* डॉ. प्रेमपाल सिंह वाल्यान

युनायटेड किंगडमच्या कु ल्युवेन विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत डॉ. मार्टेन लारमुसियू यांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, यूकेनची २ टक्के मुले विवाहबाह्य संबंधांतून जन्मतात. आता प्रश्न पडतो की, जोडीदाराशी प्रामाणिक न राहाणे भावनिक आणि लैंगिकतेच्या दृष्टीने लग्नाच्या बंधनाचे उल्लंघन असते, हे माहीत असतानाही लोक एवढया मोठया प्रमाणावर व्यभिचार का करतात?

सध्या, विविध नियतकालिकांद्वारे करण्यात आलेले सर्वेक्षण असेही सूचित करते की, भारतातील २५ ते ३० टक्के विवाहित महिला वेळीअवेळी त्यांच्या पतींव्यतिरिक्त इतर पुरुषांसोबत आपली कामवासना शांत करतात. भलेही ही अतिशयोक्ती वाटली तरी सत्य नाकारता येत नाही. अतिशय साध्या आणि गंभीर दिसणाऱ्या महिला, लग्न आणि सामाजिक कार्यक्रमावेळी स्वत:साठी अशा कोणाच्या तरी शोधात असतात, जो त्यांची कामवासना लपूनछपून शांत करू शकेल.

आपली पत्नी आपल्यासोबत प्रामाणिक नाही, हे माहीत असूनही बहुतेक पती हे सत्य जाहीरपणे मान्य करण्यास टाळाटाळ करतात. बरेच पती जाणूनबुजून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की, त्यांची पत्नी त्यांच्याशी पूर्णपणे एकनिष्ठ आहे.

१९५० च्या दशकाच्या सुरुवातीला, किन्से या संस्थेने जाहीर केलेल्या सर्वेक्षणात असे स्पष्ट करण्यात आले होते की, विवाहबाह्य संबंधांची संख्या लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांपेक्षा जास्त आहे. सर्वेक्षणात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांपैकी ५० टक्के विवाहित पुरुष आणि २५ टक्के विवाहित महिलांचे विवाहबाह्य संबंध होते.

अशाच प्रकारे अमेरिकेतील लैंगिक संबंधांवर आधारित जेन्सने केलेल्या सर्वेक्षणात एक तृतीयांश विवाहित पुरुष आणि एक चतुर्थांश महिला विवाहबाह्य संबंधांमध्ये गुंतल्याचे आढळून आले. जोडीदारासोबत एकनिष्ठ न राहण्यासंदर्भातील सर्वात अचूक माहिती शिकागो विद्यापीठातील १९७२ च्या अभ्यासातून समोर आली, ज्यामध्ये १२ टक्के पुरुष आणि ७ टक्के महिलांनी विवाहबाह्य संबंधांत गुंतल्याचे कबूल केले होते.

मानसशास्त्रज्ञ मानतात की, एखादी व्यक्ती पूर्णपणे एकच लग्न केलेली किंवा पूर्णपणे अनेक लग्न केलेली नसते. मानववंशशास्त्रज्ञ हेलन फिशर यांच्या मते व्यभिचाराला अनेक मानसिक कारणे जबाबदार असतात.

काही लोकांना लग्नानंतरही लैंगिक संबंधांची कमतरता जाणवते, त्यामुळे ते विवाहबाह्य लैंगिक संबंधात गुंततात. काही लोक त्यांच्या लैंगिक समस्या सोडवण्यासाठी तर काही स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी विवाहबाह्य संबंध ठेवतात.

दररोज १८ लाख लोक सोशल मीडियावर फक्त सेक्सची चर्चा करतात. जोडीदाराशी अप्रमाणिक असल्याच्या प्रत्येक प्रकरणात, व्यक्तीचा हेतू वेगळा असू शकतो, परंतु याच्या मुख्यत: ५ श्रेणी आहेत –

संधीसाधू अप्रमाणिकपणा : जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जोडीदारासाठी समर्पित असते, परंतु तिच्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करते तेव्हा तो संधीसाधू अप्रमाणिकपणा ठरतो.

सक्तीचा अप्रमाणिकपणा : ही परिस्थिती उद्भवते जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या/तिच्या फसवणूक करणाऱ्या जोडीदाराच्या प्रेमाला पूर्णपणे कंटाळलेली असते. अशावेळी तिला दुसऱ्यासोबत सेक्स करणे आवश्यक होते.

विरोधाभासी अप्रमाणिकपणा : अशी परिस्थिती उद्भवते जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराशी पूर्णपणे वचनबद्ध राहते, परंतु तिच्या तीव्र लैंगिक इच्छेमुळे, वेळोवेळी इतर कुणाशी लैंगिक संबंध ठेवते.

संबंधनिष्ठ विश्वासघात : अशी परिस्थिती उद्भवते जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या वैवाहिक नात्याशी पूर्णपणे वचनबद्ध राहाते, परंतु जोडीदाराकडून आत्मीयता नसल्यामुळे, दुसऱ्याशी लैंगिक संबंध ठेवते.

रोमँटिक विश्वासघात : अशी परिस्थिती उद्भवते जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराशी वचनबद्ध राहूनही इतरांसोबत प्रणय करत राहते.

असे संबंध जगजाहीर झाल्यास इज्जत जाणे, स्वत:बद्दल तिरस्कार वाटणे, मानसिक तणाव, कौटुंबिक संबंध बिघडणे, कोर्टकचेरी यांसह अन्य त्रासालाही सामोरे जावे लागू शकते.

जोडीदाराशी अप्रमाणिकपणा प्रत्येक युगात पाहायला मिळाला आहे, मात्र आता महिलांना जास्त अधिकार आहेत. त्यामुळेच त्या जास्त धोका पत्करतात आणि एकनिष्ठ न राहणाऱ्या जोडीदाराला धडाही शिकवतात. काही अडचण असेल तर आधी बोलून ती सोडवण्याचा प्रयत्न करा आणि एकनिष्ठ न राहण्याला आयुष्याचा शेवट समजू नका. अशावेळी विवाह तज्ज्ञांशी बोला. जोडीदार सतत विश्वासघात किंवा प्रतारणा करत असेल तरच वेगळे राहाणे किंवा घटस्फोट घेण्याबद्दल बोला.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...