ट्रेंडी आय मेकअपने मास्कमध्येदेखील दिसा सर्वात वेगळे

*  मेकअप आर्टिस्ट शालिनीसोबत मनीषा जनमेजय यांच्याशी केलेल्या बातचीतवर आधारित

कोरोना व्हायरसच्या दरम्यान फेस मास्क एक आवश्यक बाब बनली आहे. आपण सर्वजण मास्कचा वापर करतो, परंतु याचा अर्थ असा नाही की स्त्रियांनी मेकअप करणं सोडून द्यावं. ज्या महिलांनी मास्कमुळे मेकअप करणं सोडलं आहे, त्यांनी आता नाराज होऊ नये. मास्कमुळे नक्कीच नाक आणि तोंड कव्हर होतं, परंतु आपले दोन प्रिय डोळे तर आहेत ना, जे कोणत्याही व्यक्तीच सौंदर्य व्यतीत करतं. तुम्ही तर ऐकलेच असेल की डोळेदेखील मनातील बोलतात. मग काय तुम्ही तुमच्या डोळयांचा मेकअप अशा प्रकारे करा की तुमच्या मनातील गोष्ट मुखाने न बोलता डोळे बोलतील. अशावेळी तुमच्या आय मेकअपवर लक्ष देऊन तुम्ही मास्कमध्येदेखील तुमचा लुक परफेक्ट बनवू शकता.

आयशॅडोसोबत अट्रॅक्टिव्ह लुक

आयशॅडोचा वापर करण्यापूर्वी आयलिडवर प्रायमरचा वापर करा. प्रायमर तुमच्या आयशॅडोला दीर्घकाळ टिकवून ठेवण्यात मदतनीस ठरेल. यानंतर कन्सीलरचा वापर करा. ड्रेसच्या कलरला मॅच करणारं आयशॅडो लावा. आयब्रशने व्यवस्थित पसरवा. तुमच्या पूर्ण आयलिडवर एक सिंगल कलर अॅप्लाय केल्यामुळे तुम्हाला क्लासिक लुक देतं. जर तुम्ही आयशॅडोवर मल्टिपल कलर्स वापरत असाल तर त्यांना एकत्रित ब्लँड करायला विसरू नका. आजच्या ट्रेंडमध्ये ग्लिटरी स्मोकी, डबलशेड आयशॅडो लुक अधिक ट्रेंडी आहे.

आयलॅशेज

जर तुम्हाला वाटतं की तुमच्या पापण्या अधिक दाट आहेत तर बाजारात उपलब्ध चांगल्या ब्रँडच्या आर्टिफिशील आयलॅशेज वापरू शकता. पापण्यांना व्यवस्थित स्टिक करा म्हणजे मेकअपनंतरदेखील त्या निघणार नाहीत.

आयलायनरचा करा वापर

आयलायनर सामान्य डोळयांनादेखील अट्रॅक्टिव्ह बनवतं. म्हणून जेव्हा आयलायनर लावायला सुरुवात कराल तेव्हा वर आयलॅश लाइनच्या मध्यावरून लायनर लावा. शक्य होईल तेवढं लायनर ब्रशला आपल्या आयलॅशेजच्या जवळ ठेवा. असं केल्यामुळे तुम्ही बाहेरच्या कोनापर्यंत सहजपणे लावू शकाल. तुम्ही वॉटरप्रुफ आयलायनर वापरू शकता.

पापण्यांना करा कर्ल

डोळयांना अधिक आकर्षक बनविण्यासाठी तुम्ही तुमच्या पापण्यांना कर्लदेखील करू शकता, कारण हे पापण्यांच्या सौंदर्यासाठी खूपच गरजेचे आहे. नेहमी मस्करा लावण्यापूर्वी पापण्यांना कोंब करा. यामुळे मस्करा व्यवस्थित लावला जाईल, त्याचबरोबर तुमच्या पापण्यादेखील दाट दिसतील.

आयब्रोजनादेखील द्या नवीन लुक

आयब्रोची रेषा व्यवस्थित दिसण्यासाठी बारीक आयब्रो पेन्सिलचा वापर करा. एक गोष्ट लक्षात ठेवा की आयब्रो पेन्सिलचा वापर हलक्या हाताने वरच्या दिशेने करा आणि कधीही मागे फिरवू नका.

स्मोकी आयमेकअप

स्मोकी आय मेकअपसाठी डोळयांवर अगोदर ब्लॅक काजळ आणि आयलायनर लावा. यानंतर ब्लॅक आणि ब्राऊन आयशॅडो एकत्रित मिसळून आयलिडवर लावा. कॉपर कलरने हायलाईटींग करा आणि वरच्या खालच्या पापण्यांवर मस्कारा लावा.

हे आयमेकअप टिप्स फॉलो करून तुम्ही मास्कमध्येदेखील आकर्षक दिसून याल. मग उशीर काय करता आजपासूनच या मेकअप टीप्सचा वापर करा.

आयलायनरच्या लेटेस्ट स्टाइल

– प्रतिनिधी

नवनवीन फॅशन करून पाहणं आवडत असेल तर रेग्यूलर आयलायनर स्टाइलला बायबाय म्हणून आयलायनरच्या लेटेस्ट स्टाइलला आपलेसे करा. हल्ली आयलायनरच्या कोणकोणत्या स्टाइल टे्न्डमध्ये आहेत हे जाणून घेऊ मेकअप आर्टिस्ट मनीष केरकरकडून :

फ्लोरल आयलायनर

डोळ्यांच्या मेकअपमध्ये सूपर कुल लुक देण्यासाठी फ्लोरल आयलायनर हा एक छान पर्याय आहे. आय मेकअपमध्ये बहुतांशी काळे किंवा ब्राऊन शेडचे आयलायनर अधिकीने वापरले जाते. पण फ्लोरल आयलायनर स्टाईलमध्ये पांढऱ्या रंगापासून पिवळा, गुलाबी, लाल, जांभळा असे बोल्ड शेड्स मोठ्या प्रमाणात वापरले जातात.

या रंगीबेरंगी आयलायनर्सनी पापण्यांवर वेगवेगळ्या फुलांची डिझाइन काढली जाते. म्हणून याला फ्लोरल आयलायनर स्टाइल म्हणतात. पूर्ण पापणीवर किंवा दोन्ही पापण्यांच्या सुरूवातीला किंवा टोकाच्या बाजूला फुलांची डिझाइन काढली जाते. आयलायनरची ही स्टाईल डे पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहे. फ्लोरल डिझाइनला योग्य आकार देण्यासाठी पेन आणि लिक्विड आयलायनरचा वापर करा.

क्रिस्टल आयलायनर

तुमच्या डिझायनर डे्सवर परफेक्ट मॅच होण्यासाठी क्रिस्टल आयलायनर हल्लीच फॅशनमध्ये आले आहे. यासाठी सर्वात आधी काळे, ब्राउन किंवा निळे असे घातलेल्या पेहरावाला मॅचिंग असणारे कोणत्याही एका शेडचे आयलायनर पापणीवर व खालीसुद्धा लावू घ्यावे.

हे व्यवस्थित वाळून सेट झाल्यानंतर आयलायनरच्या जवळ किंवा वर गोल्डन किंवा सिल्वर शेडच्या छोट्या छोट्या टिकल्या ओळीत चिकटवा. यामुळे तुमच्या आयलायनरला क्रिस्टल इफेक्ट मिळेल आणि लाइट पडताच तुमचा आयमेकअप चमकू लागेल. लग्नप्रसंगी किंवा नाईट पार्टी, काही विशेष सोहळ्यांसाठीही क्रिस्टल आयलायनर स्टाइल अतिशय बेस्ट आहे.

स्टिक ऑन आयलायनर

जर तुम्हालाही आयलायनरच्या वेगवेगळ्या शेड्स ट्राय करून पाहायच्या असतील, पण कुठल्याही प्रोफेशनलच्या मदतीशिवाय स्वत: वेगळ्या स्टाइलचा आयमेकअप करायची हिंमत होत नसेल किंवा आयलायनरला योग्य आकार देता येत नसेल तर समजून घ्या की स्टिक ऑन आयलायनर खास तुमच्याचसाठी आहे.

बाजारात उपलब्ध वेगवेगळ्या शेड्स आणि डिझाइनचे स्टिक ऑन आयलायनर लावून तुम्ही तुमच्या आय मेकअपला आकर्षक लुक देऊ शकता. यासाठी तुम्हाला फार काही करायची गरज नाही. फक्त आयलायनर स्टिकर पापण्यांवर योग्य जागी चिकटवायचे असते. स्टिक ऑन आयलायनर दिवसा असणाऱ्या कार्यक्रमांऐवजी रात्रीच्या कार्यक्रमात जास्त आकर्षक व उठून दिसते.

कॅन्डी केन आयलायनर

जर तुम्ही मजा मस्तीच्या किंवा सुट्टीच्या मूडमध्ये असाल व तुमच्या आय मेकअपला तुम्हाला वेगळा लुक द्यायचा असेल तर कॅन्डी केन आयलायनरद्वारे तुम्ही आय मेकअपला कॅन्डी केन लुक देवू शकता. या आयलायनर स्टाइलसाठी तुम्हाला फार काही करायचे नाही. फक्त व्हाईट आणि रेड शेड्च्या पेन्सिल, लिक्विड, पेन आयलायनर जे तुम्हाला आवडेल ते खरेदी करा. मग त्यावर रेड शेडच्या आयलायनरने थोड्या थोड्या अंतरावर तिरक्या रेषा बनवा.

डे पार्टी किंवा गेटटुगेदरमध्ये फंकी लुकसाठी कॅन्डी केन आयलायनर लावू शकता. सुंदर लुक दिसणारे हे कॅन्डी केन आयलायनर तेव्हाच लावा, जेव्हा तुमच्या डे्रसचा रंग व्हाईट आणि रेड असेल.

बबल आयलायनर

जर तुम्ही नेहमीसारखे स्टे्ट आयलायनर लावून कंटाळला असाल तर बबल आयलायनर ट्राय करून पाहा. स्टे्ट आयलायनर प्रमाणेच हे आयलायनरही तुम्ही नेहमी लावू शकता. यासाठी नेहमी वापरण्यात येणारे ब्लॅक आयलायनर नेहमीप्रमाणे स्टे्ट न लावता डॉट डॉट करून बबलप्रमाणे बनवावेत म्हणजे ती सरळ लाईन न दिसता वर खाली दिसू लागेल.

तुम्हाला आवडत असेल तर बबलच्या मधोमध व्हाईट पेन आयलायनरने डॉट बनवून त्याला अधिक आकर्षक लुक देऊ शकता. बबल आयलायनर तुम्ही रोज लावू शकता व दैनंदिन आऊटफिटसोबत ते मॅचसुद्धा होते.

रिबन आयलायनर

स्टे्ट, राऊंड आणि फिश कटशिवाय काही वेगळी आयलायनर स्टाइल ट्राय करायची असेल तर रिबन आयलायनर स्टाइल ट्राय करून पाहा. यासाठी वरच्या पापणीवर ब्लॅक लिक्विड वा जेल आयलायनर लावा. आता खालील पापणीवर ब्लॅक आणि ब्राउन किंवा अन्य एखाद्या शेडचे पेन आयलायनर लावा आणि शेवटच्या टोकाला जाताच वर लावलेल्या ब्लॅक आयलायनरला रिबीनप्रमाणे लपेटून लावल्याप्रमाणे लावा.

रिबन आयलायनर स्टाइल तुम्ही कुठल्याही विशेष प्रसंगी किंवा रेग्यूलर दिवशीही लावू शकता. पारंपरिक कपड्यांपेक्षा वेस्टर्नवर हे स्टायलिश दिसते.

ग्लिटर आयलायनर

ग्लिटर लिपस्टिक, ग्लिटर आयशॅडो आणि ग्लिटर हेअर हायलायटर याबरोबरीनेच सध्या ग्लिटर आयलायनरचीसुद्धा चलती आहे. हे पारंपरिक व वेस्टर्न वेअरवरही सूट होते. हे फक्त वर किंवा वर खाली दोन्ही पापण्यांना लावू शकता. केवळ ग्लिटर आयलायनर किंवा ब्लॅक, ब्राऊन, ब्लू यांसारख्या दुसऱ्या शेडचे आयलायनर लावून त्यावरही ग्लिटर आयलायनर लावू शकता.

सिल्वर, गोल्डन याबरोबरच पिंक, ब्लू, पर्पल, रेड, यलो असे शेड्ससुद्धा या ग्लिटर आयलायनरमध्ये उपलब्ध आहेत. आकर्षक दिसण्यासाठी जेल आयलायनर वापरा. नाईट पार्टी किंवा समारंभात मेकअप हायलाइट करण्यासाठी ग्लिटर आयलायनर स्टाइलहून उत्तम पर्याय असूच शकत नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें