एकल माता सुलभ होईल अवघड प्रवास

* गरिमा पंकज

एकल मातेला एकाकीपणे स्वत:च्या बळावर मुलाचे संगोपन करणे आणि त्याला सक्षम बनविणे सोपे नसते, परंतु जर तिने हिंमत बाळगली तर ती केवळ तिच्या कार्यातच यशस्वी होत नाही तर ती इतरांसाठीही प्रेरणा बनते, काहीशी अशाप्रकारे

काम आणि मुलाशी असलेले नाते जतन करा : कार्यालयातील आनंदी तास, मैत्रिणीची वाढदिवसाची पार्टी, तयारी विना डेट यासारखे प्रसंग मुलांमुळे तर कधी हृदयभंगामुळे प्राधान्यक्रमात मागे पडतात. याचप्रमाणे कधीकधी डॉक्टरकडे जाणे किंवा ब्युटी पार्लरला जाणेदेखील टाळले जाते. हे खरे आहे की एकल पालक या नात्याने आपले मुलाबरोबर शारीरिक आणि भावनिक पातळीवर असणे आपल्यासाठी महत्वाचे आहे, परंतु यामुळे समाजापासून वेगळे राहणे आणि गरजा टाळणे योग्य नाही.

काहीवेळा आपल्या मातृत्वाच्या जबाबदारीपासून मोकळे होऊन स्वत:साठी काही वेळ घालवणे महत्वाचे असते, जेणेकरून आपली उर्जेची बॅटरी रीचार्ज होत राहील आणि आपण जबाबदारी अधिक चांगल्याप्रकारे पार पाडू शकाल.

आपली सकारात्मकता कायम ठेवा आणि जीवनात पुढे जाण्याचे मार्ग खुले ठेवा. लोकांना भेटा, मान उंचावून लोकांमध्ये फिरा. आपल्याला लपण्याची किंवा स्वत:साठी दु:खी होण्याची आवश्यकता नाही.

समुदायाचा पाठिंबा शोधा : एकल मातांना बऱ्याचदा स्वत:ला एकटे व अस्वस्थ वाटते. त्यांना वाटते की त्या एकट्या आहेत परंतु ही विचारसरणी योग्य नाही. आपण पेरेंट्स विदाउट पार्टनर्स, सिंगल मॉम्स कनेक्ट ऑर्गेनाइजेशन यासारख्या एकल मातांशी संबंधित संस्थांच्या सदस्य बनू शकता. मित्र, शेजारी आणि आपल्यासारख्या एकल मातादेखील आपल्या सपोर्ट सिस्टिम बनू शकतात. आपण ऑनलाईनदेखील एखाद्या समुदायाच्या सदस्य बनून पाठिंबा मिळवू शकाल.

मदत मागा : बऱ्याच वेळा एकल माता मदतीसाठी विचारण्यास किंवा आवश्यक मदत स्वीकारण्यास अगदीच संकोच करतात. समजा, तुम्हाला २-३ तास एखाद्या महत्त्वपूर्ण कामासाठी बाहेर जायचे आहे किंवा तुमची तब्येत ठीक नसेल तर तुमच्या घराभोवती मदत शोधा. मदत मागण्यास शेजारी, मित्र किंवा कुटूंबीय कोणीही असू शकतात.

तुम्ही तुमची गरज स्पष्टपणे सांगा आणि त्यांची मदत घ्या. तुमच्या आयुष्यात असे बरेच लोक असतील, ज्यांना तुम्हाला मदत करायची इच्छा असेल. संकोच न करता त्यांची मदत घ्या. कॉफी पाजून किंवा त्यांच्या मुलांसाठी काहीतरी करून आपण त्याची परतफेडदेखील करू शकता. जर आपण कुटुंबीयांना आणि मित्रांना त्रास देऊ इच्छित नसल्यास एक पर्याय म्हणून आपला समवयस्क शेजारी असू शकेल.

दिल्लीतील ३२ वर्षीय वीणा ठाकूर सांगते, ‘‘मी व माझा नवरा विभक्त झालो, तेव्हा माझा मुलगा १५ महिन्यांचा होता. बऱ्याच वेळा अशी परिस्थिती आली की मला त्याला १-२ तास सोडून कुठेतरी जावे लागले. त्यावेळी माझ्या शेजारी राहणारी श्रुति माझा आधार बनली. तिला एक २ वर्षाचे बाळ होते. आम्ही दोघींनी ठरवलं होतं की जेव्हा-जेव्हा तिला किंवा मला कुठेतरी जावं लागेल तेव्हा आम्ही एकमेकांच्या मुलांची काळजी घेऊ. आमचा वेळ, पैसा आणि मनाची शांती राखण्यासाठी आमची ही भागीदारी खूपच फायदेशीर ठरली.’’

आपला प्राधान्यक्रम पुन्हा एडजस्ट करा : बऱ्याच एकल माता स्वत:ला सुपर महिला मानतात. त्यांना असे वाटते की दिवसभर काम करून आणि मुलाची काळजी घेण्याबरोबरच त्यांना घरदेखील स्वच्छ ठेवायचे आहे किंवा नेहमी घरात तयार केलेले भोजनच मुलांना द्यायचे आहे किंवा आपल्या मुलाची प्रत्येक गरज त्या क्षणी पूर्ण करायची आहे. परंतु इतके सारे करणे शक्य नाही. एकल मातांनी एका दिवसात त्या काय-काय करू शकतात आणि काय करू शकत नाहीत त्या दृष्टीने वास्तववादी असणे आवश्यक आहे.

आपण स्वत:कडून जास्त अपेक्षा न ठेवणं अधिक योग्य ठरेल. स्वत:लाही ब्रेक द्यायला शिका. उदाहरणासाठी यात काही चुकीचे नाही की रात्रीच्या जेवणात तुम्ही कधीकधी फास्ट फूड किंवा तृणधान्य सर्व्ह करता, तेसुद्धा या अटीवर की मुलाचा एकूण आहार निरोगी असेल. तसेच आवश्यक नाही की आपले घर नेहमीच स्वच्छ आणि व्यवस्थित असले पाहिजे.

आपल्याला मदत करण्यासाठी एखादी मोलकरीण अवश्य ठेवा. आपण काही कामांकडे दुर्लक्षदेखील करू शकता जेणेकरून आपण मुलाबरोबर थोडासा जास्त वेळ घालवू शकाल आणि पुरेशी झोपदेखील घेऊ शकाल.

अपराधभाव बाळगू नका : तुमच्या एकल असल्याचे कारण काहीही असू शकते, याबद्दल मनावर कुठल्याही प्रकारचे ओझे बाळगू नका. आपण बहुतेकदा यामुळे अस्वस्थ असाल की तुम्हाला एकटीलाच खूप काही हाताळावे लागणार आहे किंवा आपल्या एक्सबरोबर कटुतेचा प्रवास आजही चालू आहे किंवा आपण आपल्या मुलाला अजून एक भावंडं देऊ शकत नाही किंवा आपल्या कुटुंबाच्या मोडकळीची भावना आणि आपण एक चांगली पत्नी/आई/सून असल्याचे सिद्ध करू शकला नाहीत.

आपण स्वत:ला दोष देत राहणे हे खूप सोपे आहे, परंतु याचा परिणाम योग्य नसतो. अशा भावना आपल्या मनाला भरकटवतात आणि आपण वर्तमानावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. आपण आज वर्तमानाला महत्त्व दिले तर ते उत्तम होईल. मुलाची अधिक चांगल्याप्रकारे काळजी कशी घ्यावी, त्याला त्याच्या वाटयाचे पूर्ण प्रेम आणि सुरक्षा कशी देता येईल, त्याच्या गरजा कशा पूर्ण करायच्या आणि घरातील वातावरण कसे आनंदी ठेवावे यावर लक्ष द्या.

जीवनात ध्येय बाळगा, सर्वोत्तम बना : आयुष्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी आपण वेळोवेळी स्वत:साठी ध्येय निश्चित करणे महत्वाचे आहे. ही ध्येय १ दिवस, १ आठवडा, १ महिना, कित्येक वर्षे म्हणजेच कितीही कालावधीसाठी असू शकतात. ते कोणत्याही प्रकारच्या आर्थिक, सामाजिक, भावनिक किंवा कौटुंबिक समस्यांशी संबंधित असू शकतात. फक्त त्यांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्या जीवनाकडे वाटचाल करत रहा.

एखादी विशिष्ट पदवी मिळविणे, वजन कमी करणे, एका नवीन नातेबंधात, चांगल्या सोसायटीत शिफ्ट होणे इ. यासारख्या दीर्घकालीन महत्वाकांक्षादेखील आपण जगू शकता. परंतु या सर्व गोष्टींमध्ये संतुलन राखणे महत्वाचे आहे, जेणेकरून आपण आपल्या मुलांसाठीदेखील संपूर्ण वेळ देत राहाल. कधीकधी मुलाला सुट्टीवर घेऊन जा. त्याचा गृहपाठ व प्रकल्प करा. संगीत ऐका, पुस्तके वाचा, व्यायाम करा, त्याच्यासाठी नवीन डिशेस बनव वगैरे.

आपल्या भूतकाळाला स्वत:वर कधीही वरचढ होऊ देऊ नका : एकल मातांनी नेहमीच आपल्या मनाची शांतता व उत्साह टिकवून ठेवणे खूप महत्वाचे आहे आणि आपल्या एक्सशी संबंधित जुन्या कटुतांचा वर्तमानावर परिणाम होऊ देऊ नये. आपल्या भूमिकेस सकारात्मक ठेवावे आणि सर्वकाही विसरून मोकळया मनाने कुठल्याही पश्चातापाशिवाय, दु:ख किंवा लाज न बाळगता आपले नवीन जीवन स्वीकारावे, कारण तुमची मानसिक स्थिती तुमच्या मुलावर थेट परिणाम करेल.

उधळपट्टी टाळा : आपण जास्त पैसे कमवत असाल किंवा कमी, एकट्या पालक म्हणून खर्चावर लगाम घालणे आवश्यक आहे. आपल्याला हे सर्व एकटयालाच करावे लागणार आहे. मुलांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याबरोबरच त्याचे भविष्यही घडवायचं आहे.

आपला खर्च मर्यादित करा. व्यर्थ खर्च टाळा. जीवन विमा, हेल्थकेअर यांमध्ये गुंतवणूक करा. आपण कितीही योजना आखल्या तरीही आपल्याला कधीही अतिरिक्त पैशांची आवश्यकता भासू शकते. कधीही आपली नोकरी सुटू शकते किंवा एखादी आपत्कालीन परिस्थिती ओढवू शकते.

मुलांसाठी विविध योजनांमध्ये गुंतवणूक करत रहा. जेणेकरून आपल्याला नंतर इतरांचे तोंड पाहावे लागू नये.

रोल मॉडेल शोधा : एकल माता आणि त्यांची मुले काहीही अचिव्ह करू शकतात. यासंबंधी शेकडो उदाहरणे आहेत. एकल पालकांची एक यादी बनवा, जेणेकरून तुम्हाला प्रेरणा मिळेल. आपणास माहीत आहे काय की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना त्यांच्या एकल मातेने आणि आजी-आजोबांनीच वाढवले आहे. माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांनादेखील त्यांच्या आईने प्रामुख्याने वाढविले. वस्तुत: भलेही परिस्थिती कठीण असो पण जर उरात जिद्द बाळगली तर ती व्यक्ति यशाच्या आकाशाला स्पर्श करू शकते.

आदर्श आहेत हे सेलिब्रिटी

ती जगासाठी काही असली तरी मुलासाठी ती नेहमी ममतामयी आणि जगाशी लढण्यास तयार आई असते. वास्तविक जीवनात छोटया-मोठया पडद्यावरची अशी काही उदाहरणे आहेत या नायिका –

सुष्मिता सेन : माजी मिस इंडिया आणि मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन वयाच्या ४२ व्या वर्षीही अविवाहित आहेत, परंतु त्यांचे कुटुंब त्यांच्या २ दत्तक घेतलेल्या प्रेमळ मुली पूर्ण करतात. सुष्मिता सेन ही सिंगल मदर असून ती रिनी व अलिशा नावाच्या २ मुली सांभाळत आहे आणि या मुली तिचे प्राधान्य आहेत.

करिश्मा कपूर : करिश्मा कपूरने एकेकाळी चित्रपट जगतात स्वत:चा खास दर्जा बनविला होता. तिचे उद्योगपती संजय कपूर यांच्याशी लग्न झाले होते, जे जास्त काळ टिकू शकले नाहीत आणि दोघे वेगळे झाले. करिश्मा कपूर तिच्या दोन्ही मुलांची जबाबदारी एकटयाने पार पाडत आहे. एक सिंगल मदर या रूपात ती मुलांवर भरपूर प्रेम करते आणि त्यांना मार्गदर्शन करते.

रवीना टंडन : अनिल थडानीशी लग्न करण्यापूर्वी रवीनाने २ मुलींना दत्तक घेतले. आज तिच्याजवळ ४ मुले आहेत, २ आपली आणि २ दत्तक घेतलेली.

कोंकणा सेन : कोंकणा सेन एक यशस्वी आणि धाडसी एकटी आई आहे. रणवीर शौरीपासून विभक्त झाल्यानंतर तिने कामातून ब्रेक घेतला आणि आपल्या मुलांच्या संगोपनाला प्राधान्य दिले.

अमृता सिंग : सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंग यांना २ मुले आहेत. सैफपासून विभक्त झाल्यानंतर ती खूप संयम व परिश्रम करून एकटी आई म्हणून आपल्या मुलांचे संगोपन करत आहे आणि त्यासाठी तिने चित्रपट कारकिर्दीला निरोपही दिला आहे.

नीना गुप्ता : बॉलिवूडमध्ये नीना गुप्ताची ओळख एक यशस्वी एकल आई म्हणून केली जाते, जिने एकटयाने आपली मुलगी मसाबाला वाढवले. आज ती एक प्रसिद्ध डिझाइनर आहे.

सारिका : कमल हासनची पत्नी सारिकाने आपली मुलगी श्रृतीला एकटयानेच वाढवले आहे.

पूनम ढिल्लो : आपल्या काळातील एक सुप्रसिद्ध नायिका आणि मिस इंडिया, पूनम ढिल्लोने चित्रपट निर्माते अशोक ठाकरियाशी लग्न केलं, ज्यामुळे तिला दोन मुले आहेत. पतीबरोबरचे नाते बिघडल्यानंतर ती ज्याप्रकारे एकटयाने आपल्या मुलांना वाढवत आहे, ते प्रशंसनीय आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें