* सोमा घोष
पावसाच्या आगमनामुळे जितके आल्हादायक वाटते, तितक्याच समस्याही आपल्यापुढे निर्माण होत असतात. पावसाळी दिवसात तुम्ही घरी असा, ऑफिसमध्ये किंवा कुठे बाहेर असा पण सगळीकडेच तुम्हाला दमटपणा जाणवतो. याचा सर्वाधिक परिणाम त्वचेवर होतो. म्हणून पावसाळ्यात त्वचेची काळजी सर्वात जास्त घ्यावी लागते. त्वचेला कधीकधी फंगल इन्फेक्शनसुद्धा होते. जर काळजी घेतली तर हे दूर ठेवता येईल ही मुंबईतील ‘द कॉस्मेटिक सर्जरी’ इंस्ट्रीस्ट्यूटच्या डर्मेटोलॉजिस्ट डॉ. सोमा सरकार म्हणतात की पावसाळ्यात त्वचेसंबंधी समस्या तसेच फंगल इन्फेक्शन अधिक असतं, कारण त्वचेत ओलावा अधिक काळ राहतो. या सर्वांपासून बचाव करण्यासाठी कोमट पाण्याने स्नान करणे आणि अॅटीफंगल क्रिम, साबण आणि पावडरचा उपयोग करणे गरजेचे असते. पण खालील टीप्स जास्त उपयोगी ठरतील.
* त्वचा तीन ते चारवेळा दर्जेदार फेशवॉशने धुवा.
* अॅण्टीबॅक्टेरियल टोनरचा प्रयोग या दिवसात करणे अधिक फायदेशीर ठरते. यामुळे त्वचेला काही संसर्ग होत नाही व त्वचा फाटत नाही.
* पावसाळ्यात बऱ्याचदा सनस्क्रिन लावणे टाळले जाते. पण या दिवसातही अतिनिल किरणे आपल्यापर्यंत पोहोचतातच.
* या मोसमात लोक पाणी कमी पितात. यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते. नियमितपणे ७ ते ८ ग्लास पाणी जरूर प्यावे.
* चांगल्या स्क्रिन स्क्रबरने रोज चेहरा स्वच्छ करावा.
* पावसाळ्यात कधी हेवी मेकअप करू नये.
* आहारात ज्यूस, सूप जास्त प्रमाणात घ्यावे, कुठलीही भाजी शिजवण्याआधी स्वच्छ धुवून घ्यावी. शक्य झाल्यास कोमट पाण्याने धुवावी.
* जेव्हा तुम्ही बाहेरून घरी याल, तेव्हा कोमट पाण्याने साबण लावून हातपाय स्वच्छ धुवून व्यवस्थित कोरडे करावेत व त्यानंतर मॉइश्चरायजर लावावे.
या मोसमात पायांची विशेष काळजी घ्यावी लागते. ओलावा आणि जास्त वेळ गोळे राहिल्याने पायांना फंगल इन्फेक्शन जास्त होण्याची शक्यता असते. या मोसमात बंद आणि ओले बूट घालू नयेत, तर तुमचे बूट भिजले असतील तर ते काढून सुकवण्याचा प्रयत्न करावा. याबरोबरच पेडिक्योरही करवून घ्यावे.
विशेषत: केसांची काळजी मान्सूनमध्ये घ्यावी लागते. यावेळी केस अनेकदा घामाबरोबर पावसानेही ओले होतात. म्हणून आठवड्यातून २ ते ३ वेळा शाम्पू करावा. सोबतच कंडिशनर लावणे विसरू नये. याशिवाय केस जर पावसाने ओसे झाले असतील तर टॉवेलने व्यवस्थित सुकवावेत. आठवड्यातून एक दिवस केसांना तेल लावावे.
यापुढे डॉ. सोमा सरकार सांगतात की मान्सूनमध्ये कधीही घट्ट कपडे घालू नयेत. नायलॉन कपड्यांऐवजी सुती कपडे वापरावेत. तसेच यादरम्यान दागिने कमीत कमी वापरावेत म्हणजे तुमच्या त्वचेला मोकळा श्वास घेता येईल.
मान्सूनसाठी काही घरगुती पॅक आहेत जे तुम्ही वेळोवेळी लावू शकता :
* डाळींब दाणे अॅण्टीऐजिंगचे काम करतात व व्हिटामिन सी ने युक्त असल्याने हे कोरड्या त्वचेसाठी लाभदायक असतात. वाटलेले अनारदाणे २ चमचे, १ कप ओटमील एका वाटीत घेऊन त्यात २ मोठे चमचे मध व थोडे दही मिसळून पेस्ट बनवा व चेहऱ्यावर १० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.
* एक सफरचंद कुस्करून त्यात १-१ चमचा साखर व दूध मिसळावं. व्यवस्थित मिसळून त्यात काही थेंब कॅमोमिल मिसळावं. याचा फेसपॅक बनवून १५ मिनिटे चेहऱ्यावर लावावा. नंतर चेहरा स्वच्छ धुवावा. चेहऱ्याचा डलनेस कमी होईल.