* रितू वर्मा

चारूला पुण्यात नोकरी लागली, तेव्हा तिला खूप आनंद झाला. सुरुवातीचे काही दिवस ती तिच्या आत्येच्या घरी राहिली आणि नंतर आत्येच्याच मदतीने ती एका फ्लॅटमध्ये राहू लागली. त्या फ्लॅटमध्ये २ बेडरूम्स होत्या. चारूची रूममेट रमोना होती. हळूहळू रमोना आणि चारूची मैत्री झाली. कार्यालयीन धावपळीमुळे चारूला जेवण बनवायला त्रास होऊ लागला तेव्हा रमोनाने तिचा डबा बनवायला सुरुवात केली.

चारू निरागस होती, जेव्हा रमोनाने डब्यासाठी महिन्याला ७ हजार रुपये सांगितले तेव्हा तिने काहीही चौकशी न करताच पैसे दिले. रमोना स्वत: त्याच डब्यासाठी महिन्याला फक्त ५ हजार रुपये देत होती. एवढेच नाही तर रमोना तिचे बहुतेक फोन चारूच्या मोबाईलवरूनच करत असे. रमोना मित्राला भेटायला जाताना हक्काने चारूचे कपडे घालत असे. हद्द म्हणजे चारूच्या परवानगीशिवाय रमोना तिच्या प्रियकराला रात्री फ्लॅटवर आणू लागली. चारूने विरोध केल्यावर रमोनाने चारूला काकूबाई, जुन्या काळातली असे चिडवू लागली. चारू गप्प बसली.

रमोनाच्या आधुनिक विचारांचा परिणाम असा झाला की, जेव्हा रमोना अमली पदार्थांच्या धंद्यात पकडली गेली तेव्हा चारूलाही पोलीस स्टेशनला जावे लागले, कारण ती तिची रूममेट होती. चारूचा फ्लॅट शेअरिंगचा अनुभव इतका वाईट होता की, तिने पुन्हा कोणाशीही फ्लॅट शेअर केला नाही.

प्रत्येकाचा अनुभव चारूसारखाच असेल असे नाही. धनश्री आणि पूजा ५ वर्षांपासून गुरुग्राममध्ये फ्लॅट शेअर करत आहेत. दोघींमध्ये खूप चांगला समन्वय निर्माण झाला आहे.

धनश्री आणि पूजाचे विचार सारखे आहेत असे नाही, पण दोघींनीही पहिल्या दिवसापासून काही नियम-कायदे बनवले, जसे की, दोघीही आपल्या प्रियकराला रात्री घरी आणत नसत. स्वच्छता ही दोघींची जबाबदारी होती. पूजा स्वत: जेवण बनवत असे, तर धनश्री बाहेरून डबा आणत असे. झोपण्यापूर्वी दोघीही दिवसभरातील गोष्टी एकमेकांना सांगत आणि तणाव कमी करत, पण दोघीही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यापासून आदरपूर्वक अंतर राखून होत्या.

आजकाल आपल्या मुलांना आपल्या शहरातच नोकरी मिळेल असे नाही, जर ती घरापासून लांब कामाला गेली तर नोकरीच्या सुरुवातीच्या काही वर्षांत त्यांना फ्लॅट शेअर करावा लागू शकतो. जर तुमची मुलंही कोणासोबत तरी फ्लॅट शेअर करत असतील तर हा त्यांच्यासाठी एक फायदेशीर सौदा किंवा कटू अनुभवही ठरू शकतो.

फ्लॅट शेअरिंगचे काय फायदे आहेत ते प्रथम जाणून घेऊया :

पैशांची बचत : फ्लॅट शेअरिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पैसे वाचतात. कोणत्याही महानगरात एक छोटा स्वतंत्र प्लॅट दरमहा १०-१५ हजार रुपये भाडयाने मिळतो. तेवढयावरच सर्व भागत नाही. दरमहा फ्लॅटच्या देखभाल-दुरूस्तीचे पैसेही द्यावे लागतात. त्यामुळे एकटयाने फ्लॅट घेऊन राहाणे महागात पडू शकते. जर तुमची मुलगी किंवा मुलगा हाच फ्लॅट २-३ जणांसोबत शेअर करत असतील तर त्यांच्या पैशांची बऱ्यापैकी बचत होते.

एकाकीपणापासून सुटका : नवीन शहरात आणि नवीन वातावरणात फ्लॅटमेंट चांगला मित्र ठरू शकतो. अनेकदा एकटे राहिल्यामुळे मुलांना मानसिक आणि भावनिकदृष्ट्या असुरक्षित वाटते. अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत कोणी असेल तर ही समस्या बऱ्याच अंशी सुटते.

सुरक्षित वाटणे : नेहमी एकापेक्षा दोन भले असे म्हणतात. एकटा राहणारा मुलगा किंवा मुलगी नेहमी इतरांच्या नजरेत येतात, पण २ लोक नेहमी ११ सारखे असतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, दोन व्यक्ती एकत्र असणे केव्हाही उत्तम ठरते.

जबाबदाऱ्यांचे विभाजन : स्वच्छता असो किंवा स्वयंपाकघरातली कामे, एका व्यक्तीसाठी ही कामे खूप जास्त होतात. जर एकसारख्या विचारांचा फ्लॅटमेंट मिळाला तर कोणतेही काम अवघड वाटणार नाही. हसतखेळत वेळ खूप आरामात जाईल. सर्व कामे एकटयाने करण्याचा ताणही दूर होईल.

काही लोकांना मात्र फ्लॅट शेअर करणे खूप गैरसोयीचे वाटते. लोक फ्लॅट शेअर करणे का टाळतात, त्या कारणांवरही नजर टाकूयात :

गोपनीयतेवर आक्रमण : लोक फ्लॅट शेअरिंगपासून दूर राहण्याचे हे एक मुख्य कारण आहे. काही मुलांना किंवा मुलींना त्यांच्या फ्लॅटमेटच्या वैयक्तिक संबंधांमध्ये अनाठायी सल्ला देण्याची किंवा हस्तक्षेप करण्याची सवय असते. काही बाबतीत असेही दिसून येते की, ते फ्लॅटमेटच्या आईवडिलांचे चमचे बनून चुगल्या करू लागतात.

अनावश्यक ताण : काही प्रकरणांमध्ये असेही दिसून येते की, फ्लॅटमेट अत्यंत हुशारीने आपली सर्व कामे इतरांच्या खांद्यावर टाकली जातात. अशी हुशार मुले-मुली अतिशय आरामात त्यांचे जेवण आणि इतर खर्च रुममेटच्या माध्यमातूनच भागवतात. पुढे अशा अनेक गोष्टी आणि कारणे विनाकारण तणावास कारणीभूत ठरतात.

सुविधांवरून वाद : ललिता आणि अंशू गुरुग्राममधील एका सोसायटीत फ्लॅट शेअर करून राहतात. सोसायटीत एक बॅकअप जनरेटर होता, जो ललिताला विकत घ्यायचा होता, पण अंशू याला फालतू खर्च समजायची. जेव्हा बिल स्वत: भरेन असे सांगून ललिताने जनरेटर घेतला तेव्हा अंशूने आडकाठी केली नाही, पण भांडण तेव्हा सुरू झाले जेव्हा अंशू रात्री दिवे गेल्यावर ललिताच्या खोलीत झोपू लागली जिथे एसी सुरू असायचा. आता ललिता अंशूकडून अर्ध्या खर्चाची मागणी करत आहे, कारण तिनेही ही सुविधा उपभोगली आहे. पण, अंशूच्या म्हणण्यानुसार त्या खोलीत एक किंवा चौघे झोपले तर काय फरक पडतो. बिल तेवढेच आले पाहिजे.

फ्लॅट शेअरिंग फायदेशीर व्यवहार ठरू शकतो जर फ्लॅट शेअर करणाऱ्यांनी या गोष्टींकडे लक्ष दिले :

फ्लॅटमेटशी आदरपूर्वक अंतर ठेवा : फ्लॅटमेटशी संवाद साधा. तुम्ही तुमच्या दैनंदिन समस्याही शेअर करू शकता, पण तुमची कौटुंबिक गुपिते किंवा तुमच्यातील कमतरता त्यांच्यासमोर उघड करण्याची चूक करू नका. रात्रभर जागून त्याच्याशी गप्पा मारणे टाळा. हे नेहमी लक्षात ठेवा की, तो तुमचा फ्लॅटमेट आहे मित्र नाही. त्यामुळे योग्य अंतर राखणे हे पुढे जाऊन दोघांसाठीही फायदेशीर ठरेल.

मैत्रीपूर्ण व्यवहार करा, पण आंधळा विश्वास ठेवू नका : कधीकधी तुम्ही तुमच्या फ्लॅटमेटसोबत फिरू शकता. जर त्याला मदत हवी असेल तर नक्कीच मदत करा, पण त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवण्याची चूक करू नका. जर त्याला आर्थिक मदत हवी असेल तर थोडीफार करा. त्याच्या वैयक्तिक संबंधांबद्दल जास्त चौकशी करू नका. मैत्रीपूर्ण वागा, परंतु मित्र बनू नका. विश्वास निर्माण करण्यासाठी वेळ लागतो. काही लोकांसाठी फ्लॅट शेअर करणे ही एक मोठी गोष्ट आहे, त्यामुळे प्लॅटमेटशी मैत्री करण्यापूर्वी योग्य वेळेची वाट पाहा.

सुरुवातीलाच नाही म्हणायला शिका : जर तो वारंवार तुमच्याकडे तुमच्या वैयक्तिक वस्तू वापरण्यास मागत असेल तर नम्रपणे नाही म्हणा. तुम्ही सुरुवातीलाच नाही म्हटले नाही तर नंतर समस्या वाढू शकतात. तुम्ही फक्त फ्लॅट शेअर करत आहात, चुकूनही त्याच्यासोबत आयुष्य शेअर करू नका.

हिशेब नीट ठेवा : पायल आणि निकिता एकत्र राहायला लागल्यावर सुरुवातीला निकिता घरात किराणा सामान भरण्यापासून ते धोब्याचे पैसे स्वत:च द्यायची. महिन्याच्या शेवटी जेव्हा निकिताने पायलला हिशेब सांगितला तेव्हा पायलला राग आला. पायलच्या म्हणण्यानुसार तिला न विचारताच निकिताने महागडे साबण किंवा बिस्किटे घेण्याची गरज नव्हती. पायलने कपडयांच्या इस्त्रीचे पैसे देण्यासही नकार दिला.

निकिताला त्या महिन्यात मोठा फटका बसला, पण त्यानंतर तिने फक्त स्वत:साठी किराणा सामान किंवा इतर गोष्टी खरेदी केल्या. ती या विषयावर पायलशी स्पष्टपणे बोलली. त्यानुसार आता अर्धे वीजबिल, मोलकरणीचा अर्धा पगार, अर्धे भाडे दोघी मिळून देतात. बाकी सर्व खर्च त्या स्वत:च्या गरजेनुसार वैयक्तिक करतात. त्यांना एकत्र राहून ४ वर्षे झाली आहेत. दोघीही आपापल्या दैनंदिन आयुष्यात आनंदी आहेत.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...