* सोमा घोष

एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणारी सुमन नेहमीच ब्रँडेड कपडे घालते, कारण तिला त्यांचा रंग, फिटिंग आवडते आणि तिच्या मते ते दिसायला खूपच सुंदर दिसतात. पूर्वी ती रस्त्यावरील विक्रेत्यांकडून कपडे खरेदी करायची, पण काही दिवसांतच त्यांचा रंग फिकट व्हायचा आणि बऱ्याचदा फिटिंगही योग्य नसायची. त्यामुळे तिला ते कपडे लवकरच दुसऱ्याला देऊन टाकावे लागायचे. त्यामुळेच ती गेल्या ५ वर्षांपासून फक्त ब्रँडेड कपडे घेत आहे, कारण हे कपडे महाग असले तरी जास्त टिकतात.

सुमनला पाहून तिच्या मैत्रिणीही ब्रँडेड कपडे खरेदी करू लागल्या आहेत. त्यांच्या मते, ब्रँडेड कपडे महाग असले तरी त्यांचा लूक बराच काळपर्यंत जसाच्या तसा राहातो.

ब्रँडेड कपडे महाग असतात, पण त्यांची स्टाइल, फिटिंग, रंग, फॅब्रिक इत्यादी सर्व इतर सामान्य कपड्यांपेक्षा उत्तम असतात, त्यामुळेच आजची तरुणाई ते जास्त पैसे देऊनही खरेदी करतात, कारण ते चांगले कमावतात आणि या ब्रँडेड कपड्यांमुळे त्यांची कार्यालयातही वेगळी प्रतिमा तयार होते.

स्टेटस सिम्बॉल

इतकेच नाही तर ब्रँड नेहमीच त्यांच्या ग्राहकांना सर्वोत्तम देतात, जेणेकरून ते त्या ब्रँडचे कपडे पुन्हा पुन्हा खरेदी करतील. ब्रँड हे आजकाल स्टेटस सिम्बॉल बनले आहेत, म्हणूनच आजचे तरुण त्याकडे अधिकाधिक आकर्षित होत आहेत. डिझायनर्सचा असा विश्वास आहे की, एक काळ असा होता जेव्हा सामान्य लोक उच्च दर्जाचे कपडे खरेदी करू इच्छित नव्हते, कारण असे कपडे फक्त श्रीमंत लोकांसाठी मानले जात होते, परंतु आता तसे नाही. अधिकाधिक तरुण असे कपडे घेतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे आजकाल हजारो ब्रँड त्यांचे कपडे आणि अॅक्सेसरीज ऑनलाइन विकतात. ते त्यांच्या बजेटमध्ये असतात,

जेणेकरून तरुणाई ते खरेदी करू शकेल

याशिवाय, ब्रँडेड कपडे घातल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. गर्दीत तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसू शकता. हेच कारण आहे की, सर्व ब्रँड बाजारात सुंदर आणि आकर्षक कपडे आणून ग्राहकांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात.

फॅशन उद्योगाद्वारे उत्पादित होणारा कचरा मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरवतो. म्हणूनच, आजकाल टिकाऊ कपड्यांवर अधिक भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत, ब्रँडेड कपडे फॅशनला प्रोत्साहन देतात, सोबतच प्रदूषणही कमी होते.

ब्रँडेड कपडे घालण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत :

आरामदायक असतात

ब्रँडेड कपडे घालणे खूप आरामदायी आहे. ते उच्च दर्जाच्या साहित्यापासून बनवलेले असल्याने, आरामाची पातळी जास्त असते. हे कपडे जास्त वेळ घातले तरी तुम्हाला अस्वस्थ वाटत नाही, तुम्ही विमान प्रवास करत असाल किंवा कार्यालयात काम करत असाल, अशा कपड्यांमुळे तुम्हाला आरामच मिळतो. ब्रँडेड कपडे सर्व आकारात उपलब्ध असतात आणि योग्य आकारात बनवले जातात. कोणीही त्यांच्या शारीरिक बांध्यानुसार ते खरेदी करू शकतात आणि ते घालून सुखद अनुभव घेऊ शकतात.

प्रतिष्ठा वाढवतात

ब्रँडेड कपडे दिसण्यातील प्रतिष्ठा वाढवतात आणि शालीनतेला सर्वोच्च प्राधान्य देतात. हे कपडे व्यक्तीचा फॅशन सेन्स प्रतिबिंबित करतात. या कपड्यांचे रंग फिकट होत नाहीत, म्हणून ते अनेक वेळा घालता येतात. त्यांच्यासोबत अॅक्सेसरीज घातल्यावर त्यांचे सौंदर्य अधिकच वाढते.

दीर्घकाळ टिकतात

असे आढळून आले आहे की, साधे कपडे स्वस्त साहित्यापासून बनवले जातात. ते खरेदी केल्याने पैसे वाचतात, परंतु ते जास्त काळ टिकत नाहीत. २-३ वेळा धुतल्यानंतर त्यांचे रंग फिकट होतात आणि ते घालणे कठीण होते. याउलट ब्रँडेड कपडे महाग असतात, पण ते उच्च दर्जाच्या साहित्यापासून बनवले जातात, त्यामुळे ते अनेक वर्षे टिकतात. ते सहज फाटत नाहीत किंवा रंग फिकट होत नाहीत. म्हणूनच दर्जा, गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे नेहमीच चांगले ठरते. जर तुम्ही सर्वसाधारण कपडे खरेदी केले तर तुम्हाला वारंवार पैसे खर्च करावे लागतात. याउलट जर तुम्ही एकदा ब्रँडेड कपड्यांवर पैसे खर्च केले तर ते वर्षानुवर्षे टिकतात.

प्रत्येक प्रसंगी घालता येतात

ब्रँडेड कपडे प्रत्येक प्रसंगी घालता येतात, म्हणून या कपड्यांवर पैसे खर्च करणे ही एकदाच केलेली गुंतवणूक ठरते. ते वर्षानुवर्षे चांगले राहातात.

तुम्ही जिममध्ये जा किंवा पार्टीला जा, ब्रँडेड कपडे नेहमीच आरामदायकता आणि आत्मविश्वास मिळवून देतात. मोठे ब्रँड जिम किंवा वर्कआउटसाठी सुंदर कपडे तयार करतात. जर तुम्ही त्यासोबत कानातले, बांगड्या, अंगठ्या इत्यादी अॅक्सेसरीज घातल्या तर ते अधिकच उठून दिसतात.

अशा प्रकारे, कपड्यांचा दर्जा, डिझाइन आणि अनुभव या तीन गोष्टी बाजारात नेहमीच एक ब्रँड स्थापित करण्याचा प्रयत्न करतात
.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...