीदार आपापसात करतात.
मानसशास्त्रज्ञ अनुराधा सिंह यांचा असा विश्वास आहे की आपले वैवाहिक जीवन एखाद्या खासगी कंपनीसारखे चांगल्या संप्रेषणासह चालविणे आणि ते यशस्वी करण्याची इच्छा ठेवणे खूप महत्वाचे आहे. एक चांगला व्यावसायिक आपल्या कर्मचाऱ्याचा सन्मान करतो आणि त्याची काळजी घेतो, म्हणूनच कर्मचारी त्याचा आदर करतात आणि अपेक्षेपेक्षा जास्त काम करतात.
कामाची नैतिकता महत्त्वपूर्ण आहे
भले तो व्यवसाय असो की लग्न, दोघेही कार्य नीतिवर चालत असतात. दोघांमध्येही गुंतवणूक करावी लागते. आपण आपले पोर्टफोलिओ ज्या पद्धतीने व्यवस्थापित करता त्याच प्रकारे लग्नामध्येदेखील आपल्याला आपल्या संबंधांचे पोर्टफोलिओ व्यवस्थापित आणि अद्ययावत करावे लागत असतात.
जर आपण आपल्या आवडत्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करू शकत असाल तर समान वैचारिक नीति आपल्या लग्नाला लागू होत नाही का? गोष्ट आश्चर्यकारक वाटू शकते, परंतु आपण आपल्या कारकीर्दीत जे यश आणि कौशल्य प्राप्त केले आहे तेच वैवाहिक जीवनात हस्तांतरित करा. त्यानंतर आपण ज्याप्रकारे आपली कंपनी उभी केली त्याचप्रकारे आपण एक मजबूत कुटुंब तयार करण्यास सक्षम असाल.
अहंकार दूर ठेवा
विवाह असो किंवा व्यवसाय, दोहोंमध्ये जर अहंकार डोके वर काढू लागला तर व्यवसाय कोसळतो आणि विवाहामध्ये संघर्ष किंवा विभक्तता येते. म्हणूनच असे मानले जाते की योग्यरित्या चालविला जाणारा व्यवसाय योग्यरित्या चालणाऱ्या लग्नासारखाच आहे. दोघेही त्यांच्या खेळाडूंचा अहंकार वाढू देत नाहीत.
अहंकार हा एक असा आवेग आहे, जो दाम्पत्याला त्यांच्या स्वार्थातून बाहेर येण्यास आणि एकमेकांप्रति पूर्णपणे समर्पित होण्यास प्रतिबंधित करतो, भले ते जोडपे एकमेकांना खूप प्रेम आणि आदर देण्याची इच्छा ठेवत असेल तरी. याचप्रमाणे, व्यवसाय अपयशी होण्याचे मुख्य कारण म्हणजे अहंकारच असतो, कारण मालकास तो त्याच्या अधीनस्थांशी योग्य वागणूक देण्यात किंवा त्यांच्या समस्या समजून घेण्यापासून प्रतिबंधित करतो.
वचनबद्धता महत्वाची आहे
विवाह असो किंवा व्यवसाय, दोन्ही ठिकाणी सहकार्य आवश्यक आहे. जर दोन्ही ठिकाणी कोणतीही तडजोड झाली नाही तर अयशस्वी होण्यास जास्त वेळ लागत नाही. तडजोडीबरोबरच संवाद हा एक असा आधार आहे, जो दोघांनाही यशस्वी बनवतो.
एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी दोघांनीही स्वत:ला सुधारण्यावर लक्ष्य केंद्र्रित केले पाहिजे. संवादाव्यतिरिक्त, लग्न निभवण्यासाठी वचनबद्धतादेखील आवश्यक घटक आहे, अगदी तसेच जसे ते व्यवसाय चालविण्यासाठी आवश्यक असते. जिथे कोणतीही वचनबद्धता नसते तेथे जोडप्यांमध्ये ना विश्वास असेल, ना समर्पणाची भावना आणि ना जबाबदारीची जाणीवही.
त्याचप्रमाणे, जर व्यवसायात कोणतीही वचनबद्धता नसेल तर बॉस त्याबद्दल चिंता करणार नाही, किंवा त्यात सुधारणा करण्यासाठी कठोर परिश्रम करणार नाही. अशा परिस्थितीत हा व्यवसाय जास्त काळ टिकू शकणार नाही. तशाच प्रकारे वैवाहिक जीवनही याच्या अभावाने एका जागी येऊन थांबेल आणि पती-पत्नी दोघांसाठीही एकमेकांची साथ ही कोणत्याही शिक्षेपेक्षा कमी असणार नाही.