* अविनाश रॉय
हिंडण्या-फिरण्याचे शौकीन लोक नेहमी काही ना काही नवीन शोधत असतात. त्यांना फिरण्याव्यतिरिक्त अशा गोष्टी बघायचा छंद असतो, ज्यात रोमांच असेल. अनेकदा या गोष्टी लोकांच्या आवाक्याबाहेरील असतात, पण तरीही त्यांना अशी नवीन माहिती घ्यायला खूप आवडते. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जिथे लोक चक्क समुद्रात विश्रांती घेतात शिवाय मौजमजेने आपल्या सुट्ट्या व्यतित करतात. मालदीवमध्ये तुम्ही या हॉटेलमध्ये राहायची मजा घेऊ शकता. हे हॉटेल कॉनरेड मालदीव्स रंगाली आयर्लेंड नावाने प्रसिद्ध आहे. यात बेडरूम पाण्याच्या खाली असतं. हे पाण्यात १६.४ फूट खोल बनवलं गेलं आहे. याचं स्ट्रक्चर स्टील, कॉक्रीट आणि एक्रिलिकचं आहे. याला दोन मजले असतील. एक पाण्यावर आणि एक पाण्याखाली.
या सूईटमध्ये एकत्र एकूण ९ लोक राहू शकतात. इथे लोकांना एका प्रायेव्हेट सीप्लेनने नेलं जाईल. यानंतर त्यांना स्पीडबोटमधून विला येथे नेलं जाईल. इथे पाहुण्यांना पूर्ण वेळेसाठी ४ बटलर, एक शेफ, एक जेट स्की सेट आणि एक फिटनेस ट्रेनर दिला जाईल.
त्याचबरोबर पाहुण्यांना दररोज ९० मिनिटांसाठी स्पा ट्रीटमेंट दिली जाईल. इथे एक रात्र घालवण्यासाठी ५० हजार डॉलर म्हणजे जवळजवळ ३२ लाख, ८८ हजार रुपये खर्च करावे लागतील.
तुम्हालादेखील मालदीव फिरायची संधी मिळाली तर तुम्ही इथे नक्की फिरून या. हा तुमच्यासाठी नवीन अनुभव असेल.
स्कूबा डायविंगसाठी परफेक्ट डेस्टिनेशन
मालदीवमध्ये चारही बाजूला नजर फिरवल्यावर पाणीच पाणी दिसतं. त्यामुळे इथे तुम्ही वॉटर एडवेंचरचा आनंद घेऊ शकता किंवा आरामात आपल्या कॉटेजमध्ये आराम करू शकता. मालदीवच्या जवळपास प्रत्येक रिसॉर्टमध्ये स्कूबा डायविंगची व्यवस्था आहे. इथे शिकणाऱ्यांसाठी येथे डायविंग स्कूल आणि कोर्सही आहे. प्रत्येक रिसॉर्टजवळ बेटाखाली आपली एक समुद्री भिंत (रीफ) असते, त्यामुळे मोठ्या लाटा किंवा हवेच्या दरम्यान ड्रायव्हिंगमध्ये कोणतीही अडचण येत नाही.
४ लाख लोकसंख्या असलेल्या देशात १२ लाख टूरिस्ट
मालदीव ३६ मुंगा प्रवाळद्वीप आणि १,१९२ लहान-लहान आयलँडचा मिळून तयार झालेला देश आहे. एका आयलँडवरून दुसऱ्या आयलँडवर जाण्यासाठी मुख्यत्त्वे फेरीचा वापर केला जातो. देशातील इकोनॉमीमध्ये टूरिज्म महत्त्वपूर्ण हिस्सा आहे.
अंडरवॉटर फोटोग्राफीची मजा
मालदीव अंडरवॉटर फोटोग्राफीसाठीही जगातील सर्वोत्कृष्ट ठिकाणांपैकी एक आहे. कोरल रीफ आणि माश्यांच्या इतक्या जाती कदाचितच अन्य कुठे असतील. राहिला प्रश्न कॅमेऱ्याचा तर इथल्या डायविंग स्कूलमध्ये अंडररवॉटर कॅमेरेही भाड्याने मिळतात.
पाणबुडी (सबमरिन)चा आनंद इथे मिळेल
समुद्राच्या आत खोलवर उतरून समुद्राच्या आतील दुनिया पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. मालदीवच्या आकर्षणात जर्मन पानबुडीमुळे भर पडली आहे, ज्यामुळे प्रत्येकाला पाण्याखालील जग दिसतं.
जगभरातील व्हेल व डॉल्फिनच्या २० प्रजाती
आता ही गोष्ट खूप कमीच लोकांना ठाऊक आहे की मालदीवची गणना जगातील ५ सर्वश्रेष्ठ ठिकाणांपैकी एक म्हणून होते ती तेथील व्हेल व डॉल्फिनच्या अस्तित्त्वामुळे. या दोन्ही माशांच्या वीस प्रजाती मालदीवच्या समुद्रात आढळतात. यात महाकाय ब्लू व्हेलपासून ते अतिशय लहान परंतु कलंदर स्पिनर डॉल्फिनपर्यंत सर्वांचा समावेश आहे.
कसं पोहोचाल
मालदीवची राजधानी मालेसाठी केरळातील तिरूवनंतपुरममधून फ्लाईट आहे. दिल्लीहून कोलंबोद्वारे काही फ्लाईट मालेसाठी सुरू झाल्या आहेत. काही आंतरराष्ट्रीय फ्लाईट मुंबईतून माले येथे जातात. भाडंही खूप जास्त नाहीए. तिरूवनंतपुरमहून माले येथे एका व्यक्तीचे इकोनॉमी क्लासचे रिटर्न भाडे जवळजवळ साडे आठ हजार रूपये आहे. या फ्लाईटला केवळ ४० मिनिटांचा अवधी लागतो.