* पूनम पांडेय

फुल फिंगर रिंग

फुल फिंगर रिंगची ही डिझाइन संपूर्ण बोटाला व्यापते. या प्रकारच्या अंगठीमुळे बोटाला फुलर असा लुक मिळतो. तुम्ही याला इंडियन आणि इंडो-वेस्टर्न पेहरावासोबत टिम अप करू शकता. पण जेव्हा तुम्ही फुल फिंगर रिंग परिधान कराल त्यावेळी दुसरी कोणतीही अंगठी परिधान करू नका. जर बोट आखूड आणि जाड असेल तर ही फुल रिंग शोभून दिसणार नाही.

मिड फिंगर रिंग

नेहमीच्या अंगठीला बोटाच्या शेवटाला घाला आणि नेल आर्ट रिंगला बोटाच्या सुरुवातीला घाला. पण मिड फिंगर रिंगला बरोबर बोटाच्या मधोमध घाला. म्हणूनच त्याला मिड फिंगर रिंग म्हणतात. विशेष समारंभांव्यतिरिक्त तुम्ही रोज जीन्स, टी-शर्ट, सलवारकमीज वगैंरे सोबतही परिधान करू शकता.

चेन फिंगर रिंग

जर तुमचे हात बारीक असतील तर चेन फिंगर रिंग तुमच्या हाताला भरलेला लुक देतात. एकापेक्षा जास्त बोटातही चेन फिंगर रिंग परिधान करतात. अंगठी चेनच्या सहाय्याने एकमेकांना जोडलेली असते. म्हणूनच याला चेन फिंगर रिंग म्हणतात. परंतु या रिंग्स विशेष प्रसगांसाठीच परिधान केल्या जातात.

कॉकटेल फिंगर रिंग

जर तुम्हाला काही मिनिटांतच फॅशनेबल लुक मिळवायचा असेलतर, आपल्या नेहमीच्या सिंपल रिंगऐवजी जागी कॉकटेल फिंगर रिंग परिधान करा. मोठी आणि बोल्ड साईजच्या कॉकटेल रिंगमुळे नेहमीच स्टायलिश लुक मिळतो. यास तुम्ही वेस्टर्न आउटफिटसोबत परिधान करू शकता. अशी रिंग उंच आणि बारीक स्त्रियांवर जास्त शोभून दिसतात.

फोर फिंगर रिंग

जर तुम्हाला चारही बोटांत अंगठी घालायला आवडतं. तसेच चारही बोटांमध्ये वेगवेगळी अंगठी घालण्याऐवजी फोर फिंगर रिंगला तुम्ही आपली पहिली पसंती बनवू शकता. फोर फिंगर चारही बोटांत एकत्र घातली जाते. ही फोर फिंगर रिंग तुम्ही रोज वापरू शकत नाही. ही केवळ काही खास समारंभांमध्येच परिधान करा.

 

नेल आर्ट रिंग

जर तुमच्याकडे नेल आर्ट करून घेण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही नेल आर्ट रिंगचा वापर करू शकता. या अंगठीला बोटाच्या पुढच्या बाजूला नखाच्या इथेच परिधान केले जाते. वेस्टर्न कपडयांवर निऑन, काळ्या-पांढऱ्या शेडस्मधील नेल आर्ट रिंगची निवड करू शकता. भारतीय पारंपरिक कपडयावर ज्येष्ठ नेल आर्ट रिंगची निवड करता येईल.

ट्रिपल फिंगर रिंग

डबल फिंगर रिंगप्रमाणे ट्रिपल फिंगर रिंगलाही अनेकांची पसंती मिळत आहे. ही एकत्र तीन बोटांत परिधान केली जाते. सिंपल डायमंडसह कलरफुल डायमंडमध्येदेखील या रिंग्ज उपलब्ध आहेत. तुमच्या पेहरावांनुसार रिंगची निवड करा.

डबल फिंगर रिंग

अशाप्रकारची अंगठी एकावेळी दोन बोटांत परिधान करता येते. या डबल फिंगर रिंगचा लुक एकदम स्टाइलिश दिसतो. साध्या डबल रिंगपासून अगदी ह्युज डिझाइनवाल्या डबल रिंग बाजारात उपलब्ध आहेत. रोज वापरण्यासाठी सिंपल स्टाइलच्या डबल रिंग वापरा आणि विशेष प्रसंगांकरीता ज्वेल डबल फिंगर रिंगची खरेदी करा. जर तुमची बोटे बारीक असतील तर हेवी आणि जर बोटे जाड असतील तर लाइट फिंगर रिंगची निवड करा.

कफ फिंगर रिंग

बाजारात या कफ फिंगर रिंगची मागणी मोठया प्रमाणात आहे. प्लेन कफसह डिझायनर कफ रिंग देखील बाजारात उपलब्ध आहेत. जर बोटे लांब असतील तर जास्त रुंदीची कफ रिंग निवडा जर बोटे आखुड असतील तर कमी रुंदीची कफ रिंग निवडल्यास बोटे दिसणार नाहीत.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...