* अमी साता, फाऊंडर, अमोव

सणांचा काळ अनेक आनंद घेऊन येतो. सणासुदीच्या दिवसात आपण नेहमीच घरातील नव्या वस्तू घेण्यासाठी इतके व्यस्त होतो की आपण हे लक्षातच घेत नाही की आपल्या आरोग्यासाठी हे हानिकारक आहे. म्हणून तुमचे घर ऑर्गेनिक बनवण्यासाठी हे १० उपाय सांगत आहोत :

लाकडाचा वापर मन आणि मेंदू दोन्ही बदलण्याची क्षमता ठेवतो : लाकूड एकमात्र अशी सामुग्री आहे, ज्यामुळे घराची चमक अनेक पटींनी वाढवता येते. यामुळे केवळ घराचे अंतर्गत सौंदर्य वाढते इतकेच नाहीतर यामुळे घराला नैसर्गिक टचसुद्धा मिळतो. फरशीपासून ते छताच्या बीमपासून लाकडाने घर सजवता येते. जुन्या इमारतीमध्ये लाकडाचा वापर करून ती अनेक वर्षांसाठी उपयोगी बनवली जाऊ शकते.

झाडे आणि रोपे : घरात असलेली झाडे आपल्याला नेहमी ही जाणीव करून देतात की हरित तसेच स्वच्छ वातावरणाची सुरूवात घरापासूनच होते. हे अत्यंत आकर्षक दिसतात इतकेच नाही तर आसपासची हवा ही शुद्ध करतात व आपल्याला रिलॅक्स करतात. रोपे तणाव आणि आराम मिळवून देण्यासाठी तसेच चांगली झोप यावी म्हणून मदत करतात. घरात ठेवण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय एलोवेरा, लवेंडर, जॅसमिन व स्नेक प्लांट आहे.

विंडो ब्लाइंड्स : जेव्हा तुम्हाला झोयचे असेल किंवा आराम करायचा असेल तेव्हा खोलीत अंधार असण्याची गरज असते. यासाठी बांबू किंवा जूटपासून बनवलेल्या नैसर्गिक ब्लाइंड्स किंवा शेड्स निवडा. तुमचे पडदे ऑर्गेनिक कॉटन, हॅप किंवा लिनेनचे असावेत. आकर्षक रंग आणि डिझाइन निवडून तुम्ही बेडरूमला नवा लुक देऊ शकता.

फर्निचर : फर्निचरची योग्य निवड तुमच्या खोलीसाठी खुप महत्त्वाची आहे. कारण ही अशी जागा असते, जिथे तुम्ही अधिक काळ व्यतित करता. फर्निचर असे निवडा जे वातावरणाला अनुकूल असेल आणि नैसर्गिक लाकूड वा वांळूने बनलेले असेल तसेच मजबूत लाकूड किंवा बांबूचे बनलेले असावे. जर तुम्ही पेंट केलेले किंवा स्डेंड फर्निचर निवडत असाल तर लक्षात ठेवा, त्यात वीओसीरहीत पेंटचा वापर केलेला असावा.

चादरी : तुम्हाला हे माहीत आहे का की कॉटनच्या ज्या चादरींवर तुम्ही तुमच्या जीवनाचा एकतृतियांश भाग व्यतित करता त्या रसायनांनी बनलेल्या असतात. कॉटनच्या चादरींमध्ये फॉर्मेल्डिहाइड आणि कॅन्सर निर्माण करणारे घटक असतात. हे रसायन अनिद्रा, शिंका, छातीमध्ये घरघर आणि श्वासाच्या समस्यांचं कारण बनू शकतात. त्यामुळे कॉटनच्या बनलेल्या ऑर्गेनिक चादरीच खरेदी करा. या खूप मुलायम असून अत्यंत आरामदायक असतात.

सोबतच गाद्याही अशा निवडा ज्या नैसर्गिक लेटेक्सच्या बनलेल्या असतात. मैमोरी फोम आणि अशाच इतर पेट्रो रसायनांमुळे झोपेमध्ये बाधा निर्माण होते. इतकेच नाही तर आरोग्य आणि पर्यावरणासाठीही हानिकारक असतात.

फूले : तुम्हाला ते दिवस आठवतात, जेव्हा हिरवळ म्हणून लोक कृत्रिम झाडे घरात ठेवत असत आणि जे धुळीच्या थरांनी माखलेले असत. आता पुन्हा एकदा लोक निसर्गाच्या दिशेने वळू लागले आहेत. घराच्या अंतर्गत सजावटीत नैसर्गिक फुले त्यांची जागा निर्माण करत आहेत. ही फूले डायनिंग टेबल, कॉफी व साईड टेबलला एक वेगळाच नैसर्गिक लुक देतात.

रंग : घराच्या भिंतीचा रंग बदलणे हा घराला नवीन लुक देण्याचा सोपा मार्ग आहे. रंगाची निवड करताना वीओसीरहित रंग निवडा, ज्यात हानिकारक रसायनांचा वापर केलेला नसतो. हे निश्चित करा की पेटिंग केलेली खोली हवेशीर असावी आणि पेटिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर पेंट व्यवस्थित स्टोर करावा.

प्रकाश योजना : एलईडी लाईट सामान्य बल्बच्या तुलनेत अनेक पटींनी प्रभावी असते. त्यामुळे तुमच्या जुन्या बल्बच्या जागी एलईडी लाईट्सने प्रकाश वाढवा. उर्जेचीही बचत होईल.

कारपेट : जर थंडीने त्रासले असाल आणि खोलीत गरम वातावरण हवे असेल तर फरशी गालिचाने झुकावी. फरशीवर असणाऱ्या गालिच्यामुळे उष्णता बाहेर जात नाही व खोली उबदार राहते. गालिचे अनेक रंगात आणि डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत.

इकोफ्रेन्डली मेणबत्ती : मेणबत्ती बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पॅरफिनचा वापर केला जातो. पॅराफिन एक पेट्रोलियम वॅक्स आहे, जे नैसर्गिक नाही. हे पर्यावरणासाठी अनुकूल नाही.

मेणबत्ती बनवण्यासाठी इकोफ्रेन्डली पद्धत आहे. ती म्हणजे ग्रीन कॅन्डल वॅक्सची निवड. बी वॅक्स १०० टक्के नैसर्गिक आहे. यामध्ये कुठलेही हानिकारक रसायन नाही. तुम्ही हे वितळवल्याशिवाय मेणबत्ती बनवू शकता. बी वॅक्स शीट्स सोपा आणि पर्यावरणाला अनुकूल असा पर्याय आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...