– सोमा घोष
पार्टीत जाणं प्रत्येकाला आवडतं. पण पार्टी रात्रीच्या वेळेस असल्यावर मात्र स्त्रियांच्या मनात प्रश्न उद्भवतो की मेकअप कसा करावा. याबाबत ब्यूटी एक्सपर्ट आणि मेकअप आर्टिस्ट नम्रता सोनी सांगतात की रात्रीच्या पार्टीमध्ये कधीही भडक मेकअप चांगला दिसतो. त्यावेळेस मिडनाइट लाइट, सॉफ्ट लाइट आणि कँडल लाइटचं वातावरण असतं. जिथे भडक रंगाच्या आउटफिटबरोबरच डार्क, ग्लिटरिंग आइज, स्मोकी आइज इत्यादी चांगले दिसतात. मोकळे केस आणि लाल, तांबूस किंवा मरून लिपस्टिक लावून तुम्ही आणखीन जास्त सुंदर दिसू शकता. पार्टीमध्ये डान्सफ्लोअर असेल तर अशाप्रकारचा मेकअप तुम्हाला आणखीन जास्त आकर्षक दाखवतो. मात्र हा मेकअप जास्त वेळ टिकून राहावा म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवणं फार जरुरी आहे :
* सर्वप्रथम चेहरा मॉश्चराइज करा. साधारणपणे १५ मिनिटे मॉश्चरायझर लावून ठेवल्यानंतर आपल्या स्क्रिन टोनच्या अनुरूप फाउंडेशनचा वापर करा. फाउंडेशन लावण्यापूर्वी फेस प्रायमर लावून घ्या. यामुळे मेकअप बराच वेळ टिकून राहातो. हे त्वचा आणि फाउंडेशनमध्ये एका आवरणाचं काम करतं. फाउंडेशन क्रीम, पावडर, जेल इत्यादी कोणत्याही प्रकारचं असू शकतं. जर क्रीम फाउंडेशन लावलं असेल तर कॉम्पेक्ट पावडर वापरणं फार जरूरी आहे.
* डोळ्यांचा मेकअप विशिष्ट असतो जो तुमच्या आउटफिटनुसारच असावा. आउटफिटच्या अपोजिट रंगांचा वापर करणंही चांगलं ठरतं. फ्लॅट आयशॅडो ब्रशच्या मदतीने आयशॅडो लावून घ्या. त्यानंतर मऊ ब्रशच्या मदतीने ते चांगल्याप्रकारे ब्लेण्ड करा. डोळ्यांच्या उभाराच्या बाजूला गडद रंग लावत जाऊन आयब्रोजपर्यंत फिका रंग लावा.
* त्यानंतर ब्लॅक, ब्लू, ब्राउन किंवा ग्रीन काजळ लावा. पेन्सिल किंवा आयलायनर लावल्यानंतर मसकारा लावणंही गरजेचं असतं. स्मोकी आइज आणि गडद लाल लिपस्टिक अशा पार्टीमध्ये फार छान दिसतं.
* ब्लशर कायम आपल्या स्किनटोनपेक्षा दोन शेड डार्क लावा. याने मंद प्रकाशातही गालांची चमक उठून दिसते.
* ओठांवर लिपग्लॉसचा पातळ थर लावा. त्यानंतर लिप पेन्सिलीने ओठांना आउटलाइन द्या आणि मग लिपस्टिक लावा. त्यानंतर ओठांवर टिशू पेपर ठेवा आणि मग ब्रशच्या मदतीने लूड पावडर लावा. टिशूपेपर काढून पुन्हा लिपस्टिकचा थर द्या.
नम्रता पुढे सांगते की मेकअपमध्ये केसांकडेही विशेष लक्ष द्यावं लागतं. केस लांब असतील तर ब्लोड्राय चांगलं दिसतं आणि कर्ली असतील तर ते मोकळे ठेवा. ऑफिस गोइंग असाल तर मधोमध पार्टीशन करून एक नॉट किंवा जुडा बनवा, जो तुम्हाला ऐलिगेंट लुक देतो.
मेकअप बराच वेळ टिकवून ठेवण्यासाठी अधूनमधून टचअप करणंही फार जरुरी असतं. जेणेकरून तुम्ही फ्रेश दिसाल. यासाठी लिपस्टिक, कॉम्पेक्ट पावडर, टिशू पेपर इत्यादी सोबत ठेवावं. एकदीड तासांनी वॉशरूममध्ये जाऊन लिपस्टिक आणि कॉम्पेक्ट पावडर लावा; कारण तुम्ही जर डान्स फ्लोरवर असाल किंवा काही खाल्लं असेल तर लिपस्टिक रूमच होण्याची भीती असते.
अशावेळी वारंवार पावडर न लावता टिशू पेपर चेहऱ्यावर हळुवारपणे ठेवून चेहऱ्यावर सुटलेलं तेल आणि घाम सुकवा. याने तुमच्या चेहऱ्यावरील चमक दिसून राहील. मेकअप फ्रेश दाखवण्यासाठी चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे मारून टिशू पेपरने ते सुकवून घ्या. तुम्हाला ताजंतवानं वाटेल.
तुम्ही जर स्मोकी आइज किंवा डार्क आइजचा मेकअप केला असेल तर डोळ्यांवर बोटांच्या मदतीने हळुवारपणे हायलायटिंग पावडरने डॅब करा. यामुळे डोळ्यांची चमक टिकून राहील.
या सर्व गोष्टींबरोबरच जरूरी आहे तुमची गोड स्माइल, जी तुम्हाला कायम तुमच्या सौंदर्याची जाणीव करून देत असते. म्हणून त्यात कंजूषपणा करू नका.