* पूजा भारद्वाज

पादत्राणे ऋतूनुसार बदलायला हवीत. हीच गोष्ट लक्षात घेत आम्ही तुम्हाला मान्सूनमधील पादत्राणांच्या फॅशनबाबत सांगत आहोत.

हो जर हिवाळा आणि उन्हाळ्यात फॅशनमध्ये बदल घडतो तर पावसाळयात का नाही? मान्सून काळात बाजारात फॅशनचे हजारो पर्याय मिळतील, जे तुमच्या फॅशनची शोभा वाढवतील.

फुटवेअर डिझायनर रेखा कपूर यांचे असे मत आहे की बाजार रंगीत फ्लिप फ्लॉप, फ्लोटर्स, रेन बूट्स आणि प्लास्टिक चप्पल्सने खचाखच भरला आहे. हे सर्व लाल, निळ्या, पिवळ्या, हिरव्या सर्व रंगात उपलब्ध आहेत. याशिवाय फ्लॉवर  प्रिंट्स  व इतर डिझाइन्समध्येसुद्धा हे मिळतात, जे तुम्हाला एखादा फंकी आणि हॅपनिंग लुक देतील आणि मान्सून काळात तुम्ही वेगळेच दिसाल.

असे निवडा

पावसाळयात आपल्या पादत्राणांची निवड विचार करून करायला हवी. या दिवसात बूट अजिबात घालू नये, कारण पावसाळयात बूट ओले झाल्यास फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. या ऋतूत प्लास्टिकच्या चपला घालणे पायांसाठी अधिक सुरक्षित असते.

दिल्लीच्या कनॉट प्लेसमध्ये चपलांचे दुकान चालवणारा महेंद्र सांगतो की अलीकडे म्युल्सनासुद्धा खूप मागणी आहे, जे एक प्रकारचे बॅकलेस शूज असतात. हा फ्लिप फ्लॉपचा स्टायलिश पर्याय आहे. हे घालणे आणि काढणे अत्यंत सोपे आहे. याची किंमत १५० ते २०० च्या आसपास असते, जी तरुणांच्या खिशाला महाग वाटत नाही.

पादत्राणांची निगा राखणेसुद्धा आहे गरजेचे

तज्ज्ञांचे मत आहे की मान्सून काळात प्लास्टिक चपलांचा सेल जास्त असतो. आणि यावेळी गम बूट्सचे खास कलेक्शन बाजारात उपलब्ध आहे. पावसाळयात पादत्राणांची खास निगा ठेवणे आवश्यक असते.

प्लास्टिक सँडल्स : प्लास्टिक जोडे अथवा चपला खराब झाल्यास सहज ब्रशने स्वच्छ करता येतात.

रबराचे बूट : रबराचे जोडे वा चपला घालणार असाल तर वापरल्यानंतर लगेच ते पंख्याखाली वाळवा कारण ओल्या रबरातून लगेच दुर्गंधी येण्यास सुरूवात होते आणि पादत्राणे लवकर खराब होतात.

स्पोर्ट्स शूज : जर तुम्ही स्पोर्ट्स शूज घातले असतील, तर लगेच लेस काढून हे शूज उलट बाजूने ठेवा. जर तुम्ही ताबडतोब वाळायला ठेवाल तर शूज खराब होणार नाहीत.

कपाटात ठेवू नका : जोवर तुमचे शूज चांगले खणखणीत वाळत नाहीत तोवर ते कपाटात बंद करून ठेवू नका. नाहीतर ते खराब होतील आणि त्यावर फंगस चढण्याची शक्यता असते.

उन्हात ठेवा : जोडे खराब होऊ नये म्हणून त्यांना उन्हात ठेवा. यामुळे आत वाढत असलेले बॅक्टेरिया नाहीसे होतील.

लेदर टाळा : मान्सून काळात लेदरचे शूज आणि चपला घालू नका. जर वापरणे अतिशय आवश्यक असेल तर त्यांना आधी वॅक्सचे पॉलिश करा. वॅक्स लावल्याने शूजवर सुरक्षेचा पातळ थर निर्माण होतो.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...