* किरण बाला

साधारणपणे पुरुषांचे कार्यक्षेत्र घराच्या चार भिंतींच्या बाहेर असतं आणि घर संसाराची जबाबदारी पत्नी सांभाळतात. परंतु याच्या उलटदेखील होत आहे. पत्नी नोकरी करते आणि पती बेरोजगार होऊन घरातील कामं करतो. काही आळशी पती आर्थिक दृष्ट्या पत्नीच्या कमाईवर अवलंबून असतात ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ या सिद्धांतांवरच चालणारे पती आयुष्यभर असेच पडून राहतात. ते घरगुती काम आणि मुलांची देखभाल तर करतात, परंतु कोणताही कामधंदा नाही.

अशा पतींनी आणि त्यांच्या पत्नींनी सावध राहायला हवं. कारण अशा राहणाऱ्या पतीनां हार्ट अटॅक म्हणजेच हृदयरोग जो त्यांना अचानक मृत्यूच्या खाईत ढकलतो.

घरात राहून मुलांची देखभाल करणाऱ्या पतींना हृदयरोग होण्याची शक्यता वाढते. ही गोष्ट अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानंतर समोर आली. घरात राहून मुलांची जबाबदारी सांभाळणाऱ्या पतींना हृदयरोग होण्याची आणि लवकर मृत्यू होण्याची शक्यता वाढते. ही गोष्ट कामा संबंधित तणाव आणि कोरोनरी आजाराबाबत करण्यात आलेल्या एका अभ्यासाच्या दरम्यान समोर आली होती. घरात राहणाऱ्या पतींच्या आरोग्याचा अशा प्रकारे धोका निर्माण होतो कारण त्यांना त्यांचे नातेवाईक, मित्र आणि साथीदारांचे समर्थन व सहकार्य मिळत नाही. तर घरातील काम न करणाऱ्या एकटया कमावत्या पत्नी मात्र प्रत्येकवेळी कौतुकास पात्र होतात.

नेहमी तणावात राहणं

मग पुरुषांना हेदेखील सिद्ध करावं लागतं की ते बायकांपेक्षा चांगलं काम करू शकतात, म्हणून देखील ते सदैव तणावत राहतात. एक संशोधन सतत १० वर्ष १८ वर्षापासून ते ७७ वर्षापर्यंतच्या २,६८२ पतींवरती करण्यात आलं. या संशोधनात हेदेखील समजलं की घरात राहणारे पती कायम त्यांच्या समवयीन लोकांपेक्षा दहा वर्ष अगोदर मरतात. संशोधनकर्त्यांनी या पतींचं वय, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, वजन, मधुमेह आणि धुम्रपान करण्याच्या सवयीला जेव्हा आधार बनवलं तेव्हा देखील या संशोधनाचे परिणाम योग्य निघालेत.

कमी मिळकत असणारे वा शिक्षण अर्धवट दरम्यान सोडणाऱ्या पुरुषांनादेखील हृदयरोग होण्याची आणि वेळेपूर्वीच जग सोडण्याची शक्यता अधिक असते. चांगली मिळकत असणारे पुरुष जसं की डॉक्टर, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट आणि शिक्षकांना हृदयरोग होण्याचा धोका असतो, परंतु अधिक नाही.

काडीमोड घेणं सोपं नाही

बायकांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की अशा नाकर्त्या पतींकडून त्या घटस्फोट घेऊ शकत नाही कारण भारतीय न्यायालयं हिंदू बायकांना आजदेखील पतीचे सेवक मानतात आणि त्यांच्यासाठी पती तर जीवनभराचा साथीदार असतो मग तो कोडी असो की वेश्या गमनी असो. नाकर्त्या पतीचं आवरण देखील बायकांसाठी चांगलं असतं. कारण तो नावाला तरी असतो, त्यामुळे इतरजण घाबरून असतात.

नाकर्त्या पतींचा मृत्यू लवकर देखील यासाठी होतो की  बायको किंवा मुलं अशांची योग्य देखभाल करत नाहीत. गरज पडल्यास त्यांना दुर्लक्षित केलं जातं. होय, एकदा मद्रास उच्च न्यायालयाने हिम्मत दाखवून अशा बेरोजगार पतींना कमावत्या बायकोकडून रोजगार भत्ता देण्यास नकार दिला होता, जो पत्नीपासून वेगळा राहत होता. असे पती छोटा आजारदेखील अनेकदा सांगू शकत नाहीत.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...